Mi Home मुळेच जास्त त्रस्त शाओमी प्रीफर्ड पार्टनर, बोलेले-रोज होत आहे नुकसान

शाओमी भारतातील नंबर वन स्मार्टफोन निर्माता कंपनी बनली आहे. जवळपास 29 टक्के बाजारावर कंपनीचा कब्जा आहे. जरी कंपनी ने ऑनलाइन स्टोरवरून आपल्या फोनची सुरवात केली होती पण वर्ष 2017 मध्ये कंपनी ने ऑफलाइन सेग्मेंट मध्ये पण पाऊल टाकले आणि लवकरच नंबर एकचे स्थान मिळवले कारण भारतात आज पण ऑफलाइन बाजार मोठा आहे. अलीकडे कंपनी ने माहिती दिली आहे कि ऑफलाइन बाजारात पण शाओमीचा मार्केट शेयर 20 टक्क्यांपर्यंत पोचला आहे. परंतु परिस्थिती आता बदलत आहे जी शाओमीसाठी जरी योग्य असली तरी त्या ऑफलाइन रिटेल पार्टनर्ससाठी चांगली नाही ज्यांच्या जीवावर कंपनी नंबर एक बनली आहे.

शाओमी ने वर्ष 2017 मध्ये ऑफलाइन रिटेल साठी प्रीफर्ड पार्टनरची सुरवात केली होती आणि आज जेव्हा हे प्रीफर्ड पार्टनर त्रासले आहेत तेव्हा आम्ही त्यांच्याशी बोललो. भारतात ऑफलाइन सेल्स वाढवण्यासाठी चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी ने अलीकडेच भारतात 1,000वा मी होम स्टोर उघडला आहे. तसेच कंपनी म्हणते कि ती वर्षाच्या शेवटी संपूर्ण देशात मी होम स्टोर्सची संख्या 10,000 करेल आणि हीच रणनीती प्रीफर्ड पार्टनर साठी परेशानीचे कारण बनत आहे.

आम्ही स्वतः दिल्लीतील दोन अशा मी प्रीफर्ड पार्टनर कडे गेलो, ज्यांच्या दुकानापासून जवळपास 500 मीटरवर कंपनी ने आपला नवीन मी होम स्टोर उघडला आहे. यातील एक प्रीफर्ड पार्टनरने आपले नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले कि आमची स्पर्धा फक्त मी प्रीफर्ड पार्टनरशी होती. पण आता मी होम स्टोरची संख्या जास्त झाल्यामुळे कॉम्पिटिशन वाढले आहे. मी प्रीफर्ड पार्टनर स्टोरचे मालक म्हणतात कि कंपनी ने आमच्या जीवावर ऑफलाइन मार्केट मध्ये आपली जागा बनवली आणि आज आमचेच नुकसान होत आहे.

स्टोर मालक म्हणतात कि कंपनीने आम्हाला आधीच सांगितले होते कि येत्या काळात अजून मी होम स्टोर ओपन केले जातील पण आमच्या शॉप पासून 500 मीटरवरच ओपन होईल याची माहिती नव्हती. ते म्हणतात कि आमच्या पासून एक किलोमीटर मध्ये जवळपास 24 मोबाईल शॉप आहेत, ज्यात शाओमी फोन विकणारे दोन मी प्रीफर्ड पार्टनर आणि एक मी होम स्टोरे आहे. त्यामुळे कॉम्पिटशन वाढणार हे निश्चित.

पण हि काही पहिली वेळ नाही जेव्हा मी प्रीफर्ड पार्टनर स्टोर्स मालकांना त्रास झाला आहे. याआधी पण काही मी प्रीफर्ड पार्टनरनी याची माहिती दिली आहे. अलीकडेच शाओमी ने रेडमी नोट 7, रेडमी नोट 7 प्रो, रेडमी वाई 3 आणि रेडमी 7 सारखे फोन सादर केले आहेत. सुरवातीपासून हे फोन ऑनलाइन स्टोर सोबत ऑफलाइन स्टोर वर उपलब्ध केले जात आहेत. पण या फोन्सची मोठी मागणी मी प्रीफर्ड स्टोर मालक पुरी करू शकत नाहीत कारण ते म्हणतात कि आमच्याकडे स्टॉक नसताना फोन विकावा कसा. या फोनची डिमांड पाहता हा फोन तुम्हाला मी होम स्टोर वर मिळू शकतो.पण शाओमी प्रीफर्ड पार्टनर स्टोर वर मिळने अशक्य आहे.

याबाबत दिल्लीच्या एका शाओमी प्रीफर्ड पार्टनर ने सांगितले कि सध्या मार्केट मध्ये सर्वात जास्त डिमांड रेडमी नोट 7 प्रो ची आहे. पण याचा स्टॉक नसणे आमच्यासाठी मोठी अडचण आहे. जवळपास दोन महिन्यांपूर्वी रेडमी नोट 7 सीरीजचा फोन लॉन्च झाला आहे. पण अजूनही मोठ्या मुश्किलीने Redmi Note 7 Pro चे 5-6 यूनिट सेल साठी मिळाले आहेत, ज्यात सर्व ग्राहकांना फोन देणे जमत नाही. तसेच 500 मीटरवरील मी होम स्टोर वर कमी किंमतीत मिळत असल्यामुळे ग्राहक आमच्याकडे कमी येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here