OnePlus 8 चा रियल फोटो आला समोर, बघा का असेल हा ब्रँडचा सर्वात वेगळा आणि एडवांस स्मार्टफोन

OnePlus त्या ब्रँड्स पॅकी एक आहे, जो निवडक स्मार्टफोन्सच्या जीवावर मोबाईल मार्केटच्या मोठ्या हास्यवर राज्य करतो. OnePlus चे स्मार्टफोन हाईएंड स्पेसिफिकेशन्स सह येतात ज्यांची किंमत पण कमी असते. याच कारणांमुळे OnePlus ला फ्लॅगशिप कीलर म्हटले जाते. OnePlus 7 आणि OnePlus 7T च्या यशानंतर आता कंपनीची नजर OnePlus 8 वर आहे, जो ब्रँडचा आतापर्यंतचा सर्वात पावरफुल स्मार्टफोन असेल. तसे OnePlus 8 बद्दल आतापर्यंत अनेक लीक्स समोर आले आहेत, पण या आठवड्यात OnePlus 8 चा खरा फोटो पण इंटरनेट वर वायरल झाला आहे.

OnePlus 8 ची खरी ईमेज समोर आली आहे. फोनचा फोटो टिपस्टर स्लॅशलीकने पोस्ट केला आहे ज्यात एक व्यक्ति हा स्मार्टफोन वापरत आहे. फोनच्या एका फोटो मध्ये OnePlus 8 यूजरच्या हातात आहे ज्यात फोनचा फ्रंट पॅनल दिसत आहे तसेच दुसऱ्या फोटो मध्ये तोच फोन टेबल वर उलटा ठेवण्यात आला आहे. दुसऱ्या फोटो मध्ये फोनच्या बॅक पॅनलची झलक मिळाली आहे ज्यावरून रियर कॅमेरा सेटअप डिजाईनचा खुलासा झाला आहे.

असा असेल OnePlus 8 चा लुक

फ्रंट पॅनल

1. OnePlus 8 च्या फ्रंट पॅनल वर डुअल पंच-होल देण्यात आला आहे.

2. हा पंच-होल डिजाईन स्क्रीनच्या वरच्या उजव्या बाजूला आहे.

3. खास बाब अशी कि हा डुअल पंच-होल पूर्णपणे उजव्या बाजूला नाही तर पंच होल आणि राईट एजच्या मध्ये जागा आहे.

4. OnePlus 8 च्या पंच-होल आणि राईट एज मध्ये नोटिफिकेशन्स आईकन फ्लॅश होत आहेत.

5. OnePlus 8 मध्ये कर्व्ड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो उजव्या आणि डाव्या दोन्ही बाजुंनी बॅक पॅनलच्या दिशेला वाकलेला आहे.

6. OnePlus 8 मध्ये चिन पार्ट दिसत नाही. कदाचित हा फोन फुलव्यू डिस्प्ले सह लॉन्च केला जाऊ शकतो.

रियर पॅनल

7. OnePlus 8 च्या बॅक पॅनल वर रियर कॅमेरा सेटअपच्या मध्ये देण्यात आला आहे जो वर्टिकल शेप मध्ये आहे.

8. फोनच्या रियर कॅमेरा सेटअप मध्ये तीन कॅमेरा सेंसर आणि एक फ्लॅश लाईट आहे.

9. रियर पॅनल वर मधोमध OnePlus ची ब्रँडिंग आहे. इथे कोणताही फिंगरप्रिंट सेंसर नाही.

10. OnePlus 8 च्या बॅक पॅनल वरच खालच्या बाजूला 5G पण लिहिण्यात आले आहे. म्हणजे हा फोन 5जी कनेक्टिविटी सह येईल.

साईड व लोवर पॅनल

11. OnePlus 8 च्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे.

12. फोनच्या लोवर पॅनल वर तीन कट आउट आहेत.

13. यात मधोमध यूएसबी टाईप सी पोर्ट देण्यात आला आहे.

14. यूएसबी पोर्टच्या उजवीकडे स्पीकर आणि डावीकडे 3.5एमएम जॅक आहे.

15. OnePlus 8 या फोटो मध्ये पर्पल कलर शेड मध्ये दिसत आहे.

OnePlus 8 स्पेसिफिकेशन्स

फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता आता पर्यंत समोर आलेल्या लीक्सनुसार OnePlus 8 मध्ये 12 जीबी रॅम मिळू शकतो. तसेच प्रोसेसिंग साठी या डिवाईस मध्ये क्वॉलकॉमचा सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 865 दिला जाऊ शकतो. विशेष म्हणजे क्वॉलकॉम आगामी काळात हा चिपसेट लॉन्च करेल. तसेच OnePlus 8 कंपनी 120हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेल्या एमोलेड डिस्प्ले सह लॉन्च करू शकते. पण तरीही OnePlus 8 च्या अधिकृत माहितीसाठी वाट बघावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here