Oneplus 7T - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 26 Nov 2019 05:39:13 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 OnePlus 7 Pro आणि OnePlus 7T वर मिळत आहे 10,000 रुपयांपर्यंतची सूट, विकत घेण्याची हि आहे सर्वोत्तम संधी https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7-pro-7t-available-for-purchase-with-discount-upto-10000-on-amazon-india/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7-pro-7t-available-for-purchase-with-discount-upto-10000-on-amazon-india/#respond Tue, 26 Nov 2019 05:39:13 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5865 सेल अंतर्गत OnePlus 7T चा हा वेरिएंट 34,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल

The post OnePlus 7 Pro आणि OnePlus 7T वर मिळत आहे 10,000 रुपयांपर्यंतची सूट, विकत घेण्याची हि आहे सर्वोत्तम संधी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OnePlus फ्लॅगशिप कीलर म्हणून ओळखली जाते. OnePlus चे नाव त्या ब्रँडस मध्ये येते जे निवडक स्मार्टफोन्सच्या जीवावर आपले नाव हिट केले आहे आणि चांगलीच फॅन फॉलोइंग बनवली आहे. OnePlus ने भारतात पाच वर्ष पूर्ण केले आहेत. आपले यश साजरे करत OnePlus ने आपल्या फॅन्स साठी पण खास भेट देण्याची तयारी केली आहे. आपल्या पाचव्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने OnePlus ब्रँडच्या लेटेस्ट व हिट स्मार्टफोन्स 10,000 रुपयांपर्यंतच्या डिस्काउंट सह विकले जात आहेत.

OnePlus ने आपल्या पाचव्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने अमेझॉन इंडिया सोबत भागेदारी केली आहे आणि ‘फाइव इयर सेल’ ची सुरवात केली आहे. OnePlus चा हा फोन आज म्हणजे 25 नोव्हेंबर पासून सुरु झाला आहे जो येत्या 2 डिसेंबर पर्यंत सुरु राहील. OnePlus ने या सेल अंतर्गत OnePlus 7 Pro आणि OnePlus 7T स्मार्टफोन वर 10,000 रुपयांपर्यंतचा भरभक्कम डिस्काउंट दिला आहे. त्याचबरोबर बँक कार्ड सह यूजर्सना अतिरिक्त कॅशबॅक पण मिळत आहे.

OnePlus 7 Pro बद्दल बोलायचे तर हा स्मार्टफोन भारतात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला होता. फोनचा 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज वेरिएंट कंपनीने 48,999 रुपयांमध्ये लॉन्च केला होता, पण ऑफर अंतर्गत हा वेरिएंट 39,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे OnePlus 7 Pro चा 8 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेज वेरिएंट कंपनीने 52,999 रुपयांमध्ये लॉन्च केला होता पण हा वेरिएंट सेल अंतर्गत 42,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

OnePlus 7T बद्दल बोलायचे तर या स्मार्टफोनचा बेस वेरिएंट 8 जीबी रॅम व 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जो 37,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. पण सेल अंतर्गत OnePlus 7T चा हा वेरिएंट 34,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचप्रमाणे 39,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला OnePlus 7T चा 8 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेज वेरिएंट सेल अंतर्गत अमेझॉन इंडिया वरून 37,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

भरभक्कम डिस्काउंट सोबत OnePlus 7 Pro आणि OnePlus 7T एचडीएफसी बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास अमेझॉन थेट 2,000 रुपयांची अतिरिक्त सूट पण देत आहे. तसेच हे दोन्ही पावरफुल स्मार्टफोन 6 महिन्याच्या नो कॉस्ट ईएमआई सह शॉपिंग साइट वर खरेदीसाठी उपलब्ध आहेत.

The post OnePlus 7 Pro आणि OnePlus 7T वर मिळत आहे 10,000 रुपयांपर्यंतची सूट, विकत घेण्याची हि आहे सर्वोत्तम संधी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7-pro-7t-available-for-purchase-with-discount-upto-10000-on-amazon-india/feed/ 0
OnePlus 8 चा रियल फोटो आला समोर, बघा का असेल हा ब्रँडचा सर्वात वेगळा आणि एडवांस स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8-real-photo-image-leaked-front-back-panel-dual-punch-hole-rear-camera-3-5mm-audio-jack/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8-real-photo-image-leaked-front-back-panel-dual-punch-hole-rear-camera-3-5mm-audio-jack/#respond Mon, 11 Nov 2019 10:20:57 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5740 प्रोसेसिंग साठी या डिवाईस मध्ये क्वॉलकॉमचा सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 865 दिला जाऊ शकतो.

The post OnePlus 8 चा रियल फोटो आला समोर, बघा का असेल हा ब्रँडचा सर्वात वेगळा आणि एडवांस स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OnePlus त्या ब्रँड्स पॅकी एक आहे, जो निवडक स्मार्टफोन्सच्या जीवावर मोबाईल मार्केटच्या मोठ्या हास्यवर राज्य करतो. OnePlus चे स्मार्टफोन हाईएंड स्पेसिफिकेशन्स सह येतात ज्यांची किंमत पण कमी असते. याच कारणांमुळे OnePlus ला फ्लॅगशिप कीलर म्हटले जाते. OnePlus 7 आणि OnePlus 7T च्या यशानंतर आता कंपनीची नजर OnePlus 8 वर आहे, जो ब्रँडचा आतापर्यंतचा सर्वात पावरफुल स्मार्टफोन असेल. तसे OnePlus 8 बद्दल आतापर्यंत अनेक लीक्स समोर आले आहेत, पण या आठवड्यात OnePlus 8 चा खरा फोटो पण इंटरनेट वर वायरल झाला आहे.

OnePlus 8 ची खरी ईमेज समोर आली आहे. फोनचा फोटो टिपस्टर स्लॅशलीकने पोस्ट केला आहे ज्यात एक व्यक्ति हा स्मार्टफोन वापरत आहे. फोनच्या एका फोटो मध्ये OnePlus 8 यूजरच्या हातात आहे ज्यात फोनचा फ्रंट पॅनल दिसत आहे तसेच दुसऱ्या फोटो मध्ये तोच फोन टेबल वर उलटा ठेवण्यात आला आहे. दुसऱ्या फोटो मध्ये फोनच्या बॅक पॅनलची झलक मिळाली आहे ज्यावरून रियर कॅमेरा सेटअप डिजाईनचा खुलासा झाला आहे.

असा असेल OnePlus 8 चा लुक

फ्रंट पॅनल

1. OnePlus 8 च्या फ्रंट पॅनल वर डुअल पंच-होल देण्यात आला आहे.

2. हा पंच-होल डिजाईन स्क्रीनच्या वरच्या उजव्या बाजूला आहे.

3. खास बाब अशी कि हा डुअल पंच-होल पूर्णपणे उजव्या बाजूला नाही तर पंच होल आणि राईट एजच्या मध्ये जागा आहे.

4. OnePlus 8 च्या पंच-होल आणि राईट एज मध्ये नोटिफिकेशन्स आईकन फ्लॅश होत आहेत.

5. OnePlus 8 मध्ये कर्व्ड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो उजव्या आणि डाव्या दोन्ही बाजुंनी बॅक पॅनलच्या दिशेला वाकलेला आहे.

6. OnePlus 8 मध्ये चिन पार्ट दिसत नाही. कदाचित हा फोन फुलव्यू डिस्प्ले सह लॉन्च केला जाऊ शकतो.

रियर पॅनल

7. OnePlus 8 च्या बॅक पॅनल वर रियर कॅमेरा सेटअपच्या मध्ये देण्यात आला आहे जो वर्टिकल शेप मध्ये आहे.

8. फोनच्या रियर कॅमेरा सेटअप मध्ये तीन कॅमेरा सेंसर आणि एक फ्लॅश लाईट आहे.

9. रियर पॅनल वर मधोमध OnePlus ची ब्रँडिंग आहे. इथे कोणताही फिंगरप्रिंट सेंसर नाही.

10. OnePlus 8 च्या बॅक पॅनल वरच खालच्या बाजूला 5G पण लिहिण्यात आले आहे. म्हणजे हा फोन 5जी कनेक्टिविटी सह येईल.

साईड व लोवर पॅनल

11. OnePlus 8 च्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे.

12. फोनच्या लोवर पॅनल वर तीन कट आउट आहेत.

13. यात मधोमध यूएसबी टाईप सी पोर्ट देण्यात आला आहे.

14. यूएसबी पोर्टच्या उजवीकडे स्पीकर आणि डावीकडे 3.5एमएम जॅक आहे.

15. OnePlus 8 या फोटो मध्ये पर्पल कलर शेड मध्ये दिसत आहे.

OnePlus 8 स्पेसिफिकेशन्स

फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता आता पर्यंत समोर आलेल्या लीक्सनुसार OnePlus 8 मध्ये 12 जीबी रॅम मिळू शकतो. तसेच प्रोसेसिंग साठी या डिवाईस मध्ये क्वॉलकॉमचा सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 865 दिला जाऊ शकतो. विशेष म्हणजे क्वॉलकॉम आगामी काळात हा चिपसेट लॉन्च करेल. तसेच OnePlus 8 कंपनी 120हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेल्या एमोलेड डिस्प्ले सह लॉन्च करू शकते. पण तरीही OnePlus 8 च्या अधिकृत माहितीसाठी वाट बघावी लागेल.

The post OnePlus 8 चा रियल फोटो आला समोर, बघा का असेल हा ब्रँडचा सर्वात वेगळा आणि एडवांस स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8-real-photo-image-leaked-front-back-panel-dual-punch-hole-rear-camera-3-5mm-audio-jack/feed/ 0
8 जीबी रॅम आणि एंडरॉयड 10 सह समोर आला OnePlus 7T, 26 सप्टेंबरला होईल भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7t-8gb-ram-android-10-geekbench-listing-oneplus-hd1903-26-september-india-launch/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7t-8gb-ram-android-10-geekbench-listing-oneplus-hd1903-26-september-india-launch/#respond Thu, 19 Sep 2019 13:12:56 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5357 OnePlus 7T ला सिंगल कोर मध्ये 791 तसेच मल्टी कोर मध्ये 2955 स्कोर देण्यात आला आहे.

The post 8 जीबी रॅम आणि एंडरॉयड 10 सह समोर आला OnePlus 7T, 26 सप्टेंबरला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OnePlus ने सांगितले आहे कि कंपनी टेक मंचावर आपल्या फ्लॅगशिप अंतर्गत नवीन स्मार्टफोन आणणार आहे. कंपनी येत्या 26 सप्टेंबरला भारतात एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंटच्या मंचावरून जगासमोर OnePlus 7T सादर केला जाईल. काही दिवसांपूर्वी OnePlus चे CEO Pete Lau ने या स्मार्टफोनचा फोटो शेयर केला होता ज्यावरून OnePlus 7T च्या लुक आणि डिजाईनची माहिती मिळाली होती. आता OnePlus 7T बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर पण लिस्ट करण्यात आला आहे ज्यावरून फोनच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे.

OnePlus 7T चीनी बेंचमार्किंग साइट वर OnePlus HD1903 मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. गीकबेंचची हि लिस्टिंग काल म्हणजे 18 सप्टेंबरची आहे. या लिस्टिंग मध्ये फोनच्या नावचा खुलासा केला नाही पण बोलले जात कि हा स्मार्टफोन OnePlus 7T नावाने मार्केट मध्ये येईल. गीकबेंच वर OnePlus चा हा स्मार्टफोन 8 जीबी च्या पावरफुल रॅम सह दाखवण्यात आला आहे.

गीकबेंच वर कथित OnePlus 7T एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 सह दाखवण्यात आला आहे वहीं प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन चिपसेट असण्याचे स्पष्ट झाले आहे. आशा आहे कि OnePlus 7T मध्ये स्नॅपड्रॅगॉन 855 प्लस चिपसेट मिळेल. गीकबेंच लिस्टिंग नुसार OnePlus 7T मध्ये 1.78गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असेलला आक्टाकोर प्रोसेसर दिला जाईल. स्कोरिंग बद्दल बोलायचे तर OnePlus 7T ला सिंगल कोर मध्ये 791 तसेच मल्टी कोर मध्ये 2955 स्कोर देण्यात आला आहे.

हे देखील वाचा: 48 MP कॅमेऱ्यासह भारतात लॉन्च झाला Nokia 7.2, जाणून घ्या याची खासियत

OnePlus 7T डिजाईन

मागच्या भागाची डिजाइन तर लीक झालेल्या फोटोज सारखी आहे. फोनच्या मागे सर्कुलर कॅमेरा सेटअप असेल, ज्यात तीन कॅमेरा सेंसर हॉरिजोंटली आहेत आणि एक फ्लॅश लाइट त्या कॅमेरा सेंसरच्या खाली आहे. डिवाइस मध्ये कॅमेरा सेटअपच्या खाली कंपनीचा लोगो आणि बॉटमला कंपनीचे नाव आहे. अजूनतरी डिवाइसच्या फ्रंटचे फोटो आले नाही पण लीक झालेल्या फोटोजच्या आधारवर म्हणता येईल कि फोन मध्ये पॉप-अप कॅमेरा असेल.

OnePlus 7T स्पेसिफिकेशन्स

आता पर्यंत समोर आलेल्या रिपोर्ट्स नुसार फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 855+ चिपसेट असेल. त्याचबरोबर यात 6.55-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असेल. फोन मध्ये 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असेल. अफवा पाहता फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप 48 मेगापिक्सल सेंसर, 12 मेगापिक्सल टेलीफोटो सह 2x झूम आणि अल्ट्रा-वाइड 16-मेगापिक्सल सेंसर आहे. सेल्फी साठी हँडसेट मध्ये 16-मेगापिक्सलचा सेंसर असेल. तसेच फोन मध्ये पावर बॅकअप साठी 3,800mAh बॅटरी Warp चार्ज 30T, एंडरॉयड 10 बेस्ड ऑक्सिजनओएस सह नवीन माइक्रो मोड पण असेल.

हे देखील वाचा: OPPO K5 होने वाला आहे लॉन्च, VOOC 4.0 टेक्नॉलॉजी सह Redmi K20 Pro ला देईल टक्कर

OnePlus TV

आता पर्यंत समोर आलेल्या माहिती नुसार OnePlus TV 55-इंचाच्या स्क्रीन साइज सह येईल. तसेच यात QLED डिस्प्ले दिला जाईल. इतकेच नव्हे तर, कंपनीने स्पष्ट इशारा केला होता कि याच्या एका वेरिएंट मध्ये 4K रेजॉलूशन असेल. कंपनी द्वारा कन्फर्म करण्यात आलेल्या फीचर्स नुसार यात डॉल्बी विजन टेक्नॉलजी दिली जाईल. हा HDR 10 चा अपग्रेडेड वेरियंट आहे. तसेच वनप्लस टीवी मध्ये 8 इन-बिल्ट स्पीकर असतील. हे स्पीकर 50 वॉट पावर सह येतील. पावरफुल साउंड क्वॉलिटी साठी डॉल्बी ऐटमॉस सपॉर्ट देण्यात आला आहे.

The post 8 जीबी रॅम आणि एंडरॉयड 10 सह समोर आला OnePlus 7T, 26 सप्टेंबरला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7t-8gb-ram-android-10-geekbench-listing-oneplus-hd1903-26-september-india-launch/feed/ 0
OnePlus 7T आणि OnePlus TV होतील 26 सप्टेंबरला लॉन्च, 7T Pro पण होऊ शकतो सादर https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7t-and-tv-is-launching-in-india-on-september-26th/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7t-and-tv-is-launching-in-india-on-september-26th/#respond Tue, 17 Sep 2019 10:55:45 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5328 वनप्लस 7 प्रो प्रमाणे वनप्लस 7टी पण 90 हर्ट्ज डिस्प्ले सह येईल.

The post OnePlus 7T आणि OnePlus TV होतील 26 सप्टेंबरला लॉन्च, 7T Pro पण होऊ शकतो सादर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OnePlus 7T आणि 7T Pro खूप चर्चेत आहेत. आता कंपनीने मीडिया इनवाइट शेयर करून अशी माहिती दिली आहे कि OnePlus 7T 26 सप्टेंबरला सादर केला जाईल. त्याचदिवशी कंपनी आपली पहिली फ्लॅगशिप स्मार्ट टीव्ही पण जगासमोर लॉन्च करेल. या इवेंट मध्ये OnePlus 7T Pro लॉन्च केला जाईल कि नाही याची कंपनीने माहिती दिली नाही. तर काही दिवसांपूर्वी OnePlus ने अधिकृत ट्विटर हँडल वरून ट्विट करून सांगितले होते कि वनप्लस 7टी सीरीज लावरच समोर येईल.

26 सप्टेंबरला नवी दिल्ली मध्ये इवेंटचे आयोजन इंदिरा गांधी एरिना मध्ये केले जाईल. त्यानंतर दोन आठवडयांनी कंपनी 10 ऑक्टोबरला OnePlus 7T Pro सादर करेल. दिल्ली मध्ये आयोजित इवेंट संध्याकाळी 7 वाजता होईल, ज्यासाठी 20 सप्टेंबर सकाळी 10 वाजल्यापासून तिकीट मिळण्यास सुरवात होईल. या इवेंटची तिकीट 999 रुपये असेल. तिकीट कंपनीच्या वेबसाइट वर जाऊन विकत घेता येईल. दोन्ही फोन सोबत OnePlus TV बद्दल काही दिवसांपासून माहिती लीक झाली आहे. तसेच कंपनीने स्वतः असा खुलासा केला आहे कि वनप्लस 7 प्रो प्रमाणे वनप्लस 7टी पण 90 हर्ट्ज डिस्प्ले सह येईल. चला दोन्ही फोन आणि टीव्हीचे लीक स्पेसिफिकेशन्स पाहूया.

हे देखील वाचा: लॉन्चच्या आधीच समोर आली डुअल पॉप-अप सेल्फी कॅमेरा असेलेल्या Vivo V17 Pro ची किंमत, 20 सप्टेंबरला आहे भारतातील लॉन्च

OnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स

आता पर्यंत समोर आलेल्या माहिती नुसार OnePlus TV 55-इंचाच्या स्क्रीन साइज सह येईल. यात QLED डिस्प्ले दिला जाईल. इतकेच नव्हे तर कंपनीने असे संकेत दिले आहेत कि याच्या एका वेरिएंट मध्ये 4K रेजॉलूशन असेल.

तसेच कंपनीने कन्फर्म केलेले फीचर्स पाहता यात डॉल्बी विजन टेक्नॉलजी दिली जाईल. हा HDR 10 चा अपग्रेडेड वेरियंट आहे. तसेच वनप्लस टीव्ही मध्ये 8 इन-बिल्ट स्पीकर असतील. हे स्पीकर 50 वॉट पावर सह येतील. पावरफुल साउंड क्वॉलिटी साठी डॉल्बी ऐटमॉस सपॉर्ट देण्यात आला आहे.

OnePlus 7T चे स्पेसिफिकेशन्स

OnePlus 7T चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात स्नॅपड्रॅगॉन 855+ चिपसेट असेल. त्याचबरोबर यात 6.55-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असेल. फोन मध्ये 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असेल. असे बोलले जात आहे कि फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप 48 मेगापिक्सल सेंसर, 12 मेगापिक्सल टेलीफोटो सह 2x झूम आणि अल्ट्रा-वाइड 16-मेगापिक्सल सेंसर असेल. सेल्फी साठी हँडसेट मध्ये 16-मेगापिक्सलचा सेंसर असेल. तसेच फोन मध्ये पावर बॅकअप साठी 3,800mAh बॅटरी Warp चार्ज 30T, एंडरॉयड 10 बेस्ड ऑक्सिजनओएस सह नवीन माइक्रो मोड पण असेल.

हे देखील वाचा: Xiaomi ने भारतात सादर केले 4 नवीन स्मार्ट टीव्ही, Mi TV 4X सह स्टाईलिश Mi Smart Band 4 पण झाला लॉन्च

OnePlus 7T Pro स्पेसिफिकेशन्स

OnePlus 7T Pro बद्दल बोलायचे तर यात 6.65-इंचाचा QHD+ AMOLED डिस्प्ले असेल, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz, HDR10+ सपोर्ट आणि बिल्ट-इन फिंगरप्रिंट सेंसर असेल. त्याचबरोबर फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 855+ चिपसेट आणि 8 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेज दिला जाईल. रियर कॅमेरा पाहता यात पण ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल, ज्यात 48 मेगापिक्सल सेंसर, 8 मेगापिक्सल टेलीफोटो यूनिट सह 3x झूम व 16 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड सेंसर असेल. फोन मध्ये 4,085 एमएएच ची बॅटरी असेल.

वनप्लस 7टी प्रो वीडियो

The post OnePlus 7T आणि OnePlus TV होतील 26 सप्टेंबरला लॉन्च, 7T Pro पण होऊ शकतो सादर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7t-and-tv-is-launching-in-india-on-september-26th/feed/ 0
लॉन्चच्या आधी आली Oneplus 7T ची डिजाइन समोर, ट्रिपल कॅमेऱ्यासह साथ लॉन्च होईल हा फोन https://www.91mobiles.com/marathi/first-render-image-of-oneplus-7t/ https://www.91mobiles.com/marathi/first-render-image-of-oneplus-7t/#respond Mon, 26 Aug 2019 10:24:56 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5117 आज या फोनची पहिली रेंडर इमेज समोर आली आहे ज्यात फोनचा लुक आणि स्टाइल दिसते.

The post लॉन्चच्या आधी आली Oneplus 7T ची डिजाइन समोर, ट्रिपल कॅमेऱ्यासह साथ लॉन्च होईल हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वनप्लस ने भारतात आपला पहिला फोन Oneplus 1 नावाने आणला होता. त्यावेळी कंपनी वर्षातून एकच फोन लॉन्च करत होती. परंतु 2017 मध्ये कंपनीने Oneplus 3 सादर केला आणि त्यानंतर काही महिन्यांनी कंपनीने याचा अपग्रेड मॉडेल Oneplus 3T आणला. त्यानंतर Oneplus 5 नंतर Oneplus 5T आणि Oneplus 6 नंतर त्याच वर्षी कंपनीने Oneplus 7T पण सादर केला होता. आता यावर्षी मे मध्ये Oneplus 7 आणला आहे आणि काही दिवसानंतरच Oneplus 7T ची चर्चा सुरु झाली होती. बातमी अशी आहे कि कंपनी सप्टेंबर मधेच 7T आणि 7T Pro मॉडेल सादर करू शकते. आज या फोनची पहिली रेंडर इमेज समोर आली आहे ज्यात फोनचा लुक आणि स्टाइल दिसते.

Oneplus 7T चा हा रेंडर प्राइसबाबा वेबसाइट ने प्रकाशित केला आहे आणि हे जगातील प्रमुख टिपस्टर ऑनलिक्सच्या मदतीने बनवण्यात आला आहे. बोलले जात आहे कि वनप्लस 7टी कंपनी पुढल्या महिन्यात सादर करू शकते. हा फोन वनप्लस टीव्ही सोबत 26 नोव्हेंबरला लॉन्च केला जाऊ शकतो. वेबसाइटने या फोनच्या रेंडर ईमेज सोबत 360 डिग्री वीडियो पण प्रकाशित केला आहे. त्याचबरोबर ऑनलिक्स ने असे पण सांगितले कि 6T प्रमाणे 7T मध्ये पण मॅकलरेन (सेना) एडिशन कंपनी लॉन्च करेल.

कशी असेल Oneplus 7T ची डिजाइन

फोटोमध्ये दिसत आहे कि Oneplus 7T च्या बॅक पॅनलवर यावेळी गोल रिंग मध्ये ट्रिपल कॅमेरा मिळेल. याआधी मोटोरोला फोन मध्ये आपण गोल रिंग मध्ये कॅमेरा सेंसर बघितला आहे. वनप्लसचा अंदाज थोडा वेगळा आहे. गोल सर्कल मध्ये होरिजेंटल स्टाइल मध्ये कॅमेरे आहेत. डावीकडील आणि उजवीकडील कॅमेऱ्यांसाठी बाणाचे चिन्ह बनवण्यात आले आहे त्याच्या आत जिथे दोन्ही बाण एकत्र येतात तिथे मधला कॅमेरा आहे. कॅमेऱ्याच्या खाली एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे. फोनचा मागील पॅनल थोडा कर्व्ड आहे आणि हा ग्लासचा आहे. याआधी Oneplus 7 मध्ये पण अशी डिजाइन देण्यात आली होती. कंपनी लोगो फोनच्या बॉडीच्या मधोमध आहे.

फ्रंट पॅनल पाहता यात तुम्हाला वी शेप वॉटर ड्रॉप नॉच मिळेल जी फ्लॅट डिस्प्ले सह येते. लीक मध्ये असे सांगण्यात आले आहे कि फोन मध्ये 6.5-इंचाची स्क्रीन मिळेल. राहिला प्रश्न डायमेंशनचा तर 161.2 x 74.5 x 8.3 एमएम आहे आणि फ्रंटला सिंगल सेल्फी कॅमेरा आहे. फोन मध्ये पावर बार अलर्ट बटण उजवीकडे देण्यात आला आहे तर डावीकडे वॉल्यूम रॉकर आहे. तसेच खाली तुम्हाला यूसबी टाइप-सी पोर्ट मिळेल. खालीच लाउडस्पीकर ग्रिल आणि सिम कार्ड ट्रे उपलब्ध आहे.

Oneplus 7T स्पेसिफिकेशन

फोनचे स्पेसफिकेशन पाहता काही खास माहिती मिळाली नाही पण मागील काही लीकनुसार हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855+ चिपसेट सह सादर केला जाऊ शकतो. तसेच फोन मध्ये 8जीबी रॅम आणि 256जीबी इंटरनल मेमरी मिळू शकते. कंपनी फुल एचडी+ एमोलेड स्क्रीनचा वापर करू शकते.

The post लॉन्चच्या आधी आली Oneplus 7T ची डिजाइन समोर, ट्रिपल कॅमेऱ्यासह साथ लॉन्च होईल हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/first-render-image-of-oneplus-7t/feed/ 0