Xiaomi ने भारतात सादर केले 4 नवीन स्मार्ट टीव्ही, Mi TV 4X सह स्टाईलिश Mi Smart Band 4 पण झाला लॉन्च

Xiaomi ने वर्षाच्या सुरवातीला भारतात आपल्या स्मार्ट टेलीविजनचा प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत ‘4X सीरीज’ सादर केली होती. या सीरीजअंतर्गत कंपनीने Mi LED TV 4X PRO स्मार्टटीव्ही लॉन्च केली होती. हि एक 4K HDR Smart TV होती जी भारतीय यूजर्सना खूप आवडली. आज या सीरीज अंतर्गत Xiaomi ने अजून एक नवीन स्मार्ट टीव्ही Mi 4X पण लॉन्च केली आहे. कंपनीने हि स्मार्ट टीव्ही तीन डिस्प्ले साईज मध्ये आणली आहे जी बजेट मध्ये शानदार लुक आणि परफॉर्मंस देते. या स्मार्ट टीव्ही सोबत Xiaomi ने Mi Smart Band 4 आणि Mi Smart Water Purifier पण भारतात लॉन्च केला आहे.

Xiaomi Mi TV 4X

शाओमीने हि लेटेस्ट स्मार्ट टेलीविजनची रेंज तीन मॉडेल्स मध्ये लॉन्च केली आहे. Mi TV 4X चा सर्वात छोटा मॉडेल 43 इंचाचा आहे जो 24,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. त्याचप्रमाणे Mi TV 4X 50 इंचाचा मॉडेल कंपनीने 29,999 रुपये आणि Mi TV 4X 65 इंच मॉडेल 54,999 रुपयांमध्ये भारतीय बाजारात आणला आहे. Mi TV 4X सोबत कंपनीने Mi TV 4A चा 40 इंचाचा मॉडेल पण आज भारतात लॉन्च केला आहे ज्याची किंमत 17,999 रुपये आहे. हि टीव्ही 29 सप्टेंबर पासून मी डॉटा कॉम आणि अमेझॉन वर सेल साठी उपलब्ध होईल.

Xiaomi Mi TV 4X एक Android TV आहे जी PatchWall 2.0 वर चालते. कंपनीने आपल्या लेटेस्ट टेलीविजन मध्ये Google Assistant पण दिला आहे. Mi TV 4X कंपनीने 4K HDR 10-बिट डिस्प्ले टेक्नॉलॉजी वर लॉन्च केला आहे जो VIVID ला सपोर्ट करतो. हि Xiaomi स्मार्टटीव्ही 20W Dolby स्पीकर्स आणि DTS-HD ला सपोर्ट करते.

हे देखील वाचा: लॉन्च झाला जगातील पहिला डुअल पॉप अप कॅमेरा असलेला फोन VIVO NEX 3, 12 जीबी रॅम सह चालतो स्नॅपड्रॅगॉन 855+ वर

या टेलीविजन सीरीजची खास बाब अशी कि Mi TV 4X मध्ये Netflix, Amazon Prime आणि Hotstar सारखे OTT ऍप्स एकाच प्लॅटफॉर्म वर मिळतील. Xiaomi ने सांगितले आहे कि Mi TV 4X डेटा सेवर टेक्नॉलॉजी सह येते जी ऑनलाईन कंटेंट बघताना डेटावाह वापर कमी करते सोबतच स्क्रीन कास्ट साठी पण यात इंटरनेट कनेक्शनची गरज नाही.

Mi Smart Band 4

Mi Band 4 कलर डिस्प्ले सह लॉन्च झाला आहे ज्याची साईज 0.95-इंच आहे. हा एमोलेड डिस्प्ले आहे जो 240 x 120 पिक्सल रेज्ल्यूशनला सपोर्ट करतो तसेच 2.5डी कर्व्ड ग्लासने प्रोटेक्टेड आहे. डिस्प्ले मध्ये ऍप नोटिफिकेशन्स, एसएमएस, व्हाट्सऍप आणि फिटनेस डिटेल्स एक्सेस करता येतील, त्याचबरोबर म्यूजिक प्लेबॅक पण कंट्रोल करता येईल. Mi Band 4 Xiaomi च्या स्मार्टहोम डिवाईसेसशी पण कनेक्ट करता येईल.

हे देखील वाचा: Realme 5 Pro आता विकला जाईल रिटेल स्टोर्स वर पण, जाणून घ्या फोनची ऑफलाईन किंमत

Xiaomi चा Smart Band 4 आईपी रेटिंग सह येतो ज्यामुळे हा पाण्यात पण सुरक्षित राहतो. Mi Band 4 ब्लूटूथ 5.0 सह येतो. कंपनीचा दावा आहे कि Mi Band 4 ची बॅटरी एका फुल चार्ज मध्ये 20 दिवस चालू शकतो. Mi Band 4 मध्ये माइक्रोफोन आहे जो XiaoAI assistant सह काम करतो. तसेच ब्लूटूथ व्यतिरिक्त हा बॅंड एनएफसी च्या माध्यमातून फोनशी कनेक्ट केला जाऊ शकतो. Mi Smart Band 4 कंपनीने 2299 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे जो 19 सप्टेंबर पासून सेल साठी उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here