OnePlus 7T आणि OnePlus TV होतील 26 सप्टेंबरला लॉन्च, 7T Pro पण होऊ शकतो सादर

OnePlus 7T आणि 7T Pro खूप चर्चेत आहेत. आता कंपनीने मीडिया इनवाइट शेयर करून अशी माहिती दिली आहे कि OnePlus 7T 26 सप्टेंबरला सादर केला जाईल. त्याचदिवशी कंपनी आपली पहिली फ्लॅगशिप स्मार्ट टीव्ही पण जगासमोर लॉन्च करेल. या इवेंट मध्ये OnePlus 7T Pro लॉन्च केला जाईल कि नाही याची कंपनीने माहिती दिली नाही. तर काही दिवसांपूर्वी OnePlus ने अधिकृत ट्विटर हँडल वरून ट्विट करून सांगितले होते कि वनप्लस 7टी सीरीज लावरच समोर येईल.

26 सप्टेंबरला नवी दिल्ली मध्ये इवेंटचे आयोजन इंदिरा गांधी एरिना मध्ये केले जाईल. त्यानंतर दोन आठवडयांनी कंपनी 10 ऑक्टोबरला OnePlus 7T Pro सादर करेल. दिल्ली मध्ये आयोजित इवेंट संध्याकाळी 7 वाजता होईल, ज्यासाठी 20 सप्टेंबर सकाळी 10 वाजल्यापासून तिकीट मिळण्यास सुरवात होईल. या इवेंटची तिकीट 999 रुपये असेल. तिकीट कंपनीच्या वेबसाइट वर जाऊन विकत घेता येईल. दोन्ही फोन सोबत OnePlus TV बद्दल काही दिवसांपासून माहिती लीक झाली आहे. तसेच कंपनीने स्वतः असा खुलासा केला आहे कि वनप्लस 7 प्रो प्रमाणे वनप्लस 7टी पण 90 हर्ट्ज डिस्प्ले सह येईल. चला दोन्ही फोन आणि टीव्हीचे लीक स्पेसिफिकेशन्स पाहूया.

हे देखील वाचा: लॉन्चच्या आधीच समोर आली डुअल पॉप-अप सेल्फी कॅमेरा असेलेल्या Vivo V17 Pro ची किंमत, 20 सप्टेंबरला आहे भारतातील लॉन्च

OnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स

आता पर्यंत समोर आलेल्या माहिती नुसार OnePlus TV 55-इंचाच्या स्क्रीन साइज सह येईल. यात QLED डिस्प्ले दिला जाईल. इतकेच नव्हे तर कंपनीने असे संकेत दिले आहेत कि याच्या एका वेरिएंट मध्ये 4K रेजॉलूशन असेल.

तसेच कंपनीने कन्फर्म केलेले फीचर्स पाहता यात डॉल्बी विजन टेक्नॉलजी दिली जाईल. हा HDR 10 चा अपग्रेडेड वेरियंट आहे. तसेच वनप्लस टीव्ही मध्ये 8 इन-बिल्ट स्पीकर असतील. हे स्पीकर 50 वॉट पावर सह येतील. पावरफुल साउंड क्वॉलिटी साठी डॉल्बी ऐटमॉस सपॉर्ट देण्यात आला आहे.

OnePlus 7T चे स्पेसिफिकेशन्स

OnePlus 7T चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात स्नॅपड्रॅगॉन 855+ चिपसेट असेल. त्याचबरोबर यात 6.55-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असेल. फोन मध्ये 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असेल. असे बोलले जात आहे कि फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप 48 मेगापिक्सल सेंसर, 12 मेगापिक्सल टेलीफोटो सह 2x झूम आणि अल्ट्रा-वाइड 16-मेगापिक्सल सेंसर असेल. सेल्फी साठी हँडसेट मध्ये 16-मेगापिक्सलचा सेंसर असेल. तसेच फोन मध्ये पावर बॅकअप साठी 3,800mAh बॅटरी Warp चार्ज 30T, एंडरॉयड 10 बेस्ड ऑक्सिजनओएस सह नवीन माइक्रो मोड पण असेल.

हे देखील वाचा: Xiaomi ने भारतात सादर केले 4 नवीन स्मार्ट टीव्ही, Mi TV 4X सह स्टाईलिश Mi Smart Band 4 पण झाला लॉन्च

OnePlus 7T Pro स्पेसिफिकेशन्स

OnePlus 7T Pro बद्दल बोलायचे तर यात 6.65-इंचाचा QHD+ AMOLED डिस्प्ले असेल, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz, HDR10+ सपोर्ट आणि बिल्ट-इन फिंगरप्रिंट सेंसर असेल. त्याचबरोबर फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 855+ चिपसेट आणि 8 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेज दिला जाईल. रियर कॅमेरा पाहता यात पण ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल, ज्यात 48 मेगापिक्सल सेंसर, 8 मेगापिक्सल टेलीफोटो यूनिट सह 3x झूम व 16 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड सेंसर असेल. फोन मध्ये 4,085 एमएएच ची बॅटरी असेल.

वनप्लस 7टी प्रो वीडियो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here