लॉन्चच्या आधी आली Oneplus 7T ची डिजाइन समोर, ट्रिपल कॅमेऱ्यासह साथ लॉन्च होईल हा फोन

वनप्लस ने भारतात आपला पहिला फोन Oneplus 1 नावाने आणला होता. त्यावेळी कंपनी वर्षातून एकच फोन लॉन्च करत होती. परंतु 2017 मध्ये कंपनीने Oneplus 3 सादर केला आणि त्यानंतर काही महिन्यांनी कंपनीने याचा अपग्रेड मॉडेल Oneplus 3T आणला. त्यानंतर Oneplus 5 नंतर Oneplus 5T आणि Oneplus 6 नंतर त्याच वर्षी कंपनीने Oneplus 7T पण सादर केला होता. आता यावर्षी मे मध्ये Oneplus 7 आणला आहे आणि काही दिवसानंतरच Oneplus 7T ची चर्चा सुरु झाली होती. बातमी अशी आहे कि कंपनी सप्टेंबर मधेच 7T आणि 7T Pro मॉडेल सादर करू शकते. आज या फोनची पहिली रेंडर इमेज समोर आली आहे ज्यात फोनचा लुक आणि स्टाइल दिसते.

Oneplus 7T चा हा रेंडर प्राइसबाबा वेबसाइट ने प्रकाशित केला आहे आणि हे जगातील प्रमुख टिपस्टर ऑनलिक्सच्या मदतीने बनवण्यात आला आहे. बोलले जात आहे कि वनप्लस 7टी कंपनी पुढल्या महिन्यात सादर करू शकते. हा फोन वनप्लस टीव्ही सोबत 26 नोव्हेंबरला लॉन्च केला जाऊ शकतो. वेबसाइटने या फोनच्या रेंडर ईमेज सोबत 360 डिग्री वीडियो पण प्रकाशित केला आहे. त्याचबरोबर ऑनलिक्स ने असे पण सांगितले कि 6T प्रमाणे 7T मध्ये पण मॅकलरेन (सेना) एडिशन कंपनी लॉन्च करेल.

कशी असेल Oneplus 7T ची डिजाइन

फोटोमध्ये दिसत आहे कि Oneplus 7T च्या बॅक पॅनलवर यावेळी गोल रिंग मध्ये ट्रिपल कॅमेरा मिळेल. याआधी मोटोरोला फोन मध्ये आपण गोल रिंग मध्ये कॅमेरा सेंसर बघितला आहे. वनप्लसचा अंदाज थोडा वेगळा आहे. गोल सर्कल मध्ये होरिजेंटल स्टाइल मध्ये कॅमेरे आहेत. डावीकडील आणि उजवीकडील कॅमेऱ्यांसाठी बाणाचे चिन्ह बनवण्यात आले आहे त्याच्या आत जिथे दोन्ही बाण एकत्र येतात तिथे मधला कॅमेरा आहे. कॅमेऱ्याच्या खाली एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे. फोनचा मागील पॅनल थोडा कर्व्ड आहे आणि हा ग्लासचा आहे. याआधी Oneplus 7 मध्ये पण अशी डिजाइन देण्यात आली होती. कंपनी लोगो फोनच्या बॉडीच्या मधोमध आहे.

फ्रंट पॅनल पाहता यात तुम्हाला वी शेप वॉटर ड्रॉप नॉच मिळेल जी फ्लॅट डिस्प्ले सह येते. लीक मध्ये असे सांगण्यात आले आहे कि फोन मध्ये 6.5-इंचाची स्क्रीन मिळेल. राहिला प्रश्न डायमेंशनचा तर 161.2 x 74.5 x 8.3 एमएम आहे आणि फ्रंटला सिंगल सेल्फी कॅमेरा आहे. फोन मध्ये पावर बार अलर्ट बटण उजवीकडे देण्यात आला आहे तर डावीकडे वॉल्यूम रॉकर आहे. तसेच खाली तुम्हाला यूसबी टाइप-सी पोर्ट मिळेल. खालीच लाउडस्पीकर ग्रिल आणि सिम कार्ड ट्रे उपलब्ध आहे.

Oneplus 7T स्पेसिफिकेशन

फोनचे स्पेसफिकेशन पाहता काही खास माहिती मिळाली नाही पण मागील काही लीकनुसार हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855+ चिपसेट सह सादर केला जाऊ शकतो. तसेच फोन मध्ये 8जीबी रॅम आणि 256जीबी इंटरनल मेमरी मिळू शकते. कंपनी फुल एचडी+ एमोलेड स्क्रीनचा वापर करू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here