लॉन्चच्या आधीच समोर आली डुअल पॉप-अप सेल्फी कॅमेरा असेलेल्या Vivo V17 Pro ची किंमत, 20 सप्टेंबरला आहे भारतातील लॉन्च

Vivo इंडियन टेक बाजारातील पहिला डुअल पॉप-अप सेल्फी कॅमेरा असेलला स्मार्टफोन आणण्यासाठी तयार आहे. कंपनीने घोषणा केली आहे कि येत्या 20 सप्टेंबरला भारतात ‘वी सीरीज’ चा विस्तार करत नवीन स्मार्टफोन लॉन्च केला जाईल जो Vivo V17 Pro नावाने बाजारात येईल. Vivo V17 Pro बद्दल आम्ही गेल्याच आठवड्यात एक्सक्लूसिव माहिती दिली होती कि 19 सप्टेंबर पासून या फोनची प्री-बुकिंग सुरु होईल आणि 27 सप्टेंबर पासून Vivo V17 Pro सेल साठी उपलब्ध होईल. आज Vivo V17 Pro च्या लॉन्चच्या आधी याच्या किंमतीचा खुलासा पण झाला आहे.

Vivo V17 Pro च्या किंमतीची माहिती द मोबाइल इंडियन ने दिली आहे. वेबसाइटने आपल्या रिपोर्ट मध्ये सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारवर लिहिले आहे कि Vivo V17 Pro कंपनी 29,990 रुपयांमध्ये लॉन्च करेल. रिपोर्ट मध्ये हि किंमत कोणत्या वेरिएंटची असेल हे सांगण्यात आले नाही आणि हि Vivo V17 Pro ची बेस किंमत असेल कि हाइयर वेरिएंट या किंमतीती येईल हे देखील स्पष्ट नाही. त्यामुळे Vivo V17 Pro च्या खऱ्या किंमतीसाठी 20 सप्टेंबरची वाट बघावी लागेल.

डिजाईन

Vivo V17 Pro च्या लुक बद्दल बोलायचे झाले तर हा फोन फुलव्यू बेजल लेस डिजाईन वर बनलेला आहे. डिस्प्ले वर कोणतीही नॉच किंवा सेंसर नाही. डिस्प्लेच्या चारही कडा पूर्णपणे बेजल लेस आहेत. सेल्फी साठी फोन मध्ये पॉप-अप मेकॅनिज्म देण्यात आले आहे. तसेच Vivo V17 Pro च्या बॅक पॅनल वर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. हा कॅमेरा सेटअप फोनच्या बॅक पॅनल पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये असेल. या कॅमेरा सेटअप मध्ये फ्लॅश लाईट असेल. दोन सेंसर फ्लॅशच्या वर असतील तर दोन कॅमेरा सेंसर फ्लॅश लाईटच्या खाली आहेत.

हे देखील वाचा: Xiaomi ने भारतात सादर केले 4 नवीन स्मार्ट टीव्ही, Mi TV 4X सह स्टाईलिश Mi Smart Band 4 पण झाला लॉन्च

डुअल पॉप-अप

Vivo V17 Pro ची सर्वात मोठी खासियत फोनचा कॅमेरा सेटअप असेल. फोनच्या फ्रंट पॅनल वर 2 कॅमेरा सेंसर मिळेल तसेच बॅक पॅनल वर 4 सेंसर असलेला क्वॉड रियर कॅमेरा सेटअप असेल. सेल्फी कॅमेरा पाहता इथे दोन्ही सेंसर पॉप-अप मेकॅनिज्म वर असतील. विशेष म्हणजे आतापर्यंत सिंगल पॉप-अप सेल्फी कॅमेरा आणि शार्कफिन पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेले फोन बाजारात आले आहेत. डुअल पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च होणारा Vivo V17 Pro पहिला स्मार्टफोन असेल. Vivo V17 Pro 48-मेगापिक्सलच्या प्राइमरी रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.

स्पेसिफिकेशन्स

Vivo V17 Pro चे स्पेसिफिकेशन्स अजूनतरी समोर आले नाहीत पण लेकिन मीडिया रिपोर्ट्स व लीक नुसार फोन 2440 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.44 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला जाऊ शकतो. Vivo V17 Pro च्या स्क्रीन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असेल. प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट मिळू शकतो. लीक नुसार Vivo V17 Pro मध्ये 8 जीबी रॅम मिळेल जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल.

हे देखील वाचा: लॉन्च झाला जगातील पहिला डुअल पॉप अप कॅमेरा असलेला फोन VIVO NEX 3, 12 जीबी रॅम सह चालतो स्नॅपड्रॅगॉन 855+ वर

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Vivo V17 Pro च्या बॅक पॅनल वर 4 आणि सेल्फी साठी 2 सेंसर मिळतील. म्हणजे हा फोन 6 कॅमेरा सेंसर्सना सपोर्ट करेल. रियर सेटअप मध्ये 48-मेगापिक्सलच्या प्राइमरी रियर कॅमेरा सोबत 8-मेगापिक्सल, 2-मेगापिक्सल आणि 13-मेगापिक्सलचे कॅमेरा सेंसर्स दिले जाऊ शकतात. तसेच डुअल पॉप-अप कॅमेऱ्यात 32-मेगापिक्सल + 2-मेगापिक्सलचा सेंसर मिळू शकतो. Vivo V17 Pro 4100एमएएच बॅटरी सह लॉन्च केला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here