OPPO Reno 10 Pro Plus - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 25 Apr 2023 07:32:21 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 OPPO Reno 10 Pro+ स्मार्टफोन 100W फास्ट चार्जिंगसह 3C सर्टिफिकेशनवर लिस्ट; अशी असतील वैशिष्ट्ये https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-10-pro-smartphone-listed-on-3c-certification-with-100w-fast-charging/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-10-pro-smartphone-listed-on-3c-certification-with-100w-fast-charging/#respond Tue, 25 Apr 2023 07:32:21 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20450 OPPO सध्या आपल्या आगामी OPPO Reno 10 सीरीजचे स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनीची ही स्मार्टफोन सीरीज सर्वप्रथम चीनमध्ये लाँच होईल. त्यानंतर हळहळू ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केली जाईल. ओप्पोच्या आगामी स्मार्टफोन सीरीजचे तीन स्मार्टफोन Reno 10, Reno 10 Pro आणि Reno 10 Pro+ सादर केले जाऊ शकतात. लाँचपूर्वीच या सीरीजचा सर्वात प्रीमिमय स्मार्टफोन Reno […]

The post OPPO Reno 10 Pro+ स्मार्टफोन 100W फास्ट चार्जिंगसह 3C सर्टिफिकेशनवर लिस्ट; अशी असतील वैशिष्ट्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OPPO Reno 10 सीरीजच्या स्मार्टफोनवर कंपनीनं सुरु केलं काम
  • OPPO Reno 10, Reno 10 Pro, आणि Reno 10 Pro+ स्मार्टफोन होऊ शकतात लाँच
  • OPPO Reno 10 Pro+ स्मार्टफोन 100W फास्ट चार्जसह 3C वर लिस्ट

OPPO सध्या आपल्या आगामी OPPO Reno 10 सीरीजचे स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनीची ही स्मार्टफोन सीरीज सर्वप्रथम चीनमध्ये लाँच होईल. त्यानंतर हळहळू ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केली जाईल. ओप्पोच्या आगामी स्मार्टफोन सीरीजचे तीन स्मार्टफोन Reno 10, Reno 10 Pro आणि Reno 10 Pro+ सादर केले जाऊ शकतात. लाँचपूर्वीच या सीरीजचा सर्वात प्रीमिमय स्मार्टफोन Reno 10 Pro+ चिनी 3C सर्टिफिकेशन अथॉरिटीच्या वेबसाइटवर लिस्ट केला गेला आहे. हा फोन फास्ट चार्जिंगसह लाँच केला जाईल.

OPPO Reno 10 Pro+ 3C सर्टिफिकेशन लिस्टिंग

  • 100W SuperVOOC फास्ट चार्जिंग
  • 5G कनेक्टिव्हिटी

चीनच्या 3C सर्टिफिकेशन अथॉरिटी इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट मार्केटमध्ये विक्रीसाठी येण्यापूर्वी टेस्ट करते. ही चीनमधील ऑफिशियल रेग्युलेटर बॉडी आहे. या लिस्टिंगमध्ये आगामी OPPO Reno 10 Pro+ स्मार्टफोन मॉडेल नंबर OPPO PHU110 सह लिस्ट करण्यात आला आहे, तसेच यातील 100W, 11VDc, 9.1A Max फास्ट चार्जिंग स्पीडची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर 3C लिस्टिंगवरून समजलं आहे की अपकमिंग Reno 10 Pro+ स्मार्टफोन 5G कनेक्टिव्हिटीसह सादर केला जाईल. हे देखील वाचा: JioCinema साठी लवकरच द्यावे लागू शकतात पैसे; सब्सक्रिप्शन प्लॅनची माहिती झाली लीक

ओप्पो रेनो 10 प्रो+ स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • 6.74 Inch 1.5K AMOLED Display
  • MediaTek Dimnsity 8200
  • 12GB RAM, 512GB storage
  • 4800mAh Battery, 100W Fast charging
  • 50MP Rear Camera, 32MP Selfie shooter

OPPO Reno 10 Pro+ स्मार्टफोनमध्ये 6.74-इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असू शकतो. या फोनमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी सिंगल पंच होल डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ओप्पोच्या आगामी फोनबद्दल चर्चा आहे की हा MediaTek Dimensity 8200 प्रोसेसरसह मार्केटमध्ये एंट्री करू शकतो. आगामी OPPO Reno 10 Pro+ स्मार्टफोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो. जोडीला 32MP चा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. हे देखील वाचा: व्हिडीओ बघताना फोनमध्ये झालेल्या स्फोटामुळे केरळातील आठ वर्षांच्या मुलीचा मृत्य

OPPO Reno 10 Pro+ स्मार्टफोन कंपनी 12GB पर्यंतच्या रॅम आणि 512GB पर्यंतच्या स्टोरेजसह सादर करू शकते. ओप्पोच्या या फोनमध्ये 4,800mAh ची ड्युअल सेल बॅटरी दिली जाऊ शकते. तसेच लेटेस्ट रिपोर्टमधून कंफर्म झाला आहे की कंपनीच्या प्रीमियम फोनमध्ये 100W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. या फोनमध्ये USB Type-C पोर्ट दिला जाईल.

The post OPPO Reno 10 Pro+ स्मार्टफोन 100W फास्ट चार्जिंगसह 3C सर्टिफिकेशनवर लिस्ट; अशी असतील वैशिष्ट्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-10-pro-smartphone-listed-on-3c-certification-with-100w-fast-charging/feed/ 0
16GB रॅम आणि दमदार कॅमेऱ्यासह लाँच होऊ शकतो OPPO reno 10 Pro PLus, लिक झाली माहिती https://www.91mobiles.com/marathi/16-gb-ram-and-50-camera-details-leaked-of-oppo-reno-10-pro-plus/ https://www.91mobiles.com/marathi/16-gb-ram-and-50-camera-details-leaked-of-oppo-reno-10-pro-plus/#respond Mon, 10 Apr 2023 09:30:25 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20156 गेल्या काही महिन्यांपासून ओप्पो रेनो 10 सीरीजबद्दल खूप बातम्या येत आहेत. तसेच आज या सीरीजच्या सर्वात शक्तिशाली फोन Oppo Reno 10 Pro Plus बद्दल मोठा खुलासा झाला आहे. लीकच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार हा फोन ओएलईडी डिस्प्लेसह सादर केला जाऊ शकतो. तसेच फोनमध्ये 16 जीबी रॅम मिळू शकतो. फोनमधील कॅमेऱ्याची माहिती देखील समोर आली आहे. ओप्पो […]

The post 16GB रॅम आणि दमदार कॅमेऱ्यासह लाँच होऊ शकतो OPPO reno 10 Pro PLus, लिक झाली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Reno सीरीजमधील सर्वात शक्तिशाली फोन असू शकतो ओप्पो रेनो 10 प्रो प्लस
  • क्वालकाॅम स्नॅपड्रॅगन 8 प्लस जेन 1 प्रोसेसरसह होऊ शकतो लाँच
  • 50 MP च्या सेानी सेन्सरसह येऊ शकतो बाजारात

गेल्या काही महिन्यांपासून ओप्पो रेनो 10 सीरीजबद्दल खूप बातम्या येत आहेत. तसेच आज या सीरीजच्या सर्वात शक्तिशाली फोन Oppo Reno 10 Pro Plus बद्दल मोठा खुलासा झाला आहे. लीकच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार हा फोन ओएलईडी डिस्प्लेसह सादर केला जाऊ शकतो. तसेच फोनमध्ये 16 जीबी रॅम मिळू शकतो. फोनमधील कॅमेऱ्याची माहिती देखील समोर आली आहे.

ओप्पो रेनो 10 प्रो प्लसची लीक माहिती

  • 6.74 इंचाचा ओएलईडी डिस्प्ले
  • 8 एमपीचा अल्ट्रावाइड कॅमेरा
  • 64 एमपीचा पेरिस्कोप सेन्सर
  • 4700 एमएएचची बॅटरी
  • 80 वाॅट फास्ट चार्जर
  • 512 जीबी स्टोरेज

Oppo Reno Pro Plus ची नवीन लीक माहिती डिजिटल चॅट स्टेशनच्या माध्यमातून आली आहे. त्यानुसार कंपनी हा फोन क्वालकाॅम स्नॅपड्रॅगन 8 प्लस जेन 1 प्रोसेसरसह सादर करू शकते. त्याचबरोबर फोनमध्ये तुम्हाला 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेला 6.74 इंचाचा ओएलईडी डिस्प्ले मिळू शकतो आणि कंपनी यात 1.5के स्क्रीन रिजोल्यूशनचा वापर करू शकते.

कॅमेरा पाहता, हा फोन 50 मेगापिक्सलच्या कॅमेरा सेन्सरसह येऊ शकतो आणि कंपनी सोनी आयएमएक्स890 लेन्सचा वापर करू शकते. तसेच 8 एमपीचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 64 एमपीची पेरिस्कोप झूम लेन्स असू शकते ज्यात 2एक्स का ऑप्टिकल झूम सपोर्ट दिला जाऊ शकतो.

ओप्पो रेनो 10 प्रो प्लसचे काही लीक्स याआधी देखील आले आहेत त्यानुसार फोनमध्ये तुम्हाला 4700 एमएएचची बॅटरी मिळू शकते. जोडीला 80 वाॅट फास्ट चार्जर दिला जाऊ शकतो. तसेच हा फोन 16जीबी रॅमसह 512 जीबी स्टोरेजला सपोर्ट करू शकतो. कंपनी यात यूएफएस 3.1 स्टोरेज टेक्नॉलॉजी देऊ शकते. यूएफएस म्हणजे युनिव्हर्सल फ्लॅश स्टोरेज आणि 3.1 व्हर्जन फास्ट डेटा ट्रांस्फरसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे आशा आहे की युजर्सना एक चांगला एक्सपीरियंस मिळू शकेल.

लाँच टाइम

कंपनी ओप्पो रेनो 10 सीरीज मे मध्ये लाँच करू शकते. या सीरीजमध्ये रेनो 9 प्रमाणेच तीन फोन येऊ शकतात ज्यात ओप्पो रेनो 10 सह ओप्पो रेनो 10 प्रो आणि ओप्पो रेनो 10 प्रो प्लसचा समावेश असू शकतो.

The post 16GB रॅम आणि दमदार कॅमेऱ्यासह लाँच होऊ शकतो OPPO reno 10 Pro PLus, लिक झाली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/16-gb-ram-and-50-camera-details-leaked-of-oppo-reno-10-pro-plus/feed/ 0
Reno 9 सीरिजला डच्चू देऊन Oppo Reno 10 सीरिज भारतात आणू शकते कंपनी https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-10-to-launch-in-india-in-february-company-may-skip-reno-9/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-10-to-launch-in-india-in-february-company-may-skip-reno-9/#respond Sat, 07 Jan 2023 03:38:11 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16631 गेल्या महिन्यात Oppo नं Reno 9 मॉडेल चीनमध्ये लाँच केला होता आणि कंपनी ही सीरिज लवकरच भारतात सादर करू शकते, अशी माहिती आली होती. परंतु 91मोबाइल्सला याबाबत एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली आहे की कंपनी रेनो 9 सीरीज भारतात लाँच करणार नाही आणि थेट OPPO Reno 10 सीरीज सादर करू शकते. आम्हाला ही माहिती टिप्सटर सुधांशुकडून मिळाली […]

The post Reno 9 सीरिजला डच्चू देऊन Oppo Reno 10 सीरिज भारतात आणू शकते कंपनी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या महिन्यात Oppo नं Reno 9 मॉडेल चीनमध्ये लाँच केला होता आणि कंपनी ही सीरिज लवकरच भारतात सादर करू शकते, अशी माहिती आली होती. परंतु 91मोबाइल्सला याबाबत एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली आहे की कंपनी रेनो 9 सीरीज भारतात लाँच करणार नाही आणि थेट OPPO Reno 10 सीरीज सादर करू शकते. आम्हाला ही माहिती टिप्सटर सुधांशुकडून मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, “कंपनी फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात OPPO Reno 10 सीरीज भारतात लाँच करू शकते, जिचे प्रमोशन देखील या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरु केलं जाऊ शकतं. हा फोन रेनो 9 चा रीब्रँडेड व्हर्जन असेल की स्पेक्स नवीन असतील याबाबत सध्या माहिती मिळाली नाही.” हे देखील वाचा: 15 हजारांच्या आत येतायत दोन Samsung 5G phone; Galaxy A14 5G व A23 5G भारतीय लाँचचा खुलासा

ओप्पो रेनो 10 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

  • नवीन डिजाइन
  • मिळेल OLED डिस्प्ले
  • 4700mAh ची बॅटरी असण्याची शक्यता
  • 50MP सोनी कॅमेरा सेन्सर

अलीकडेच OPPO Reno 10 सीरीजची काही माहिती देखील लीक झाली होती. त्यामुळे कंपनीची तयारी सुरु झाली आहे हे स्पष्ट झालं आहे. आतापर्यंत जे लीक्स आले आहेत त्यानुसार Oppo कंपनी Reno 10 Pro Plus वर काम करत आहे आणि याची डिजाइन देखील लीक झाला आहे, लिक्समध्ये हा फोन रेनो 9 सीरीज पेक्षा वेगळा दिसत आहे. फोनच्या बॅक पॅनलवर तुम्हाला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो परंतु रेनो 9 मध्ये कॅमेरा ब्रॅकेट चौकोनी आहे तर नवीन डिजाइनमध्ये सिलेंडर शेप दिसत आहे. तसेच दोन कॅमेऱ्यासह एक पॅरिस्कोप कॅमेरा दिसत आहे.

स्पेसिफिकेशन पाहता आतापर्यंत जे लीक आले आहेत त्यानुसार Oppo Reno 10 Pro Plus मध्ये तुम्हाला 50 MP चा Sony IMX890 मेन सेन्सर मिळू शकतो तर दुसरा कॅमेरा 8MP चा अल्ट्रावाइड सेन्सर असण्याची शक्यता आहे. पेरीस्कोप कॅमेरा बद्दल जी माहिती आली आहे त्यानुसार या फोनमध्ये 2X ऑप्टिकल झूमचा सपोर्ट मिळू शकतो. हे देखील वाचा: Shahid Kapoor करणार वेब सीरीजच्या विश्वात पदार्पण; ‘Farzi’ च्या रिलीज डेटची घोषणा

ओप्पो रेनो 10 मध्ये डिस्प्लेसाठी कंपनी OLED पॅनलचा वापर केला जाऊ शकतो जो 1.5K रेजल्युशनसह 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकतो. तसेच सिक्योरिटीसाठी फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर मिळू शकतो. आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार हा फोन 4700mAh च्या बॅटरीसह 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकतो. परंतु अद्याप कथित ओप्पो रेनो 10 प्रो प्लसच्या प्रोसेसर आणि डिस्प्ले साइजची माहिती मिळाली नाही.

The post Reno 9 सीरिजला डच्चू देऊन Oppo Reno 10 सीरिज भारतात आणू शकते कंपनी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-10-to-launch-in-india-in-february-company-may-skip-reno-9/feed/ 0