OPPO Reno 10 Pro+ स्मार्टफोन 100W फास्ट चार्जिंगसह 3C सर्टिफिकेशनवर लिस्ट; अशी असतील वैशिष्ट्ये

Highlights

  • OPPO Reno 10 सीरीजच्या स्मार्टफोनवर कंपनीनं सुरु केलं काम
  • OPPO Reno 10, Reno 10 Pro, आणि Reno 10 Pro+ स्मार्टफोन होऊ शकतात लाँच
  • OPPO Reno 10 Pro+ स्मार्टफोन 100W फास्ट चार्जसह 3C वर लिस्ट

OPPO सध्या आपल्या आगामी OPPO Reno 10 सीरीजचे स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनीची ही स्मार्टफोन सीरीज सर्वप्रथम चीनमध्ये लाँच होईल. त्यानंतर हळहळू ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केली जाईल. ओप्पोच्या आगामी स्मार्टफोन सीरीजचे तीन स्मार्टफोन Reno 10, Reno 10 Pro आणि Reno 10 Pro+ सादर केले जाऊ शकतात. लाँचपूर्वीच या सीरीजचा सर्वात प्रीमिमय स्मार्टफोन Reno 10 Pro+ चिनी 3C सर्टिफिकेशन अथॉरिटीच्या वेबसाइटवर लिस्ट केला गेला आहे. हा फोन फास्ट चार्जिंगसह लाँच केला जाईल.

OPPO Reno 10 Pro+ 3C सर्टिफिकेशन लिस्टिंग

  • 100W SuperVOOC फास्ट चार्जिंग
  • 5G कनेक्टिव्हिटी

चीनच्या 3C सर्टिफिकेशन अथॉरिटी इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट मार्केटमध्ये विक्रीसाठी येण्यापूर्वी टेस्ट करते. ही चीनमधील ऑफिशियल रेग्युलेटर बॉडी आहे. या लिस्टिंगमध्ये आगामी OPPO Reno 10 Pro+ स्मार्टफोन मॉडेल नंबर OPPO PHU110 सह लिस्ट करण्यात आला आहे, तसेच यातील 100W, 11VDc, 9.1A Max फास्ट चार्जिंग स्पीडची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर 3C लिस्टिंगवरून समजलं आहे की अपकमिंग Reno 10 Pro+ स्मार्टफोन 5G कनेक्टिव्हिटीसह सादर केला जाईल. हे देखील वाचा: JioCinema साठी लवकरच द्यावे लागू शकतात पैसे; सब्सक्रिप्शन प्लॅनची माहिती झाली लीक

ओप्पो रेनो 10 प्रो+ स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • 6.74 Inch 1.5K AMOLED Display
  • MediaTek Dimnsity 8200
  • 12GB RAM, 512GB storage
  • 4800mAh Battery, 100W Fast charging
  • 50MP Rear Camera, 32MP Selfie shooter

OPPO Reno 10 Pro+ स्मार्टफोनमध्ये 6.74-इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असू शकतो. या फोनमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी सिंगल पंच होल डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ओप्पोच्या आगामी फोनबद्दल चर्चा आहे की हा MediaTek Dimensity 8200 प्रोसेसरसह मार्केटमध्ये एंट्री करू शकतो. आगामी OPPO Reno 10 Pro+ स्मार्टफोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो. जोडीला 32MP चा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. हे देखील वाचा: व्हिडीओ बघताना फोनमध्ये झालेल्या स्फोटामुळे केरळातील आठ वर्षांच्या मुलीचा मृत्य

OPPO Reno 10 Pro+ स्मार्टफोन कंपनी 12GB पर्यंतच्या रॅम आणि 512GB पर्यंतच्या स्टोरेजसह सादर करू शकते. ओप्पोच्या या फोनमध्ये 4,800mAh ची ड्युअल सेल बॅटरी दिली जाऊ शकते. तसेच लेटेस्ट रिपोर्टमधून कंफर्म झाला आहे की कंपनीच्या प्रीमियम फोनमध्ये 100W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. या फोनमध्ये USB Type-C पोर्ट दिला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here