Reno 9 सीरिजला डच्चू देऊन Oppo Reno 10 सीरिज भारतात आणू शकते कंपनी

Reno 9

गेल्या महिन्यात Oppo नं Reno 9 मॉडेल चीनमध्ये लाँच केला होता आणि कंपनी ही सीरिज लवकरच भारतात सादर करू शकते, अशी माहिती आली होती. परंतु 91मोबाइल्सला याबाबत एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली आहे की कंपनी रेनो 9 सीरीज भारतात लाँच करणार नाही आणि थेट OPPO Reno 10 सीरीज सादर करू शकते. आम्हाला ही माहिती टिप्सटर सुधांशुकडून मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, “कंपनी फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात OPPO Reno 10 सीरीज भारतात लाँच करू शकते, जिचे प्रमोशन देखील या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरु केलं जाऊ शकतं. हा फोन रेनो 9 चा रीब्रँडेड व्हर्जन असेल की स्पेक्स नवीन असतील याबाबत सध्या माहिती मिळाली नाही.” हे देखील वाचा: 15 हजारांच्या आत येतायत दोन Samsung 5G phone; Galaxy A14 5G व A23 5G भारतीय लाँचचा खुलासा

ओप्पो रेनो 10 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

  • नवीन डिजाइन
  • मिळेल OLED डिस्प्ले
  • 4700mAh ची बॅटरी असण्याची शक्यता
  • 50MP सोनी कॅमेरा सेन्सर

अलीकडेच OPPO Reno 10 सीरीजची काही माहिती देखील लीक झाली होती. त्यामुळे कंपनीची तयारी सुरु झाली आहे हे स्पष्ट झालं आहे. आतापर्यंत जे लीक्स आले आहेत त्यानुसार Oppo कंपनी Reno 10 Pro Plus वर काम करत आहे आणि याची डिजाइन देखील लीक झाला आहे, लिक्समध्ये हा फोन रेनो 9 सीरीज पेक्षा वेगळा दिसत आहे. फोनच्या बॅक पॅनलवर तुम्हाला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो परंतु रेनो 9 मध्ये कॅमेरा ब्रॅकेट चौकोनी आहे तर नवीन डिजाइनमध्ये सिलेंडर शेप दिसत आहे. तसेच दोन कॅमेऱ्यासह एक पॅरिस्कोप कॅमेरा दिसत आहे.

स्पेसिफिकेशन पाहता आतापर्यंत जे लीक आले आहेत त्यानुसार Oppo Reno 10 Pro Plus मध्ये तुम्हाला 50 MP चा Sony IMX890 मेन सेन्सर मिळू शकतो तर दुसरा कॅमेरा 8MP चा अल्ट्रावाइड सेन्सर असण्याची शक्यता आहे. पेरीस्कोप कॅमेरा बद्दल जी माहिती आली आहे त्यानुसार या फोनमध्ये 2X ऑप्टिकल झूमचा सपोर्ट मिळू शकतो. हे देखील वाचा: Shahid Kapoor करणार वेब सीरीजच्या विश्वात पदार्पण; ‘Farzi’ च्या रिलीज डेटची घोषणा

ओप्पो रेनो 10 मध्ये डिस्प्लेसाठी कंपनी OLED पॅनलचा वापर केला जाऊ शकतो जो 1.5K रेजल्युशनसह 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकतो. तसेच सिक्योरिटीसाठी फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर मिळू शकतो. आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार हा फोन 4700mAh च्या बॅटरीसह 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकतो. परंतु अद्याप कथित ओप्पो रेनो 10 प्रो प्लसच्या प्रोसेसर आणि डिस्प्ले साइजची माहिती मिळाली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here