OPPO Reno 9 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 09 Mar 2023 14:58:12 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 OPPO Reno 9 Pro आणि Reno 9 Pro+ चीनमध्ये लाँच https://www.91mobiles.com/marathi/16gb-ram-smartphone-oppo-reno-9-pro-plus-5g-launched-know-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/16gb-ram-smartphone-oppo-reno-9-pro-plus-5g-launched-know-price-and-specifications/#respond Thu, 24 Nov 2022 10:04:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15339 बहुप्रतीक्षित OPPO Reno 9 series आज अखेरीस चीनमध्ये लाँच झाली आहे. नवीन रेनो 9 सीरीज अंतगर्त तीन 5जी फोन लाँच झाले आहेत ज्यांची नावे OPPO Reno 9, OPPO Reno 9 Pro आणि OPPO Reno 9 Pro Plus अशी आहेत. ओप्पो रेनो 9 5जी फोनच्या माहितीसाठी इथे क्लिक करू शकता, या लेखात आम्ही सीरिजमधल्या शक्तिशाली प्रो […]

The post OPPO Reno 9 Pro आणि Reno 9 Pro+ चीनमध्ये लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
बहुप्रतीक्षित OPPO Reno 9 series आज अखेरीस चीनमध्ये लाँच झाली आहे. नवीन रेनो 9 सीरीज अंतगर्त तीन 5जी फोन लाँच झाले आहेत ज्यांची नावे OPPO Reno 9, OPPO Reno 9 Pro आणि OPPO Reno 9 Pro Plus अशी आहेत. ओप्पो रेनो 9 5जी फोनच्या माहितीसाठी इथे क्लिक करू शकता, या लेखात आम्ही सीरिजमधल्या शक्तिशाली प्रो मॉडेल्स ओप्पो रेनो 9 प्रो आणि रेनो 9 प्रो+ च्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि प्राइसची माहिती दिली आहे.

OPPO Reno 9 Pro आणि Reno 9 Pro+ Display

ओप्पो रेनो 9 प्रो आणि रेनो 9 प्रो प्लस स्मार्टफोन 6.7 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट. ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करते. पंच-होल स्टाइल असलेला हा फोन कर्व्ड एज डिजाइनवर बनला आहे जो 2160 पीडब्ल्यूएम डिमिंग, 950निट्स ब्राइटनेस आणि 394पीपीआय सारख्या फीचर्ससह येतो. हे देखील वाचा: Airtel या 2 रिचार्जमध्ये देतेय ते बेनिफिट जे Jio च्या कुठल्याही प्लॅनमध्ये मिळत नाहीत

16GB RAM Smartphone OPPO Reno 9 Pro plus 5g launched know price and specifications

OPPO Reno 9 Pro आणि Reno 9 Pro+ Camera

फोटोग्राफीसाठी ओप्पो रेनो 9 प्रो मध्ये ड्युअल रियर कॅमेरा आहे तर ओप्पो रेनो 9 प्रो+ मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मिळतो. Reno 9 Pro च्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलची सुपर वाइड अँगल लेन्स देण्यात आली आहे. तर Reno 9 Pro+ मध्ये या दोन्ही सेन्सर्ससह एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची थर्ड लेन्स देण्यात आली आहे. हे दोन्ही ओप्पो मोबाइल एफ/2.4 अपर्चर असलेल्या 32 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतात.

16GB RAM Smartphone OPPO Reno 9 Pro plus 5g launched know price and specifications

OPPO Reno 9 Pro आणि Reno 9 Pro+ Processor

ओप्पो रेनो 9 प्रो मध्ये 2.85गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टा-कोर प्रोसेसरसह मीडियाटेक डिमेनसिटी 8100 मॅक्स चिपसेट देण्यात आला आहे तर ओप्पो रेनो 9 प्रो प्लस स्मार्टफोन 2.99गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टा-कोर प्रोसेसरसह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8प्लस जेन 1 चिपसेटला सपोर्ट करतो. ग्राफिक्ससाठी Reno 9 Pro मध्ये एड्रेनो 730जीपीयू तर Reno 9 Pro+ मध्ये माली जी610 जीपीयू मिळतो.

16GB RAM Smartphone OPPO Reno 9 Pro plus 5g launched know price and specifications

OPPO Reno 9 Pro आणि Reno 9 Pro+ Battery

पावर बॅकअपसाठी ओप्पो रेनो प्रो स्मार्टफोनमध्ये 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. तर ओप्पो रेनो प्रो प्लस स्मार्टफोन 4,500एमएएच बॅटरीसह 80वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीवर चालतो. कंपनीचा दावा आहे की हा ओप्पो मोबाइल 10 मिनिटांत 0 ते 45 टक्क्यांपर्यंत चार्ज होतो तसेच 31 मिनिटांत फुल चार्ज होतो.

16GB RAM Smartphone OPPO Reno 9 Pro plus 5g launched know price and specifications

OPPO Reno 9 Pro आणि Reno 9 Pro+ Price

दोन्ही OPPO Reno 9 Pro आणि OPPO Reno 9 Pro+ स्मार्टफोनचे दोन वेरिंएट्स बाजारात आले आहेत. यांचा बेस व्हेरिएंट 16 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर मोठ्या व्हेरिएंटमध्ये 16 जीबी रॅमसह 512 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. हे देखील वाचा: खुशखबर! भारतीय संस्कृती आणि परंपरांचे दर्शन घडवणारा Kantara आला OTT वर, आता पाहा घरच्यांसोबत

OPPO Reno 9 Pro 16GB RAM + 256GB Storage = 3499 युआन (जवळपास 39,900 रुपये)
OPPO Reno 9 Pro 16GB RAM + 512GB Storage = 3799 युआन (जवळपास 43,400 रुपये)

16GB RAM Smartphone OPPO Reno 9 Pro plus 5g launched know price and specifications

OPPO Reno 9 Pro+ 16GB RAM + 256GB Storage = 3999 युआन (जवळपास 45,500 रुपये)
OPPO Reno 9 Pro+ 16GB RAM + 512GB Storage = 4399 युआन (जवळपास 50,000 रुपये)

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post OPPO Reno 9 Pro आणि Reno 9 Pro+ चीनमध्ये लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/16gb-ram-smartphone-oppo-reno-9-pro-plus-5g-launched-know-price-and-specifications/feed/ 0
OPPO Reno 9, Reno 9 Pro आणि Reno 9 Pro Plus ची माहिती लाँचपूर्वीच लीक https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-9-reno-9-pro-reno-9-pro-plus-launch-to-compete-with-vivo-v27/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-9-reno-9-pro-reno-9-pro-plus-launch-to-compete-with-vivo-v27/#respond Mon, 14 Nov 2022 05:12:01 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14898 OPPO आणि Vivo मधील स्पर्धा जगजाहीर आहे. काही दिवसांपूर्वी Vivo V27 सीरीजची माहिती आली होती. तर आता ओप्पो रेनो 9 सीरीजबद्दल एका मोठा लीक समोर आला आहे. त्यानुसार हे फोन्स कंपनी या महिन्याच्या अखेरीस चीनमध्ये लाँच करू शकते. भारतीय लाँचची माहिती नसली तरी त्यानंतर काही दिवसांनी भारतात देखील हे उपलब्ध होऊ शकतात. मिळालेल्या माहितीनुसार OPPO […]

The post OPPO Reno 9, Reno 9 Pro आणि Reno 9 Pro Plus ची माहिती लाँचपूर्वीच लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO आणि Vivo मधील स्पर्धा जगजाहीर आहे. काही दिवसांपूर्वी Vivo V27 सीरीजची माहिती आली होती. तर आता ओप्पो रेनो 9 सीरीजबद्दल एका मोठा लीक समोर आला आहे. त्यानुसार हे फोन्स कंपनी या महिन्याच्या अखेरीस चीनमध्ये लाँच करू शकते. भारतीय लाँचची माहिती नसली तरी त्यानंतर काही दिवसांनी भारतात देखील हे उपलब्ध होऊ शकतात. मिळालेल्या माहितीनुसार OPPO Reno 9, Reno 9 Pro आणि Reno 9 Pro Plus कंपनी 6.7 इंचाच्या मोठ्या स्क्रीनसह सादर करू शकते.

OPPO Reno 9 सीरीजचे लीक स्पेसिफिकेशन

लीकनुसार, OPPO Reno 9 स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 778G चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो. चिपसेट नवीन नसला तरी मिड रेंजमध्ये खूप पावरफुल मानला जातो. तसेच पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये तुम्हाला 4,500mAh ची बॅटरी 67W फास्ट चार्जिंगसह मिळू शकते. हे देखील वाचा: 5G Mobile Phones: 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारे सर्वात बेस्ट 5G Phone; किंमत कमी फीचर्स भरपूर

oppo-reno-9-reno-9-pro-reno-9-pro-plus-launch-to-compete-with-vivo-v27

फोनचे कॅमेरा फीचर्स पाहता कंपनी हा 64MP च्या मेन कॅमेऱ्यासह सादर करू शकते. याआधी ओप्पो रेनो 8 सीरीजमध्ये देखील असाच सेटअप मिळाला होता. तसेच फोनचा दुसरा सेन्सर 2 मेगापिक्सलचा असू शकतो. यात ड्युअल सेन्सर असेल की ट्रिपल याबाबत सध्या जास्त माहिती मिळाली नाही.

OPPO Reno 9 Pro पाहता कंपनी हा MediaTek Dimensity 8100-Max चिपसेटसह सादर करू शकते. या फोनमध्ये पण तुम्हाला 67W फास्ट चार्जिंगसह 4,500mAh ची बॅटरी मिळू शकते. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये तुम्हाला ड्युअल कॅमेरा मिळू शकतो. फोनचा मेन सेन्सर 50MP चा असू शकतो आणि कंपनी यात Sony IMX890 सेन्सरचा वापर करू शकते. तसेच 8MP सेकंडरी कॅमेरा दिला जाऊ शकतो, हा अल्ट्रा वाइड सेन्सर असू शकतो.

राहिला प्रश्न OPPO Reno 9 Pro+ चा तर हा सर्वात शक्तिशाली फोन असू शकतो आणि यात तुम्हाला Qualcomm चा फ्लॅगशिप चिपसेट Snapdragon 8 Plus Gen1 मिळू शकतो. पावर बॅकअपसाठी यात 4,700mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते जी 80W फास्ट चार्जिंगसह येऊ शकते. हा फोन कंपनी ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह सादर करू शकते. फोनचा मेन सेन्सर 50MP चा असू शकतो जो Sony IMX890 सेन्सरसह येऊ शकतो. तसेच 8MP चा सेकंडरी आणि 2MP तीसर सेन्सर मिळू शकतो. या मॉडेलमध्ये तुम्हाला ओआयएस सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे. हे देखील वाचा: घर बसल्या मिळावा Airtel 5G सिम, काही स्टेप्समध्ये काम फत्ते

तिन्ही मॉडेल OPPO Reno 9, Reno 9 Pro आणि Reno 9 Pro प्लस मध्ये तुम्हाला 6.7-inch फुल एचडी प्लस रेजल्युशनसह OLED स्क्रीन मिळू शकते. कंपनी यात कर्व्ड डिस्प्ले देऊ शकते. विशेष म्हणजे यावेळी ओप्पो 120 हर्ट्ज स्क्रीन रिफ्रेश रेटसह 10-bit कलर पॅनलचा वापर करू शकते. तसेच अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आणि 32MP चा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post OPPO Reno 9, Reno 9 Pro आणि Reno 9 Pro Plus ची माहिती लाँचपूर्वीच लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-9-reno-9-pro-reno-9-pro-plus-launch-to-compete-with-vivo-v27/feed/ 0