दाक्षिणात्य चित्रपट फक्त ओटीटी नव्हे तर मोठ्या पडद्यावर देखील नवनवीन रेकॉर्ड बनवत आहेत. या लिस्टमध्ये कमाईच्या बाबतीत सर्वांना मागे टाकणारा चित्रपट Kantara अखेरीस ओटीटीवर रिलीज झाला आहे. अधिकृतपणे Kantara OTT Release Date ची माहिती समोर आली आहे. परंतु, ज्यांना दाक्षिणात्य भाषा समजत नाहीत अशा लोकांसाठी निराशाजनक बातमी आहे सध्या हा चित्रपट Kannada, Malayalam, Tamil आणि Telugu भाषेत उपलब्ध आहे. हिंदी डब व्हर्जन अजूनही ओटीटीवर रिलीज करण्यात आलं नाही. चला जाणून घेऊया कोणत्या प्लॅटफॉर्मवर हा सुपरहिट चित्रपट बघता येईल.
ओटीटीवर रिलीज झाला कांतारा
‘कांतारा’ च्या ओटीटी रिलीज डेटची वाट बघत असलेल्या दर्शकांसाठी खुशखबर आली आहे कारण हा दाक्षिणात्य चित्रपट 24 नोव्हेंबर 2022 म्हणजे आजपासून ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर स्ट्रीम करता येईल. तुम्ही प्राइम व्हिडीओच्या सब्सक्रिप्शनसह हा चित्रपट बघू शकता. हे देखील वाचा: 32MP च्या शानदार सेल्फी कॅमेऱ्यासह Oppo Reno9 5G लाँच; फोटो साठवून ठेवण्यासाठी 512GB मेमरी
putting an end to all the wait!!! ?#KantaraOnPrime, out tomorrow@hombalefilms @shetty_rishab @VKiragandur @gowda_sapthami @AJANEESHB @actorkishore pic.twitter.com/HBsEAGNRbU
— prime video IN (@PrimeVideoIN) November 23, 2022
चित्रपट कांताराच्या ओटीटी रिलीज डेट बद्दल अनेक दिवसांपासून लीक व माहिती समोर येत होती. परंतु चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अॅक्टर ऋषभ शेट्टी यांनी स्पष्ट केलं होतं की चित्रपटाच्या ओटीटी रिलीज डेटची घोषणा अधिकृतपणे होईल तेव्हाच त्यावर विश्वास ठेवा. आता प्राइम व्हिडीओ सोबतच ऋषभ शेट्टी यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर याच्या ओटीटी डेटची घोषणा केली आहे. हे देखील वाचा: एकच नंबर! 160MP कॅमेरा आणि सर्वात पावरफुल प्रोसेसर; HONOR 80 Pro चे सर्वच फीचर्स दर्जेदार
इथे पाहा चित्रपटाचा ट्रेलर
कांताराची गोष्ट
‘कांतारा’ चित्रपटाची गोष्ट दक्षिण भारतातील रूढी, परंपरा आणि पिढ्यानपिढ्या गुपित राहिलेल्या रहस्यांभोवती फिरते. यात दाखवण्यात आलं आहे की एका राजाने देव म्हणून पुजल्या जाणाऱ्या एका दगडाच्या बदल्यात आपली जमीन गावकऱ्यांना दिली कारण त्याला मनःशांती हवी असते. परंतु कालांतराने राजाच्या वंशजांना ती जमीन परत हवी असते, तशी मागणी देखील ते गावकऱ्यांकडे करतात. दुसरीकडे देवाने राजाला जमीन परत मागितल्यास भोगाव्या लागणाऱ्या परिणांमाची माहिती दिली होती. तसे परिणाम देखील दिसू लागतात. ही गोष्ट राजाचे वंशज, गावकरी आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट यांच्यातील संघर्षाची आहे.
लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.