Airtel च्या 2 रिचार्जमध्ये मिळतंय Disney+ Hotstar चं सब्सस्क्रिप्शन; जाणून घ्या माहिती

block-airtel-sim-if-it-is-lost-or-stolen-know-these-easy-steps

Airtel नं अलीकडेच आपल्या ग्राहकांना नाराज करत बेसिक प्लॅनच्या किंमतीत 57 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे आता सर्वात स्वस्त एयरटेल प्रीपेड प्लॅनची किंमत 155 रुपये झाली आहे. यामुळे एयरटेल मागे पडेल असं वाटत असलं तरी Airtel Users कडे असे दोन रिचार्ज प्लॅन आहेत, ज्यात कंपनी ते बेनिफिट्स देत आहे जे Akash Mukesh Ambani च्या टेलीकॉम कंपनी Jio कडे पण नाहीत. Airtel च्या 2 रिचार्जमध्ये मिळतंय Disney+ Hotstar चं सब्सस्क्रिप्शन. चला जाणून घेऊया एयरटेलच्या त्या प्लॅनबाबत सर्वकाही.

या रिचार्जमध्ये मिळतंय Disney+ Hotstar

आम्ही ज्या रिचार्ज प्लॅनबाबत बोलत आहोत ते आहेत 499 रुपये आणि 3359 रुपयांचा प्लॅन आहेत, ज्यात डिज्नी प्लस हॉटस्टारचं फ्री सब्सक्रिप्शन मिळतं. परंतु, जर तुम्ही जियोचे सर्व प्लॅन पाहिलेत तर कंपनीकडे आता कोणताही असा Recharge प्लॅन नाही ज्यात हे ओटीटी सब्सस्क्रिप्शन मिळत आहे. जियोनं काही दिवसांपूर्वी डिज्नी प्लस हॉटस्टार बेनिफिट देणारे सर्व प्लॅन आपल्या साइटवरून हटवले आहेत. चला जाणून घेऊया एयरटेलच्या या दोन्ही रिचार्ज प्लॅनमध्ये मिळणाऱ्या अन्य बेनिफिट्सची माहिती. हे देखील वाचा: खुशखबर! भारतीय संस्कृती आणि परंपरांचे दर्शन घडवणारा Kantara आला OTT वर, आता पाहा घरच्यांसोबत

Airtel 499 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

499 रुपयांच्या रिचार्ज प्लॅन बद्दल बोलायचं झालं तर यात युजर्सना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, डेली 100 SMS आणि डेली 2GB डेटा ऑफर केला जात आहे. तसेच या रिचार्ज प्लॅनची वॅलिडिटी 28 दिवस आहे. या प्लॅनमध्ये फक्त मोफत फ्री डिज्नी प्लस हॉटस्टार सब्सस्क्रिप्शन मिळत नाही तर सोबत विंक म्यूजिक, हेल्लो ट्यून्ससह फास्टॅगवर 100 रुपयांचा कॅशबॅक आणि तीन महिन्यांसाठी अपोलो 24×7 चा लाभ घेता येतो हे देखील वाचा: 32MP च्या शानदार सेल्फी कॅमेऱ्यासह Oppo Reno9 5G लाँच; फोटो साठवून ठेवण्यासाठी 512GB मेमरी

Airtel 3359 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

तसेच 3359 रुपयांचा प्लॅन बद्दल बोलायचं झालं तर या रिचार्जमध्ये युजर्सना Amazon Prime Video Mobile Edition सब्सक्रिप्शन फ्री मिळतं. तसेच प्लॅनमध्ये एक वर्षासाठी डिज्नी प्लस हॉटस्टारचा लाभ घेता येतो. थोडक्यात या प्लॅनमध्ये ग्राहकांना दोन लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मचं मोफत सब्सस्क्रिप्शन दिलं जात आहे. तसेच प्लॅनमध्ये डेली 2.5GB डेटा, प्रतिदिन 100 फ्री SMS आणि अनलिमिटेड कॉल्ससह 365 दिवसांची वैधता मिळते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here