15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारे सर्वात बेस्ट 5G Phone; किंमत कमी फीचर्स भरपूर

5g-phone-under-15000

5G Mobile Phones गेले कित्येक दिवस सादर होत आहेत, देसाहत 5G नेटवर्क लाइव्ह होण्याआधीपासूनच हा सिलसिला सुरु आहे. परंतु खूप कमी लोकांना यांचं महत्व समजलं की आगामी काळ 5जी फोन्सचा आहे. सध्या भारतात रिलायन्स जियो आणि एयरटेलचं 5G नेटवर्क लाइव्ह झालं आहे. 5जी नेटवर्क सुरु झाल्यानंतर स्मार्टफोन ब्रँड्स देखील नवनवीन मोबाइल फोन्स घेऊन येत आहेत. सध्या मार्केटमध्ये खूप स्वस्तात 5जी स्मार्टफोन विकत घेता येतात. पुढे आम्ही भारतीय बाजारातील 5 सर्वात स्वस्त 5जी फोन्सची लिस्ट शेयर केली आहे ज्यांची किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी आहे. हे स्मार्टफोन 50MP Camera आणि 5,000mAh Battery ला सपोर्ट करतात आणि यांची किंमत 11,999 रुपयांपासून सुरु होते.

सर्वात स्वस्त 5जी फोन

Lava Blaze 5G

Price: Rs 9,999

Lava Blaze 5G स्मार्टफोनमध्ये 6.51-इंचाचा HD+ IPS (720×1,600) डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. हा फोन Android 12 वर चालतो. फोनमध्ये MediaTek Dimensity 700 प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 3GB व्हर्च्युअल रॅमचा सपोर्ट देण्यात आला आहे. हा फोन ग्लास ब्लू आणि ग्लास ग्रीन कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येतो. Lava Blaze 5G स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच यात 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. या लावा फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि USB-C OTG सपोर्ट मिळतो. लावाच्या या फोनमध्ये 5G साठी n77 आणि n78 बँडचा सपोर्ट आहे.

Redmi Note 10T 5G

Price – ₹11,999

5g-phone-under-15000

शाओमी रेडमी नोट 10टी 5जी सध्या भारतातील सर्वात स्वस्त 5जी मोबाइल फोन आहे. हा स्मार्टफोन फक्त 11,999 रुपयांच्या किंमतीत विकत घेता येईल ज्यात 4 जीबी रॅमसह परफॉर्मन्ससाठी मीडियाटेक डाइमेंसिटी 700 चिपसेट मिळतो. हा स्मार्टफोन 6.5 इंचाच्या लार्ज डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर 48 एमपी + 2 एमपी + 2 एमपी ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फीसाठी फोनमध्ये 8 चा एमपी फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअपसाठी Redmi Note 10T 5G फोन 5,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 90 दिवसांचा रिचार्ज प्लॅन फक्त 439 रुपयांमध्ये! जाणून घ्या ‘या’ दिवाळी ऑफरची संपूर्ण माहिती

POCO M4 5G

Price – ₹12,999

5g-phone-under-15000

पोको एम4 5जी फोन 12,999 रुपयांच्या बेस किंमतीत सेलसाठी उपलब्ध आहे जो शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल. स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 4 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो ज्यात प्रोसेसिंगसाठी मीडियाटेक डाइमेंसिटी 700 चिपसेट देण्यात आला आहे. फोनमध्ये 6.58 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले आहे तसेच फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा मोबाइल फोन देखील 5,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

iQOO Z6 5G

Price – ₹13,999

5g-phone-under-15000

आयक्यू झेड6 5जी फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटवर चालतो तसेच हा 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेजसह 13,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. अन्य फीचर्स पाहता, हा मोबाइल फोन 6.58 इंचाच्य मोठ्या डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. फोटोग्राफीसाठी यात 50MP + 2MP + 2MP ट्रिपल रियर कॅमेरा तर 16MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 18वॉट फास्ट चार्जिंगसह 5,000एमएएचची बॅटरी आहे.

Vivo T1 5G

Price – ₹14,499

5g-phone-under-15000

हा विवो मोबाइल देखील क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटवर चालतो. या फोनच्या 4 जीबी रॅम व 128 जीबी स्टोेरेज व्हेरिएंटची किंमत 14,499 रुपये आहे. फोनमधील 44वॉट फास्ट चार्जिंग याची प्रमुख यूएसपी आहे, जी 5,000एमएएच बॅटरी मिनिटांत चार्ज करते. अन्स स्पेसिफिकेशन्स पाहता. विवो टी1 5जी फोनमध्ये 6.58 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे जो 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. फोटोग्राफीसाठी या मोबाइल फोनमध्ये 50MP + 8MP + 2MP ट्रिपल रियर कॅमेरा आणि 16MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Realme 9 5G

Price – ₹14,990

5g-phone-under-15000

मार्च मध्ये लाँच झालेल्या रियलमी 9 5जी फोनचा 4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंट सध्या 14,990 रुपयांमध्ये अ‍ॅमेझॉनवरून विकत घेता येईल. मीडियाटेक डिमेनसिटी 810 चिपसेटवर चालतो तसेच यात डायनॅमिक रॅम एक्सपँशन टेक्नॉलॉजीसह 5जीबी वचुर्अल रॅम देखील मिळतो. फोनमध्ये 90हर्ट्ज रिफ्रेश रेट 6.5 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे तसेच फोटोग्राफीसाठी हा फोन 48 मेगापिक्सल प्रायमरी लेन्स असलेल्या ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सेल्फीसाठी रियलमी मोबाइल फोनमध्ये 16एमपीचा फ्रंट सेन्सर आहे. पावर बॅकअपसाठी स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. हे देखील वाचा: WhatsApp Down: ट्विटरवर लोकांनी उडवली खिल्ली; तुम्हाला देखील येतेय का समस्या?

OPPO A74 5G

Price – 14990 रुपये

5g-phone-under-15000

OPPO A74 5G स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा IPS LCD डिस्प्ले मिळतो, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आणि रिजोल्यूशन 1080 x 2400 पिक्सलचा आहे. ओप्पोच्या या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 480 5G ऑक्टा कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग स्पीड देण्यात आला आहे. या फोन दोन व्हेरिएंट – 128GB स्टोरेज, 6GB रॅम, आणि 128GB स्टोरेज, 8GB रॅमसह सादर केला गेला आहे. या फोनमध्ये 48MP चा प्रायमरी कॅमेरा, 8 MP ची अल्ट्रा वाइड लेन्स आणि 2MP ची मॅक्रो कॅमेरा लेन्स आणि 2MP ची इन-डेप्थ लेन्स देण्यात आली आहे.

MOTO G51 5G

Price: Rs 12,249

Moto G51 5G स्मार्टफोनमध्ये 6.8-इंचाचा डिस्प्ले मिळतो, ज्याचे रिजोल्यूशन 1080×2400 पिक्सल आहे. मोटोरोलाचा हा स्मार्टफोन Android 11 वर आधारित ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. तसेच फोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 480+ ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. मोटोरोलाच्या या बजेट 5G स्मार्टफोनमध्ये 50MP+8MP+2MP रियर कॅमेरा आहे आणि 13MP चा सेल्फी कॅमेरा आहे. मोटो जी51 5जी फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

Samsung Galaxy F23 5G

Price: Rs 13499

Samsung Galaxy F23 5G स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 1080×2408 पिक्सल आहे. सॅमसंगचा हा फोन Android 12 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 750G ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनच्या मागे 50MP+8MP+8MP ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. तर फ्रंटला 8MP चा सेल्फी कॅमेरा आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी मिळते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here