OPPO Reno 9 Pro आणि Reno 9 Pro+ चीनमध्ये लाँच

16GB RAM Smartphone OPPO Reno 9 Pro plus 5g launched know price and specifications

बहुप्रतीक्षित OPPO Reno 9 series आज अखेरीस चीनमध्ये लाँच झाली आहे. नवीन रेनो 9 सीरीज अंतगर्त तीन 5जी फोन लाँच झाले आहेत ज्यांची नावे OPPO Reno 9, OPPO Reno 9 Pro आणि OPPO Reno 9 Pro Plus अशी आहेत. ओप्पो रेनो 9 5जी फोनच्या माहितीसाठी इथे क्लिक करू शकता, या लेखात आम्ही सीरिजमधल्या शक्तिशाली प्रो मॉडेल्स ओप्पो रेनो 9 प्रो आणि रेनो 9 प्रो+ च्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि प्राइसची माहिती दिली आहे.

OPPO Reno 9 Pro आणि Reno 9 Pro+ Display

ओप्पो रेनो 9 प्रो आणि रेनो 9 प्रो प्लस स्मार्टफोन 6.7 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट. ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करते. पंच-होल स्टाइल असलेला हा फोन कर्व्ड एज डिजाइनवर बनला आहे जो 2160 पीडब्ल्यूएम डिमिंग, 950निट्स ब्राइटनेस आणि 394पीपीआय सारख्या फीचर्ससह येतो. हे देखील वाचा: Airtel या 2 रिचार्जमध्ये देतेय ते बेनिफिट जे Jio च्या कुठल्याही प्लॅनमध्ये मिळत नाहीत

16GB RAM Smartphone OPPO Reno 9 Pro plus 5g launched know price and specifications

OPPO Reno 9 Pro आणि Reno 9 Pro+ Camera

फोटोग्राफीसाठी ओप्पो रेनो 9 प्रो मध्ये ड्युअल रियर कॅमेरा आहे तर ओप्पो रेनो 9 प्रो+ मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मिळतो. Reno 9 Pro च्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलची सुपर वाइड अँगल लेन्स देण्यात आली आहे. तर Reno 9 Pro+ मध्ये या दोन्ही सेन्सर्ससह एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची थर्ड लेन्स देण्यात आली आहे. हे दोन्ही ओप्पो मोबाइल एफ/2.4 अपर्चर असलेल्या 32 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतात.

16GB RAM Smartphone OPPO Reno 9 Pro plus 5g launched know price and specifications

OPPO Reno 9 Pro आणि Reno 9 Pro+ Processor

ओप्पो रेनो 9 प्रो मध्ये 2.85गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टा-कोर प्रोसेसरसह मीडियाटेक डिमेनसिटी 8100 मॅक्स चिपसेट देण्यात आला आहे तर ओप्पो रेनो 9 प्रो प्लस स्मार्टफोन 2.99गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टा-कोर प्रोसेसरसह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8प्लस जेन 1 चिपसेटला सपोर्ट करतो. ग्राफिक्ससाठी Reno 9 Pro मध्ये एड्रेनो 730जीपीयू तर Reno 9 Pro+ मध्ये माली जी610 जीपीयू मिळतो.

16GB RAM Smartphone OPPO Reno 9 Pro plus 5g launched know price and specifications

OPPO Reno 9 Pro आणि Reno 9 Pro+ Battery

पावर बॅकअपसाठी ओप्पो रेनो प्रो स्मार्टफोनमध्ये 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. तर ओप्पो रेनो प्रो प्लस स्मार्टफोन 4,500एमएएच बॅटरीसह 80वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीवर चालतो. कंपनीचा दावा आहे की हा ओप्पो मोबाइल 10 मिनिटांत 0 ते 45 टक्क्यांपर्यंत चार्ज होतो तसेच 31 मिनिटांत फुल चार्ज होतो.

16GB RAM Smartphone OPPO Reno 9 Pro plus 5g launched know price and specifications

OPPO Reno 9 Pro आणि Reno 9 Pro+ Price

दोन्ही OPPO Reno 9 Pro आणि OPPO Reno 9 Pro+ स्मार्टफोनचे दोन वेरिंएट्स बाजारात आले आहेत. यांचा बेस व्हेरिएंट 16 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर मोठ्या व्हेरिएंटमध्ये 16 जीबी रॅमसह 512 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. हे देखील वाचा: खुशखबर! भारतीय संस्कृती आणि परंपरांचे दर्शन घडवणारा Kantara आला OTT वर, आता पाहा घरच्यांसोबत

OPPO Reno 9 Pro 16GB RAM + 256GB Storage = 3499 युआन (जवळपास 39,900 रुपये)
OPPO Reno 9 Pro 16GB RAM + 512GB Storage = 3799 युआन (जवळपास 43,400 रुपये)

16GB RAM Smartphone OPPO Reno 9 Pro plus 5g launched know price and specifications

OPPO Reno 9 Pro+ 16GB RAM + 256GB Storage = 3999 युआन (जवळपास 45,500 रुपये)
OPPO Reno 9 Pro+ 16GB RAM + 512GB Storage = 4399 युआन (जवळपास 50,000 रुपये)

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here