Prime Video - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 27 Apr 2023 10:07:05 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Amazon Prime वापरणं महागलं; आवडीच्या वेब सीरीज बघण्यासाठी द्यावे लागतील जास्त पैसे https://www.91mobiles.com/marathi/amazon-prime-plan-price-hike-in-india-prime-video-rate-increase/ https://www.91mobiles.com/marathi/amazon-prime-plan-price-hike-in-india-prime-video-rate-increase/#respond Thu, 27 Apr 2023 10:07:05 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20525 Amazon नं आपल्या भारतीय युजर्सना झटका दिला आहे. कंपनीनं आपल्या Prime Membership ची किंमत वाढवली आहे आणि आपल्या सर्व्हिसेज महाग केल्या आहेत. याआधी डिसेंबर 2021 मध्ये अ‍ॅमेझॉन प्राइमच्या वार्षिक प्लॅन्सच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती आणि आता कंपनीनं आपल्या मासिक प्लॅनचा रेट देखील वाढवला आहे. नवीन किंमतीनंतर Prime Video वर चित्रपट व वेब सीरीज बघणं […]

The post Amazon Prime वापरणं महागलं; आवडीच्या वेब सीरीज बघण्यासाठी द्यावे लागतील जास्त पैसे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Amazon Prime Membership महागली आहे.
  • 1 महिना आणि 3 महिन्यांच्या प्लॅनची किंमत वाढवण्यात आली आहे.
  • Prime Video वर फिल्म व सीरीज पाहणं महाग झालं आहे.

Amazon नं आपल्या भारतीय युजर्सना झटका दिला आहे. कंपनीनं आपल्या Prime Membership ची किंमत वाढवली आहे आणि आपल्या सर्व्हिसेज महाग केल्या आहेत. याआधी डिसेंबर 2021 मध्ये अ‍ॅमेझॉन प्राइमच्या वार्षिक प्लॅन्सच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती आणि आता कंपनीनं आपल्या मासिक प्लॅनचा रेट देखील वाढवला आहे. नवीन किंमतीनंतर Prime Video वर चित्रपट व वेब सीरीज बघणं महाग होईल.

किती महागले अ‍ॅमेझॉन प्राइम प्लॅन्स

नवीन अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबरशिप प्लॅन प्राइस

  • Monthly Prime (1 महिना) = 299 रुपये
  • Quarterly Prime (3 महिने) = 599 रुपये
  • Annual Prime Lite (12 महिने) = 999 रुपये
  • Annual Prime (12 महिने) = 1499 रुपये

हे देखील वाचा: Realme C53 लवकरच होऊ शकतो लाँच; NBTC वर झाला सर्टिफाइड

जुना अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबरशिप प्लॅन प्राइस

  • Monthly Prime (1 महिना) = 179 रुपये
  • Quarterly Prime (3 महिने) = 459 रुपये
  • Annual Prime Lite (12 महिने) = 999 रुपये
  • Annual Prime (12 महिने) = 1499 रुपये

अ‍ॅमेझॉननं मासिक आणि तिमाही प्लॅन्सच्या किंमतीत वाढ केली आहे. 1 महिना वैधता असलेला मासिक प्लॅन आधी 179 रुपयांचा होता जो आता 299 रुपयांचा झाला आहे. तर 3 महिन्यांच्या तिमाही प्लॅनची किंमत आधी 459 रुपये होती ती आता दरवाढीनंतर वाढून 599 रुपये झाली आहे. Amazon Prime च्या वार्षिक प्लॅनची किंमत मात्र बदलण्यात आली नाही. हे देखील वाचा: आला नवीन स्वदेशी 5जी फोन; Lava Blaze 1X 5G भारतात लाँच

अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबरशिप मधील फायदे

अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबरशिपमध्ये प्राइम शिपिंगचा फायदा मिळतो. तसेच प्राइम व्हिडीओवर वेब सीरिज आणि चित्रपट बघता येतात. प्राइम म्युजिकच्या माध्यमातून जाहिरातरहित गाणी ऐकता येतात. तसेच प्राइम मेंबर्ससाठी खास डील्स आणि ऑफर्स देण्यात आल्या आहेत. तसेच क्रेडिट कार्ड रिवॉर्ड्स, प्राइम गेमिंग, प्राइम रिडींग आणि अ‍ॅमेझॉन फॅमिलीचे बेनिफिट्स मिळतात.

The post Amazon Prime वापरणं महागलं; आवडीच्या वेब सीरीज बघण्यासाठी द्यावे लागतील जास्त पैसे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/amazon-prime-plan-price-hike-in-india-prime-video-rate-increase/feed/ 0
999 रुपयांची Amazon Prime Lite मेंबरशिप बीटा टेस्टिंगमध्ये https://www.91mobiles.com/marathi/amazon-prime-lite-cheapest-plan-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/amazon-prime-lite-cheapest-plan-launch-soon/#respond Tue, 17 Jan 2023 07:34:30 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16948 ओटीटी सेक्टरमधील बडा प्लेयर Amazon Prime आपल्या युजर्सना खुश करू शकतो. आता बातमी आली आहे की कंपनी आपल्या सब्सस्क्रिप्शन मॉडेलमध्ये स्वस्त ‘प्राइम लाइट’ चा समावेश करू शकते. रिपोर्ट्सनुसार कंपनी भारतात प्राइम लाइटच्या स्वस्त सब्सक्रिप्शन प्लॅनची टेस्टिंग करत आहे. टेक ब्लॉग ओनलीटेकला एका निवडक बीटा टेस्टिंग प्रोग्राममधून याची माहिती मिळाली आहे आणि वेबसाइटनं प्लॅनचा स्क्रीनशॉट देखील […]

The post 999 रुपयांची Amazon Prime Lite मेंबरशिप बीटा टेस्टिंगमध्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • प्राइम लाइट युजर्ससाठी एक स्वस्त प्लॅनचं टेस्टिंग सुरु
  • 999 रुपयांचा अ‍ॅन्युअल प्लॅन लाँच करण्याची तयारी
  • कमी किंमतीत युजर्सना काही बेनिफिट्स मिळू शकणार नाहीत

ओटीटी सेक्टरमधील बडा प्लेयर Amazon Prime आपल्या युजर्सना खुश करू शकतो. आता बातमी आली आहे की कंपनी आपल्या सब्सस्क्रिप्शन मॉडेलमध्ये स्वस्त ‘प्राइम लाइट’ चा समावेश करू शकते. रिपोर्ट्सनुसार कंपनी भारतात प्राइम लाइटच्या स्वस्त सब्सक्रिप्शन प्लॅनची टेस्टिंग करत आहे. टेक ब्लॉग ओनलीटेकला एका निवडक बीटा टेस्टिंग प्रोग्राममधून याची माहिती मिळाली आहे आणि वेबसाइटनं प्लॅनचा स्क्रीनशॉट देखील शेयर केला आहे. त्यामुळे असं वाटत आहे की कंपनी देशात आपल्या ग्राहकांची संख्या वाढवण्याच्या प्रयत्न करत आहे.

Amazon Prime Lite price in India

OnlyTech च्या बातमीनुसार Amazon Prime Lite च्या अ‍ॅन्युअल प्लॅनची प्राइस 999 रुपये असू शकते. Amazon Prime च्या एक वर्षाच्या रेग्युलर सब्सक्रिप्शनची किंमत 1,499 रुपये आहे. विशेष म्हणजे वर्षभराच्या रेग्युलर प्लॅनची आधी किंमत 999 रुपयेच होती, परंतु कंपनीनं साल 2021 डिसेंबरमध्ये या प्लॅनच्या किंमतीत 50 टक्क्यांनी वाढ केली. हे देखील वाचा: बजेटमध्ये BGMI-PUBG साठी फोन हवा? 16 फेब्रुवारीला भारतात येतोय शानदार गेमिंग फोन iQOO Neo 7 5G

प्राइम लाइटची बीटा टेस्टिंग सुरु आहे आणि भारतात काही प्राइम मेंबर्ससाठी हा प्लॅन उपलब्ध आहे. तसेच, टेस्टिंग यशस्वी झाल्यास अ‍ॅमेझॉन हा किफायतशीर सब्सक्रिप्शन प्लॅन सर्व युजर्ससाठी जारी करू शकते. परंतु हे कधी होईल हे सांगणं जरा कठीणच आहे. या प्लॅनची खासियत म्हणजे युजर्स स्मार्ट टीव्ही आणि कंप्यूटरवर देखील अ‍ॅमेझॉन प्राइम लाइट सर्व्हिस वापरू शकतील.

Amazon Prime Lite मध्ये मिळतील हे बेनिफिट्स

अ‍ॅमेझॉन प्राइम लाइटमध्ये अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबर्सना दोन दिवसांत अनलिमिटेड फ्री आणि स्टॅंडर्ड डिलिव्हरी मिळू शकते. अर्थात यात सेम-डे डिलिव्हरी किंवा वन-डे डिलिव्हरीचा फायदा मिळणार नाही. तसेच मेंबर्सना प्राइम एक्सक्लूसिव्ह ऑफर्स आणि डील्सचा फायदा सर्वप्रथम मिळू शकतो.

ग्राहक अ‍ॅमेझॉन-पे ICICI बँक क्रेडिट कार्डनं शॉपिंग करून 5 टक्के कॅशबॅक मिळवू शकतात. या प्लॅनमध्ये अ‍ॅडसह अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओचा अ‍ॅक्सेस दिला जाऊ शकतो. तसेच प्राइम व्हिडीओचे रेजोल्यूशन SD ठेवलं जाऊ शकतं आणि एकावेळी फक्त 2 डिवाइसवर कंटेंट पाहता येऊ शकतो. या स्वस्त प्लॅनमध्ये युजर्स प्राइम म्यूजिक, प्राइम गेमिंग, फ्री ईबुक आणि नॉ-कॉस्ट EMI सारख्या बेनिफिट्सचा लाभ मिळणार नाही. हे देखील वाचा: Motorola च्या सर्वात शक्तिशाली स्मार्टफोनची किंमत लीक; 512GB मेमरीसह होणार Edge 40 Pro ची एंट्री

Amazon Prime Yearly Plan

सध्या अ‍ॅमेझॉन प्राइमकडे एक Yearly plan आहे, ज्याच्या माध्यमातून ग्राहक टीव्ही आणि लॅपटॉपवर कंटेंट अ‍ॅक्सेस करू शकतात. या प्लॅनची किंमत 1,499 रुपये आहे. या प्लॅनमध्ये ई-कॉमर्स साइट कडून फास्ट आणि मोफत डिलिव्हरी, म्यूजिक आणि व्हिडीओ स्ट्रीमिंगचा लाभ मिळतो.

The post 999 रुपयांची Amazon Prime Lite मेंबरशिप बीटा टेस्टिंगमध्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/amazon-prime-lite-cheapest-plan-launch-soon/feed/ 0
599 रुपयांमध्ये वर्षभर चालणारा Amazon Prime Video Plan; Netflix आणि Disney+ Hotstar च्या अडचणी वाढल्या https://www.91mobiles.com/marathi/amazon-prime-video-mobile-plan-launch-with-yearly-validity-price-rs-599/ https://www.91mobiles.com/marathi/amazon-prime-video-mobile-plan-launch-with-yearly-validity-price-rs-599/#respond Mon, 07 Nov 2022 10:38:05 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14662 Amazon Prime Video Plan: देशातील लोकप्रिय OTT Platform पैकी एक Amazon Prime Video नं आपल्या ग्राहकांना खुश करत एक नवीन व स्वस्त प्लॅन सादर केला आहे. ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनच्या व्हिडीओ कंटेंट प्रोव्हायडर कंपनी प्राइम व्हिडीओनं मोबाइलवर प्राइम व्हिडीओ कंटेंट बघणाऱ्या सब्सक्राइबर्ससाठी नवीन वार्षिक सर्वात स्वस्त सब्सक्रिप्शन प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनची प्राइस 599 रुपये […]

The post 599 रुपयांमध्ये वर्षभर चालणारा Amazon Prime Video Plan; Netflix आणि Disney+ Hotstar च्या अडचणी वाढल्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Amazon Prime Video Plan: देशातील लोकप्रिय OTT Platform पैकी एक Amazon Prime Video नं आपल्या ग्राहकांना खुश करत एक नवीन व स्वस्त प्लॅन सादर केला आहे. ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनच्या व्हिडीओ कंटेंट प्रोव्हायडर कंपनी प्राइम व्हिडीओनं मोबाइलवर प्राइम व्हिडीओ कंटेंट बघणाऱ्या सब्सक्राइबर्ससाठी नवीन वार्षिक सर्वात स्वस्त सब्सक्रिप्शन प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनची प्राइस 599 रुपये आहे आणि हा एकदा रिचार्ज केल्यास वर्षभर अ‍ॅमेझॉन प्राइम अ‍ॅक्सेस प्रोवाइड करेल. अ‍ॅमेझॉनचं प्राइमचं मोबाइल एडिशन आल्यामुळे नेटफ्लिक्स, वूट आणि डिज्नी + हॉटस्टार सारख्या स्ट्रीमिंग सर्व्हिसेसचा टक्कर मिळणं साहजिक आहे.

स्मार्टफोनवर बघता येतील मूव्ही

अ‍ॅमेझॉनच्या नवीन 599 रुपयांच्या मोबाइल ऑनली प्राइम व्हिडीओ सब्सक्रिप्शनचा आनंद फक्त स्मार्टफोनवरच घेता येईल. युजर्स टीव्ही आणि लॅपटॉपवर या प्लॅनसह लॉग इन करू शकणार नाहीत. तसेच या प्लॅनमध्ये ओटीटीवर येणाऱ्या आणि जुन्या चित्रपट, अ‍ॅमेझॉन ओरिजनल, लाइव्ह क्रिकेट आणि इत्यादींचा अ‍ॅक्सेस मिळेल.

प्राइम व्हिडीओ मोबाइल सब्सक्रिप्शन प्लॅनसह ग्राहकांना स्टॅंडर्ड डेफिनेशन म्हणजे SD क्वॉलिटीमध्ये व्हिडीओ स्ट्रीमिंग करता येईल. याचा अर्थ थेट फक्त 480p क्वॉलिटी पर्यंतचा व्हिडीओ बघता येईल. तसेच या प्लॅनसह Ad देखील दिसतील. हे देखील वाचा: 108MP कॅमेऱ्याने काढता येतील डीटेल्ड फोटो; लाँच पूर्वीच Realme 10 Pro+ 5G चे स्पेसिफिकेशन्स लीक

अ‍ॅमेझॉन प्राइम Monthly प्लान

मंथली अ‍ॅमेझॉन प्राइम प्लॅनची किंमत आता 179 रुपये आहे. या प्लॅनमध्ये मोफत एक किंवा दोन दिवसांची डिलिव्हरी, अ‍ॅमेझॉन प्राइम वीडियो, प्राइम म्यूजिक, खास डिस्काउंट आणि खूप काही मिळते. हे देखील वाचा: वॉटर प्रूफ बॅटरीसह आल्या हिरोच्या 2 नव्या इलेक्ट्रिक सायकल; किंमत देखील परवडणारी

अ‍ॅमेझॉन प्राइम Quarterly प्लान

अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबरशिप Quarterly सब्सक्रिप्शन फॉर्मेटमध्ये देखील उपलब्ध आहे. जास्त पैसे देऊन दीर्घ वैधता मिळवता येते. या प्लॅनची किंमत 459 रुपये आहे. या प्लॅनमध्ये अन्य प्राइम मेंबरशिप प्रमाणे तुम्चाळ प्राइम वीडियो, प्राइम म्युजिक आणि प्राइमसह खास डिस्काउंट दिला जाईल.

Amazon Prime Yearly Plan

Mobile Only Yearly Plan व्यतिरिक्त प्राइमकडे एक आणखी एक Yearly plan आहे, ज्याच्या माध्यमातून ग्राहक टीव्ही आणि लॅपटॉपवर कंटेंट अ‍ॅक्सेस करू शकतात. या प्लॅनची किंमत 1,499 रुपये आहे. या प्लॅनमध्ये ई-कॉमर्स साइट कडून फास्ट आणि मोफत डिलिव्हरी, म्यूजिक आणि व्हिडीओ स्ट्रीमिंगचा लाभ मिळतो.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post 599 रुपयांमध्ये वर्षभर चालणारा Amazon Prime Video Plan; Netflix आणि Disney+ Hotstar च्या अडचणी वाढल्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/amazon-prime-video-mobile-plan-launch-with-yearly-validity-price-rs-599/feed/ 0