Realme 10T 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 22 Mar 2023 07:22:38 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 50MP Camera आणि 5,000mAh Battery सह Realme 10T 5G थायलंडमध्ये लाँच https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-realme-10t-5g-launched-know-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-realme-10t-5g-launched-know-price-and-specifications/#respond Wed, 22 Mar 2023 07:22:38 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19638 Realme 10T 5G फोन थायलंडमध्ये लाँच झाला आहे. हा या सीरीजमध्ये जोडण्यात आलेला सहावा मोबाइल आहे. याआधी realme 10, realme 10 Pro 5G, realme 10 Pro+ 5G आणि realme 10 Pro 5G Coca-Cola Edition भारतात लाँच झाले आहेत तर realme 10s चायनामध्ये आला आहे. MediaTek Dimensity 810 प्रोसेसरसह आलेल्या नवीन रियलमी 10टी 5जी फोन ची […]

The post 50MP Camera आणि 5,000mAh Battery सह Realme 10T 5G थायलंडमध्ये लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Realme 10T 5G थायलंडमध्ये लाँच झाला आहे.
  • हा फोन MediaTek Dimensity 810 वर चालतो.
  • रियलमी 10टी 5जी फोनमध्ये 8GB Dynamic RAM देण्यात आली आहे.

Realme 10T 5G फोन थायलंडमध्ये लाँच झाला आहे. हा या सीरीजमध्ये जोडण्यात आलेला सहावा मोबाइल आहे. याआधी realme 10, realme 10 Pro 5G, realme 10 Pro+ 5G आणि realme 10 Pro 5G Coca-Cola Edition भारतात लाँच झाले आहेत तर realme 10s चायनामध्ये आला आहे. MediaTek Dimensity 810 प्रोसेसरसह आलेल्या नवीन रियलमी 10टी 5जी फोन ची संपूर्ण माहिती पुढे देण्यात आली आहे.

रियलमी 10टी 5जी चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.6″ FHD+ 90Hz Display
  • 8GB Dynamic RAM
  • MediaTek Dimensity 810
  • 50MP Triple Camera
  • 8MP Selfie Sensor
  • 18W 5,000mAh Battery

Realme 10T 5G फोन 2408 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही फोन स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. हा डिस्प्ले 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट, 400निट्स ब्राइटनेस सारख्या फीचर्ससह येतो. हे देखील वाचा: 16GB RAM आणि शक्तिशाली प्रोसेसरसह OPPO Find X6 Pro ची एंट्री, जोडीला 100W fast charging

रियलमी 10टी 5जी अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे जो रियलमी वनयुआयसह चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक डिमेनसिटी 810 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालतो. हा फोन 8जीबी डायनॉमिक रॅमला सपोर्ट करतो जो याला 16जीबी रॅमची ताकद देतो. ग्राफिक्ससाठी हा फोन माली जी57 जीपीयूला सपोर्ट करतो.

फोटोग्राफीसाठी Realme 10T 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे जो 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलच्या पोर्टरेट लेन्ससह चालतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हे देखील वाचा: 50MP+50MP+50MP! पावरफुल कॅमेरा सेटअपसह OPPO Find X6 लाँच, पाहा स्पेसिफिकेशन्स

रियलमी 10टी 5जी फोन पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीवर चालते. सिक्योरिटीसाठी या फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. हा मोबाइल फोन 3.5एमएम जॅकला सपोर्ट करतो.

The post 50MP Camera आणि 5,000mAh Battery सह Realme 10T 5G थायलंडमध्ये लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-realme-10t-5g-launched-know-price-and-specifications/feed/ 0
Realme 10T 5G फोन 21 मार्चला होणार थायलंडमध्ये लाँच; MediaTek Dimensity 810 प्रोसेसरसह येणार बाजारात https://www.91mobiles.com/marathi/realme-10t-5g-launching-on-21-march-with-mediatek-dimensity-810/ https://www.91mobiles.com/marathi/realme-10t-5g-launching-on-21-march-with-mediatek-dimensity-810/#respond Wed, 15 Mar 2023 07:16:37 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19501 Realme 10 Series मध्ये कंपनी लवकरच एक नवीन स्मार्टफोन जोडणार आहे जो Realme 10T 5G नावाने लाँच होईल. हा मोबाइल फोन सर्वप्रथम थायलंडमध्ये सादर केला जाईल जो येत्या 21 मार्चला ऑफिशियल होईल. रियलमी थायलंडनं आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलच्या माध्यमातून रियलमी 10टी 5जी लाँचची माहिती दिली आहे. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 810 प्रोसेसरसह मार्केटमध्ये एंट्री […]

The post Realme 10T 5G फोन 21 मार्चला होणार थायलंडमध्ये लाँच; MediaTek Dimensity 810 प्रोसेसरसह येणार बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Realme 10T 5G 21 मार्चला थायलंडमध्ये लाँच होईल.
  • यात MediaTek Dimensity 810 प्रोसेसर दिला जाईल.
  • हा ‘रियलमी 10 सीरीज’ चा सहावा फोन असेल.

Realme 10 Series मध्ये कंपनी लवकरच एक नवीन स्मार्टफोन जोडणार आहे जो Realme 10T 5G नावाने लाँच होईल. हा मोबाइल फोन सर्वप्रथम थायलंडमध्ये सादर केला जाईल जो येत्या 21 मार्चला ऑफिशियल होईल. रियलमी थायलंडनं आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलच्या माध्यमातून रियलमी 10टी 5जी लाँचची माहिती दिली आहे. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 810 प्रोसेसरसह मार्केटमध्ये एंट्री करेल.

Realme 10T 5G 21 मार्चला थायलंडमध्ये लाँच होईल. हा फोन सर्वप्रथम या मार्केटमध्ये पदार्पण करत आहे जो नंतर अन्य देशांमध्ये येऊ शकतो. कंपनीनं या स्मार्टफोनच्या बॅक पॅनलचा फोटो शेयर केला आहे आहे ज्यात ट्रिपल रियर कॅमेरा असल्याचा खुलासा झाला आहे. तसेच उजव्या पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देखील देण्यात आलं आहे.

रियलमी 10टी 5जी फोनबद्दल माहिती मिळाली आहे की हा मोबाइल मीडियाटेक डिमेनसिटी 810 प्रोसेसरसह लाँच केला जाईल. या फोनमध्ये 256जीबी स्टोरेज असल्याचा खुलासा देखील झाला आहे. रिपोर्टनुसार हा स्मार्टफोन 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सरसह येऊ शकतो. तसेच Realme 10T 5G फोनमध्ये 90हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेली स्क्रीन मिळेल. हे देखील वाचा: 15 हजारांच्या बजेटमध्ये Samsung Galaxy F14 5G फोन पुढील आठवड्यात येऊ शकतो भारतात लाँच

रियलमी 10 सीरीज

तुम्हाला माहित असेल की रियलमी कंपनीनं भारतीय बाजारात ‘10 सीरीज’ अंतगर्त आतापर्यंत चार स्मार्टफोन लाँच केले आहेत. हे मोबाइल फोन realme 10, realme 10 Pro 5G, realme 10 Pro+ 5G आणि realme 10 Pro 5G Coca-Cola Edition नावानं सेलसाठी उपलब्ध आहेत. तसेच realme 10s चायना मध्ये आला आहे. या सीरीजमध्ये एकूण 5 स्मार्टफोन मॉडेल आहेत आणि आता Realme 10T 5G आल्यानंतर सहावा फोन देखील यात जोडला जाईल.

The post Realme 10T 5G फोन 21 मार्चला होणार थायलंडमध्ये लाँच; MediaTek Dimensity 810 प्रोसेसरसह येणार बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-10t-5g-launching-on-21-march-with-mediatek-dimensity-810/feed/ 0
Realme 10T 5G स्मार्टफोन भारतीय सर्टिफिकेशन साइट BIS सह NBTC वेबसाइटवर लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/realme-10t-5g-phone-to-launch-as-rebadged-realme-9i-5g/ https://www.91mobiles.com/marathi/realme-10t-5g-phone-to-launch-as-rebadged-realme-9i-5g/#respond Tue, 07 Feb 2023 03:31:37 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17530 रियलमी लवकरच चीनमध्ये आपला Realme GT Neo 5 स्मार्टफोन सादर करू शकते, जो 240W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकतो. जीटी नियो 5 स्मार्टफोन एक प्रीमियम मॉडेल असू शकतो. दुसरीकडे कंपनी आपल्या बजेट फ्रेंडली स्मार्टफोन सीरिजमध्ये आणखी एक मॉडेल जोडण्याची तयारी देखील करत आहे, जो Realme 10T 5G नावानं लाँच केला जाऊ शकतो. अधिकृत माहिती आली […]

The post Realme 10T 5G स्मार्टफोन भारतीय सर्टिफिकेशन साइट BIS सह NBTC वेबसाइटवर लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Realme 10T 5G मध्ये MediaTek Dimensity 810 प्रोसेसर दिला जाऊ शकतो.
  • हा फोन Realme 9i 5G चा रीब्रँडेड व्हर्जन असू शकतो.
  • हा मोबाइल भारतीय सर्टिफिकेशन साइट BIS सह थायलंडच्या NBTC वर लिस्ट झाला आहे.

रियलमी लवकरच चीनमध्ये आपला Realme GT Neo 5 स्मार्टफोन सादर करू शकते, जो 240W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकतो. जीटी नियो 5 स्मार्टफोन एक प्रीमियम मॉडेल असू शकतो. दुसरीकडे कंपनी आपल्या बजेट फ्रेंडली स्मार्टफोन सीरिजमध्ये आणखी एक मॉडेल जोडण्याची तयारी देखील करत आहे, जो Realme 10T 5G नावानं लाँच केला जाऊ शकतो. अधिकृत माहिती आली नसली तरी हा मोबाइल फोन भारतीय सर्टिफिकेशन साइट BIS सह NBTC वेबसाइटवर लिस्ट झाला आहे.

Realme 10T 5G एनबीटीसी आणि बीआयएस सर्टिफिकेशन्स साइटवर Realme RMX3612 मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या मॉडेल नंबरसह Realme 9i गेल्यावर्षी भारतात लाँच झाला होता. त्यामुळे असा अंदाज लावला जात आहे की रियलमी 10टी 5जी नावानं लाँच होणारा स्मार्टफोन रियलमी 9आयचा रीब्रँड व्हर्जन असू शकतो. तसेच सर्टिफिकेशन्सवरून स्पष्ट झालं आहे की रियलमी 10टी 5जी लवकरच भारतात येऊ शकतो. हे देखील वाचा: वनप्लसपेक्षा स्वस्त झाला Samsung Galaxy S22, जुना स्टॉक संपवण्यासाठी किंमतीत मोठी कपात

Realme 10T 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

  • 6.6″ FHD+ Display
  • 6GB RAM + 128GB Storage
  • MediaTek Dimensity 810
  • 50 Triple Rear Camera
  • 18W 5,000mAh Battery

रियलमी 10टी 5जी स्मार्टफोन रियलमी 9आयचा रीब्रँडेड व्हर्जन बनून मार्केटमध्ये येऊ शकतो त्यामुळे यांचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स एक सारखे असू शकतात. भारतात रियलमी 9आय 5जी स्मार्टफोन 2408 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या फुलएचडी+ एलसीडी डिस्प्लेसह लाँच झाला आहे. जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट, 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट आणि 400निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. Realme 9i 5G अँड्रॉइड 12 वर लाँच करण्यात आला आहे जो रियलमी युआय 3.0 सह मिळून चालतो. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेकचा डिमेन्सिटी 810 5जी चिपसेट आणि माली-जी57 एमसी2 जीपीयू आहे.

फोटोग्राफीसाठी रियलमी 9आय 5जी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर फ्लॅश लाईटसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे. जोडीला रियर कॅमेरा सेटअपमध्ये 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. फोनच्या फ्रंट पॅनलवर एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. हे देखील वाचा: विवोचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन लाँच; Vivo X90 आणि Vivo X90 Pro येत आहेत भारतात

रियलमी 9आय 5जी एक ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईवर देखील चालतो. 3.5एमएम जॅक व अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी यात साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा मोबाइल फोन 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. Realme 9i 5G 4GB + 64GB व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये आणि 6GB + 128GB व्हेरिएंटची प्राइस 16,999 रुपये आहे.

The post Realme 10T 5G स्मार्टफोन भारतीय सर्टिफिकेशन साइट BIS सह NBTC वेबसाइटवर लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-10t-5g-phone-to-launch-as-rebadged-realme-9i-5g/feed/ 0