50MP Camera आणि 5,000mAh Battery सह Realme 10T 5G थायलंडमध्ये लाँच

Highlights

  • Realme 10T 5G थायलंडमध्ये लाँच झाला आहे.
  • हा फोन MediaTek Dimensity 810 वर चालतो.
  • रियलमी 10टी 5जी फोनमध्ये 8GB Dynamic RAM देण्यात आली आहे.

Realme 10T 5G फोन थायलंडमध्ये लाँच झाला आहे. हा या सीरीजमध्ये जोडण्यात आलेला सहावा मोबाइल आहे. याआधी realme 10, realme 10 Pro 5G, realme 10 Pro+ 5G आणि realme 10 Pro 5G Coca-Cola Edition भारतात लाँच झाले आहेत तर realme 10s चायनामध्ये आला आहे. MediaTek Dimensity 810 प्रोसेसरसह आलेल्या नवीन रियलमी 10टी 5जी फोन ची संपूर्ण माहिती पुढे देण्यात आली आहे.

रियलमी 10टी 5जी चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.6″ FHD+ 90Hz Display
  • 8GB Dynamic RAM
  • MediaTek Dimensity 810
  • 50MP Triple Camera
  • 8MP Selfie Sensor
  • 18W 5,000mAh Battery

Realme 10T 5G फोन 2408 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही फोन स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. हा डिस्प्ले 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट, 400निट्स ब्राइटनेस सारख्या फीचर्ससह येतो. हे देखील वाचा: 16GB RAM आणि शक्तिशाली प्रोसेसरसह OPPO Find X6 Pro ची एंट्री, जोडीला 100W fast charging

रियलमी 10टी 5जी अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे जो रियलमी वनयुआयसह चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक डिमेनसिटी 810 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालतो. हा फोन 8जीबी डायनॉमिक रॅमला सपोर्ट करतो जो याला 16जीबी रॅमची ताकद देतो. ग्राफिक्ससाठी हा फोन माली जी57 जीपीयूला सपोर्ट करतो.

फोटोग्राफीसाठी Realme 10T 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे जो 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलच्या पोर्टरेट लेन्ससह चालतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हे देखील वाचा: 50MP+50MP+50MP! पावरफुल कॅमेरा सेटअपसह OPPO Find X6 लाँच, पाहा स्पेसिफिकेशन्स

रियलमी 10टी 5जी फोन पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीवर चालते. सिक्योरिटीसाठी या फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. हा मोबाइल फोन 3.5एमएम जॅकला सपोर्ट करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here