Redmi Note 12 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 22 Mar 2023 10:31:19 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 30 मार्चला भारतात येतोय Redmi Note 12 4G; मिळणार 50MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12-india-launch-date-march-30-company-confirm/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12-india-launch-date-march-30-company-confirm/#respond Thu, 23 Mar 2023 03:29:46 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19659 Xiaomi ने यावर्षी जानेवारीमध्ये Redmi Note 12 सीरीज भारतीय टेक मार्केटमध्ये सादर केली होती. तयेव्ह Redmi Note 12 5G, Redmi Note 12 Pro 5G आणि Redmi Note 12 Pro+ 5G आले होते. आता चीनी कंपनी भारतात Note 12 series मध्ये नवीन फोन रेडमी नोट 12 4जी सादर करण्यास तयार आहे. कंपनीनं ट्विटरवरून 30 मार्चला नवीन […]

The post 30 मार्चला भारतात येतोय Redmi Note 12 4G; मिळणार 50MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Redmi Note 12 भारतात 30 मार्चला लाँच होईल.
  • फोनमध्ये 50एमपी कॅमेरा आणि 11जीबी रॅम असेल.
  • या फोनची विक्री फ्लिपकार्टच्या माध्यमातून केली जाऊ शकते.

Xiaomi ने यावर्षी जानेवारीमध्ये Redmi Note 12 सीरीज भारतीय टेक मार्केटमध्ये सादर केली होती. तयेव्ह Redmi Note 12 5G, Redmi Note 12 Pro 5G आणि Redmi Note 12 Pro+ 5G आले होते. आता चीनी कंपनी भारतात Note 12 series मध्ये नवीन फोन रेडमी नोट 12 4जी सादर करण्यास तयार आहे. कंपनीनं ट्विटरवरून 30 मार्चला नवीन रेडमी नोट 12 येणार असल्याचं सांगितलं आहे, तर या स्मार्टफोनच्या मायक्रोसाइटवरून समजलं आहे की हा 4जी फोन आहे. तसेच काही स्पेक्सचा देखील खुलासा झाला आहे, त्यानुसार हा फोन 50MP कॅमेरा, 11जीबी रॅम आणि 5000mAh बॅटरीला सपोर्ट करेल.

30 मार्चला होणार रेडमी नोट 12 4जीची एंट्री

कंपनीच्या ऑफिशियल घोषणेनुसार, Redmi Note 12 भारतीय बाजारात 30 मार्चला सादर केला जाईल. Xiaomi नं आगामी लाँचसाठी अधिकृत घोषणा करण्यासाठी हा फोन सोशल मीडिया चॅनल्सवर टीज केला आहे. लाँच टीजरमधून आगामी डिवाइसच्या लुकची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर Redmi Note 12 साठी शाओमीनं आपल्या वेबसाइटवर एक मायक्रो-साइट लाइव्ह केली आहे, ज्यात हँडसेटच्या प्रमुख स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. हे देखील वाचा: 15 हजारांपेक्षा कमी झाली iQOO Z6 5G ची किंमत, कंपनीनं केली मोठी कपात

Redmi Note 12 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स (ऑफिशियल)

रेडमी नोट 12 मध्ये पंच होल असलेला 120Hz अ‍ॅमोलेड डिस्प्ले असेल. तसेच फोनमध्ये फुल एचडी+ रिजोल्यूशन मिळू शकतं. हँडसेटमध्ये ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 685 प्रोसेसर दिला जाईल. त्याचबरोबर स्मार्टफोनमध्ये 11जीबी रॅम (व्हर्च्युअल रॅमसह) मिळेल. इतकेच नव्हे तर Redmi Note 12 मध्ये मागे ट्रिपल-रियर कॅमेरा सेटअप आणि एक एलईडी फ्लॅश दिली जाईल. कंपनीनं सांगितलं आहे की डिवाइसवर प्रायमरी सेन्सर 50एमपीचा असेल. इतर दोन रियर सेन्सर आणि फ्रंट कॅमेऱ्याची माहिती मात्र समजली नाही. हे देखील वाचा: Find My Device म्हणजे काय? कसं वापरायचं आणि याचे फायदे काय? जाणून घ्या महत्व

फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5000mAh ची बॅटरी असेल जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. आशा आहे की हँडसेटमध्ये चार्जिंग आणि डेटा ट्रांसफरसाठी टाइप-सी पोर्ट मिळेल. सुरक्षेसाठी डिवाइसमध्ये एक साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर मिळू शकतो, जो पावर बटनमध्ये एम्बेडेड असू शकतो. हँडसेट मध्ये 3.5 एमएम ऑडियो जॅक आणि आयआर ब्लास्टर देखील असू शकतो.

The post 30 मार्चला भारतात येतोय Redmi Note 12 4G; मिळणार 50MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12-india-launch-date-march-30-company-confirm/feed/ 0
Redmi Note 12 Explorer Edition चीनमध्ये लाँच https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-12-explorer-edition-launched-in-india-check-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-12-explorer-edition-launched-in-india-check-price-and-specifications/#respond Fri, 28 Oct 2022 05:05:49 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14397 Redmi Note 12 Pro, Redmi Note 12 Pro+ आणि Redmi Note 12 Explorer Edition स्मार्टफोन लाँच झाले आहेत. Xiaomi च्या सब-ब्रँड रेडमी अंतर्गत हे तिन्ही मोबाइल कंपनीच्या होम मार्केटमध्ये चीनमध्ये लाँच करण्यात आले आहेत, जे खूप पावरफुल स्पेसिफिकेशन्सनी सुसज्ज आहेत. यातील रेडमी नोट 12 एक्सप्लोरर एडिशन सर्वात ताकदवान डिवाइस आहे ज्याची माहिती पुढे देण्यात आली […]

The post Redmi Note 12 Explorer Edition चीनमध्ये लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Redmi Note 12 Pro, Redmi Note 12 Pro+ आणि Redmi Note 12 Explorer Edition स्मार्टफोन लाँच झाले आहेत. Xiaomi च्या सब-ब्रँड रेडमी अंतर्गत हे तिन्ही मोबाइल कंपनीच्या होम मार्केटमध्ये चीनमध्ये लाँच करण्यात आले आहेत, जे खूप पावरफुल स्पेसिफिकेशन्सनी सुसज्ज आहेत. यातील रेडमी नोट 12 एक्सप्लोरर एडिशन सर्वात ताकदवान डिवाइस आहे ज्याची माहिती पुढे देण्यात आली आहे.

Redmi Note 12 Explorer Edition Display

रेडमी नोट 12 एक्सप्लोरर एडिशन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर लाँच झाला आहे जो 2400 X 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.67 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन ओएलईडी पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेट तथा 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. Redmi Note 12 Explorer Edition मध्ये 900निट्स ब्राइटनेस, एचडीआर10+ आणि डॉल्बी व्हिजन सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. हे देखील वाचा: जबरदस्त! सर्वांना परवडणाऱ्या किंमतीत 200MP Camera! दमदार Redmi Note 12 Pro आणि Note 12 Pro Plus लाँच

Xiaomi Redmi Note 12 Explorer Edition launched in india check price and specifications

Redmi Note 12 Explorer Edition Camera

फोटोग्राफीसाठी रेडमी नोट 12 एक्सप्लोरर एडिशन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.65 अपर्चर असलेला 200 मेगापिक्सलचा सॅमसंग एचपीएक्स सेन्सर देण्यात आला आहे. तसेच स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. Redmi Note 12 Explorer Edition 16 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Redmi Note 12 Explorer Edition Processor

रेडमी नोट 12 एक्सप्लोरर एडिशन अँड्रॉइड 12 वर आधारित मीयुआय 13 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक डिमेनसिटी 1080 चिपसेट देण्यात आला आहे. हा रेडमी मोबाइल 5जी आणि 4जी दोन्ही वर चालतो. Redmi Note 12 Explorer Edition मध्ये 8 जीबी पर्यंतच्या रॅम आणि 256 जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

Redmi Note 12 Explorer Edition Battery

रेडमी नोट 12 एक्सप्लोरर एडिशनची सर्वात मोठी खासियत याची चार्जिंग टेक्नॉलॉजी आहे. हा स्मार्टफोन 210वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. Redmi Note 12 Explorer Edition मध्ये 4,300एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी कंपनीच्या दाव्यानुसार 210W fast charging support मुळे फक्त 9 मिनिटांत 0 ते 100 टक्क्यांपर्यंत म्हणजे फुल चार्ज होतो. हे देखील वाचा: सुपर डिजाइन आणि दमदार फीचर्स असलेल्या फोनवर 5,000 रुपयांची सूट; अशी Realme 9i वरील ऑफर

Redmi Note 12 Explorer Edition Price

रेडमी नोट 12 एक्सप्लोरर एडिशन टेक मंचावर फक्त एकच व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे. या मोबाइल फोनमध्ये 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे जिची प्राइस 2,399 युआन म्हणजे भारतीय करंसीनुसार 27,200 रुपयांच्या आसपास आहे. चीनमध्ये Redmi Note 12 Explorer Edition स्मार्टफोन ब्लॅक कलरमध्ये लाँच केला गेला आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Redmi Note 12 Explorer Edition चीनमध्ये लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-12-explorer-edition-launched-in-india-check-price-and-specifications/feed/ 0
हुकमाचा एक्का काढणार Xiaomi! शक्तिशाली प्रोसेसरसह Redmi Note 12 लाँच करण्याची तयारी, पाहा भन्नाट फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-12-pro-price-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-12-pro-price-specifications-leaked/#respond Thu, 13 Oct 2022 05:22:27 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13936 Xiaomi च्या सब ब्रँड रेडमीची नोट सीरिज खूप लोकप्रिय आहे, बजेटमध्ये दमदार स्पेसिफिकेशन्स देण्यासाठी ही सीरिज ओळखली जाते. आता कंपनी लवकरच आपली रेडमी नोट 12 सीरीज (Redmi Note 12 Series) सादर करणार आहे. या स्मार्टफोन सीरीज अंतगर्त Redmi Note 12, Redmi Note 12 Pro आणि Redmi Note 12 Pro Max लाँच केले जातील अशी चर्चा […]

The post हुकमाचा एक्का काढणार Xiaomi! शक्तिशाली प्रोसेसरसह Redmi Note 12 लाँच करण्याची तयारी, पाहा भन्नाट फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi च्या सब ब्रँड रेडमीची नोट सीरिज खूप लोकप्रिय आहे, बजेटमध्ये दमदार स्पेसिफिकेशन्स देण्यासाठी ही सीरिज ओळखली जाते. आता कंपनी लवकरच आपली रेडमी नोट 12 सीरीज (Redmi Note 12 Series) सादर करणार आहे. या स्मार्टफोन सीरीज अंतगर्त Redmi Note 12, Redmi Note 12 Pro आणि Redmi Note 12 Pro Max लाँच केले जातील अशी चर्चा आहे. शाओमीनं मात्र या स्मार्टफोन्सच्या लाँच बद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही परंतु फोन बाजारात येण्याआधीच रेडमी नोट 12 चे स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत. पुढे आम्ही Xiaomi Redmi Note 12 स्मार्टफोन कोणत्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्ससह बाजारात येईल याची माहिती दिली आहे.

Xiaomi Redmi Note 12

शाओमी रेडमी नोट 12 बद्दल अनेक लीक्स समोर आले आहेत. अलीकडेच चीनी मायक्रोब्लागिंग साइट वेईबोवर हा आगामी रेडमी फोन स्पॉट करण्यात आला आहे जिथे अनेक महत्वाचे स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. Xiaomi Redmi Note 12 बद्दल समजलं आहे की हा स्मार्टफोन मीडियाटेक डिमेन्सिटी 1080 चिपसेट (MediaTek Dimensity 1080) वर लाँच केला जाईल. या चिपसेटची तुलना टक्कर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी (Qualcomm Snapdragon 778G) चिपसेटशी केली जात आहे. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीला नोकियाचा दणका! अत्यंत कमी किंमतीत 8 इंचाचा Nokia T10 LTE टॅबलेट

Xiaomi Redmi Note 12 Pro price specifications leaked
Redmi Note 11 Pro Plus

Redmi Note 12 मध्ये डिमेन्सिटी 1080 चिपसेट सोबतच 2.6गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टा-कोर प्रोसेसर मिळू शकतो जो कोर्टेक्स ए78 कोरवर चालतो. हा रेडमी मोबाइल लेटेस्ट अँड्रॉइड 13 वर लाँच केला जाऊ शकतो जो मीयुआय 13 वर काम करेल. फोटोग्राफीसाठी रेडमी नोट 12 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो ज्यात 50 मेगापिक्सल प्रायमरी अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससह 2 मेगापिक्सल मॅक्रो सेन्सरचा समावेश असू शकतो.

Redmi Note 11 Price

भारतात सध्या रेडमी नोट 11 स्मार्टफोन तीन व्हेरिएंट्समध्ये विकत घेता येईल. रेडमी नोट 11 चा बेस व्हेरिएंट 4 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत 11,999 रुपये आहे. रेडमी नोट 11 चा 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 13,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल तर सर्वात मोठा व्हेरिएंट 6GB RAM + 128GB Storage Redmi Note 11 Price 15,499 रुपये आहे. हा फोन Horizon Blue, Space Black आणि Starburst White कलरमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: 521KM च्या अवाढव्य रेंजसह BYD Atto 3 Electric SUV ची भारतात एंट्री; युनिट्स संपण्याआधीच करा बुक

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post हुकमाचा एक्का काढणार Xiaomi! शक्तिशाली प्रोसेसरसह Redmi Note 12 लाँच करण्याची तयारी, पाहा भन्नाट फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-12-pro-price-specifications-leaked/feed/ 0