30 मार्चला भारतात येतोय Redmi Note 12 4G; मिळणार 50MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी

Highlights

  • Redmi Note 12 भारतात 30 मार्चला लाँच होईल.
  • फोनमध्ये 50एमपी कॅमेरा आणि 11जीबी रॅम असेल.
  • या फोनची विक्री फ्लिपकार्टच्या माध्यमातून केली जाऊ शकते.

Xiaomi ने यावर्षी जानेवारीमध्ये Redmi Note 12 सीरीज भारतीय टेक मार्केटमध्ये सादर केली होती. तयेव्ह Redmi Note 12 5G, Redmi Note 12 Pro 5G आणि Redmi Note 12 Pro+ 5G आले होते. आता चीनी कंपनी भारतात Note 12 series मध्ये नवीन फोन रेडमी नोट 12 4जी सादर करण्यास तयार आहे. कंपनीनं ट्विटरवरून 30 मार्चला नवीन रेडमी नोट 12 येणार असल्याचं सांगितलं आहे, तर या स्मार्टफोनच्या मायक्रोसाइटवरून समजलं आहे की हा 4जी फोन आहे. तसेच काही स्पेक्सचा देखील खुलासा झाला आहे, त्यानुसार हा फोन 50MP कॅमेरा, 11जीबी रॅम आणि 5000mAh बॅटरीला सपोर्ट करेल.

30 मार्चला होणार रेडमी नोट 12 4जीची एंट्री

कंपनीच्या ऑफिशियल घोषणेनुसार, Redmi Note 12 भारतीय बाजारात 30 मार्चला सादर केला जाईल. Xiaomi नं आगामी लाँचसाठी अधिकृत घोषणा करण्यासाठी हा फोन सोशल मीडिया चॅनल्सवर टीज केला आहे. लाँच टीजरमधून आगामी डिवाइसच्या लुकची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर Redmi Note 12 साठी शाओमीनं आपल्या वेबसाइटवर एक मायक्रो-साइट लाइव्ह केली आहे, ज्यात हँडसेटच्या प्रमुख स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. हे देखील वाचा: 15 हजारांपेक्षा कमी झाली iQOO Z6 5G ची किंमत, कंपनीनं केली मोठी कपात

Redmi Note 12 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स (ऑफिशियल)

रेडमी नोट 12 मध्ये पंच होल असलेला 120Hz अ‍ॅमोलेड डिस्प्ले असेल. तसेच फोनमध्ये फुल एचडी+ रिजोल्यूशन मिळू शकतं. हँडसेटमध्ये ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 685 प्रोसेसर दिला जाईल. त्याचबरोबर स्मार्टफोनमध्ये 11जीबी रॅम (व्हर्च्युअल रॅमसह) मिळेल. इतकेच नव्हे तर Redmi Note 12 मध्ये मागे ट्रिपल-रियर कॅमेरा सेटअप आणि एक एलईडी फ्लॅश दिली जाईल. कंपनीनं सांगितलं आहे की डिवाइसवर प्रायमरी सेन्सर 50एमपीचा असेल. इतर दोन रियर सेन्सर आणि फ्रंट कॅमेऱ्याची माहिती मात्र समजली नाही. हे देखील वाचा: Find My Device म्हणजे काय? कसं वापरायचं आणि याचे फायदे काय? जाणून घ्या महत्व

फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5000mAh ची बॅटरी असेल जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. आशा आहे की हँडसेटमध्ये चार्जिंग आणि डेटा ट्रांसफरसाठी टाइप-सी पोर्ट मिळेल. सुरक्षेसाठी डिवाइसमध्ये एक साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर मिळू शकतो, जो पावर बटनमध्ये एम्बेडेड असू शकतो. हँडसेट मध्ये 3.5 एमएम ऑडियो जॅक आणि आयआर ब्लास्टर देखील असू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here