15 हजारांपेक्षा कमी झाली iQOO Z6 5G ची किंमत, कंपनीनं केली मोठी कपात

Highlights

  • iQOO Z6 5G च्या सर्व व्हेरिएंट्सची किंमत कमी झाली.
  • भारतात iQOO Z7 5G फोन लाँचनंतर ही कपात झाली.
  • आयकू झेड6 5जी फोनच्या सर्व व्हेरिएंट्सवर ही प्राइस लागू आहे.

iQOO Z7 5G फोन उद्या भारतात लाँच झाला आहे ज्याची प्राइस, सेल व स्पेसिफिकेशन्सची माहिती इथे क्लिक करून वाचता येईल. हा 5जी फोन भारतीय बाजारात येताच कंपनीनं iQOO Z6 5G च्या किंमतीत मोठी कपात केली आहे. आयकूनं या फोनच्या सर्व व्हेरिएंट्सच्या किंमती कमी केल्या आहेत, ज्यामुळे आयकू झेड6 5जी फोन 15 हजारांपेक्षा कमी किंमतीत विकत घेता येईल. हा प्राइस कट आजपासून लागू झाला आहे ज्याची माहिती पुढे देण्यात आली आहे.

आयकू झेड6 5जी ची किंमत

  • नवीन किंमत:

4GB RAM + 64GB Storage = 14,499 रुपये

6GB RAM + 128GB Storage = 15,999 रुपये

8GB RAM + 128GB Storage = 16,999 रुपये

  • पुरानी किंमत:

4GB RAM + 64GB Storage = 15,499 रुपये

6GB RAM + 128GB Storage = 16,999 रुपये

8GB RAM + 128GB Storage = 17,999 रुपये

iQOO Z6 5G भारतीय बाजारात तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. याच्या बेस व्हेरिएंटमध्ये 4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 15,499 रुपये होती. परंतु आता प्राइस कटनंतर याची किंमत 14,499 रुपये झाली आहे. तसेच फोनच्या 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 16,999 वरून 15,999 रुपये झाली आहे तसेच सर्वात मोठ्या 8जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपयांवरून 16,999 रुपये झाली आहे.

आयकू झेड6 5जी स्पेसिफिकेशन्स

स्पेसिफिकेशन्स पाहता iQOO Z6 5G स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 695 SoC सह सादर करण्यात आला होता. iQOO Z6 5G स्मार्टफोनमध्ये 6.58-इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यात सेल्फी कॅमेऱ्यासाठी वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे. या फोनच्या डिस्प्लेचे रिजोल्यूशन Full HD+ आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे. तसेच फोनच्या डिस्प्लेमध्ये सेकंड जेनेरेशन पांडा ग्लासची सुरक्षा मिळते. हे देखील वाचा: 50MP Camera आणि 5,000mAh Battery सह Realme 10T 5G थायलंडमध्ये लाँच

कॅमेरा सेटअप पाहता फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP चा आहे, जोडीला 2MP चा मॅक्रो आणि 2MP चा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. iQOO Z6 5G स्मार्टफोन Android 12 वर आधारित Funtouch OS 12 वर चालतो. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच हा फोन 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here