Samsung Galaxy F04 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 07:10:25 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 7,499 रुपयांमध्ये Samsung Galaxy F04 झाला भारतात लाँच; पाहा माहिती https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f04-launched-in-india-at-rs-7499-price-know-specifications-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f04-launched-in-india-at-rs-7499-price-know-specifications-sale-offer/#respond Thu, 05 Jan 2023 04:24:02 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16558 Samsung Galaxy F04 स्मार्टफोन 7,499 रुपयांमध्ये भारतात लाँच झाला आहे. विशेष म्हणजे या किंमतीची माहिती 91मोबाइल्सनं गेल्याच आठवड्यात आपल्या एक्सक्लूसिव्ह रिपोर्टमध्ये दिली होती. गॅलेक्सी एफ04 सोबतच सॅमसंगनं लो बजेट सेग्मेंटमध्ये आपला नवीन डाव टाकला आहे जो थेट चीनी कंपन्यांना आव्हान देईल. या बजेट सेग्मेंटमध्ये Realme आणि Redmi सह Infinix तसेच Tecno ला सॅमसंग गॅलेक्सी एफ04 […]

The post 7,499 रुपयांमध्ये Samsung Galaxy F04 झाला भारतात लाँच; पाहा माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy F04 स्मार्टफोन 7,499 रुपयांमध्ये भारतात लाँच झाला आहे. विशेष म्हणजे या किंमतीची माहिती 91मोबाइल्सनं गेल्याच आठवड्यात आपल्या एक्सक्लूसिव्ह रिपोर्टमध्ये दिली होती. गॅलेक्सी एफ04 सोबतच सॅमसंगनं लो बजेट सेग्मेंटमध्ये आपला नवीन डाव टाकला आहे जो थेट चीनी कंपन्यांना आव्हान देईल. या बजेट सेग्मेंटमध्ये Realme आणि Redmi सह Infinix तसेच Tecno ला सॅमसंग गॅलेक्सी एफ04 कडून टक्कर मिळेल.

Samsung Galaxy F04 Price

सॅमसंग गॅलेक्सी एफ04 स्मार्टफोन भारतात 7,499 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. शॉपिंग साइट फ्लिपकार्टच्या प्लॅटफॉर्मवरून हा मोबाइल फोन ऑफिशियल करण्यात आला आहे. या फोनमध्ये 4जीबी रॅम आणि 64जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. Samsung Galaxy F04 ची सेल 12 जानेवारीपासून फ्लिपकार्टवर सुरु होईल तसेच हा Jade Purple आणि Opal Green कलरमध्ये विकत घेता येईल. सुरवातीच्या ऑफर्सनंतर या फोनची सेलिंग प्राइस 9,499 रुपये होईल. हे देखील वाचा: मायबोली मराठीत वापरा GPay, PhonePe, Amazon Pay आणि Paytm; अशी आहे भाषा बदल्याण्याची प्रोसेस

Samsung Galaxy F04 Specifications

  • 6.5″ HD+ डिस्प्ले
  • 4GB RAM
  • 13MP रियर कॅमेरा
  • MediaTek Helio P35 चिपसेट
  • 15W 5,000mAh Battery

सॅमसंग गॅलेक्सी एफ04 मध्ये 1560 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीनं याला इनफिनिटी ‘वी’ असं नाव दिलं आहे जो एलसीडी पॅनलवर बनला आहे. हा सॅमसंग फोन 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर मीडियाटेक हीलियो पी35 चिपसेटवर चालतो. ग्राफिक्ससाठी फोनमध्ये पावरवीआर जीई8320 जीपीयू आहे.

Samsung Galaxy F04 अँड्रॉइड 12 वर आधारित वनयुआयवर चालतो. हा स्मार्टफोन ड्युअल सिमला सपोर्ट करतो ज्यात 4जी एलटीई वापरता येतं. या सॅमसंग फोनमध्ये 3.5एमएम जॅकसह अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देखील देण्यात आले आहेत. पावर बॅकअपसाठी हा मोबाइल फोन 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: Bank Mitra Apply Online: दहावी पास देखील बँक मित्र बनून करू शकतात कमाई; जाणून घ्या प्रोसेस

फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी एफ04 ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे, जोडीला एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देखील आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा मोबाइल फोन एफ/2.2 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

The post 7,499 रुपयांमध्ये Samsung Galaxy F04 झाला भारतात लाँच; पाहा माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f04-launched-in-india-at-rs-7499-price-know-specifications-sale-offer/feed/ 0
Samsung Galaxy F04 पुढील आठवड्यात येऊ शकतो भारतात; रॅम प्लस फिचरची माहिती लीक https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f04-launching-in-india-next-week-price-under-8000-with-ram-plus/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f04-launching-in-india-next-week-price-under-8000-with-ram-plus/#respond Thu, 29 Dec 2022 03:30:27 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16458 Samsung Galaxy F04 लवकरच भारतात लाँच होऊ शकतो. हा एक लो बजेट स्मार्टफोन असू शकतो ज्याची किंमत 8,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते. कंपनी बऱ्याच कालावधीनंतर ‘एफ’ सीरीजचा मोबाइल फोन भारतीय बाजारात घेऊन येत आहे आणि पुढील आठवड्यात म्हणजे साल 2023 च्या सुरुवातीला भारतात लाँच होऊ शकतो. RAM Plus फीचर सोबतच ड्युअल रियर कॅमेरा आणि मोठी […]

The post Samsung Galaxy F04 पुढील आठवड्यात येऊ शकतो भारतात; रॅम प्लस फिचरची माहिती लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy F04 लवकरच भारतात लाँच होऊ शकतो. हा एक लो बजेट स्मार्टफोन असू शकतो ज्याची किंमत 8,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते. कंपनी बऱ्याच कालावधीनंतर ‘एफ’ सीरीजचा मोबाइल फोन भारतीय बाजारात घेऊन येत आहे आणि पुढील आठवड्यात म्हणजे साल 2023 च्या सुरुवातीला भारतात लाँच होऊ शकतो. RAM Plus फीचर सोबतच ड्युअल रियर कॅमेरा आणि मोठी बॅटरी या स्वस्त सॅमसंग फोनची खासियत असू शकते.

Samsung Galaxy F04

सॅमसंग गॅलेक्सी एफ04 बद्दल आम्हाला माहिती मिळाली आहे की कंपनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच हा स्मार्टफोन भारतीय बाजारात अनाउंस करू शकते. हा मोबाइल 7 हजारांच्या रेंज मध्ये भारतात लाँच होऊ शकतो जो फ्लिपकार्टवर विकला जाऊ शकतो. फोनची किंमत 7,499 रुपये असू शकते. कंपनीनं सर्व स्पेसिफिकेशन्सची माहिती तर दिली नाही परंतु Galaxy F04 RAM Plus फीचरसह 8GB RAM वर परफॉर्म करू शकतो, हे मात्र स्पष्ट झालं आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हे देखील वाचा: वोडाफोन-आयडियाचे 25 आणि 55 रुपयांचे दोन नवे प्लॅन सादर; फायदे Jio पेक्षा जास्त

नुकत्याच आलेल्या Samsung Galaxy A04e चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले
  • 13MP ड्युअल रियर कॅमेरा
  • MediaTek Helio P35 चिपसेट
  • 5,000mAh Battery

हा सॅमसंग फोन अलीकडेच भारतात लाँच झाला आहे ज्याची किंमत 9,299 रुपयांपासून सुरु होते. ही 3जीबी रॅम + 32जीबी स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंटची प्राइस आहे. तसेच Samsung Galaxy A04e 3जीबी + 64जीबी व्हेरिएंट 9,999 रुपये तसेच 4जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज व्हेरिएंट 11,499 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे.

या लो बजेट सॅमसंग मोबाइल फोनमध्ये 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाचा एचडी+ वॉटरड्रॉप नॉच एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. अँड्रॉइड 12 सह हा स्मार्टफोन 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड ऑक्टाकोर मीडियाटेक हीलियो पी35 प्रोसेसरवर चालतो. यात देखील RAM Plus feature मुळे फोनमधील इंटरनल रॅम 4जीबी एक्स्ट्रा बूस्ट करता येतो आणि 8जीबी रॅमची परफॉर्मन्स मिळते. हे देखील वाचा: GPay, Paytm आणि PhonePe वर अशी करा बिलाची समसमान वाटणी; कॅल्क्युलेटरचीही गरज नाही

फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए04ई च्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. फोनच्या फ्रंट पॅनलवर एफ/2.2 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सल सेल्फी सेन्सर आहे. पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी ए04ई मध्ये 5,000एमएएचची बॅटरी मिळते.

The post Samsung Galaxy F04 पुढील आठवड्यात येऊ शकतो भारतात; रॅम प्लस फिचरची माहिती लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f04-launching-in-india-next-week-price-under-8000-with-ram-plus/feed/ 0