वोडाफोन-आयडियाचे 25 आणि 55 रुपयांचे दोन नवे प्लॅन सादर; फायदे Jio पेक्षा जास्त

वोडाफोन-आयडियानं (VI) 5G लाइव्ह करण्याआधी आपल्या ग्राहकांना नव्या रिचार्जची भेट दिली आहे. कंपनीनं डेटा अ‍ॅड ऑन रिचार्जच्या यादीत दोन नवीन प्लॅन जोडले आहेत. कंपनी सादर केलेले हे रिचार्ज प्लॅन खूप स्वस्तात उपलब्ध झाला आहेत, ज्यामुळे जियोचं टेंशन वाढू शकतं. कंपनीनं 25 रुपये आणि 55 रुपयांचे दोन नवीन रिचार्ज प्लॅन नवीन वर्षांपूर्वी सादर केले आहेत. या दोन्ही प्लॅनमध्ये ग्राहकांना 4G डेटा मिळेल. चला जाणून घेऊया दोन्ही प्लॅनमध्ये मिळणारे सर्व फायदे.

Vi चे दोन डेटा प्लॅन

Vi Rs 25 Data Plan: वोडाफोनच्या प्रीपेड युजर्सना 25 रुपयांच्या प्लॅनमध्ये 1 दिवसासाठी 1.1 जीबी डेटा दिला जात आहे. तसेच रिचार्जमध्ये 7 दिवसांसाठी अ‍ॅड फ्री म्यूजिकचा अनुभव देखील दिला जात आहे. याव्यतिरिक्त या प्लॅनमध्ये इतर कोणतेही फायदे कंपनी देत नाही.

Vi Rs 55 Plan: वोडाफोनचा दुसरा प्लॅन पाहता याची किंमत 55 रूपये आहे. तसेच, या रिचार्जमध्ये ग्राहकांना 3.3 जीबी डेटा मिळतो, ज्याची वॅलिडिटी 7 दिवस आहे. तसेच या प्लॅनसह युजर्सना 1 महिन्यासाठी अ‍ॅड फ्री म्यूजिकचा एक्सपीरियंस मिळेल.

नोट: लक्षात असू दे की दोन्ही प्लॅन वापरण्यासाठी तुम्हाला एक अ‍ॅक्टिव्ह बेस प्लॅनची गरज असेल. म्हणजे तुम्ही यांचा वापर अ‍ॅडीशनल डेटा व्हाउचर प्रमाणे करू शकता.

कॉलिंग आणि SMS चा फायदा नाही

या दोन्ही प्लॅनमध्ये तुम्हाला फक्त डेटा मिळेल. याचा अर्थ असा की रिचार्जमध्ये युजर्सना कॉलिंग आणि एसएमएसचा फायदा मिळत नाही. Vi 5G लाइव्ह न झाल्यामुळे ग्राहक सध्या या प्लॅन्समध्ये फक्त हाय-स्पीड 4G डेटा वापरू शकतील.

काही दिवसांपूर्वी आला आहे 75 रुपयांचा प्लॅन

वोडाफोन आयडियानं काही दिवसांपूर्वी 75 रुपयांच्या डेटा प्लॅन देखील सादर केला होता. या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 6GB डेटा दिला जात आहे. कंपनी या प्लॅन सोबत 7 दिवसांची वैधता देत आहे. हा देखील एक डेटा व्हाउचर प्लॅन आहे त्यामुळे यात कॉलिंग आणि एसएमएसचे फायदे मिळत नाहीत. यासाठी तुमच्याकडे एक बेस प्लॅन अ‍ॅक्टिव्ह असणं आवश्यक आहे.

वोडाफोन-आयडियाचं 5G कधी येणार?

Vi आर्थिक अडचणींचा सामना करत आहे आणि कंपनीनं अजूनही आपले 5G बेस स्टेशन नेटवर्क उभारलं नाही. 5जी सर्व्हिसच्या अभावामुळे वोडाफोन-आयडिया आपले ग्राहक गमावू शकते कारण इतर टेलिकॉम कंपन्यांनी अनेक राज्यांमध्ये 5जी सेवा सुरु केली आहे. Vi ग्राहक गमावत आहे, हे काही आता लपून राहील नाही आणि पुढील सहा महिन्यांमध्ये अजून ग्राहक कंपनीचा निरोप घेऊ शकतात. रिपोर्ट्समधून माहिती मिळाली आहे की जर पुढील दोन महिन्यांमध्ये प्रमोटर्सकडून नवीन भांडवल आलं नाही तर वोडाफोन आयडियाचं भारतातील अस्तित्व धोक्यात येऊ शकतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here