Samsung Galaxy F04 पुढील आठवड्यात येऊ शकतो भारतात; रॅम प्लस फिचरची माहिती लीक

Samsung Galaxy F04 लवकरच भारतात लाँच होऊ शकतो. हा एक लो बजेट स्मार्टफोन असू शकतो ज्याची किंमत 8,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते. कंपनी बऱ्याच कालावधीनंतर ‘एफ’ सीरीजचा मोबाइल फोन भारतीय बाजारात घेऊन येत आहे आणि पुढील आठवड्यात म्हणजे साल 2023 च्या सुरुवातीला भारतात लाँच होऊ शकतो. RAM Plus फीचर सोबतच ड्युअल रियर कॅमेरा आणि मोठी बॅटरी या स्वस्त सॅमसंग फोनची खासियत असू शकते.

Samsung Galaxy F04

सॅमसंग गॅलेक्सी एफ04 बद्दल आम्हाला माहिती मिळाली आहे की कंपनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच हा स्मार्टफोन भारतीय बाजारात अनाउंस करू शकते. हा मोबाइल 7 हजारांच्या रेंज मध्ये भारतात लाँच होऊ शकतो जो फ्लिपकार्टवर विकला जाऊ शकतो. फोनची किंमत 7,499 रुपये असू शकते. कंपनीनं सर्व स्पेसिफिकेशन्सची माहिती तर दिली नाही परंतु Galaxy F04 RAM Plus फीचरसह 8GB RAM वर परफॉर्म करू शकतो, हे मात्र स्पष्ट झालं आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हे देखील वाचा: वोडाफोन-आयडियाचे 25 आणि 55 रुपयांचे दोन नवे प्लॅन सादर; फायदे Jio पेक्षा जास्त

नुकत्याच आलेल्या Samsung Galaxy A04e चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले
  • 13MP ड्युअल रियर कॅमेरा
  • MediaTek Helio P35 चिपसेट
  • 5,000mAh Battery

हा सॅमसंग फोन अलीकडेच भारतात लाँच झाला आहे ज्याची किंमत 9,299 रुपयांपासून सुरु होते. ही 3जीबी रॅम + 32जीबी स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंटची प्राइस आहे. तसेच Samsung Galaxy A04e 3जीबी + 64जीबी व्हेरिएंट 9,999 रुपये तसेच 4जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज व्हेरिएंट 11,499 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे.

या लो बजेट सॅमसंग मोबाइल फोनमध्ये 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाचा एचडी+ वॉटरड्रॉप नॉच एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. अँड्रॉइड 12 सह हा स्मार्टफोन 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड ऑक्टाकोर मीडियाटेक हीलियो पी35 प्रोसेसरवर चालतो. यात देखील RAM Plus feature मुळे फोनमधील इंटरनल रॅम 4जीबी एक्स्ट्रा बूस्ट करता येतो आणि 8जीबी रॅमची परफॉर्मन्स मिळते. हे देखील वाचा: GPay, Paytm आणि PhonePe वर अशी करा बिलाची समसमान वाटणी; कॅल्क्युलेटरचीही गरज नाही

फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए04ई च्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. फोनच्या फ्रंट पॅनलवर एफ/2.2 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सल सेल्फी सेन्सर आहे. पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी ए04ई मध्ये 5,000एमएएचची बॅटरी मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here