Samsung Galaxy J4 Plus - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 07 Jan 2019 11:19:41 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 सॅमसंग गॅलेक्सी जे4+ आणि गॅलेक्सी जे6+ ची किंमत 2,000 रुपयांपर्यंत कमी, बघा नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j4-galaxy-j6-price-in-india-slashed-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j4-galaxy-j6-price-in-india-slashed-in-marathi/#respond Mon, 07 Jan 2019 11:19:41 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3309 सॅमसंगने दोन्ही स्मार्टफोन्सच्या एकाच वेरिएंटची किंमत कमी केली आहे.

The post सॅमसंग गॅलेक्सी जे4+ आणि गॅलेक्सी जे6+ ची किंमत 2,000 रुपयांपर्यंत कमी, बघा नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जास्तीत जास्त ग्राहक मिळवण्यासाठी स्मार्टफोन ब्रँड सतत आपल्या स्मार्टफोनच्या किंमती कमी करत आहेत. वीवो, मोटो आणि असूस नंतर आता सॅमसंगने पण आपल्या स्मार्टफोन्सच्या किंमती कमी केल्या आहेत. साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिकी कंपनी सॅमसंगने गेल्या वर्षी लॉन्च केलेल्या सॅमसंग गॅलेक्सी जे4+ आणि गॅलेक्सी जे6+ च्या किंमती 2,000 रुपयांपर्यंत कमी केल्या आहेत. याआधी पण या स्मार्टफोन्सच्या किंमती कमी करण्यात आल्या होत्या. कंपनी ने साल 2018 मध्ये सॅमसंग गॅलेक्सी जे4+ आणि गॅलेक्सी जे6+ भारतात क्रमश: 10,990 रुपये व 15,990 रुपयांमध्ये लॉन्च केले गेले होते.

हि आहे नवीन किंमत
सॅमसंगने दोन्ही स्मार्टफोन्सच्या एकाच वेरिएंटची किंमत कमी केली आहे. सॅमसंग गॅलेक्सी जे4+ च्या 2जीबी रॅम + 32जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत आता 8,490 रुपये झाली आहे याआधी डिवाइस 9,990 रुपयांमध्ये विकला जात होता. तसेच सॅमसंग गॅलेक्सी जे6+ चा 4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज वेरिएंट कमी केलेल्या किंमतीनंतर 12,990 रुपयांमध्ये सेल केला जात आहे. याआधी हा डिवाइस 14,990 रुपयांमध्ये उपलब्द होता.

या नवीन किंमतीसह हे स्मार्टफोन ऑफलाइन मार्केट मध्ये मिळत आहे. पण ऑनलाइन रिटेल स्टोर्स वर डिवाइस अजूनही जुन्याच किंमतीसह लिस्ट आहेत. पण तुम्ही अमेझॉन इंडिया वर सॅमसंग गॅलेक्सी जे4+ नवीन किंमतीती विकत घेऊ शकता.

सॅमसंग गॅलेक्सी जे4+ चे स्पेसिफिकेशन्स
सॅमसंग गॅलेक्सी जे4+ मध्ये 6-इंचाचा ट्रू एचडी+ आईपीएस एलसीडी इनफिनिटी डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनचे फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल ग्लासचे आहेत आणि दोन्ही पॅनल मध्ये 2.5डी कर्व्ड ग्लास चा वापर करण्यात आला आहे. सोबत सॅमसंग गॅलेक्सी जे4+ क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 425 चिपसेट वर आधारित आहे. यात 512जीबी पर्यंतच्या मेमरी कार्डचा वापर करता येतो.

सॅमसंगचा हा फोन एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो वर चालतो आणि यात 3,300 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. फोटोग्राफी साठी फोन मध्ये एफ/1.9 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे तर 5-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. फोन मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर नाही. 4जी वोएलटीई सोबत डुअल सिम सपोर्ट मिळेल आणि कंपनीने यात फेस अनलॉक दिले आहे.

सॅमसंग गॅलेक्सी जे6+ चे स्पेसिफिकेशन्स
सॅमसंग गॅलेक्सी जे6+ मध्ये 6-इंचाचा ट्रू एचडी+ इनफिनिटी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 425 चिपसेट आधारित आहे. सोबत 4जीबी रॅम आणि 64जीबी मेमरी देण्यात आली. फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे आणि तुम्ही 512जीबी पर्यंतच्या कार्डचा वापर करू शकता. तसेच कार्ड मध्ये तुम्ही ऍप पण इंस्टॉल करू शकता. चांगल्या म्यूजिक साठी कंपनी ने हा डॉल्बी एटमॉस इंटीग्रेशन सह सादर केला आहे. फोन मध्ये तुम्ही 360 डिग्री सराउंड साउंडचा अनुभव घेऊ शकता.

फोटोग्राफीच्या बाबतीती हा खूप अपग्रेडड आहे. कंपनी ने हा डुअल रियर कॅमेऱ्यांसह सादर केला आहे. फोन मध्ये एक सेंसर एफ/1.9 अपर्चर वाला आहे तो 13-मेगापिक्सल सह येतो. तर दूसरा सेंसर 5-मेगापिक्सलचा आहे जो एफ/2.2 अपर्चर सह येतो. सॅमसंग गॅलेक्सी जे6+ मध्ये तुम्हाला 8-मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा मिळेल. तसेच पावर बॅकअप साठी 3,300 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post सॅमसंग गॅलेक्सी जे4+ आणि गॅलेक्सी जे6+ ची किंमत 2,000 रुपयांपर्यंत कमी, बघा नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j4-galaxy-j6-price-in-india-slashed-in-marathi/feed/ 0
सॅमसंग गॅलेक्सी जे6 प्लस आणि गॅलेक्सी जे4 प्लस झाले आॅफिशियल, डुअल कॅमेरा सह आहे 6-इंचाचा इनफिनिटी डिस्प्ले https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j6-plus-and-galaxy-j4-plus-goes-official-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j6-plus-and-galaxy-j4-plus-goes-official-in-marathi/#respond Wed, 19 Sep 2018 07:54:40 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2172 कंपनी ने अधिकृतपणे या फोन्सची घोषणा केली आहे. अजूनतरी किंमत समोर आली नाही पण स्पेसिफिकेशन उपलब्ध झाले आहेत.

The post सॅमसंग गॅलेक्सी जे6 प्लस आणि गॅलेक्सी जे4 प्लस झाले आॅफिशियल, डुअल कॅमेरा सह आहे 6-इंचाचा इनफिनिटी डिस्प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की लवकरच सॅमसंग बजेट सेग्मेंट मध्ये आपला नवीन स्मार्टफोन सादर करू शकते. त्यानुसार काल कंपनी दोन नवीन फोन आपल्या वेबसाइट वर लिस्ट पण केले होते. कंपनी ने सॅमसंग गॅलेक्सी जे4+ आणि गॅलेक्सी जे6+ लिस्ट केले होते पण भारतातील वेबसाइट वर फोन चे नाव आणि काही फीचर्स चा उल्लेख करण्यात आला होता. आता कंपनी ने अधिकृतपणे या फोन्सची घोषणा केली आहे. अजूनतरी किंमत समोर आली नाही पण स्पेसिफिकेशन उपलब्ध झाले आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी जे4+
सॅमसंग गॅलेक्सी जे4+ चे स्पेसिफिकेशन पाहता या फोन मध्ये 720 x 1480 पिक्सल रेजल्यूशन सह 6-इंचाचा आईपीएस एलसीडी इनफिनिटी डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनी ने कर्व्ड डिस्प्ले वापरला आहे.

जरी कंपनी ने चिपसेट चा उल्लेख केला नाही पण दुसर्‍या सोर्स कडून मिळालेल्या माहितीनुसार हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 425 चिपसेट वर चालतो. सॅमसंग ने प्रोसेसर क्लॉक स्पीडचा उल्लेख केला आहे. फोन मध्ये 1.4गीगाहट्र्जचा आॅक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. गॅलेक्सी जे4+ 2जीबी रॅम व 16जीबी इंटरनल मेमरी आणि 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल मेमरी वेरियंट सह उपलब्ध आहे.

हा फोन एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो वर चालतो आणि यात 3,300 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. फोटोग्राफी साठी फोन मध्ये एफ/1.9 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे तर 5-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. फोन मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर नाही. पण 4जी वोएलटीई सह डुअल सिम सपोर्ट मिळेल.

सॅमसंग गॅलेक्सी जे6+
सॅमसंग गॅलेक्सी जे6+ पाहता या फोन मध्ये 1480×720 पिक्सल रेजल्यूशन असलेली 6-इंचाची स्क्रीन मिळेल. हा फोन 3जीबी रॅम सह 64जीबी स्टोरेज आणि 4जीबी रॅम सह 64जीबी स्टोरे​​ज वेरियंट मध्ये उपलब्ध आहे.

फोटोग्राफी पाहता हा खुप अपग्रेडड आहे. कंपनी ने हा डुअल रियर कॅमेरा सह सादर केला आहे. फोन मध्ये एक सेंसर एफ/1.9 अपर्चर वाला आहे जो 13-मेगापिक्सल सह येतो. तसेच दुसरा सेंसर 5-मेगापिक्सलचा आहे जो एफ/2.2 अपर्चर सह येतो.

सॅमसंग गॅलेक्सी जे6+ मध्ये तुम्हाला 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. या फोन मध्ये पण तुम्हाला 1.4गीगाहट्र्जचा आॅक्टाकोर प्रोसेसर मिळेल. तसेच पावर बॅकअप साठी 3,300 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. अजूनतरी किंमतीची माहिती मिळाली नाही. पण बातमी नुसार 25 सप्टेंबरला हे फोन भारतात लॉन्च होणार आहेत आणि तेव्हाच किंमत समोर येईल.

The post सॅमसंग गॅलेक्सी जे6 प्लस आणि गॅलेक्सी जे4 प्लस झाले आॅफिशियल, डुअल कॅमेरा सह आहे 6-इंचाचा इनफिनिटी डिस्प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j6-plus-and-galaxy-j4-plus-goes-official-in-marathi/feed/ 0
एक्सक्लूसिव : 4,350एमएएच बॅटरी आणि 6-इंचाच्या इनफिनिटी डिस्प्ले सह लॉन्च होईल सॅमसंग गॅलेक्सी जे6 प्लस, किंमत असेल 14,990 रुपये https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j6-plus-j5-plus-4350mah-battery-specifications-features-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j6-plus-j5-plus-4350mah-battery-specifications-features-price-in-marathi/#respond Tue, 18 Sep 2018 12:33:59 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2169 लॉन्च च्या आधी आम्हाला बातमी मिळाली आहे की भारतात गॅलेक्सी जे6 प्लस ची किंमत 14,990 रुपये असेल तर गॅलेक्सी जे4 प्लस सॅमसंग द्वारा 12,990 रुपयांमध्ये लॉन्च केला जाईल.

The post एक्सक्लूसिव : 4,350एमएएच बॅटरी आणि 6-इंचाच्या इनफिनिटी डिस्प्ले सह लॉन्च होईल सॅमसंग गॅलेक्सी जे6 प्लस, किंमत असेल 14,990 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग इंडिया ने आपल्या आॅफिशियल वेबसाइट वर गॅलेक्सी जे सीरीज चे दोन नवीन स्मार्टफोन्स गॅलेक्सी जे6 प्लस आणि गॅलेक्सी जे4 प्लस लिस्ट केले आहेत. सॅमसंगच्या या लिस्टिंग नंतर फोन च्या डिजाईन आणि लुक ची माहिती मिळाली आहे पण कपंनीने दोन्ही फोनचे स्पेसिफिकेशन्स सांगितले नाही. पण 91मोबाईल्सने सॅमसंगच्या घोषणेच्या आधी गॅलेक्सी जे6 प्लस आणि गॅलेक्सी जे4 प्लस ची किंमत आणि काही स्पेसिफिकेशन्स ची एक्सक्लूसिव माहिती मिळवली आहे. सॅमसंग गॅलेक्सी जे6+ 14,990 रुपयांमध्ये लॉन्च होईल तर गॅलेक्सी जे4+ ची किंमत 12,990 रुपये असेल.

91मोबाईल्सला मिळालेल्या एक्सक्लूसिव माहितीनुसार गॅलेक्सी जे6 प्लस ला कंपनी 6-इंचाच्या इनफिनिटी डिस्प्ले सह सादर करेल. तसेच गॅलेक्सी जे4 प्लस मध्ये 5.6-इंचाचा इनफिनिटी डिस्प्ले मिळेल. डिसप्ले साईज व्यतिरिक्त आम्हाला फोनच्या बॅटरीची माहिती पण मिळाली आहे. गॅलेक्सी जे6+ मध्ये पावर बॅकअप साठी 4,350एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात येईल तर गॅलेक्सी जे4+ 3,300एमएएच च्या बॅटरी सह बाजारात येईल.

सॅमसंग गॅलेक्सी जे सीरीजचे हे दोन्ही स्मार्टफोन कंपनी द्वारा 25 सप्टेंबरला देशात लॉन्च केले जाऊ शकतात. स्पेसिफिकेशन्स सोबत कंपनी या दोन्ही फोन मॉडल्स च्या किंमतीचा खुलासा पण लॉन्च सोबत करेल. पण लॉन्च च्या आधी आम्हाला बातमी मिळाली आहे की भारतात गॅलेक्सी जे6 प्लस ची किंमत 14,990 रुपये असेल तर गॅलेक्सी जे4 प्लस सॅमसंग द्वारा 12,990 रुपयांमध्ये लॉन्च केला जाईल.

सॅमसंग चे हे दोन्ही फोन खास असण्याचे कारण म्हणजे यांच्या साइड पॅनल वर पावर बटन मध्ये फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड असेल. गॅलेक्सी जे6+ आणि गॅलेक्सी जे4+ सॅमसंग चे पहिले स्मार्टफोन असतील ज्यांच्यात हा फीचर मिळेल. सॅमसंग गॅलेक्सी जे6+ च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. तसेच फोन मधील सेल्फी कॅमेरा मध्ये ऐनिमोजी सारखे फीचर्स पण मिळतील.

The post एक्सक्लूसिव : 4,350एमएएच बॅटरी आणि 6-इंचाच्या इनफिनिटी डिस्प्ले सह लॉन्च होईल सॅमसंग गॅलेक्सी जे6 प्लस, किंमत असेल 14,990 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j6-plus-j5-plus-4350mah-battery-specifications-features-price-in-marathi/feed/ 0
सॅमसंग घेऊन येत आहे नवीन ‘गॅलेक्सी एम’ सीरीज, घेता येईल का शाओमीची नंबर वन ची जागा ? https://www.91mobiles.com/marathi/samsung-to-bring-new-galaxy-m-series-and-galaxy-j-eliminate-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-to-bring-new-galaxy-m-series-and-galaxy-j-eliminate-in-marathi/#respond Tue, 18 Sep 2018 07:32:11 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2160 सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीज बद्दल बोलायचे झाले तर या सीरीज मध्ये येणारे स्मार्टफोन लो बजट मध्ये असतील ज्यांची अधिकतम किंमत 12,000 रुपयांपर्यंत असू शकते.

The post सॅमसंग घेऊन येत आहे नवीन ‘गॅलेक्सी एम’ सीरीज, घेता येईल का शाओमीची नंबर वन ची जागा ? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ने आॅफिशियल घोषणा केली आहे की कंपनी येत्या 11 ऑक्टोबरला एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंट मध्ये गॅलेक्सी ए सीरीजचा नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी ए9 प्रो लॉन्च होऊ शकतो. तसेच सॅमसंग आपल्या स्वस्त गॅलेक्सी जे सीरीज मध्ये पण दोन नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी जे4 प्लस आणि गॅलेक्सी जे7 प्लस घेऊन येत आहे. गॅलेक्सी जे सीरीज चे हे दोन्ही स्मार्टफोन कंपनीच्या इंडियन वेबसाइट वर लिस्ट पण झाले आहेत. पण आता अशी बातमी येत आहे की हे दोन्ही फोन गॅलेक्सी जे सीरीज चे शेवटचे फोन असू शकतात. सॅमसंग आपली जे सीरीज बंद करू शकते आणि एक नवीन सीरीज ‘गॅलेक्सी एम’ नावाने आणू शकते.

सॅमसंग संबंधित ही बातमी विदेशी वेबसाइट ईटीन्यूज ने पब्लिश केली आहे. रिपोर्ट नुसार सॅमसंग आपल्या लो बजेट तसेच मीड बजेट सेग्मेंट मध्ये नवीन योजना बनवत आहे. मीड बजेट सेग्मेंट मजबूत करण्यासाठी गॅलेक्सी ए सीरीज ला अजून चांगले व एडवांस करत तिच्यात ताकदवान स्पेसिफिकेशन्स दिले जातील. तसेच लो बजेट सेग्मेंट मधील गॅलेक्सी जे सीरीज कंपनी बंद करून त्याजागी नवीन गॅलेक्सी एम सीरीज आणणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीज बद्दल बोलायचे झाले तर या सीरीज मध्ये येणारे स्मार्टफोन लो बजट मध्ये असतील ज्यांची अधिकतम किंमत 12,000 रुपयांपर्यंत असू शकते. सॅमसंग या सीरीज मध्ये कमी किंमतीत जास्त चांगले स्पेसिफिकेशन्स देण्याचा प्रयत्न करेन. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे की सॅमसंग ची गॅलेक्सी आॅन सीरीज पण गॅलेक्सी एम सीरीज द्वारा रिप्लेस केली जाऊ शकते.

विशेष म्हणजे गॅलेक्सी आॅन स्मार्टफोन सीरीज सॅमसंग द्वारा मुख्यत: भारतीय आणि चीनी बाजारात विकली जाते. त्यामुळे गॅलेक्सी एम सीरीज मधील सर्वात जास्त स्मार्टफोन इंडियन मार्केट मध्ये लॉन्च होऊ शकतात. तसेच दुसरीकडे असे बोलले जात आहे की भारतात शाओमीच्या लो बजट स्मार्टफोन्स मुळे सॅमसंग ने आपली नंबर वन पॉजिशन गामावली आहे त्यामुळे गॅलेक्सी एम सीरीज ने कंपनी फक्त शाओमी ला टक्कर देणार नाही तर भारतीय टेक बाजारात आपला शेयर पण वाढवेल.

The post सॅमसंग घेऊन येत आहे नवीन ‘गॅलेक्सी एम’ सीरीज, घेता येईल का शाओमीची नंबर वन ची जागा ? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-to-bring-new-galaxy-m-series-and-galaxy-j-eliminate-in-marathi/feed/ 0
सॅमसंग गॅलेक्सी जे6+ आणि गॅलेक्सी जे4+ मध्ये पावर बटन वर असेल फिंगरप्रिंट स्कॅनर, कपंनी वेबसाइट वर झाले लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j6-plus-and-galaxy-j4-plus-listed-on-company-website-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j6-plus-and-galaxy-j4-plus-listed-on-company-website-in-marathi/#respond Tue, 18 Sep 2018 07:00:32 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2152 बजेट सेग्मेंट मध्ये कंपनी दोन नवीन फोन सादर करणार आहे आणि या फोन्स ची माहिती सॅमसंग ने आपल्या वेबसाइट वर लिस्ट पण केली आहे.

The post सॅमसंग गॅलेक्सी जे6+ आणि गॅलेक्सी जे4+ मध्ये पावर बटन वर असेल फिंगरप्रिंट स्कॅनर, कपंनी वेबसाइट वर झाले लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोनच्या शर्यतीत शाओमी पुढे गेल्याने असे वाटते आहे की सॅमसंग आता जास्त अग्रेसिव झाली आहे. नुकतेच कंपनी ने आॅफलाइन स्टोर वर गॅलेक्सी ए6, गॅलेक्सी ए6प्लस, गॅलेक्सी जे8 आणि जे4 सारखे डिवाइस लॉन्च केले आहेत. तसेच आॅनलाइन वर कंपनी आॅन8 सारखे फोन सादर केले आहेत. तसेच आता पुन्हा एकदा बजेट सेग्मेंट मध्ये कंपनी दोन नवीन फोन सादर करणार आहे आणि या फोन्स ची माहिती सॅमसंग ने आपल्या वेबसाइट वर लिस्ट पण केली आहे. लवकरच भारतात सॅमसंग गॅलेक्सी जे6+ आणि गॅलेक्सी जे+ प्लस येणार आहेत. जरी कंपनी ने अजून लॉन्चची तारीख सांगितली नसली तरी पुढल्या आठवड्यात हे फोन्स जगासमोर येऊ शकतात.

सॅमसंग वेबसाइट वर लिस्ट केलेल्या फोनचे फक्त फोटोग्राफ आणि काही फिचर्सचा उल्लेख आहे. कंपनी ने अजून फुल स्पेसिफिकेशनची माहिती दिली नाही. कंपनी ने वेबसाइट वर इनफिनिटी फन चे नाव दिले आहे. तुम्हाला तर माहितीच आहे की सॅमसंग आपल्या बेजल लेस फोनला इनफिनिटी डिस्प्ले बोलते. यात पण तुम्हाला तोच डिस्प्ले मिळेल. फोटो मध्ये स्पष्टपणे दिसत आहे की यात बेजल लेस डिस्प्ले वापरण्यात आला आहे.

यात सर्वात खास याची डिजाइन आहे. सॅमसंग गॅलेक्सी जे4+ आणि गॅलेक्सी जे6+ मध्ये साइड फिंगरप्रिंट स्कॅनर मिळेल. पहिल्यांदाच सॅमसंग पावर बटन सोबत फिंगरप्रिंट स्कॅनर देत आहे. याआधी सोनी च्या हाईएंड फोन मध्ये हा फीचर होता.

दिलेल्या माहितीनुसार सॅमसंग गॅलेक्सी जे6+ आणि गॅलेक्सी जे4+ मध्ये तुम्हाला डुअल रियर कॅमेरा मिळेल. कंपनी ने सध्या सेल्फीचा उल्लेख केला नाही. तसेच यात ऐनिमोजी सारखे फीचर्स पण मिळतील.

काही दिवसांपूर्वी सॅमसंग गॅलेक्सी जे6+ आणि गॅलेक्सी जे4+ तैवानच्या सर्टिफिकेशन्स साइट एनसीसी वर दिसले होते. तसेच एफसीसी वर पण दोन्ही डिवाइस लिस्ट करण्यात आले होते. तिथे गॅलेक्सी जे6+ एसएम-जे610 मॉडेल नंबर सह लिस्ट करण्यात आला होता. तसेच गॅलेक्सी जे4 प्राइम एसएम-जे415 मॉडेल नंबर सह लिस्ट करण्यात आला होता. तिथे पण फोन बद्दल जास्त माहिती देण्यात आली नव्हती पण मेमरी बद्दलची माहिती होती. गॅलेक्सी जे6+/प्राइम 64जीबी स्टोरेज सह लॉन्च होईल तर गॅलेक्सी जे4+ मध्ये 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात येईल.

लीक्स नुसार सॅमसंग गॅलेक्सी जे6+ क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट सह सादर केला जाऊ शकतो. तसेच हा फोन 3जीबी + 32जीबी आणि 4जीबी + 64जीबी मेमरी सह उपलब्ध होईल. फोटोग्राफी साठी या फोन मध्ये 13-पिक्सलचा डुअल रियर कॅमेरा आणि 8-पिक्सलचा सेल्फी कॅमेरा असेल. सॅमसंग हा फोन एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो सह सादर करू शकते तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी असू शकते.

The post सॅमसंग गॅलेक्सी जे6+ आणि गॅलेक्सी जे4+ मध्ये पावर बटन वर असेल फिंगरप्रिंट स्कॅनर, कपंनी वेबसाइट वर झाले लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j6-plus-and-galaxy-j4-plus-listed-on-company-website-in-marathi/feed/ 0
सॅमसंग गॅलेक्सी जे7 प्लस आणि गॅलेक्सी जे4 प्लस 24 सप्टेंबरला होऊ शकतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j7-plus-galaxy-j4-plus-launch-date-leaked-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j7-plus-galaxy-j4-plus-launch-date-leaked-in-marathi/#respond Mon, 17 Sep 2018 09:13:22 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2143 जरी सॅमसंग ने अजून गॅलेक्सी जे7 प्लस आणि गॅलेक्सी जे4 प्लस ची लॉन्च डेट सांगितली नसली तरी एका टिप्सटर ने आपल्या ट्वीटर हँडल वरून फोन लॉन्च ची माहिती दिली आहे.

The post सॅमसंग गॅलेक्सी जे7 प्लस आणि गॅलेक्सी जे4 प्लस 24 सप्टेंबरला होऊ शकतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग गॅलेक्सी जे सीरीज चे दोन स्मार्टफोन सतत चर्चेत आहेत. गॅलेक्सी जे7 प्राइम आणि गॅलेक्सी जे4 प्लस बद्दल लीक्स समोर येत आहेत. फोटो आणि स्पेसिफिकेशन्स संबधीत माहिती आल्यानंतर आता गॅलेक्सी जे7 प्राइम/ जे7 प्लस आणि गॅलेक्सी जे4 प्लस ची लॉन्च डेट पण समोर आली आहे. ताजा लीक मधून समजले आहे की सॅमसंग आपली गॅलेक्सी जे सीरीज चे हे दोन्ही स्मार्टफोन्स 24 सप्टेंबरला भारतात लॉन्च करेल.

जरी सॅमसंग ने अजून गॅलेक्सी जे7 प्लस आणि गॅलेक्सी जे4 प्लस ची लॉन्च डेट सांगितली नसली तरी एका टिप्सटर ने आपल्या ट्वीटर हँडल वरून फोन लॉन्च ची माहिती दिली आहे. या ट्वीट मध्ये सांगण्यात आले आहे की येत्या 24 सप्टेंबरला गॅलेक्सी जे7 प्लस आणि गॅलेक्सी जे4 प्लस स्मार्टफोन इंडियन टेक मार्केट मध्ये येतील. पण या ट्वीट मध्ये फोनची किंमत तसेच यांची उपलब्धता याचा उल्लेख करण्यात आलेला नाही.

समोर आलेल्या लीक मध्ये दोन्ही स्मार्टफोन मॉडेल मधील काही महत्वपूर्ण स्पेसिफिकेशन्स चा उल्लेख करण्यात आला आहे. लीक नुसार गॅलेक्सी जे7 प्लस मध्ये 4जीबी रॅम देण्यात येईल तसेच गॅलेक्सी जे4 प्लस 3जीबी रॅम सह सादर केला जाऊ शकतो. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता गॅलेक्सी जे7 प्लस च्या बॅक पॅनल वर 13 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सलचा डुअल कॅमेरा आहे. तसेच गॅलेक्सी जे4 प्लस मध्ये 13 मेगापिक्सल चा सिंगल रियर कॅमेरा असल्याचे सांगण्यात आले आहे.

सेल्फी साठी गॅलेक्सी जे7 प्लस मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो तसेच गॅलेक्सी जे4 प्लस 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा सह बाजारात येईल. या लीक मध्ये गॅलेक्सी जे4 प्लस च्या स्टोरेजची माहिती पण देण्यात आली आहे जी ट्वीट नुसार 32जीबी असेल. लक्षात घ्या सॅमसंग ने अजूनही गॅलेक्सी जे7 प्लस किंवा गॅलेक्सी जे4 प्लस बद्दल कोणतीही आॅफिशियल घोषणा केली नाही, त्यामुळे कंपनी च्या घोषणीची वाट बघितली जात आहे.

The post सॅमसंग गॅलेक्सी जे7 प्लस आणि गॅलेक्सी जे4 प्लस 24 सप्टेंबरला होऊ शकतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j7-plus-galaxy-j4-plus-launch-date-leaked-in-marathi/feed/ 0