सॅमसंग गॅलेक्सी जे4+ आणि गॅलेक्सी जे6+ ची किंमत 2,000 रुपयांपर्यंत कमी, बघा नवीन किंमत

जास्तीत जास्त ग्राहक मिळवण्यासाठी स्मार्टफोन ब्रँड सतत आपल्या स्मार्टफोनच्या किंमती कमी करत आहेत. वीवो, मोटो आणि असूस नंतर आता सॅमसंगने पण आपल्या स्मार्टफोन्सच्या किंमती कमी केल्या आहेत. साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिकी कंपनी सॅमसंगने गेल्या वर्षी लॉन्च केलेल्या सॅमसंग गॅलेक्सी जे4+ आणि गॅलेक्सी जे6+ च्या किंमती 2,000 रुपयांपर्यंत कमी केल्या आहेत. याआधी पण या स्मार्टफोन्सच्या किंमती कमी करण्यात आल्या होत्या. कंपनी ने साल 2018 मध्ये सॅमसंग गॅलेक्सी जे4+ आणि गॅलेक्सी जे6+ भारतात क्रमश: 10,990 रुपये व 15,990 रुपयांमध्ये लॉन्च केले गेले होते.

हि आहे नवीन किंमत
सॅमसंगने दोन्ही स्मार्टफोन्सच्या एकाच वेरिएंटची किंमत कमी केली आहे. सॅमसंग गॅलेक्सी जे4+ च्या 2जीबी रॅम + 32जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत आता 8,490 रुपये झाली आहे याआधी डिवाइस 9,990 रुपयांमध्ये विकला जात होता. तसेच सॅमसंग गॅलेक्सी जे6+ चा 4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज वेरिएंट कमी केलेल्या किंमतीनंतर 12,990 रुपयांमध्ये सेल केला जात आहे. याआधी हा डिवाइस 14,990 रुपयांमध्ये उपलब्द होता.

या नवीन किंमतीसह हे स्मार्टफोन ऑफलाइन मार्केट मध्ये मिळत आहे. पण ऑनलाइन रिटेल स्टोर्स वर डिवाइस अजूनही जुन्याच किंमतीसह लिस्ट आहेत. पण तुम्ही अमेझॉन इंडिया वर सॅमसंग गॅलेक्सी जे4+ नवीन किंमतीती विकत घेऊ शकता.

सॅमसंग गॅलेक्सी जे4+ चे स्पेसिफिकेशन्स
सॅमसंग गॅलेक्सी जे4+ मध्ये 6-इंचाचा ट्रू एचडी+ आईपीएस एलसीडी इनफिनिटी डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनचे फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल ग्लासचे आहेत आणि दोन्ही पॅनल मध्ये 2.5डी कर्व्ड ग्लास चा वापर करण्यात आला आहे. सोबत सॅमसंग गॅलेक्सी जे4+ क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 425 चिपसेट वर आधारित आहे. यात 512जीबी पर्यंतच्या मेमरी कार्डचा वापर करता येतो.

सॅमसंगचा हा फोन एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो वर चालतो आणि यात 3,300 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. फोटोग्राफी साठी फोन मध्ये एफ/1.9 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे तर 5-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. फोन मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर नाही. 4जी वोएलटीई सोबत डुअल सिम सपोर्ट मिळेल आणि कंपनीने यात फेस अनलॉक दिले आहे.

सॅमसंग गॅलेक्सी जे6+ चे स्पेसिफिकेशन्स
सॅमसंग गॅलेक्सी जे6+ मध्ये 6-इंचाचा ट्रू एचडी+ इनफिनिटी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 425 चिपसेट आधारित आहे. सोबत 4जीबी रॅम आणि 64जीबी मेमरी देण्यात आली. फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे आणि तुम्ही 512जीबी पर्यंतच्या कार्डचा वापर करू शकता. तसेच कार्ड मध्ये तुम्ही ऍप पण इंस्टॉल करू शकता. चांगल्या म्यूजिक साठी कंपनी ने हा डॉल्बी एटमॉस इंटीग्रेशन सह सादर केला आहे. फोन मध्ये तुम्ही 360 डिग्री सराउंड साउंडचा अनुभव घेऊ शकता.

फोटोग्राफीच्या बाबतीती हा खूप अपग्रेडड आहे. कंपनी ने हा डुअल रियर कॅमेऱ्यांसह सादर केला आहे. फोन मध्ये एक सेंसर एफ/1.9 अपर्चर वाला आहे तो 13-मेगापिक्सल सह येतो. तर दूसरा सेंसर 5-मेगापिक्सलचा आहे जो एफ/2.2 अपर्चर सह येतो. सॅमसंग गॅलेक्सी जे6+ मध्ये तुम्हाला 8-मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा मिळेल. तसेच पावर बॅकअप साठी 3,300 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here