एक्सक्लूसिव : 4,350एमएएच बॅटरी आणि 6-इंचाच्या इनफिनिटी डिस्प्ले सह लॉन्च होईल सॅमसंग गॅलेक्सी जे6 प्लस, किंमत असेल 14,990 रुपये

सॅमसंग इंडिया ने आपल्या आॅफिशियल वेबसाइट वर गॅलेक्सी जे सीरीज चे दोन नवीन स्मार्टफोन्स गॅलेक्सी जे6 प्लस आणि गॅलेक्सी जे4 प्लस लिस्ट केले आहेत. सॅमसंगच्या या लिस्टिंग नंतर फोन च्या डिजाईन आणि लुक ची माहिती मिळाली आहे पण कपंनीने दोन्ही फोनचे स्पेसिफिकेशन्स सांगितले नाही. पण 91मोबाईल्सने सॅमसंगच्या घोषणेच्या आधी गॅलेक्सी जे6 प्लस आणि गॅलेक्सी जे4 प्लस ची किंमत आणि काही स्पेसिफिकेशन्स ची एक्सक्लूसिव माहिती मिळवली आहे. सॅमसंग गॅलेक्सी जे6+ 14,990 रुपयांमध्ये लॉन्च होईल तर गॅलेक्सी जे4+ ची किंमत 12,990 रुपये असेल.

91मोबाईल्सला मिळालेल्या एक्सक्लूसिव माहितीनुसार गॅलेक्सी जे6 प्लस ला कंपनी 6-इंचाच्या इनफिनिटी डिस्प्ले सह सादर करेल. तसेच गॅलेक्सी जे4 प्लस मध्ये 5.6-इंचाचा इनफिनिटी डिस्प्ले मिळेल. डिसप्ले साईज व्यतिरिक्त आम्हाला फोनच्या बॅटरीची माहिती पण मिळाली आहे. गॅलेक्सी जे6+ मध्ये पावर बॅकअप साठी 4,350एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात येईल तर गॅलेक्सी जे4+ 3,300एमएएच च्या बॅटरी सह बाजारात येईल.

सॅमसंग गॅलेक्सी जे सीरीजचे हे दोन्ही स्मार्टफोन कंपनी द्वारा 25 सप्टेंबरला देशात लॉन्च केले जाऊ शकतात. स्पेसिफिकेशन्स सोबत कंपनी या दोन्ही फोन मॉडल्स च्या किंमतीचा खुलासा पण लॉन्च सोबत करेल. पण लॉन्च च्या आधी आम्हाला बातमी मिळाली आहे की भारतात गॅलेक्सी जे6 प्लस ची किंमत 14,990 रुपये असेल तर गॅलेक्सी जे4 प्लस सॅमसंग द्वारा 12,990 रुपयांमध्ये लॉन्च केला जाईल.

सॅमसंग चे हे दोन्ही फोन खास असण्याचे कारण म्हणजे यांच्या साइड पॅनल वर पावर बटन मध्ये फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड असेल. गॅलेक्सी जे6+ आणि गॅलेक्सी जे4+ सॅमसंग चे पहिले स्मार्टफोन असतील ज्यांच्यात हा फीचर मिळेल. सॅमसंग गॅलेक्सी जे6+ च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. तसेच फोन मधील सेल्फी कॅमेरा मध्ये ऐनिमोजी सारखे फीचर्स पण मिळतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here