सॅमसंग गॅलेक्सी जे6+ आणि गॅलेक्सी जे4+ मध्ये पावर बटन वर असेल फिंगरप्रिंट स्कॅनर, कपंनी वेबसाइट वर झाले लिस्ट

स्मार्टफोनच्या शर्यतीत शाओमी पुढे गेल्याने असे वाटते आहे की सॅमसंग आता जास्त अग्रेसिव झाली आहे. नुकतेच कंपनी ने आॅफलाइन स्टोर वर गॅलेक्सी ए6, गॅलेक्सी ए6प्लस, गॅलेक्सी जे8 आणि जे4 सारखे डिवाइस लॉन्च केले आहेत. तसेच आॅनलाइन वर कंपनी आॅन8 सारखे फोन सादर केले आहेत. तसेच आता पुन्हा एकदा बजेट सेग्मेंट मध्ये कंपनी दोन नवीन फोन सादर करणार आहे आणि या फोन्स ची माहिती सॅमसंग ने आपल्या वेबसाइट वर लिस्ट पण केली आहे. लवकरच भारतात सॅमसंग गॅलेक्सी जे6+ आणि गॅलेक्सी जे+ प्लस येणार आहेत. जरी कंपनी ने अजून लॉन्चची तारीख सांगितली नसली तरी पुढल्या आठवड्यात हे फोन्स जगासमोर येऊ शकतात.

सॅमसंग वेबसाइट वर लिस्ट केलेल्या फोनचे फक्त फोटोग्राफ आणि काही फिचर्सचा उल्लेख आहे. कंपनी ने अजून फुल स्पेसिफिकेशनची माहिती दिली नाही. कंपनी ने वेबसाइट वर इनफिनिटी फन चे नाव दिले आहे. तुम्हाला तर माहितीच आहे की सॅमसंग आपल्या बेजल लेस फोनला इनफिनिटी डिस्प्ले बोलते. यात पण तुम्हाला तोच डिस्प्ले मिळेल. फोटो मध्ये स्पष्टपणे दिसत आहे की यात बेजल लेस डिस्प्ले वापरण्यात आला आहे.

यात सर्वात खास याची डिजाइन आहे. सॅमसंग गॅलेक्सी जे4+ आणि गॅलेक्सी जे6+ मध्ये साइड फिंगरप्रिंट स्कॅनर मिळेल. पहिल्यांदाच सॅमसंग पावर बटन सोबत फिंगरप्रिंट स्कॅनर देत आहे. याआधी सोनी च्या हाईएंड फोन मध्ये हा फीचर होता.

दिलेल्या माहितीनुसार सॅमसंग गॅलेक्सी जे6+ आणि गॅलेक्सी जे4+ मध्ये तुम्हाला डुअल रियर कॅमेरा मिळेल. कंपनी ने सध्या सेल्फीचा उल्लेख केला नाही. तसेच यात ऐनिमोजी सारखे फीचर्स पण मिळतील.

काही दिवसांपूर्वी सॅमसंग गॅलेक्सी जे6+ आणि गॅलेक्सी जे4+ तैवानच्या सर्टिफिकेशन्स साइट एनसीसी वर दिसले होते. तसेच एफसीसी वर पण दोन्ही डिवाइस लिस्ट करण्यात आले होते. तिथे गॅलेक्सी जे6+ एसएम-जे610 मॉडेल नंबर सह लिस्ट करण्यात आला होता. तसेच गॅलेक्सी जे4 प्राइम एसएम-जे415 मॉडेल नंबर सह लिस्ट करण्यात आला होता. तिथे पण फोन बद्दल जास्त माहिती देण्यात आली नव्हती पण मेमरी बद्दलची माहिती होती. गॅलेक्सी जे6+/प्राइम 64जीबी स्टोरेज सह लॉन्च होईल तर गॅलेक्सी जे4+ मध्ये 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात येईल.

लीक्स नुसार सॅमसंग गॅलेक्सी जे6+ क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट सह सादर केला जाऊ शकतो. तसेच हा फोन 3जीबी + 32जीबी आणि 4जीबी + 64जीबी मेमरी सह उपलब्ध होईल. फोटोग्राफी साठी या फोन मध्ये 13-पिक्सलचा डुअल रियर कॅमेरा आणि 8-पिक्सलचा सेल्फी कॅमेरा असेल. सॅमसंग हा फोन एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो सह सादर करू शकते तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी असू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here