सॅमसंग गॅलेक्सी जे6 प्लस आणि गॅलेक्सी जे4 प्लस झाले आॅफिशियल, डुअल कॅमेरा सह आहे 6-इंचाचा इनफिनिटी डिस्प्ले

काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की लवकरच सॅमसंग बजेट सेग्मेंट मध्ये आपला नवीन स्मार्टफोन सादर करू शकते. त्यानुसार काल कंपनी दोन नवीन फोन आपल्या वेबसाइट वर लिस्ट पण केले होते. कंपनी ने सॅमसंग गॅलेक्सी जे4+ आणि गॅलेक्सी जे6+ लिस्ट केले होते पण भारतातील वेबसाइट वर फोन चे नाव आणि काही फीचर्स चा उल्लेख करण्यात आला होता. आता कंपनी ने अधिकृतपणे या फोन्सची घोषणा केली आहे. अजूनतरी किंमत समोर आली नाही पण स्पेसिफिकेशन उपलब्ध झाले आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी जे4+
सॅमसंग गॅलेक्सी जे4+ चे स्पेसिफिकेशन पाहता या फोन मध्ये 720 x 1480 पिक्सल रेजल्यूशन सह 6-इंचाचा आईपीएस एलसीडी इनफिनिटी डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनी ने कर्व्ड डिस्प्ले वापरला आहे.

जरी कंपनी ने चिपसेट चा उल्लेख केला नाही पण दुसर्‍या सोर्स कडून मिळालेल्या माहितीनुसार हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 425 चिपसेट वर चालतो. सॅमसंग ने प्रोसेसर क्लॉक स्पीडचा उल्लेख केला आहे. फोन मध्ये 1.4गीगाहट्र्जचा आॅक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. गॅलेक्सी जे4+ 2जीबी रॅम व 16जीबी इंटरनल मेमरी आणि 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल मेमरी वेरियंट सह उपलब्ध आहे.

हा फोन एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो वर चालतो आणि यात 3,300 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. फोटोग्राफी साठी फोन मध्ये एफ/1.9 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे तर 5-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. फोन मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर नाही. पण 4जी वोएलटीई सह डुअल सिम सपोर्ट मिळेल.

सॅमसंग गॅलेक्सी जे6+
सॅमसंग गॅलेक्सी जे6+ पाहता या फोन मध्ये 1480×720 पिक्सल रेजल्यूशन असलेली 6-इंचाची स्क्रीन मिळेल. हा फोन 3जीबी रॅम सह 64जीबी स्टोरेज आणि 4जीबी रॅम सह 64जीबी स्टोरे​​ज वेरियंट मध्ये उपलब्ध आहे.

फोटोग्राफी पाहता हा खुप अपग्रेडड आहे. कंपनी ने हा डुअल रियर कॅमेरा सह सादर केला आहे. फोन मध्ये एक सेंसर एफ/1.9 अपर्चर वाला आहे जो 13-मेगापिक्सल सह येतो. तसेच दुसरा सेंसर 5-मेगापिक्सलचा आहे जो एफ/2.2 अपर्चर सह येतो.

सॅमसंग गॅलेक्सी जे6+ मध्ये तुम्हाला 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. या फोन मध्ये पण तुम्हाला 1.4गीगाहट्र्जचा आॅक्टाकोर प्रोसेसर मिळेल. तसेच पावर बॅकअप साठी 3,300 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. अजूनतरी किंमतीची माहिती मिळाली नाही. पण बातमी नुसार 25 सप्टेंबरला हे फोन भारतात लॉन्च होणार आहेत आणि तेव्हाच किंमत समोर येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here