Samsung Galaxy M42 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 28 Apr 2021 12:12:02 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung चा सर्वात स्वस्त 5G फोन Galaxy M42 झाला लॉन्च, जाणून घ्या या फोनबाबत सर्वकाही https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m42-5g-launch-in-india-5000mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m42-5g-launch-in-india-5000mah-battery/#respond Wed, 28 Apr 2021 12:11:02 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10735 Samsung Galaxy M42 5G कंपनीने Qualcomm Snapdragon 750G प्रोसेसरवर सादर केला गेला आहे. हा प्रोसेसर आपल्या 5G क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे आणि अनेक फोन या प्रोसेसरसह आले आहेत.

The post Samsung चा सर्वात स्वस्त 5G फोन Galaxy M42 झाला लॉन्च, जाणून घ्या या फोनबाबत सर्वकाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने आज अनेक दिवसांच्या बातम्यानंतर आपला नवीन फोन Galaxy M42 5G भारतात लॉन्च केला आहे. कंपनीने आज एका वर्चुअल इवेंटचे आयोजन करून हा डिवाइस अधिकृतपणे मार्केटमध्ये सादर केला आहे. कंपनीने हा फोन सध्या फक्त भारतीय बाजारात सादर केला आहे, ज्याचे फोटो आणि काही स्पेसिफिकेशन्स सॅमसंगने आधीच ऑफिशियल केले होते. फीचर्सच्या बाबतीत हा स्मार्टफोन गेल्यावर्षी लॉन्च झालेल्या गॅलेक्सी ए42 5G फोनचा रिब्रँडेड वर्जन आहे. (Samsung Galaxy M42 5G launch in India 5000mah battery)

डीसेंट लुक

सॅमसंग गॅलेक्सी एम42 5जी कंपनीने Infinity-U नॉच डिस्प्ले डिजाइनवर सादर केला आहे. फ्रंट पॅनलवर तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. फोनच्या स्क्रीनवर इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर मिळेल. तर, मागे डावीकडे चौकोनी क्वाड कॅमेरा सेटअप मिळेल. एकंदरीत फोनचा लुक खूप डिसेंट म्हणता येईल.

शानदार फोटोग्राफीसाठी दमदार कॅमेरा

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy M42 5G क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर फ्लॅश लाइटसह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे जो अपर्चर F1.8 सह येतो. तसेच फोनमध्ये अपर्चर F2.2 सह 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, F2.4 अपर्चरसह 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि अपर्चर F2.4 सह 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. मागील कॅमेऱ्यात फीचर्स म्हणून OIS, रियर कॅमेरा झूम आणि डिजिटल झूम 10x पर्यंत आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 20 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy M42 5G चा प्रोसेसर आणि रॅम

Samsung Galaxy M42 5G कंपनीने Qualcomm Snapdragon 750G प्रोसेसरवर सादर केला गेला आहे. हा प्रोसेसर आपल्या 5G क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे आणि अनेक फोन या प्रोसेसरसह आले आहेत. कंपनीचा दावा आहे कि साधारण काम करताना हा सहज मल्टीटास्किंग करू शकतो. तसेच गेमिंगसाठी यात गेम बूस्टर आणि फ्रेम बूस्टर सारखे ऑप्शन आहेत जे तुम्हाला चांगला अनुभव देतील. हा फोन दोन मेमरी वेरियंटमध्ये येतो. कंपनीने हा 6 GB रॅम आणि 8 GB RAM मध्ये सादर केला आहे आणि दोन्हीमध्ये तुम्हाला 128 GB स्टोरेज मिळते. फोनमध्ये 1 TB ची एक्सपांडेबल मेमरी मिळेल.

Samsung Galaxy M42 5G ची किंमत

सॅमसंग गॅलेक्सी एम42 5जी भारतीय बाजारात 6GB + 128GB मॉडेल 21,999 रुपये आणि 8GB + 128 GB मॉडेल 23,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. हा फोन अमेझॉन इंडिया आणि काही निवडक ऑफलाइन स्टोरवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. खास बाब अशी म्हणता येईल कि हा मेमध्ये अमेझॉन सेलमध्ये 19,999 रुपये आणि 21,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन Prism Dot Black आणि Prism Dot Gray colours सह दोन रंगात उपलब्ध आहे.

The post Samsung चा सर्वात स्वस्त 5G फोन Galaxy M42 झाला लॉन्च, जाणून घ्या या फोनबाबत सर्वकाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m42-5g-launch-in-india-5000mah-battery/feed/ 0
Samsung Galaxy M42 5G फोन 28 एप्रिलला होईल भारतात लॉन्च, स्पेसिफिकेशन्स पण आले समोर https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m42-5g-phone-india-launch-on-28-april-with-snapdragon-750g-soc/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m42-5g-phone-india-launch-on-28-april-with-snapdragon-750g-soc/#respond Fri, 16 Apr 2021 14:17:52 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10616 Samsung Galaxy M42 5G फोनबद्दल मागे न्यूज एजन्सी IANS ने लॉन्चपूर्वीच या फोनच्या किंमतीचा खुलासा केला होता. एजन्सीने इंडस्ट्री सोर्सच्या आधारावर रिपोर्ट प्रकाशित केला होता ज्यात फोनच्या किंमतचा उल्लेख केला गेला होता.

The post Samsung Galaxy M42 5G फोन 28 एप्रिलला होईल भारतात लॉन्च, स्पेसिफिकेशन्स पण आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy M42 दीर्घकाळ चर्चेचा विषय बनला आहे. वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्स आणि लीक्समध्ये या फोनचे अनेक स्पेसिफिकेशन्स व फीचर्स समोर आले आहेत. फोनच्या पावरचा अंदाज जवळपास लागला आहे आणि लोकांना प्रतीक्षा हे हि या फोनच्या भारतीय बाजारती लॉन्चची. आजच्या सॅमसंगच्या घोषणेनंतर हि प्रतीक्षा संपेल. कंपनीने घोषणा केली आहे कि Samsung Galaxy M42 5G फोन येत्या 28 एप्रिलला भारतात लॉन्च केला जाईल. (Samsung Galaxy M42 5G phone India launch on 28 April with Snapdragon 750G SOC)

Samsung Galaxy M42 5G च्या लॉन्चची माहिती शॉपिंग साइट अमेझॉन इंडियाच्या माध्यमातून समोर आली आहे. अमेझॉनवर गॅलेक्सी एम42 चे प्रोडक्ट पेज लाईव करण्यात आले आहेत ज्यावर लॉन्च डेट सोबतच या फोनच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे. कंपनीने माहिती दिली आहे कि सॅमसंग कंपनी येत्या 28 एप्रिलला भारतात लॉन्च ईवेंट आयोजित करणार आहे आणि ईवेंटच्या मंचावरून Samsung Galaxy M42 5G फोन भारतात लॉन्च केला जाईल.

असे असतील स्पेसिफिकेशन्स

सॅमसंग गॅलेक्सी एम42 5जी च्या लॉन्चची माहिती देण्यासोबतच अमेझॉन प्रोडक्ट पेजवर खुलासा करण्यात आला आहे कि हा स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 750जी चिपसेटसह येईल. विशेष म्हणजे हा चिपसेट 5जी बॅंडला सपोर्ट करतो. तसेच हा स्मार्टफोन Samsung Pay आणि Secured by Knox सारख्या अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह येईल. सॅमसंगने असे पण सांगितले आहे कि Galaxy M42 5G फोन 6GB आणि 8GB RAM वेरिएंटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

अशी असेल किंमत

Samsung Galaxy M42 5G फोनबद्दल मागे न्यूज एजन्सी IANS ने लॉन्चपूर्वीच या फोनच्या किंमतीचा खुलासा केला होता. एजन्सीने इंडस्ट्री सोर्सच्या आधारावर रिपोर्ट प्रकाशित केला होता ज्यात फोनच्या किंमतचा उल्लेख केला गेला होता. या रिपोर्टमध्ये दावा केला गेला होता कि सॅमसंग आपला हा फोन 20,000 ते 25,000 रुपयांच्या दरम्यान लॉन्च करेल आणि हा फोन एप्रिलच्या शेवटी बाजारात येईल.

हे देखील वाचा : 5,000mAh बॅटरीसह OPPO घेऊन येत आहे लो बजेट असलेला फोन, Xiaomi-Realme ची करेल सुट्टी!

हि माहिती आली समोर

बोलेल जात आहे की सॅमसंग गॅलेक्सी एम42 5जी मध्ये तुम्हाला 6.6 इंचाची HD+ Super AMOLED स्क्रीन मिळेल. फोनमध्ये Infinity-U waterdrop नॉच दिली जाऊ शकते. लीकनुसार हा फोन Android OS 11 वर काम करेल आणि यात 6 GB RAM मेमरीसह 128 GB ची इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते.

रियर कॅमेरा सेटअपमध्ये प्राइमरी सेंसर व्यतिरिक्त 8 MP ची अल्ट्रा—वाइड लेंस, 5 MP चा डेफ्थ सेंसर आणि 5 MP ची मॅक्रो लेंस दिला जाऊ शकते. तसेच फ्रंट पॅनलवर 20 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. या फोनमध्ये 5G सह 4G VOLTE सपोर्ट, डुअल बॅंड वाय-फाय, USP Type-C पोर्ट मिळेल. Samsung Galaxy M42 5G च्या लॉन्च डेटसाठी कंपनीच्या घोषणेची वाट बघितली जात आहे.

The post Samsung Galaxy M42 5G फोन 28 एप्रिलला होईल भारतात लॉन्च, स्पेसिफिकेशन्स पण आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m42-5g-phone-india-launch-on-28-april-with-snapdragon-750g-soc/feed/ 0
Samsung Galaxy M42 5G ची किंमत असेल 25,000 रुपयांपेक्षा कमी, 6,000mAh बॅटरीसह मिळेल 64MP कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m42-5g-india-price-under-rs-25000-launch-in-april-with-snapdragon-750g/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m42-5g-india-price-under-rs-25000-launch-in-april-with-snapdragon-750g/#respond Tue, 13 Apr 2021 09:42:59 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10579 Samsung Galaxy M42 5G संबंधित आईएएनएसचा हा रिपोर्ट इंडस्ट्री सोर्सच्या हवाल्याने प्रकाशित करण्यात आला आहे.

The post Samsung Galaxy M42 5G ची किंमत असेल 25,000 रुपयांपेक्षा कमी, 6,000mAh बॅटरीसह मिळेल 64MP कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung आपल्या गॅलेक्सी ‘एम’ सीरीजच्या नवीन डिवायस Galaxy M42 वर काम करत आहे ज्याचे अनेक दिवसांपासून लीक्स समोर येत आहेत. वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्समध्ये या फोनच्या वेगवेगळ्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. तर आज न्यूज एजेंसी IANS ने लॉन्चपूर्वीच Samsung Galaxy M42 5G च्या किंमतीचा खुलासा पण केला आहे. रिपोर्टमध्ये दावा केला गेला आहे कि सॅमसंग आपला हा फोन 20,000 ते 25,000 रुपयांदरम्यान लॉन्च करेल आणि हा फोन एप्रिलच्या अखेरीस बाजारात येईल. (Samsung Galaxy M42 5G India price under RS 25000 launch in April with Snapdragon 750G)

Samsung Galaxy M42 5G संबंधित आईएएनएसचा हा रिपोर्ट इंडस्ट्री सोर्सच्या हवाल्याने प्रकाशित करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार गॅलेक्सी एम42 या महिन्यात भारतात लॉन्च होईल आणि सॅमसंग येत्या काही दिवसांत या फोनच्या लॉन्चची घोषणा करेल. Galaxy M42 ची लॉन्च डेट एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात असू शकते. रिपोर्टनुसार या फोनची किंमत 20,000 ते 25,000 रुपयांदरम्यान असेल. फोन किती वेरिएंट्समध्ये लॉन्च होईल हे अजून स्पष्ट झाले नाही.

असे असतील स्पेसिफिकेशन्स

सॅमसंग गॅलेक्सी एम42 बद्दल रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे कि हा फोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 750जी चिपसेटवर लॉन्च केला जाईल आणि या चिपसेटमुळे सॅमसंगच्या या फोनमध्ये 5G कनेक्टिविटी सपोर्ट पण असेल. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे कि Samsung Galaxy M42 क्चॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल ज्याचा प्राइमरी सेंसर 64 मेगापिक्सलचा असेल. हा फोन 6,000एमएएच बॅटरीसह हा फोन येईल असे रिपोर्टमध्ये समोर आले आहे.

Galaxy A72

हे देखील वाचा : 7,040mAh बॅटरी, 10 इंच डिस्प्ले आणि 64GB स्टोरेजसह Samsung Galaxy Tab A7 भारतात लॉन्च

माहिती आली समोर

बोलले जात आहे सॅमसंग गॅलेक्सी एम42 5जी मध्ये तुम्हाला 6.6 इंचाची HD+ Super AMOLED स्क्रीन मिळेल. तसेच फोनमध्ये Infinity-U waterdrop नॉच दिली जाऊ शकते. लीकनुसार हा फोन Android OS 11 वर काम करेल आणि यात 6 GB RAM मेमरीसह 128 GB इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते.

रियर कॅमेरा सेटअपमध्ये प्राइमरी सेंसर व्यतिरिक्त 8 MP ची अल्ट्रा—वाइड लेंस, 5 MP चा डेफ्थ सेंसर आणि 5 MP ची मॅक्रो लेंस दिली जाऊ शकते. तसेच फ्रंट पॅनलवर 20 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. या फोनमध्ये 5G सह 4G VOLTE सपोर्ट, डुअल बॅंड वाय-फाय, USP Type-C पोर्ट मिळेल. Samsung Galaxy M42 5G च्या लॉन्च डेटसाठी कंपनीच्या घोषणेची वाट बघितली जात आहे.

The post Samsung Galaxy M42 5G ची किंमत असेल 25,000 रुपयांपेक्षा कमी, 6,000mAh बॅटरीसह मिळेल 64MP कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m42-5g-india-price-under-rs-25000-launch-in-april-with-snapdragon-750g/feed/ 0
Samsung Galaxy M42 5G चा लॉन्च आला जवळ, स्पेसिफिकेशन्ससह वेबसाइटवर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m42-5g-geekbench-listing-specs-leaked-india-launch-soon-price/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m42-5g-geekbench-listing-specs-leaked-india-launch-soon-price/#respond Thu, 01 Apr 2021 11:35:53 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10458 Samsung Galaxy M42 5G गीकबेंचवर अँड्रॉइडच्या लेटेस्ट ओएस अँड्रॉइड 11 सह दाखवण्यात आला आहे ज्याच्यासोबत 1.8गीगाहर्ट्ज बेस क्लॉक स्पीड असलेला आक्टाकोर प्रोसेसर असल्याचे सांगण्यात आले आहे.

The post Samsung Galaxy M42 5G चा लॉन्च आला जवळ, स्पेसिफिकेशन्ससह वेबसाइटवर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung कंपनी भारतात आपला नवीन मोबाईल फोन Samsung Galaxy M42 लॉन्च करण्याची तयारी करत आहे जो 5G सपोर्टसह बाजारात येईल. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती कि सॅमसंगचा हा फोन कंपनीच्या अधिकृत इंडियन वेबसाइटवर दिसला आहे जिथे फोनचा सपोर्ट पेज लाईव करण्यात आला आहे. हे पेज समोर आल्यानंतर सॅमसंग गॅलेक्सी एम42 चा भारतातील लॉन्च कंफर्म असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे आता Samsung Galaxy M42 5G बाजारात येण्याआधी या फोनचे स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत. (samsung galaxy m42 5g geekbench listing specs leaked india launch soon price)

Samsung Galaxy M42 5G बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट केला गेला आहे. गीकबेंचवर हा फोन SM-M426B मॉडेल नंबरसह सर्टिफाइड झाला आहे आणि या मॉडेल नंबरसह फोनचा सपोर्ट पेज सॅमसंग इंडियावर स्पॉट झाला होता. मॉडेल नंबरने स्पष्ट केले आहे कि बेंचमार्किंग साइटवर समोर आलेला हा मोबाईल फोन सॅमसंग गॅलेक्सी एम42 5जी आहे. लिस्टिंगमध्ये फोनचे अनेक महत्वाचे स्पेसिफिकेशन्स पण समजले आहेत.

गीकबेंचवर झाला खुलासा

Samsung Galaxy M42 5G गीकबेंचवर अँड्रॉइडच्या लेटेस्ट ओएस अँड्रॉइड 11 सह दाखवण्यात आला आहे ज्याच्यासोबत 1.8गीगाहर्ट्ज बेस क्लॉक स्पीड असलेला आक्टाकोर प्रोसेसर असल्याचे सांगण्यात आले आहे. लिस्टिंगमध्ये मदरबोर्ड सेक्शनमध्ये चिपसेटचे नाव समजले नाही पण कोडनेमवरून रिपोर्ट्समध्ये दावा केला गेला आहे कि हा फोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 750जी चिपसेटला सपोर्ट करेल.

गीकबेंचवर गॅलेक्सी एम42 5जी 4 जीबी रॅमसह दाखवण्यात आला आहे. हा या फोनचा सर्वात छोटा वेरिएंट असू शकतो आणि आशा आहे कि सॅमसंग बाजारात एकापेक्षा जास्त रॅम वेरिएंटमध्ये लॉन्च करेल. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये एड्रेनो 619 जीपीयू मिळू शकतो. तसेच बेंचमार्किंग स्कोरबद्दल बोलायचे तर गॅलेक्सी एम42 5जी ला सिंगल-कोरमध्ये 650 पॉईंट्स तर मल्टी-कोर मध्ये 1779 स्कोर मिळाला आहे.

हे देखील वाचा : OPPO F19 Pro आणि F19 Pro Plus नंतर येत आहे स्वस्त OPPO F19 स्मार्टफोन, किंमत आणि स्पेसिफिकेशन आले समोर

Samsung Galaxy A42

असे असतील स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy M42 5G फोनचे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता वेगवेगळ्या लीक्स व मीडिया रिपोर्ट्स नुसार हा फोन 6.6 इंचाच्या एचडी+ एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. मार्केटमध्ये हा फोन तीन वेरिएंटमध्ये सादर केला जाऊ शकतो ज्यात 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज, 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज आणि 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेजचा समावेश असेल.

Samsung Galaxy A42

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 48 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसरसह 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर दिला जाऊ शकतो तसेच सेल्फीसाठी फोनमध्ये 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. पावर बॅकअपसाठी हा फोन 6,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीसह येऊ शकतो जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

The post Samsung Galaxy M42 5G चा लॉन्च आला जवळ, स्पेसिफिकेशन्ससह वेबसाइटवर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m42-5g-geekbench-listing-specs-leaked-india-launch-soon-price/feed/ 0