Samsung Galaxy M42 5G चा लॉन्च आला जवळ, स्पेसिफिकेशन्ससह वेबसाइटवर झाला लिस्ट

Galaxy A72

Samsung कंपनी भारतात आपला नवीन मोबाईल फोन Samsung Galaxy M42 लॉन्च करण्याची तयारी करत आहे जो 5G सपोर्टसह बाजारात येईल. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती कि सॅमसंगचा हा फोन कंपनीच्या अधिकृत इंडियन वेबसाइटवर दिसला आहे जिथे फोनचा सपोर्ट पेज लाईव करण्यात आला आहे. हे पेज समोर आल्यानंतर सॅमसंग गॅलेक्सी एम42 चा भारतातील लॉन्च कंफर्म असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे आता Samsung Galaxy M42 5G बाजारात येण्याआधी या फोनचे स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत. (samsung galaxy m42 5g geekbench listing specs leaked india launch soon price)

Samsung Galaxy M42 5G बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट केला गेला आहे. गीकबेंचवर हा फोन SM-M426B मॉडेल नंबरसह सर्टिफाइड झाला आहे आणि या मॉडेल नंबरसह फोनचा सपोर्ट पेज सॅमसंग इंडियावर स्पॉट झाला होता. मॉडेल नंबरने स्पष्ट केले आहे कि बेंचमार्किंग साइटवर समोर आलेला हा मोबाईल फोन सॅमसंग गॅलेक्सी एम42 5जी आहे. लिस्टिंगमध्ये फोनचे अनेक महत्वाचे स्पेसिफिकेशन्स पण समजले आहेत.

गीकबेंचवर झाला खुलासा

Samsung Galaxy M42 5G गीकबेंचवर अँड्रॉइडच्या लेटेस्ट ओएस अँड्रॉइड 11 सह दाखवण्यात आला आहे ज्याच्यासोबत 1.8गीगाहर्ट्ज बेस क्लॉक स्पीड असलेला आक्टाकोर प्रोसेसर असल्याचे सांगण्यात आले आहे. लिस्टिंगमध्ये मदरबोर्ड सेक्शनमध्ये चिपसेटचे नाव समजले नाही पण कोडनेमवरून रिपोर्ट्समध्ये दावा केला गेला आहे कि हा फोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 750जी चिपसेटला सपोर्ट करेल.

गीकबेंचवर गॅलेक्सी एम42 5जी 4 जीबी रॅमसह दाखवण्यात आला आहे. हा या फोनचा सर्वात छोटा वेरिएंट असू शकतो आणि आशा आहे कि सॅमसंग बाजारात एकापेक्षा जास्त रॅम वेरिएंटमध्ये लॉन्च करेल. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये एड्रेनो 619 जीपीयू मिळू शकतो. तसेच बेंचमार्किंग स्कोरबद्दल बोलायचे तर गॅलेक्सी एम42 5जी ला सिंगल-कोरमध्ये 650 पॉईंट्स तर मल्टी-कोर मध्ये 1779 स्कोर मिळाला आहे.

हे देखील वाचा : OPPO F19 Pro आणि F19 Pro Plus नंतर येत आहे स्वस्त OPPO F19 स्मार्टफोन, किंमत आणि स्पेसिफिकेशन आले समोर

Samsung Galaxy A42

असे असतील स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy M42 5G फोनचे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता वेगवेगळ्या लीक्स व मीडिया रिपोर्ट्स नुसार हा फोन 6.6 इंचाच्या एचडी+ एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. मार्केटमध्ये हा फोन तीन वेरिएंटमध्ये सादर केला जाऊ शकतो ज्यात 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज, 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज आणि 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेजचा समावेश असेल.

Samsung Galaxy A42

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 48 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसरसह 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर दिला जाऊ शकतो तसेच सेल्फीसाठी फोनमध्ये 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. पावर बॅकअपसाठी हा फोन 6,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीसह येऊ शकतो जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here