Sony Xperia - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:24:51 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Sony ने केले शक्तिप्रदर्शन, लॉन्च केला दमदार स्मार्टफोन Sony Xperia 5 II https://www.91mobiles.com/marathi/sony-xperia-5-ii-launched-120hz-refresh-rate-display-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/sony-xperia-5-ii-launched-120hz-refresh-rate-display-specs-price-sale/#respond Thu, 17 Sep 2020 13:51:27 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8209 Sony Xperia 5 II अँड्रॉइड 10 ओएस वर सादर केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या 7एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट वर चालतो.

The post Sony ने केले शक्तिप्रदर्शन, लॉन्च केला दमदार स्मार्टफोन Sony Xperia 5 II first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Sony ने आज टेक मंचावर आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत नवीन एक्सपीरिया फोन सादर केला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन Sony Xperia 5 II नावाने मार्केट मध्ये आणला आहे जो सध्या अमेरिकन बाजारात आला आहे. आर्कषक डिस्प्ले आणि शानदार लुक सोबतच हा फोन पावरफुल स्पेसिफिकेशन्स सह येतो ज्याची किंमत यूएस मार्केट मध्ये $950 म्हणजे भारतीय करंसीनुसार 69,900 रुपयांच्या आसपास आहे. चला एक नजर टाकूया सोनी एक्सपीरिया 5 II च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स वर.

Sony Xperia 5 II

सोनी एक्सपीरिया 5 II कंपनीने 21:9 आस्पेक्ट रेशियो असलेल्या सिनेमावाइड एफएचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्टेड 2520 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.1 इंचाच्या स्क्रीनला सपोर्ट करतो. Xperia 5 II चा डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो ज्यामुळे स्क्रीनचा वापर खूप स्मूद आणि लॅगफ्री होतो. Sony ने या फोन मध्ये BRAVIA X1 कलर्सचा वापर केला आहे.

Sony Xperia 5 II अँड्रॉइड 10 ओएस वर सादर केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या 7एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट वर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये एड्रेनो 650 जीपीयू देण्यात आला आहे. सोनीने आपला हा फोन 8 जीबी रॅम वर लॉन्च केला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी कार्डने 1 टीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Sony Xperia 5 II ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.7 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा Exmor RS सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 12 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेल्या 12 मेगापिक्सलच्या टेलीफोटो लेंसला सपोर्ट करतो. तसेच सेल्फीसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Sony Xperia 5 II डुअल सिम फोन आहे जो 5G आणि 4G वोएलटीई दोन्ही नेटवर्क वर चालतो. 3.5एमएम जॅक आणि एनएफसी सोबतच फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. हा फोन IP68 रेटेड आहे जी या फोनला पाणी आणि धुळीपासून वाचवते. सिक्योरिटीसाठी हा फोन साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो तर पावर बॅकअपसाठी सोनी एक्सपीरिया 5 II मध्ये 4,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन फक्त ब्लॅक कलर मध्ये लॉन्च झाला आहे.

The post Sony ने केले शक्तिप्रदर्शन, लॉन्च केला दमदार स्मार्टफोन Sony Xperia 5 II first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/sony-xperia-5-ii-launched-120hz-refresh-rate-display-specs-price-sale/feed/ 0
Sony आता भारतात लॉन्च करणार नाही स्मार्टफोन, जाणून घ्या कारण https://www.91mobiles.com/marathi/sony-to-withdraw-india-smartphone-business/ https://www.91mobiles.com/marathi/sony-to-withdraw-india-smartphone-business/#respond Thu, 23 May 2019 10:02:11 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4380 दक्षिण आफ्रिका, दक्षिण आशिया आणि आफ्रिका या क्षेत्रांवर फोकस करणार नाही.

The post Sony आता भारतात लॉन्च करणार नाही स्मार्टफोन, जाणून घ्या कारण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतीय स्मार्टफोन मार्केट मध्ये वाढती स्पर्धा पाहून सर्व कंपन्या आपल्या हँडसेट मध्ये एका पेक्षा एक चांगले फीचर्स देण्याचा प्रयत्न करत आहेत. असे करत असताना कंपन्या आपल्या यूजर्सना सर्व शानदार स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स कमीत कमी किंमतीत उपलब्ध करण्याचा प्रयत्न करतात. या रेस मधून आता एक कंपनी बाजूला गेली आहे, जिचे फोन कदाचित तुम्ही एकेकाळी वापरले असतील आणि तिचे नाव सोनी इलेक्ट्रॉनिक आहे.

भारतासहित इतर देशांत चालू असलेल्या या स्पर्धेत जापानची प्रसिद्ध कंपनी सोनी गेल्या काही वर्षांपासून मागे राहत आहे, याच कारणांमुळे सोनी ने आता भारतीय स्मार्टफोन बाजरातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

सोनी आता भारतात आपला कोणताही नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार नाही. मोबाईल पोर्टफोलियो मध्ये होणाऱ्या सततच्या तोट्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. कंपनीने ऑफिशियली स्टेटमेंट देऊन सांगितले आहे कि ते आता दक्षिण आफ्रिका, दक्षिण आशिया आणि आफ्रिका या क्षेत्रांवर फोकस करणार नाही.

हे देखील वाचा: पंच होल डिजाइन सह Vivo Z5X स्मार्टफोन 24 मे ला होईल लॉन्च, समोर आला ऑफिशियल टीजर

विशेष म्हणजे कंपनीचे ध्येय आर्थिक वर्ष 2020 मध्ये नफा मिळवण्याचे आहे आणि याचसाठी कंपनी आपला खर्च 50 टाक्यांपर्यंत कमी करेल. तसेच सोनी ग्रुप आपल्या प्रमुख टेक्नॉलजीचा वापर करून प्रॉडक्ट अपील मजबूत करण्यावर काम करेल.

कंपनी ने एका विधानात म्हटले, ‘भविष्यात 5G चे महत्व पाहता नफा कमवण्यासाठी आमचे लक्ष्य जापान, यूरोप, हाँगकाँग आणि तैवान मार्केट वर आहे. आम्हाला आर्थिक वर्ष 2018 मध्ये मध्ये आणि दक्षिण अमेरिका, मध्य पूर्व, दक्षिण आशिया सारख्या देशांत विक्री बंद केली आहे, पण आम्ही बाजाराची स्थिती आणि व्यापाराच्या शक्यतांवर नजर ठेऊ. व्यापाराची संधी मिळाल्यास आम्ही सोनी स्टोर सारख्या डायरेक्ट चॅनेल द्वारे विक्रीचा विचार करू शकतो.

हे देखील वाचा: Xiaomi घेऊन येत आहे Redmi K20 Pro, स्पेसिफिकेशन्स असे जे देतील OnePlus 7 Pro ला पण टक्कर! एवढी असेल किंमत

जापानच्या इलेक्ट्रॉनिक कंपनी सोनीने अलीकडेच आपला नवीन स्मार्टफोन Sony Xperia 1 चीन मध्ये लॉन्च केला होता पण भारतात हा स्मार्टफोन कदाचित कधीच लॉन्च केला जाणार नाही. सोनीने यावर्षी बर्सिलोना मध्ये आयोजित मोबाईल वर्ल्ड कांग्रेस मध्ये आपला एक्सपीरिया 1 फ्लॅगशिप फोन लॉन्च केला होता. तसेच कंपनीने एक्सपीरिया 10 आणि एक्सपीरिया 10 प्लस मिड-रेंज फोन सादर केला होता.

The post Sony आता भारतात लॉन्च करणार नाही स्मार्टफोन, जाणून घ्या कारण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/sony-to-withdraw-india-smartphone-business/feed/ 0
6जीबी रॅम आणि दमदार प्रोसेसर सह लॉन्च होईल सोनी एक्सपीरिया 2 https://www.91mobiles.com/marathi/sony-xperia-2-with-6-2-inch-display-snapdragon-855-and-6-gb-ram-launched-this-year/ https://www.91mobiles.com/marathi/sony-xperia-2-with-6-2-inch-display-snapdragon-855-and-6-gb-ram-launched-this-year/#respond Thu, 28 Mar 2019 18:04:01 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3961 कंपनी हा डिवाइस स्नॅपड्रॅगॉन 855 प्रोसेसर आणि 6जीबी रॅम सह आणेल

The post 6जीबी रॅम आणि दमदार प्रोसेसर सह लॉन्च होईल सोनी एक्सपीरिया 2 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सोनी ने यावर्षी बर्सिलोना मध्ये आयोजित मोबाईल वर्ल्ड कांग्रेस मध्ये आपला एक्सपीरिया 1 फ्लॅगशिप फोन लॉन्च केला होता. तसेच कंपनी ने एक्सपीरिया 10 आणि एक्सपीरिया 10 प्लस मिड-रेंज फोन सादर केले होते. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी बातमी समोर आली होती कि कंपनी आपल्या मिड-रेंज कॅटगरी मध्ये एक्सपीरिया 4 लॉन्च करू शकते. पण आता समोर आलेल्या नवीन माहितीनुसार कंपनी अपकमिंग फोन एक्सपीरिया 2 नावाने लॉन्च केला जाईल.

सोनी आईएफए टेक ट्रेड शॉ मध्ये आपले नवीन फोन सादर करण्यासाठी ओळखली जाते. पण यावेळी वेगळा अंदाज लावला जात आहे कि कंपनी सप्टेंबर मध्ये एक्सपीरिया 2 लॉन्च करू शकते. सोनी एक्सपीरिया 1 बद्दल बोलायचे तर याची किंमत £799 (जवळपास 74,000 रुपये) आहे. डिवाइस पर्पल, ब्लॅक, ग्रे आणि व्हाइट कलर ऑप्शन मध्ये सादर केला गेला होता.

आता पर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार एक्सपीरिया 2 मध्ये 6.2-इंच सिनेमावाइड डिस्प्ले दिला जाईल, ज्याचा एस्पेक्ट रेश्यो 21:9 आणि स्क्रीन रेजोल्यूशन (2880 x 1234 पिक्सल) असेल. तसेच हँडसेटचे मेजर पाहता हा 161 x 70 x 8.1एमएम सह येईल. बोलले जात आहे कि कंपनी हा डिवाइस स्नॅपड्रॅगॉन 855 प्रोसेसर आणि 6जीबी रॅम सह आणेल. तसेच फोन मध्ये पवार बॅकअप साठी 3,000एमएएच ची बॅटरी दिली जाईल जी वायरलेस चार्जिंग सपोर्ट सह येईल. तसेच हँडसेट मध्ये 3.5एमएम ऑडियो जॅक जॅक दिला जाईल.

एक्सपीरिया 2 मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाईल. तसेच फोन मध्ये दिल्या जाणाऱ्या रियर कॅमेरा सेटअपची संपूर्ण माहिती समोर आलेली नाही. अशा आहे कि यात एक टीओएफ (टाइम ऑफ फ्लाइट) सेंसर असेल. सध्या एक्सपीरिया 2 बद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. एक्सपीरिया 1 स्मार्टफोन आणि एक्सपीरिया 2 मध्ये फरक डिस्प्ले कॅमेरा स्पेक्स आणि बॅटरी क्षमतेचा असेल.

सोर्स

The post 6जीबी रॅम आणि दमदार प्रोसेसर सह लॉन्च होईल सोनी एक्सपीरिया 2 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/sony-xperia-2-with-6-2-inch-display-snapdragon-855-and-6-gb-ram-launched-this-year/feed/ 0
सोनी घेऊन येत आहे 21:9 डिस्प्ले असलेला नवीन फोन एक्सपीरिया 4, स्पेसिफिकेशन्स आले समोर https://www.91mobiles.com/marathi/sony-xperia-4-21-9-display-leaked-specifications-snapdragon-710/ https://www.91mobiles.com/marathi/sony-xperia-4-21-9-display-leaked-specifications-snapdragon-710/#respond Tue, 12 Mar 2019 09:56:56 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3829 एका ताज्या लीक मध्ये समोर आले आहे कि सोनी या आस्पेक्ट रेशियो सह अजून एक स्मार्टफोन बाबत आहे जो एक्सपीरिया 4 नावासह टेक बाजारात येईल.

The post सोनी घेऊन येत आहे 21:9 डिस्प्ले असलेला नवीन फोन एक्सपीरिया 4, स्पेसिफिकेशन्स आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी सोनी ने गेल्या महिन्यात झालेल्या मोबाईल वर्ल्ड कांग्रेस 2019 मध्ये एक साथ 4 नवीन स्मार्टफोन लॉन्च केले होते. कंपनीने एक्सपीरिया एल3, एक्सपीरिया 1, एक्सपीरिया 10 आणि एक्सपीरिया 10 प्लस अंर्तराष्ट्रीय टेक मंचावर आणले होते. हि पहिली वेळ होती जेव्हा एखाद्या टेक कपंनी ने 21:9 आस्पेक्ट रेशियो वर फोन सादर केला होता. हे चारही स्मार्टफोन आता भारतात येणे बाकी आहे, पण सोनी अंर्तराष्ट्रीय मंचावर आपल्या अजून एका फोन सह तयार झाली आहे. एका ताज्या लीक मध्ये समोर आले आहे कि सोनी या आस्पेक्ट रेशियो सह अजून एक स्मार्टफोन बाबत आहे जो एक्सपीरिया 4 नावासह टेक बाजारात येईल.

सोनी एक्सपीरिया 4
सोनी एक्सपीरिया 4 संबंधित हि बातमी Sumahoinfo ने आपल्या रिपोर्ट मध्ये शेयर केली आहे. या रिपोर्ट मध्ये दावा करण्यात आला आहे कि सोनी आपल्या अजून एका नवीन स्मार्टफोन वर काम करत आहे जो एक्सपीरिया 4 नावासह लवकरच अंर्तराष्ट्रीय मोबाईल बाजारात लॉन्च केला जाऊ शकतो. रिपोर्ट मध्ये या फोनच्या डिजाईन आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती पण देण्यात आली आहे. समोर आलेल्या ताज्या लीक्स नंतर बोलले जात आहे कि एक्सपीरिया 4 एमडब्ल्यूसी 2019 मध्ये लॉन्च झालेल्या एक्सपीरिया 1 चा छोटा म्हणजे कॉम्पेक्ट वर्जन म्हणून बाजारात येऊ शकतो जो किंमतीच्या बाबतीत पण एक्सपीरिया 1 पेक्षा स्वस्त असेल.

लवकरच येत आहे नोकिया 6.2 स्मार्टफोन, किंमत असेल नोकिया 6.1 च्या आसपास

सोनी एक्सपीरिया 4 ची डिजाईन
ताजा रिपोर्टनुसार एक्सपीरिया 4 पण सोनी द्वारा 21:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिस्प्ले वर सादर केला जाईल. म्हणजे या फोनचा डिस्प्ले अरुंद आणि लांब असेल. या फोनला कोणतीही नॉच दिली जाणार नाही. डिस्प्लेवर तसेच खाली बारीक बॉडी पार्ट असले तर स्क्रीनच्या दोन्ही साईड पूर्णपणे बेजल लेस असतील. लीकनुसार कंपनी हा फोन 5.7-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले वर सादर करू शकते जो 1080 x 2520 पिक्सल रेज्ल्यूशनला सपोर्ट करेल.

सोनी एक्सपीरिया 4 चे स्पेसिफिकेशन्स
लीकनुसार सोनी एक्सपीरिया 4 4जीबी रॅम सह सादर केला जाईल जो 64जीबी इंटरनल स्टोरेज सपोर्ट करेल. हा फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस वर सादर केला जाऊ शकतो सोबत हा फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट वर चालेल. लीकनुसार एक्सपीरिया 4 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. लीकनुसार पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 2,800एमएएच ची बॅटरी असू शकते. माहितीनुसार फोनचा आस्पेक्ट रेशियो कमी असल्यामुळे सोनी या फोन मध्ये 9.4एमएम चपटी बॅटरी देईल जी फोन बॉडीच्या आत सहज फिट होईल. हा फोन 3.5एमएम आडियो जॅकला पण सपोर्ट करेल करेगा तसेच कंपनी सिल्वर, ब्लॅक, पर्पल आणि रेड कलर वेरिएंट मध्ये हा फोन लॉन्च करू शकते.

एक्सक्लूसिव: सॅमसंग गॅलेक्सी ए सीरीजला टक्कर देण्यासाठी वीवो घेऊन येत आहे ट्रिपल कॅमेरा असलेला वीवो वाय5 आणि वाय3 मॉडेल

सोनी एक्सपीरिया 1
एक्सपीरिया 4 सोनी च्या एक्सपीरिया 1 चा छोटा वर्जन म्हणून लॉन्च होऊ शकतो. एक्सपीरिया 4 पाहता हा जगातील पहिला फोन आहे ज्यात 21:9 आस्पेक्ट रेशियो डिस्प्ले सोबत आय ऑटो फोकस ट्रॅकिंग सिस्टम देण्यात आली आहे. हा फोन आईपी रेटेड आहे. फोनच्या साइड पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे. सोनी एक्सपीरिया 1 £799 मध्ये लॉन्च केला गेला आहे जे भारतीय करंसी अनुसार जवळपास 74,000 रुपये होतात. त्यामुळे आशा आहे कि एक्सपीरिया 4 मीड रेंज मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

सोनी एक्सपीरिया 1 चे स्पेसिफिकेशन्स
या फोन मध्ये 6.5-इंचाचा 4के एचडीआर ओएलईडी डिस्प्ले मिळेल जो गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्ट केला गेला आहे. तसेच फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट आहे. हा डॉल्बी ऐटमॉस ऑडियो टेक्नॉलजीला सपॉर्ट करतो. फोटोग्राफी साठी फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यात 12-एमपी + 12एमपी + 12एमपी चा कॉम्बिनेशन मिळेल. तसेच वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

सोनी एक्सपीरिया 1 कंपनी द्वारा 6जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे. तसेच फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. जर तुम्हाला फोनची स्टोरेज वाढवायची असेल तर माइक्रोएसडी कार्डने वाढवता येईल. सोनी एक्सपीरिया 1 मध्ये एंडरॉयडचा लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,330एमएएच ची बॅटरी देण्यात आला आहे.

वाया

The post सोनी घेऊन येत आहे 21:9 डिस्प्ले असलेला नवीन फोन एक्सपीरिया 4, स्पेसिफिकेशन्स आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/sony-xperia-4-21-9-display-leaked-specifications-snapdragon-710/feed/ 0
येत आहे जगातील पहिला स्मार्टफोन ज्यात असेल 52-एमपी चा रियर कॅमेरा, 25 फेब्रुवारीला होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/sony-xperia-xz4-premium-to-support-52mp-triple-rear-camera-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/sony-xperia-xz4-premium-to-support-52mp-triple-rear-camera-specifications-in-marathi/#respond Thu, 31 Jan 2019 13:39:58 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3508 हा जगातील पहिला स्मार्टफोन असेल ​ज्यात 52-मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल.

The post येत आहे जगातील पहिला स्मार्टफोन ज्यात असेल 52-एमपी चा रियर कॅमेरा, 25 फेब्रुवारीला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी सोनी येत्या 25 फेब्रुवारीला एफडब्ल्यूसी 2019 मध्ये ईवेंटचे आयोजन करणार आहे. बातमी अशी आहे कि या दिवशी कंपनी आपल्या एक्सपीरिया सीरीजचे नवीन स्मार्टफोन्स सादर करेल ज्यात एक्सपीरिया एक्सझेड4 पण असेल. कालच एक्सपीरिया एक्सझेड4 संबंधित एक लीक आला होता ज्यात फोनच्या स्टोरेज आणि बॅटरी संबंधी माहिती समोर आली होती. आज ​सोनी संबंधित एक मोठी बातमी आली आहे ज्यात फोनच्या कॅमेरा सेग्मेंटचे डिटेल देण्यात आले आहेत. या रिपोर्ट नुसार एक्सपीरिया एक्सझेड4 चा एक मॉडेल 52-मेगापिक्सल कॅमेरा सेंसर सह येईल.

सोनी एक्सपीरिया एक्सझेड4 संबंधित हि माहिती जापानी मीडिया मध्ये पब्लिश झाली आहे. या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि सोनी एक्सपीरिया एक्सझेड4 चा एक प्रीमियम मॉडेल पण कंपनी लॉन्च करेल ज्यात 52-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर असेल. सोनी एक्सपीरिया एक्सझेड4 ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपला सपोर्ट करेल. नव्या रिपोर्ट मध्ये रियर कॅमेरा सेटअपचे डिटेल समोर आले आहेत. या रिपोर्टनुसार सोनी चा हा जगातील पहिला स्मार्टफोन असेल ​ज्यात 52-मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल.

एक्सपीरिया एक्सझेड4 प्रीमियम मॉडेल बद्दल बोलायचे तर रिपोर्टनुसार या फोनच्या बॅक पॅनल वर एफ/2.6 अपर्चर वाली 16-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस असेल. फोनचा दुसरा रियर सेंसर 52-मेगापिक्सलचा आले जो एफ/1.6 अपर्चरला सपोर्ट करेल तर तिसरा एफ/1.4 अपर्चर वाला 0.3-मेगापिक्सलचा टीओएफ सेंसर असेल जो ऑटो फोकसचा वेग वाढवेल. अलीकडेच शाओमीचा रेडमी नोट 7 आणि ऑनरचा व्यू 20 स्मार्टफोन बाजारात आले आहेत जे 48-मेगापिक्सलच्या कॅमेऱ्याला सपोर्ट करतात. पण सोनीचा आगामी फोन याना मागे टाकत नवा रिकॉर्ड बनवेल.

सोनी एक्सपीरिया एक्सझेड4 चे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता आतापर्यंत आलेल्या लीक्सनुसार हा फोन 21:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला जाईल जो 3,360 x 1,440 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.4-इंचाच्या क्वॉड एचडी+ ओएलईडी डिस्प्लेला सपोर्ट करेल. तसेच प्रोटेक्शन साठी या फोनला गोरिल्ला ग्लास 5 ने कोट केले जाईल. एक्सपीरिया एक्सझेड4 एंडरॉयड 9.0 पाई आधारित फोन असेल जो क्वालकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 वर लॉन्च केला जाऊ शकतो.

कंपनी एक्सपीरिया एक्सझेड4 6जीबी रॅम सह 128जीबी च्या इंटरनल स्टोरेज वर सादर करू शकते. तसेच एक्सपीरिया एक्सझेड4 प्रीमियम मॉडेल मध्ये 8जीबी किंवा यापेक्षा जास्त रॅम मिळू शकतो. कपंनी हा फोन आईपी68 रेटिंग सह लॉन्च करू शकते. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 4,400एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते.

The post येत आहे जगातील पहिला स्मार्टफोन ज्यात असेल 52-एमपी चा रियर कॅमेरा, 25 फेब्रुवारीला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/sony-xperia-xz4-premium-to-support-52mp-triple-rear-camera-specifications-in-marathi/feed/ 0
72,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला सोनी एक्सपीरिया एक्सझेड2, जाणून घ्या का आहे हा फोन इतका महाग आणि खास https://www.91mobiles.com/marathi/sony-xperia-xz2-launched-in-india-feature-specification-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/sony-xperia-xz2-launched-in-india-feature-specification-price-in-marathi/#respond Wed, 25 Jul 2018 13:02:00 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1411 आज सोनी ने आपला हाईएंड​ डिवाईस एक्सपीरिया एक्सझेड2 भारतात लॉन्च केला आहे. इं​डियन मार्केट मध्ये हा स्मार्टफोन 72,990 रुपयांमध्ये आणला गेला आहे जो येत्या 1 ऑगस्ट पासून सेल साठी उपलब्ध होईल.

The post 72,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला सोनी एक्सपीरिया एक्सझेड2, जाणून घ्या का आहे हा फोन इतका महाग आणि खास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
फेब्रुवारी मध्ये टेक कंपनी सोनी ने एक्सपीरिया सीरीज ला पुढे नेत आपल्या फ्लॅगशिप अंतर्गत दोन नवीन स्मार्टफोन सादर केले होते. सोनी ने मोबाईल वर्ल्ड कांग्रेस 2018 च्या मंचावरून एक्सपीरिया एक्सझेड2 आणि एक्सपीरिया एक्सझेड2 कॉम्पेक्ट टेक बाजारा समोर सादर केले होते. आज सोनी ने आपला हाईएंड​ डिवाईस एक्सपीरिया एक्सझेड2 भारतात लॉन्च केला आहे. इं​डियन मार्केट मध्ये हा स्मार्टफोन 72,990 रुपयांमध्ये आणला गेला आहे जो येत्या 1 ऑगस्ट पासून सेल साठी उपलब्ध होईल.

सोनी एक्सपीरिया एक्सझेड2

डिजाईन व डिस्प्ले
सोनी एक्सपीरिया एक्सझेड2 ची सर्वात मोठी खासियत ही आहे की हा सोनी चा पहिला असा स्मार्टफोन आहे जो 18:9 आस्पेक्ट रेशियो सह सादर करण्यात आला आहे. हा फोन ग्लास सँडविच डिजाईन वर बनला आहे ज्याच्या बॅक आणि फ्रंट दोन्ही पॅनल्स वर ग्लास आहे. फोन फर्स्ट लुक मध्येच प्रीमियम वाटतो. एक्सपीरिया एक्सझेड2 मध्ये 1080 x 2160 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 5.7-इंचाचा फुलएचडी+ एचडीआर डिस्प्ले देण्यात आला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. कंपनी ने फोन आईपी68 ​रेटिंग सह बाजारात आणला आहे.

ओएस व हार्डवेयर
सोनी एक्सपीरिया एक्सझेड2 लेटेस्ट एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 8.0 ओरियो आधारित आहे. 64बिट आॅक्टा-कोर प्रोसेसर सह हा फोन क्वालकॉम च्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगन 845 ​वर चालतो. ग्राफिक्स साठी फोन मध्ये ऐड्रीनो 630 आहे. एक्सपीरिया एक्सझेड2 मध्ये 6जीबी रॅम देण्यात आला आहे. हा फोन 64जीबी इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्ड ने 400जीबी पर्यंत वाढवता येते.

कॅमेरा
सोनी चा हा फोन जगातील पहिला असा स्मार्टफोन आहे जो 4के एचडीआर क्वॉलिटी चे वीडियो रेकॉर्ड करण्यास सक्षम आहे. तसेच हा 960एफपीएस च्या स्पीड ने फुलएचडी स्लो मोशन वीडियो पण रेकॉर्ड करू शकतो. फोटोग्राफी साठी या फोन च्या रियर पॅनल वर एफ/2.0 अपर्चर वाला 19-मेगापिक्सल चा मोशन आई कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तर सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी एक्सपीरियो एक्सझेड2 मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे.

कनेक्टिविटी आणि सिक्योरिटी
सोनी एक्सपीरिया एक्सझेड2 रियर डुअल सिम फोन आहे जो 4जी नेटवर्क वर चालतो. यात वाईफाई, ब्लूटूथ, एनएफसी, ग्लोनॉस व यूएसबी टाईप-सी सारखे फीचर्स आहेत. सिक्योरिटी साठी फोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन 3डी सेंसिंग टेक्नोलॉजी सह फेस अनलॉक फीचर ला पण सपोर्ट करतो.

बॅटरी
सोनी एक्सपपीरिया एक्सझेड2 मध्ये पावर बॅकअप साठी 3,180एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी क्वालकॉम च्या क्वीकचार्ज 3.0 टेक्नॉलजी सह येते. फोन ची बॅटरी स्मार्ट स्टेमिना मोड ला सपोर्ट करते जो बॅटरी चा वापर खुप कमी करतो. तसेच सोनी चा फोन वायरलैस चार्जिंग ला पण सपोर्ट करतो.

The post 72,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला सोनी एक्सपीरिया एक्सझेड2, जाणून घ्या का आहे हा फोन इतका महाग आणि खास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/sony-xperia-xz2-launched-in-india-feature-specification-price-in-marathi/feed/ 0
6जीबी रॅम सह स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालेल सोनी एक्सपीरिया एक्सझेड3, स्पेसिफिकेशन्स झाले लीक https://www.91mobiles.com/marathi/sony-xperia-xz3-leaked-features-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/sony-xperia-xz3-leaked-features-specifications-in-marathi/#respond Fri, 08 Jun 2018 11:26:23 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=840 पावर बॅकअप साठी यात 3.0 क्वीक चार्ज सपोर्ट वाली 3,240एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते.

The post 6जीबी रॅम सह स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालेल सोनी एक्सपीरिया एक्सझेड3, स्पेसिफिकेशन्स झाले लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सोनी ने वर्षाच्या सुरवातीला आपल्या एक्सपीरिया सीरीज मध्ये हाईएंड डिवाईस एक्सपीरिया एक्सझेड2 लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन टेक बाजारात खुप पसंत केला गेला होता. तसेच कंपनी आता एक्सपीरिया एक्सझेड2 ला अजून एडवांस करण्याची तयारी करत आहे. सोनी एक्सपीरिया एक्सझेड2 च्या नेक्स्ट वर्जन एक्सपीरिया एक्सझेड3 वर काम करत आहे आणि या तो सप्टेंबर महिन्यापर्यंत बाजारात येऊ शकतो. सोनी च्या या स्मार्टफोन चे स्पेसिफिकेशन्स एका जापानी ब्लॉग वर शेयर करण्यात आले आहेत ज्या वरून एक्सपीरिया एक्सझेड3 च्या ताकदीचा अंदाज लावता येतो.

सोनी एक्सपीरिया एक्सझेड3 च्या स्पेसिफिकेशन्स ची महत्वाची शीट जापानी ब्लॉग सुमाहो इंफो वर शेयर करण्यात आली आहे. या शीट मध्ये सांगण्यात आले आहे की हा स्मार्टफोन 18:9 आस्पेक्ट रेशियो सह बनला आहे. हा फोन 2160 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5.7-इंचाच्या बेजल लेस डिस्प्ले सह लॉन्च केला जाऊ शकतो. या शीट नुसार सोनी आपल्या या स्मार्टफोन ला लेटेस्ट एंडरॉयड वर सादर करेल आणि हा क्वालकॉम च्या सर्वात फास्ट चिपसेट स्नॅपड्रॅगन 845 वर चालेल.

लीक नुसार सोनी एक्सपीरिया एक्सझेड3 मध्ये 6जीबी रॅम मेमरी देण्यात येईल तसेच ग्राफिक्स साठी यात ऐड्रेनो 630 जीपीयू आहे. माहितीनुसार हा फोन 2 स्टोरेज वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाईल ज्यात 64जीबी तसेच 128जीबी चे दोन आॅप्शन असतील. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता या फोन मध्ये डुअल रियर असेल. याच्या बॅक पॅनल वर 19-मेगापिक्सल आणि 12-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर दिले जाऊ शकतात तर सेल्फी साठी फोन मध्ये 13-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा असू शकतो.

सोनी एक्सपीरिया एक्सझेड3 आईपी68 रेटिड असेल डुअल सिम सह हा फोन 4जी वोएलटीई ला सपोर्ट करेल. तसेच पावर बॅकअप साठी यात 3.0 क्वीक चार्ज सपोर्ट वाली 3,240एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते. बोलले जात आहे की सोनी आपला हा दमदार स्मार्टफोन सप्टेंबर मध्ये सादर करेल. पण जो पर्यंत को कंपनी कडून एक्सपीरिया एक्सझेड3 बद्दल अधिकृत माहिती देत नाही तो पर्यंत या स्पेसिफिकेशन्स वर विश्वास ठेवता येणार नाही.

The post 6जीबी रॅम सह स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालेल सोनी एक्सपीरिया एक्सझेड3, स्पेसिफिकेशन्स झाले लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/sony-xperia-xz3-leaked-features-specifications-in-marathi/feed/ 0