TikTok - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:24:51 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 TikTok लवर्सची शेवटची आशा पण संपली, भारतातील पुनरागमनाचे दरवाजे झाले बंद https://www.91mobiles.com/marathi/tiktok-and-58-other-chinese-apps-permanently-banned-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/tiktok-and-58-other-chinese-apps-permanently-banned-in-india/#respond Thu, 28 Jan 2021 12:57:01 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9797 टिकटॉकचे भारतात 10 कोटींपेक्षा जास्त युजर्स होते आणि यातील हजारो लोकांची टिकटॉकमुळे कमाई होत होती.

The post TikTok लवर्सची शेवटची आशा पण संपली, भारतातील पुनरागमनाचे दरवाजे झाले बंद first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारत सरकारने 59 चीनी ऍप्स वर कायमस्वरूपी बंदी घातली आहे, ज्यात टिकटॉक, वीचॅट, युसी ब्राउजर आणि इतर अनेक ऍप्सचा समावेश आहे. गेल्या वर्षी जून 2020 मध्ये या ऍप्स वर निर्बंध घालण्यात आले होते. पण, बॅन झाल्यानंतर अनेक दिवस असे रिपोर्ट्स समोर येत होते कि भारतात लोकप्रिय शॉर्ट व्हिडीओ मेकिंग ऍप TikTok चे पुनरागमन होऊ शकते. पण, आता समोर आलेल्या बातमीने TikTok लवर्सच्या शेवटच्या आशेवर पण पाणी फेरले आहे.

असे वाटत आहे कि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे डेटा सुरक्षा कायद्यांबाबत उपरोक्त ऍप्सच्या डेवलपर्सद्वारे देण्यात आलेल्या प्रतिक्रियामुळे समाधान झाले नाही. भारतात कायमचे बॅन झालेल्या पॉप्युलर चायनीज ऍप TikTok नंतर PUBG बद्दल पण बातम्या येत आहेत कि पबजी मोबाईल कमबॅक करू शकतो. परंतु, सरकारने PUBG Mobile India ला मंजुरी देण्यास मागे नकार दिला होता. तरीही अनेक दिवसांपासून अशाप्रकारच्या बातम्या समोर येत आहेत कि कंपनी लवकरच कमबॅक करू शकते.

रॉयटर्सच्या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि TikTok ची मूळ कंपनी बाइटडांसची योजना भारतीय कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करण्याची आहे. कंपनीने The Wire वेबसाइटला माहिती दिली आहे कि आम्हाला सुरवातीला वाटले होते कि परिस्थिती लवकरच ठीक होईल. पण जर आमचे ऍप्स बंद राहणार असतील तर आम्ही सर्व कर्मचाऱ्यांची जबाबदारी घेऊ शकत नाही. आम्हाला माहित नाही कि आम्ही भारतात कधी पुनरागमन करू.

यामुळे कायमचे बॅन झाले ऍप्स

Ministry of Electronics and Information Technology (MeitY) च्या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि भारतात गेल्या जून मध्ये सर्वप्रथम जे 59 चायनीज ऍप्स बॅन केले होते, ते आता कायमचे बॅन करण्यात आले आहेत.

208 चीनी ऍप्स वर लागला आहे बॅन

सरकारने आतापर्यंत एकूण 208 चीनी ऍप्स वर बंदी घातली आहे. बाकी ऍप्स सुरवातीच्या 59 प्रमाणेच कायमचे बॅन होतात कि नाही हे आता बघावे लागेल.

10 कोटींपेक्षा जास्त होते युजर्स

टिकटॉकचे भारतात 10 कोटींपेक्षा जास्त युजर्स होते आणि यातील हजारो लोकांची टिकटॉकमुळे कमाई होत होती. पबजीचे पण भारतात लाखो चाहते होते, हा गेम बॅन झाल्यानंतर अलीकडेच या गेमका पर्याय म्हणून मेड इन इंडिया FAU:G गेम सादर केला गेला आहे.

The post TikTok लवर्सची शेवटची आशा पण संपली, भारतातील पुनरागमनाचे दरवाजे झाले बंद first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tiktok-and-58-other-chinese-apps-permanently-banned-in-india/feed/ 0
भारतात पुन्हा होणार TikTok ची एंट्री! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण https://www.91mobiles.com/marathi/bytedance-in-talks-with-reliance-for-investment-in-tiktok-india/ https://www.91mobiles.com/marathi/bytedance-in-talks-with-reliance-for-investment-in-tiktok-india/#respond Fri, 14 Aug 2020 10:03:37 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7787 रॉयटर्सच्या एका रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि रिलायंस इंडस्ट्रीज टिकटॉकचा भारतातील व्यवसाय खरेदी करू शकते.

The post भारतात पुन्हा होणार TikTok ची एंट्री! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
यावर्षी जुलै मध्ये भारत सरकारने टिकटॉक समवेत 59 चायनीज ऍप बॅन केले होते. सरकारने प्राइवेसीचे कारण देत टिकटॉक समवेत इतर चायनीज ऍप बॅन केले होते. या 59 चायनीज ऍप्स मधील सर्वात प्रसिद्ध TikTok बाबत बातमी समोर येत आहे कि हा वीडियो मेकिंग ऍप भारतात पुन्हा एंट्री करू शकतो.

रॉयटर्सच्या एका रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि रिलायंस इंडस्ट्रीज टिकटॉकचा भारतातील व्यवसाय खरेदी करू शकते. सूत्रांच्यानुसार आता डील बाबत बोलणी सुरु झाली आहे. तसेच आता पर्यंत रिलायंस आणि टिकटॉक कडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

मार्केट इंटेलिजेंस फर्म सेंसर टॉवरच्या डेटानुसार भारत 61 मिलियन पेक्षा जास्त डाउनलोड सह शॉर्ट वीडियो ऍपचा सर्वात मोठा बाजार आहे. पण जेव्हा मॉनिटाइजेशनचा प्रश्न येतो तेव्हा चीन, यूएस आणि यूकेला टिकटॉकचा एकूण 90% हिस्सा मिळतो.

जून मध्ये भारत सरकारने आईटी ऍक्ट 2000 च्या सेक्शन 69 अंतर्गत हा ऍप देशात बॅन केला आहे. टिकटॉक सोबतच सरकारने एकूण 59 ऍप्सच्या वापरावर भारतात बंदी घातली होती. या आदेशानंतर गूगल प्ले स्टोर आणि ऍप्पल ऍप स्टोरने टिकटॉक व्यतिरिक्त Helo, Mi Video Call – Xiaomi, DU Browser, DU Privacy, Cache Cleaner – DU App Studio, Clean Master – Cheetah Mobile आणि Wonder Camera पण आपल्या प्लॅटफॉर्म वरून काढून टाकले होते.

अमेरिकेत पण टिकटॉक बॅन

गेल्या आठवड्यात अमेरिकेने पण चीनी ऍप टिकटॉक वरील बॅनला मंजुरी दिली होती. पण अमेरिकेने बाइटडांसला टिकटॉकचा अमेरिकेतील व्यवसाय एखाद्या अमेरिकन कंपनीला विकण्यासाठी 15 सप्टेंबर पर्यंतची वेळ दिली आहे. टिकटॉकचा अमेरिकेतील व्यवसाय माइक्रोसॉफ्ट आणि ट्वीटर विकत घेऊ शकतात. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Google आणि Apple ने आपल्या ऍप स्टोर वरून काढून टाकला फोर्टनाइट

खूप लोकप्रिय बॅटल रॉयल गेम Fortnite ऍप्पलने गुरुवारी आपल्या ऍप स्टोर वरून काढून टाकला आहे. डेवलपरने फोर्टनाइटसाठी एक अपडेट जाहीर केल्यानंतर लगेचच हे पाऊल उचलण्यात आले आहे. ऍप्पल व्यतिरिक्त Google ने पण प्ले स्टोर वरून हा ऍप काढून टाकला आहे. गूगल प्ले स्टोर आणि ऍपल ऍप स्टोर दोन्ही ठिकाणी हा ऍप उपलब्ध नाही.

The post भारतात पुन्हा होणार TikTok ची एंट्री! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/bytedance-in-talks-with-reliance-for-investment-in-tiktok-india/feed/ 0
आला नवीन TikTok Pro, पण हे ऍप डाउनलोड करणे पडू शकते महागात https://www.91mobiles.com/marathi/fake-tik-tok-pro-app-link-is-circulating-dont-click-the-link/ https://www.91mobiles.com/marathi/fake-tik-tok-pro-app-link-is-circulating-dont-click-the-link/#respond Tue, 14 Jul 2020 10:24:57 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7645 TikTok ऍप बॅन झाल्यानंतर आतापर्यंत मार्केट मध्ये अशाप्रकारचा कोणताही TikTok Pro ऍप आलेला नाही.

The post आला नवीन TikTok Pro, पण हे ऍप डाउनलोड करणे पडू शकते महागात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारत सरकारने अलीकडेच वीडियो मेकिंग ऍप TikTok सह 58 चीनी ऍप्स बॅन करण्याचा निर्णय घेतला होता. पण या बॅन केल्या गेलेल्या ऍप्सच्या नावावर काही नकली ऍप्स सध्या डाउनलोडसाठी उपलब्ध झाले आहेत जे यूजर्सचा डेटा चोरण्याचे काम करत आहेत. आता अश्याच एका ऍपची बातमी समोर येत आहे जो लोकांच्या फोनची महत्वाची व खाजगी माहिती चोरी करण्याचे काम करत आहे. मोबाईल यूजर्सकडे एक मेसेज येत आहे, ज्यात टिकटॉक सारखा ऍप डाउनलोड करण्याची लिंक दिली जात आहे, ज्याचे नाव टिकटॉक प्रो सांगण्यात आले आहे.

मेसेज काय आहे

अलीकडेच TOI च्या रिपोर्ट मध्ये समोर आले होते कि काही मोबाईल यूजर्सना एक मेसेज मिळत आहे. या मेसेज टिकटॉक सारखे ऍप डाउनलोड करण्याची लिंक दिली जात आहे, ज्याचे नाव TikTok Pro सांगण्यात येत आहे. लिंक वर क्लिक केल्यानंतर हा ऍप बाहेरच्या सोर्स वरून डाउनलोड होतो आणि इंस्टॉल झाल्यावर तुमच्या फोन मधील सर्व माहिती हॅकर्स कडे जाते.

पोलिसांनी दिली सूचना

हे प्रकरण गांभीर्याने घेऊन महाराष्ट्र साइबर सेलने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडल वरून ट्विट करून सांगितले आहे कि सर्व नागरिकांना विनंती आहे कि टिकटॉकचा एक स्कॅम समोर आला आहे. टिकटॉक प्रो नावाचा एक मालवेयर सोशल मीडिया वर शेयर केला जात आहे. जर या नावाचा तुम्हाला कोणताही मेसेज मिळाला तर तो कोणाला फॉरवर्ड करू नका, तो लगेच डिलीट करा.

TikTok Pro आहे काय

TikTok ऍप बॅन झाल्यानंतर आतापर्यंत मार्केट मध्ये अशाप्रकारचा कोणताही TikTok Pro ऍप आलेला नाही. तसेच हा ऍप गूगल प्ले स्टोर वर उपलब्ध नाही. हा थर्ड पार्टी म्हणजे बाहेरील सोर्स वरून डाउनलोड करावा लागतो जो तुमची खाजगी माहिती इतरांपर्यंत पोचवू शकतो.

गूगलने काढून टाकले 11 ऍप्स

गूगल अनेक दिवसांपासून फेक ऍप्स काढून टाकण्याचे काम करत आहे. काही दिवसांपूर्वी गूगलने प्ले स्टोर वरून 11 ऍप्स काढून टाकले होते. एंड्रॉइड ऍपला निशाना बनवणारा हा खास मालवेयर थेट यूजर्सच्या अकाउंट मध्ये घुसू शकतो. पण ज्या वापरकर्त्यांनी हे ऍप्स आधीच डाउनलोड केले आहेत, त्यांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी हे ऍप्स आपल्या फोन मधून काढून टाकले पाहिजेत.

The post आला नवीन TikTok Pro, पण हे ऍप डाउनलोड करणे पडू शकते महागात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/fake-tik-tok-pro-app-link-is-circulating-dont-click-the-link/feed/ 0
TikTok App डिलीट केल्यानंतर पण सर्वर वर राहते तुमची खाजगी माहिती, या स्टेप्स फॉलो केल्या तर होईल संपूर्ण सफाई https://www.91mobiles.com/marathi/how-to-delete-your-tiktok-account-and-personal-data-know-full-steps/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-delete-your-tiktok-account-and-personal-data-know-full-steps/#respond Thu, 25 Jun 2020 10:24:53 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7546 फक्त TikTok ऍपचा फोन मधून डिलीट होऊ नये तर त्या ऍप मध्ये असलेली तुमची सर्व माहिती पूर्णपणे डिलीट व्हावी तर आम्ही पुढे सांगितलेल्या सोप्प्या स्टेप्स फॉलो करा.

The post TikTok App डिलीट केल्यानंतर पण सर्वर वर राहते तुमची खाजगी माहिती, या स्टेप्स फॉलो केल्या तर होईल संपूर्ण सफाई first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
TikTok वर वीडियो बनवणाऱ्यांपासून ते वीडियो बघणाऱ्या लोकांपर्यंत सर्वांना पकडून भारतात 61 कोटींपेक्षा जास्त लोकांनी आपल्या फोन मध्ये टिकटॉक ऍप डाउनलोड म्हणजे इंस्टाल केला आहे. भारतात टिकटॉक आधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात राहिला आहे. आणि या गोष्टीकडे पण दुर्लक्ष करता येणार नाही कि वादग्रस्त असूनही TikTok देशातील सर्वात हिट ऍप्स पैकी एक बनला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून टिकटॉकची पत कमी होत आहे पण अजूनही टिकटॉक यूजर्सची संख्या लाखात आहे.

गेल्या काही दिवसांपासून अनेकांनी TikTok ऍप आपल्या स्मार्टफोन्स मधून डिलीट केला आहे. काहींनी चायना विरोधी भावनांमुळे तर काहींनी यू-ट्यूबच्या समर्थनासाठी. 91मोबाईल्स कोणतेही ऍप फोन मध्ये इंस्टाल करण्याची शिफारीश किंवा डिलीट करण्याचे आव्हान करत नाही. पण टिकटॉक फोन मधून डिलीट करण्याच्या या ट्रेंड मध्ये हजारो यूजर एक चूक करत आहेत कि ते ऍप फोन मधून अनइंस्टाल करत आहेत, पण त्यांचे अकाउंट मात्र TikTok च्या सर्वर वर तसेच राहत आहे.

हे सोप्प्या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर TikTok सारखे ऍप्स फोन मध्ये इंस्टाल केल्यानंतर त्यावर प्रत्येक यूजरला आपले अकाउंट बनवावे लागते. अकाउंट बनवण्यासाठी ई-मेल आईडी, फोन नंबर, नाव आणि वय सारखी माहिती दिली जाते आणि त्यानंतर प्रत्येक यूजरची यूनिक आईडी तयार होते. टिकटॉक यूजर्सनी पण असेच केले असेल. पण जेव्हा असे ऍप्स फोन मधून अनइंस्टाल किंवा डिलीट केले जातात, तेव्हा तो ऍप तर फोन मधून जातो पण ऍप वर टाकलेली माहिती आणि बनवलेले प्रोफाइल ऍप सर्वर वर सुरक्षित राहते.

जोपर्यंत हि माहिती तुम्ही स्वतःहून डिलीट करत नाही तोपर्यंत हि माहिती ऍप वर तशीच राहते आणि ऍक्टिव्ह राहते. त्यामुळे जेव्हा पुन्हा ऍप इंस्टाल केला जातो तेव्हा पुन्हा आईडी बनवण्याची गरज पडत नाही. जर तुम्हाला हवे असेल कि फक्त TikTok ऍपच फोन मधून डिलीट होऊ नये तर त्या ऍप मध्ये असलेली तुमची सर्व माहिती पण पूर्णपणे डिलीट व्हावी तर आम्ही पुढे सांगितलेल्या सोप्प्या स्टेप्स फॉलो करा. इथे सर्वात आधी तुम्हाला सांगू इच्छितो कि या सर्व स्टेप्स ऍप मधेच पूर्ण करता येतील, त्यामुळे तुम्हाला एकदा टिकटॉक ऍप तुमच्या फोन मध्ये पुन्हा इंस्टाल करावा लागेल.

1. सर्वात आधी TikTok तुमच्या स्मार्टफोन मध्ये इंस्टाल करा.

2. ऍप ओपन केल्यानंतर तुमच्या आईडी व पासवर्डने लॉग-इन करा.

3. ऍप मध्ये तुमच्या प्रोफाइल वर जा, यासाठी खाली ‘Me’ टॅब देण्यात आली आहे, तिथे क्लिक करा.

4. तुमचे प्रोफाइल येईल आणि तिथे उजवीकडे वर्टिकल शेप मध्ये तीन डॉट दिसतील, त्यावर क्लिक करा.

5. ‘Manage My Account’ चा पर्याय उघडा.

6. इथे सर्वात खाली तुम्हाला ‘Delete My Account’ चा ऑप्शन मिळेल, त्यावर क्लिक करा.

7. हि शेवटची पायरी आहे, स्क्रीन वर दिलेल्या सूचनांचे पालन करा म्हणजे तुमचे काम होईल.

तुमचे अकाउंट TikTok च्या सर्वर वरून पूर्णपणे काढून टाकण्यात आले आहे. आता तुम्ही कोणतीही माहिती इथे राहणार नाही. तुमची माहिती पूर्णपणे सुरक्षित झाली आहे आणि आता हे ऍप पण तुम्ही फोन मधून काढून टाकू शकता.

The post TikTok App डिलीट केल्यानंतर पण सर्वर वर राहते तुमची खाजगी माहिती, या स्टेप्स फॉलो केल्या तर होईल संपूर्ण सफाई first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-delete-your-tiktok-account-and-personal-data-know-full-steps/feed/ 0
Google ची कमाल: TikTok चे पुन्हा आले चांगले दिवस, रेटिंग कमी करणाऱ्यांना झटका https://www.91mobiles.com/marathi/google-removes-millions-of-negative-tiktok-reviews-apps-rating-now-44-on-play-store/ https://www.91mobiles.com/marathi/google-removes-millions-of-negative-tiktok-reviews-apps-rating-now-44-on-play-store/#respond Fri, 29 May 2020 12:31:37 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7145 गूगल कडे याचे हक्क आहेत जर कोणी चुकीचा रिव्यू पोस्ट करत असेल किंवा एकापेक्षा जास्त अकाउंट वरून रिव्यू पोस्ट केल्यास गूगल ते काढून टाकू शकतो.

The post Google ची कमाल: TikTok चे पुन्हा आले चांगले दिवस, रेटिंग कमी करणाऱ्यांना झटका first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतात कोरोना वायरसमुळे चालू असलेल्या लॉकडाउन मध्ये सर्वात जास्त प्रसिद्ध झालेल्या वीडियो शेयरिंग प्लॅटफॉर्म टिकटॉकच्या गेल्या काही दिवसांपासुन बातम्या येत होत्या. सुरवातीला यूट्यूब वीडियो बनवणाऱ्या अजय नागरने आपल्या कॅरी मिनाती नावाच्या यूट्यूब चॅनेल वर एक वीडियो टाकला होता जो आता डीलिट झाला आहे. हा वीडियो बघून लोकांना टिकटॉक वरील विडिओजचा राग येऊ लागला. त्यामुळे यूट्यूब आणि टिकटॉक यूजर्स मध्ये अचानक एक लढाई सुरु झाली. या भांडणामुळे काही दिवसांपूर्वी ट्विटर वर #BanTikTok ट्रेंड होऊ लागला आणि परिणाम असा झाला की टिकटॉकची रेटिंग कमी होऊन 1.2 झाली. पण जवळपास एक आठवड्यानंतर टिकटॉकची रेटिंग सुधारली आहे आणि जी पुन्हा 4.4 झाली आहे. यामुळे सर्वात जास्त वाईट त्यांना वाटले आहे ज्यांनी हि रेटिंग कमी होण्यासाठी मेहनत घेतली होती. पण असे काय झाले कि एकाच आठवड्यात रेटिंग सुधारली. चला जाणून घेऊया.

गूगलने केली कमाल

टिकटॉकची रेटिंग सुधारण्यामागे कोणताही चमत्कार नाही तर गूगलची कमाल आहे. गूगलने गूगल प्ले स्टोरच्या आपल्या टीमच्या मदतीने हि कमाल केली आहे. गूगल प्ले स्टोर वरून जवळपास 80 लाख नेगेटिव रिव्यू डिलीट करण्यात आले आहेत. हे तेच रिव्यू आहेत जे यूट्यूब-टिकटॉक विवादानंतर समोर आले होते. लोकांनी ऍपला कमीत कमी रेटिंग दिली, ज्यामुळे ऍपची सरासरी रेटिंग 4.8 वरून 1.2 झाली होती.

गूगल कडे आहे हक्क

गूगल कडे याचे हक्क आहेत जर कोणी चुकीचा रिव्यू पोस्ट करत असेल किंवा एकापेक्षा जास्त अकाउंट वरून रिव्यू पोस्ट केल्यास गूगल ते काढून टाकू शकतो. टिकटॉकची रेटिंग कमी झाल्यावर पण गूगलने आपल्या नियमावलीचा वापर केला आहे. या नियमाच्या मदतीने जवळपास 80 लाख नेगेटिव रिव्यू काढून टाकण्यात आले, ज्यामुळे टिकटॉकची रेटिंग पुन्हा 4.4 झाली आहे.

Mitron कडून मिळत आहे टक्कर

चीनी ऍपची रेटिंग कमी झाल्यावर Tik Tok सारख्या एक भारतीय ऍप मित्रों Mitron लोकनाच्या पसंतीस उतरत आहे. काही दिवसांपूर्वी Mitron ऍपची लोकप्रियता वाढली आहे आणि सध्या प्ले स्टोर मध्ये भारतातील पॉपुलर ऍप्स पैकी एक बनला आहे. विशेष म्हणजे या महिन्यातच हा लॉन्च करण्यात आला होता. महिनाभरात या ऍपला आतापर्यंत 50 लाख डाउनलोड मिळाले आहेत. सुरवातीला तर हा Tik Tok ला टक्कर देत असल्याचे दिसत आहे.

The post Google ची कमाल: TikTok चे पुन्हा आले चांगले दिवस, रेटिंग कमी करणाऱ्यांना झटका first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-removes-millions-of-negative-tiktok-reviews-apps-rating-now-44-on-play-store/feed/ 0
सादर झाला TikTok वाल्यांचा स्मार्टफोन, स्पेसिफिकेशन्स बघून सांगा विकत घ्याल का हा मोबाईल https://www.91mobiles.com/marathi/tiktok-bytedance-smartisan-jianguo-nut-pro-3-smartphone-launched-12gb-ram-quad-rear-camera-launched-specifications-price/ https://www.91mobiles.com/marathi/tiktok-bytedance-smartisan-jianguo-nut-pro-3-smartphone-launched-12gb-ram-quad-rear-camera-launched-specifications-price/#respond Mon, 04 Nov 2019 14:07:44 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5675 फोनच्या किंमतीची सुरवात 2899 युआन म्हणजे 29,000 रुपयांपासून होईल.

The post सादर झाला TikTok वाल्यांचा स्मार्टफोन, स्पेसिफिकेशन्स बघून सांगा विकत घ्याल का हा मोबाईल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
TikTok बद्दल अनेक दिवसांपासून बातम्या येत होत्या कि या म्यूजिक मेकिंग ऍपच पॅरेन्ट कंपनी ByteDance आपला स्वतःचा स्मार्टफोन पण बाजारात आणणार आहे. अनेक गॉसिप्स आणि बातम्यानंतर अखेरीस TikTok चा हा स्मार्टफोन समोर आला आहे. ByteDance ने आधीच स्पष्ट केले होते कि हा फोन टेक कंपनी Smartisan शी भागेदारी करून बनवला जाईल आणि या फोनचा TikTok शी कोणताही संबंध नसेल. तसेच आज कंपनीने हा स्मार्टफोन Jianguo Pro 3 नावाने अधिकृत केला आहे.

Jianguo Pro 3

हा स्मार्टफोन ग्लोबल मार्केट मध्ये Nut Pro 3 नावाने प्रेजेंट केला जाईल. थेट फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता Jianguo Pro 3 म्हणजे Nut Pro 3 वॉटरड्रॉप नॉच वर सादर केला गेला आहे जो बेजल लेस डिस्प्ले सह ‘यू’ शेप नॉचला सपोर्ट करतो. या फोन मध्ये 6.39 इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन सिक्योरिटी व अनलॉकिंग साठी Jianguo Pro 3 इन-डिस्प्ले टेक्नॉलॉजी सह येतो.

Jianguo Pro 3 एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे जो Smartisan OS 3.0 सह चालतो. तसेच प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये क्वालकॉमचा सर्वात पावरफुल आणि लेटेस्ट चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 प्लस आहे. चीनी बाजारात हा फोन तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 8 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम सह 256 जीबी मेमरी आणि सर्वात मोठ्या वेरिएंट मध्ये 12 जीबी रॅम सह 256 जीबी इंटरनल स्टोरेज आहे.

क्वॉड कॅमेऱ्याची ताकद

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Nut Pro 3 / Jianguo Pro 3 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.75 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा Sony IMX586 प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. सोबत फोन 13 मेगापिक्सलच्या अल्ट्रावाइड सेंसर, 8 मेगापिक्सलच्या टेलीफोटो लेंस आणि 5 मेगापिक्सलच्या सुपर मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी या फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Jianguo Pro 3 / Nut Pro 3 मध्ये पावर बॅकअप साठी 18वॉट फास्ट चार्जिंग फीचर असलेली 4000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी क्विक चार्ज 4 टेक्नॉलॉजीला पण सपोर्ट करते. खास बाब अशी कि या फोन वर स्क्रीन अनलॉक न करता TikTok उघडून वापरतफ येईल. चीन मध्ये TikTok ला Duoyin म्हटले जाते. किंमतीबद्दल बोलायचे तर फोनच्या किंमतीची सुरवात 2899 युआन म्हणजे 29,000 रुपयांपासून होईल.

The post सादर झाला TikTok वाल्यांचा स्मार्टफोन, स्पेसिफिकेशन्स बघून सांगा विकत घ्याल का हा मोबाईल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tiktok-bytedance-smartisan-jianguo-nut-pro-3-smartphone-launched-12gb-ram-quad-rear-camera-launched-specifications-price/feed/ 0
3 वर्षांपूवी घरातून पळून गेलेला नवरा, बायकोने TikTok वीडियो वरून पकडेल https://www.91mobiles.com/marathi/tamilnadu-suresh-caught-by-wife-after-3-years-on-tiktok-video/ https://www.91mobiles.com/marathi/tamilnadu-suresh-caught-by-wife-after-3-years-on-tiktok-video/#respond Thu, 04 Jul 2019 13:22:16 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4733 हा ऍप वापरल्यामुळे 3 वर्षांपासून गायब एक व्यक्ति आपल्या पत्नी आणि कुटुंबाला भेटू शकला आहे.

The post 3 वर्षांपूवी घरातून पळून गेलेला नवरा, बायकोने TikTok वीडियो वरून पकडेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
TikTok ऍप भारतात जितका प्रसिद्ध आहे, तितकाच विवादास्पद पण आहे. अलीकडेच कॉग्रेस नेता शशी थरूर यांनी या ऍपला राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका म्हणत म्हटले होते कि TikTok इंडियन यूजर्सचा डेटा बेकायदेशीररित्या चीन मध्ये पाठवत आहे. TikTok संबंधित असा वाद चालू असताना एक वेगळेच प्रकरण समोर आले आहे. TikTok संबंधित बातमी आली आहे कि हा ऍप वापरल्यामुळे 3 वर्षांपासून गायब एक व्यक्ति आपल्या पत्नी आणि कुटुंबाला भेटू शकला आहे.

TikTok संबंधित ये प्रकरण तामिळनाडू मधील आहे. मीडिया रिपोर्ट्स नुसार कृष्णानगर मधील सुरेश तीन वर्षांपूर्वी 2016 मध्ये आपल्या घरातून पळून गेला होता. सुरेश गायब झाल्यानंतर त्याची पत्नी आणि घरच्यांनी त्याला खूप शोधले पण तो कुठेच मिळाला नाही. पोलीसांत रिपोर्ट करूनही सुरेशचा थांगपत्ता लागला नाही. पण आता 3 वर्षानंतर सुरेशला एका TikTok वीडियो द्वारे त्याच्या पत्नीने पकडले आहे.

गायब झाल्यानंतर तीन वर्षांनी एके दिवशी सुरेशची पत्नी जयासुधाच्या नातेवाईकाने TikTok वर एक वीडियो बघितला ज्यात एक्टिंग करत असलेली एक व्यक्ती हुबेहूब सुरेश सारखी दिसत होती. त्या वीडियो मधील व्यक्ती एका किन्नरसोबत होती. संशय आल्यामुळे नातेवाईकाने जयासुधाला तो वीडियो दाखवला जो बघितल्यानंतर जयासुधाला खात्री झाली कि वीडियो मध्ये किन्नर सोबत असलेली व्यक्ति दुसरी कोणी नसून सुरेशच आहे.

TikTok वीडियो बद्दल जयासुधाने पोलिसांना सांगितले, त्यानंतर पोलिसांनी सुरेशच्या TikTok अकाउंट वर नजर ठेवली. काही दिवसांतच पोलिसांनी सुरेशला होसुर स्थानकावर पकडले. सुरेशने सांगितले कि त्याने कौटुंबिक कलहामुळे आपला परिवार सोडला होता. सुरेशने असे पण सांगितले कि तो वीडियो मधील किन्नर सोबत रिलेशनशिप मध्ये आहे आणि घरातून पळून गेल्यानंतर तो त्याच्यासोबत राहत होता.

किन्नरांसाठी काम करणाऱ्या एका NGO सोबत मिळून पोलिसांनी सुरेशला पकडले आणि त्याची काउंसलिंग केल्यानंतर त्याची पत्नी व घरच्यांच्या हवाली केले आहे. सुरेशला दोन मुलं आहेत. TikTok वर वीडियो बनवण्याचा हा नाद सुरेशसाठी किती चांगला ठरला हे तर आम्ही सांगू शकत नाही पण या ऍपने एक घरातून पळून गेलेला नवरा पुन्हा त्याच्या बायकोला भेटू शकला.

The post 3 वर्षांपूवी घरातून पळून गेलेला नवरा, बायकोने TikTok वीडियो वरून पकडेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tamilnadu-suresh-caught-by-wife-after-3-years-on-tiktok-video/feed/ 0
TikTok बेकायदेशीररीत्या भारतीयांचा डेटा पाठवत आहे चीनला : शशी थरूर https://www.91mobiles.com/marathi/tiktok-illegally-collecting-indians-data-received-by-china-issue-of-national-security-shashi-tharoor/ https://www.91mobiles.com/marathi/tiktok-illegally-collecting-indians-data-received-by-china-issue-of-national-security-shashi-tharoor/#respond Tue, 02 Jul 2019 11:20:57 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4713 ऍप द्वारे सेव केला जातो जो चीनी टेलीकॉम कंपन्यांच्या सर्वर पर्यंत पोचतो आणि या कंपन्यांच्या सर्वर वरून भारतीयांचा डेटा चीनी सरकारला मिळतो.

The post TikTok बेकायदेशीररीत्या भारतीयांचा डेटा पाठवत आहे चीनला : शशी थरूर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
TikTok ऍप भारतात सुरवातीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. देशात ज्या वेगाने हा ऍप प्रसिद्ध झाला आहे तेवढ्याच वेगाने याच्या वापरावर प्रश्न निर्माण झाले आहेत. TikTok वर अश्लीलता पसरवण्याचा आरोप पण केला गेला आहे. हा ऍप आता पुन्हा एकदा वादात अडकला आहे. TikTok वर पुन्हा एकदा आरोप केला गेला आहे पण हा अश्लीलता पसरवण्याचा नाही तर त्यापेक्षा पण जास्त गंभीर आहे. TikTok भारतासाठी “national security issue” असल्याचे सांगण्यात आले आहे ज्यामुळे प्रत्येक भारतीयाची खाजगी माहिती धोक्यात आली आहे. TikTok वर हा गंभीर आरोप कॉग्रेस नेता शशी थरूर यांनी केला आहे.

TikTok पासून भारत आणि भारतीयांना धोका आहे असे शशी थरूर यांनी म्हटले. लोकसभेत कॉग्रेस नेत्यांनी हा मुद्दा मांडत सदनाचे लक्ष वेधले. TikTok वरील या आरोपाचे गाम्भीर्य यावरूनच समजत आहे कि शशी थरूर यांनी या ऍपला राष्ट्रीय सुरक्षेचे प्रकरण म्हटले आहे. शशी थरूर यांनी आपल्या विधानात म्हटले आहे कि TikTok भारतीय यूजर्सचा डेटा अवैधरित्या जमा करत आहे आणि चीन मध्ये पाठवत आहे.

TikTok वर आरोप करत थरूर म्हटले कि हा ऍप वापरणाऱ्या भारतीयांची खाजगी माहिती धोक्यात आहे. ऍप द्वारा भारतीयांचा डेटा चीन मध्ये ट्रांसमिट केला जात आहे जे देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकते. कॉग्रेस थरूर म्हणतात कि भारतात इंटरनेट डेटा प्रोटेक्शन धोरणे मजबूत नसल्यमुळे देशात डेटा लीक होणे आणि मोबाईल यूजर्सची गोपनीयतेच्या सुरक्षेचा विषय खूप संवेदनशील झाला आहे. TikTok ऍप पण याच कारणामुळे भारतीयांचा डेटा बेकायदेशीरपणे आपल्या देशात म्हणजे चीन मध्ये पाठवत आहे.

हे देखील वाचा: PUBG खेळू न दिल्याने मोठ्या भावाला कैची घुसवून मारले!

चीनी टेलीकॉम कंपन्यांकडे भारतीयांचा डेटा

शशी थरूर यांनी संपूर्ण लोकसभेला सांगितले कि TikTok बनवणारी कंपनी ByteDance चीनी सरकार सोबत मिळून काम करत आहे आणि चीनी टेलीकॉम कंपन्यांशी पण या कंपनीचे संबंध चांगले आहेत. TikTok वापरणाऱ्या भारतीय यूजर्सचा डेटा या ऍप द्वारे सेव केला जातो जो चीनी टेलीकॉम कंपन्यांच्या सर्वर पर्यंत पोचतो आणि या कंपन्यांच्या सर्वर वरून भारतीयांचा डेटा चीनी सरकारला मिळतो.

TikTok वर हा आरोप करण्यासोबतच शशी थरूर यांनी अलीकडेच अमेरिकेद्वारा TikTok ला ठोठावण्यात आलेल्या दंडावर पण प्रकाश टाकला. शशी थरूर यांनी सांगितले कि अमेरिकेतील फेडरल रेग्यूलेशन अथारिटीने पण TikTok वर बेकादेशीररित्या यूजर्सचा डेटा चोरी करण्याचा आरोप करत या ऍपला 5.7 मिलीयनचा दंड ठोठावला आहे. हि रक्कम भारतीय करंसी नुसार 39,30,57,750 रुपये यानि 39 कोटी रुपयांच्या आसपास आहे.

हे देखील वाचा: जुलै मध्ये हे 5 दमदार फोन भारतात होतील लॉन्च

TikTok चे स्पष्टीकरण

शशी थरूर यांच्या या विधानानंतर TikTok ने पण आज एक विधान जाहीर केले आहे ज्यात ऍपने स्वतःवरील आरोपांचे खंडन केले आहे. TikTok ने म्हटले आहे कि हा ऍप पूर्णपणे देशातील कायद्यांचे पालन करत आहे आणि सर्व काम नियम व कायद्यानुसार करत आहे. TikTok ने स्पष्टपणे सांगितले आहे कि ते कोणत्याही भारतीयाचा डेटा चीनी सर्वर वर पाठवत नाहीत. तसेच चीनी सरकार किंवा इतर कोणतीही चीनी कंपनी TikTok चा डेटा एक्सेस करू शकत नाही.

The post TikTok बेकायदेशीररीत्या भारतीयांचा डेटा पाठवत आहे चीनला : शशी थरूर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tiktok-illegally-collecting-indians-data-received-by-china-issue-of-national-security-shashi-tharoor/feed/ 0
TikTok वर वीडियो बनवत असताना यमुनेत बुडून झाला युवकाचा मृत्यू https://www.91mobiles.com/marathi/young-man-drowned-in-yamuna-river-during-tiktok-video/ https://www.91mobiles.com/marathi/young-man-drowned-in-yamuna-river-during-tiktok-video/#respond Mon, 24 Jun 2019 13:30:03 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4645 मृत तरुणाचे वय 24 वर्ष आहे आणि त्याचे नाव हितेश वासनिक होते.

The post TikTok वर वीडियो बनवत असताना यमुनेत बुडून झाला युवकाचा मृत्यू first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्द विडियो मेकिंग ऍप TikTok चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी हा ऍप बॅन करण्यात आला होता. पण काही आठवड्यांपूर्वी हा पुन्हा एंडरॉयड आणि आईओएस मध्ये डाउनलोड साठी उपलब्ध झाला आहे. पण अनेक दिवसांपासून या ऍपमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढतच जात आहे. अलीकडेच टिक-टॉक वीडियो बनवणे आणि सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात एका युवकाचा यमुनेत बुडून मृत्यू झाला आहे.

हि घटना उत्तर प्रदेश मधील मथुरा येथील आहे. मीडिया रिपोर्ट्सच्या माहिती नुसार छत्तीसगड मधील भिलाई मधून मथुरा फिरायला आलेल्या एका युवकाने गेल्या आठवड्यात शनिवारी महावन येथील ब्रह्माण्ड घाटावर एक युवक टिक-टॉक वीडियो बनवण्याच्या नादात यमुनेत बुडाला, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पोलिसांच्या मते छत्तीसगड मधील दुर्ग जिल्ह्यातील भिलाई शहरातून 55 लोकांचा एक ग्रुप 16 जूनला तीर्थ यात्रेसाठी आला होता, ज्यात या युवकाचा समावेश होता. मृत तरुणाचे वय 24 वर्ष आहे आणि त्याचे नाव हितेश वासनिक होते.

याआधी तामिळनाडू मधून एक बातमी समोर आली होती, ज्यात एका महिलेने विष पिऊन आपला जीव दिला होता. मीडिया रिपोर्ट्स मध्ये समोर आले आहे कि तामिळनाडू मध्ये राहणारी 24 वर्षीय विवाहितेने विष घेऊन आत्महत्या केली आहे. रिपोर्ट्स नुसार अनिता नावाची हि महिला दोन मुलांची आई आहे जी TikTok वर वीडियो बनवायची. अनिताची TikTok वीडियो बनवण्याची सवय तिच्या नवऱ्याला आवडत नव्हती आणि याबाबत त्यांच्यात भांडण होत होते.

विशेष म्हणजे ऍप इंटेलिजेंस फर्म सेंसर टॉवर नुसार टिकटॉक ने वर्षाच्या तिमाहीत 18 कोटी 80 लाख यूजर्स जोडले आहेत. इतकेच नव्हे तर मार्च 2018 पासून आतापर्यंत हा ऍप इंस्टॉल करण्याच्या बाबतीत 70 टक्के वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपासून TikTok साठी भारत मोठी बाजारपेठ ठरली आहे. हैराणीची बाब म्हणजे देशात TikTok बॅन झाल्यामुळे या चीनी कंपनीला रोज $500,000 यूएस डॉलर म्हणजे जवळपास 3.5 कोटी रुपयांचे नुकसान होत होते.

The post TikTok वर वीडियो बनवत असताना यमुनेत बुडून झाला युवकाचा मृत्यू first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/young-man-drowned-in-yamuna-river-during-tiktok-video/feed/ 0
TikTok वरचा बॅन हटला ! पुन्हा करता येईल फोन मध्ये डाउनलोड साठी उपलब्ध https://www.91mobiles.com/marathi/tik-tok-ban-download-lifted-india-madras-high-court/ https://www.91mobiles.com/marathi/tik-tok-ban-download-lifted-india-madras-high-court/#respond Wed, 24 Apr 2019 16:23:33 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4151 TikTok ने मार्च तिमाहीत जगभरात 18.8 कोटी नवीन यूजर जोडले होते, ज्यात भारताचा वाटा 8.86 कोटी इतका होता.

The post TikTok वरचा बॅन हटला ! पुन्हा करता येईल फोन मध्ये डाउनलोड साठी उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
TikTok एक असं नाव आहे जे जवळपास सर्व युवकांना माहित आहे, मग ते हे ऍप वापरत नसतीलही. हा प्रसिद्ध वीडियो ऍप आहे चीनी पण चीन पेक्षा जास्त आपल्या भारतात प्रसिद्ध आहे. मागे मद्रास हायकोर्टाने या ऍप वर बंदी होती आणि TikTok वर ​अश्लीलता पसरवण्याचा आरोप करत सुप्रीम कोर्टाकडे हा बॅन करण्याची मागणी केली होती. या वादानंतर ऍप्पल आणि गूगल ने हे ऍप्लिकेशन आपल्या प्लॅटफॉर्म वरून काढून टाकले होते. पण आज TikTok यूजर्स साठी आनंदाची बातमी आहे कि कोर्टाने या ऍप वरील बॅन काढला आहे.

TikTok बनवणारी कंपनीच नव्हे तर भारतातातील टिकटॉकच्या लाखों फॅन्ससाठी पण हि बातमी आनंदाची लहर घेऊन आली आहे. मागील काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात असलेल्या या वीडियो मेकिंग ऍपला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे आणि मद्रास हायकोर्ट ने ऍप वरील बॅन काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. बॅन नंतर आईफोनच्या ऍप्पल ऍप स्टोर तसेच एंडरॉयड फोनच्या गूगल प्ले स्टोर वरून हा ऍप काढून टाकण्यात आला होता पण आता कोर्टाने बॅन काढल्यामुळे TikTok आता फोन मध्ये डाउनलोड साठी उपलब्ध होईल.

विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून TikTok साठी भारत मोठी बाजारपेठ बनली आहे. हैराणीची बाब म्हणजे देशात TikTok बॅन झाल्यामुळे चीनी कंपनीला रोज एका दिवसात $500,000 यूएस डॉलर म्हणजे जवळपास 3.5 कोटी रुपयांचे नुकसान होत होते. तसेच हा ऍप बनवणाऱ्या कंपनी शंघाई बाइटडांस टेक्नोलॉजी ने असे सांगितले होते कि भारतात TikTok बॅन झाल्यामुळे 250 पेक्षा जास्त नोकऱ्या संपणार आहेत. कंपनी नुसार भारतात TikTok चे 300 मिलियन पेक्षा जास्त यूजर आहेत.

TikTok वर बॅनची मागणी केल्यांनंतर सुप्रीम कोर्टाने मद्रास हायकोर्टला आदेश देऊन या ऍप वर फाइनल वर्डिक्ट देण्यास सांगितले होते. या ऑर्डर मध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितले होते कि जर मद्रास हायकोर्ट TikTok वर बॅन संविधानिकरित्या का वैध आहे हे सांगण्यात अयशस्वी ठरल्यास या ऍप वरून बॅन काढून टाकण्यात यावा.

दुसरीकडे TikTok बॅन नंतर याची पॅरेंट कंपनी बाइटडांस टेक्नोलॉजी ने असे विधान केले होते कि टिकटॉक बंद केल्यास भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला येईल. असे बोलताना कंपनी ने TikTok वरून असे 60 लाख वीडियोज काढून टाकण्याचा दावा पण केला होता जे त्यांना कम्यूनिटी गाइडलाइनच्या विरोधात वाटले होते.

विशेष म्हणजे यावर्षी पहिल्या तिमाहीत TikTok जगभरात तिसरा सर्वात जास्त इंस्टॉल केला जाणारा ऍप बनला होता. TikTok ने मार्च तिमाहीत जगभरात 18.8 कोटी नवीन यूजर जोडले होते, ज्यात भारताचा वाटा 8.86 कोटी इतका होता.

The post TikTok वरचा बॅन हटला ! पुन्हा करता येईल फोन मध्ये डाउनलोड साठी उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tik-tok-ban-download-lifted-india-madras-high-court/feed/ 0