TikTok बेकायदेशीररीत्या भारतीयांचा डेटा पाठवत आहे चीनला : शशी थरूर

TikTok ऍप भारतात सुरवातीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. देशात ज्या वेगाने हा ऍप प्रसिद्ध झाला आहे तेवढ्याच वेगाने याच्या वापरावर प्रश्न निर्माण झाले आहेत. TikTok वर अश्लीलता पसरवण्याचा आरोप पण केला गेला आहे. हा ऍप आता पुन्हा एकदा वादात अडकला आहे. TikTok वर पुन्हा एकदा आरोप केला गेला आहे पण हा अश्लीलता पसरवण्याचा नाही तर त्यापेक्षा पण जास्त गंभीर आहे. TikTok भारतासाठी “national security issue” असल्याचे सांगण्यात आले आहे ज्यामुळे प्रत्येक भारतीयाची खाजगी माहिती धोक्यात आली आहे. TikTok वर हा गंभीर आरोप कॉग्रेस नेता शशी थरूर यांनी केला आहे.

TikTok पासून भारत आणि भारतीयांना धोका आहे असे शशी थरूर यांनी म्हटले. लोकसभेत कॉग्रेस नेत्यांनी हा मुद्दा मांडत सदनाचे लक्ष वेधले. TikTok वरील या आरोपाचे गाम्भीर्य यावरूनच समजत आहे कि शशी थरूर यांनी या ऍपला राष्ट्रीय सुरक्षेचे प्रकरण म्हटले आहे. शशी थरूर यांनी आपल्या विधानात म्हटले आहे कि TikTok भारतीय यूजर्सचा डेटा अवैधरित्या जमा करत आहे आणि चीन मध्ये पाठवत आहे.

TikTok वर आरोप करत थरूर म्हटले कि हा ऍप वापरणाऱ्या भारतीयांची खाजगी माहिती धोक्यात आहे. ऍप द्वारा भारतीयांचा डेटा चीन मध्ये ट्रांसमिट केला जात आहे जे देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकते. कॉग्रेस थरूर म्हणतात कि भारतात इंटरनेट डेटा प्रोटेक्शन धोरणे मजबूत नसल्यमुळे देशात डेटा लीक होणे आणि मोबाईल यूजर्सची गोपनीयतेच्या सुरक्षेचा विषय खूप संवेदनशील झाला आहे. TikTok ऍप पण याच कारणामुळे भारतीयांचा डेटा बेकायदेशीरपणे आपल्या देशात म्हणजे चीन मध्ये पाठवत आहे.

हे देखील वाचा: PUBG खेळू न दिल्याने मोठ्या भावाला कैची घुसवून मारले!

चीनी टेलीकॉम कंपन्यांकडे भारतीयांचा डेटा

शशी थरूर यांनी संपूर्ण लोकसभेला सांगितले कि TikTok बनवणारी कंपनी ByteDance चीनी सरकार सोबत मिळून काम करत आहे आणि चीनी टेलीकॉम कंपन्यांशी पण या कंपनीचे संबंध चांगले आहेत. TikTok वापरणाऱ्या भारतीय यूजर्सचा डेटा या ऍप द्वारे सेव केला जातो जो चीनी टेलीकॉम कंपन्यांच्या सर्वर पर्यंत पोचतो आणि या कंपन्यांच्या सर्वर वरून भारतीयांचा डेटा चीनी सरकारला मिळतो.

TikTok वर हा आरोप करण्यासोबतच शशी थरूर यांनी अलीकडेच अमेरिकेद्वारा TikTok ला ठोठावण्यात आलेल्या दंडावर पण प्रकाश टाकला. शशी थरूर यांनी सांगितले कि अमेरिकेतील फेडरल रेग्यूलेशन अथारिटीने पण TikTok वर बेकादेशीररित्या यूजर्सचा डेटा चोरी करण्याचा आरोप करत या ऍपला 5.7 मिलीयनचा दंड ठोठावला आहे. हि रक्कम भारतीय करंसी नुसार 39,30,57,750 रुपये यानि 39 कोटी रुपयांच्या आसपास आहे.

हे देखील वाचा: जुलै मध्ये हे 5 दमदार फोन भारतात होतील लॉन्च

TikTok चे स्पष्टीकरण

शशी थरूर यांच्या या विधानानंतर TikTok ने पण आज एक विधान जाहीर केले आहे ज्यात ऍपने स्वतःवरील आरोपांचे खंडन केले आहे. TikTok ने म्हटले आहे कि हा ऍप पूर्णपणे देशातील कायद्यांचे पालन करत आहे आणि सर्व काम नियम व कायद्यानुसार करत आहे. TikTok ने स्पष्टपणे सांगितले आहे कि ते कोणत्याही भारतीयाचा डेटा चीनी सर्वर वर पाठवत नाहीत. तसेच चीनी सरकार किंवा इतर कोणतीही चीनी कंपनी TikTok चा डेटा एक्सेस करू शकत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here