भारतात पुन्हा होणार TikTok ची एंट्री! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

यावर्षी जुलै मध्ये भारत सरकारने टिकटॉक समवेत 59 चायनीज ऍप बॅन केले होते. सरकारने प्राइवेसीचे कारण देत टिकटॉक समवेत इतर चायनीज ऍप बॅन केले होते. या 59 चायनीज ऍप्स मधील सर्वात प्रसिद्ध TikTok बाबत बातमी समोर येत आहे कि हा वीडियो मेकिंग ऍप भारतात पुन्हा एंट्री करू शकतो.

रॉयटर्सच्या एका रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि रिलायंस इंडस्ट्रीज टिकटॉकचा भारतातील व्यवसाय खरेदी करू शकते. सूत्रांच्यानुसार आता डील बाबत बोलणी सुरु झाली आहे. तसेच आता पर्यंत रिलायंस आणि टिकटॉक कडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

मार्केट इंटेलिजेंस फर्म सेंसर टॉवरच्या डेटानुसार भारत 61 मिलियन पेक्षा जास्त डाउनलोड सह शॉर्ट वीडियो ऍपचा सर्वात मोठा बाजार आहे. पण जेव्हा मॉनिटाइजेशनचा प्रश्न येतो तेव्हा चीन, यूएस आणि यूकेला टिकटॉकचा एकूण 90% हिस्सा मिळतो.

जून मध्ये भारत सरकारने आईटी ऍक्ट 2000 च्या सेक्शन 69 अंतर्गत हा ऍप देशात बॅन केला आहे. टिकटॉक सोबतच सरकारने एकूण 59 ऍप्सच्या वापरावर भारतात बंदी घातली होती. या आदेशानंतर गूगल प्ले स्टोर आणि ऍप्पल ऍप स्टोरने टिकटॉक व्यतिरिक्त Helo, Mi Video Call – Xiaomi, DU Browser, DU Privacy, Cache Cleaner – DU App Studio, Clean Master – Cheetah Mobile आणि Wonder Camera पण आपल्या प्लॅटफॉर्म वरून काढून टाकले होते.

अमेरिकेत पण टिकटॉक बॅन

गेल्या आठवड्यात अमेरिकेने पण चीनी ऍप टिकटॉक वरील बॅनला मंजुरी दिली होती. पण अमेरिकेने बाइटडांसला टिकटॉकचा अमेरिकेतील व्यवसाय एखाद्या अमेरिकन कंपनीला विकण्यासाठी 15 सप्टेंबर पर्यंतची वेळ दिली आहे. टिकटॉकचा अमेरिकेतील व्यवसाय माइक्रोसॉफ्ट आणि ट्वीटर विकत घेऊ शकतात. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Google आणि Apple ने आपल्या ऍप स्टोर वरून काढून टाकला फोर्टनाइट

खूप लोकप्रिय बॅटल रॉयल गेम Fortnite ऍप्पलने गुरुवारी आपल्या ऍप स्टोर वरून काढून टाकला आहे. डेवलपरने फोर्टनाइटसाठी एक अपडेट जाहीर केल्यानंतर लगेचच हे पाऊल उचलण्यात आले आहे. ऍप्पल व्यतिरिक्त Google ने पण प्ले स्टोर वरून हा ऍप काढून टाकला आहे. गूगल प्ले स्टोर आणि ऍपल ऍप स्टोर दोन्ही ठिकाणी हा ऍप उपलब्ध नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here