PUBG जितका जास्त प्रसिद्ध आहे तितकाच जास्त विवादास्पद पण आहे. या गेम संबंधित भारतातील प्रत्येक कानाकोपऱ्यातून अश्या बातम्या येत असतात ज्या फक्त धक्कादायक नसतात तर PUBG प्लेयर्स सोबतच त्यांच्या घरच्यांची चिंता वाढवणाऱ्या पण असतात. हा गेम खेळल्यामुळे अनेक प्रकारच्या दुर्घटना झाल्या आहेत. बायकोने नवऱ्याकडे घटस्फोट मागणे आणि विद्यार्थ्याने फासी लावून घेणे, आशा घटनांमुळे PUBG वर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. आता पण अजून एक अशीच मनाला सुन्न करणारी बातमी समोर आली आहे ज्यामुळे पुन्हा एकदा PUBG गेम प्रश्नांच्या भोवऱ्यात अडकला आहे.
PUBG म्हणजे PLAYER UNKNOWN’S BATTLEGROUNDS, बोलले जाते कि अशाप्रकारचे गेम्स खेळल्याने मेंदू तल्लख होतो आणि विचार करण्याच्या शक्तीचा वेग वाढतो. पण जेव्हा गेम खेळण्याचा हा शौक व्यसन बनतो तेव्हा तितकाच घातक ठरतो. काही गेम प्लेयर्स साठी PUBG पण एक असेच व्यसन बनले आहे जो आता जीवघेणा ठरत आहे. ताजे प्रकरण ठाण्यातून समोर आले आहे, जिथे गेम खेळू न दिल्याने छोट्या भावाने मोठ्या भावाला कैची खुपसून मारले.
मीडिया रिपोर्ट नुसार 19 वर्षीय मोहम्मद शेख नावाचा एक युवक आपल्या कुटुंबासह ठाण्यातील भिवंडी इथे राहत होता. मोहम्मदच्या छोट्या भावाला पण PUBG खेळण्याचा नाद आहे ज्याचे वय 15 वर्ष आहे. मोहम्मदचा भाऊ त्याच्या मोबाईल मध्ये PUBG खेळत होता. एके दिवशी मोहम्मद आपल्या भावाला PUBG जास्त खेळण्यावरून ओरडला आणि त्याला आपल्या मोबाईल मध्ये गेम खेळण्यास नकार दिला.
PUBG खेळू न दिल्याने मोहम्मदच्या छोट्या भावाला राग आला आणि तो मारामारी करू लागला. स्थानिक पोलिसांनी मीडियाला सांगितले आहे कि 15 वर्षीय मुलाने मोहम्मदला जोरात धक्का दिला ज्यामुळे त्याचे डोके भिंतीवर आपटले. धक्का दिल्यानंतर छोट्या भावाने कैची उचलली आणि मोहम्मद वर कैचीने एकसाथ अनेक वार केले. मोहम्मद रक्तबंबाळ झाला नंतर त्याला दवाखान्यात नेण्यात आले. पण दवाखान्यात जाऊन मोहम्मद शेखने जीव सोडला.
मोठ्या भावाची हत्या केल्यामुळे 15 वर्षीय मुलावर आईपीसी ची धारा 302 अंतर्गत खुनाचा खटला दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी PUBG न खेळू दिल्यामुळे हैद्राबाद मध्ये एका 16 वर्षीय युवकाने आत्महत्या केली होती. या मुलाचे नाव कालाकुरी संभाशिव असे आहे. रिपोर्ट कनुसार शिव दहावीचा विद्यार्थी होता ज्याने गेल्या सोमवारी आपल्या घरात फासी घेऊन आत्महत्या केली आहे. पोलीस रिपोर्ट नुसार संभाशिवचे वडील भारत राज यांनी सांगितले शिवची दहावीची परीक्षा चालू होती पण तो अभ्यासापेक्षा जास्त वेळ मोबाईल वर गेम खेळण्यात घालवत होता.
भारत राज यांनी सांगितले कि, मंगळवारी शिवची परीक्षा होती पण सोमवारी रात्री तो अभ्यास करण्याऐवजी फोन मध्ये PUBG खेळात होता. आणि याच कारणामुळे शिवची आई उमादेवी त्याला ओरडल्या होत्या आणि पबजी खेळण्यापासून थांबवले होते. गेम न खेळू दिल्यामुळे शिव नाराज झाला आणि आपल्या खोलीत जाऊन गळफास लावून जीव दिला. पोलीस रिपोर्ट मध्ये या आत्महत्याचे कारण PUBG चे व्यसन असे नोंदवण्यात आले आहे. हि काही पहिलीच घटना नाही PUBG मुळे अश्या भयंकर घटना ठिकठिकाणी होत आहेत.