Xiaomi 13 Ultra - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 18 Apr 2023 13:07:13 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 50-50MP च्या चार कॅमेऱ्यांसह Xiaomi 13 Ultra लाँच; जागतिक बाजारात झाली एंट्री https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-13-ultra-launched-know-price-features-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-13-ultra-launched-know-price-features-and-specifications/#respond Tue, 18 Apr 2023 13:07:13 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20333 शाओमीनं आज आपला सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन Xiaomi 13 Ultra सादर केला आहे. हा एक कॅमेरा सेंट्रिक स्मार्टफोन आहे, ज्यात 50MP चा 1 इंच आकार असलेला मुख्य सेन्सर आहे. जोडीला 50MP चे तीन कॅमेरा सेन्सर मिळतात. तसेच यात Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर, 16GB RAM, 1TB स्टोरेज आणि Android 13 देण्यात आलं आहे. हा फोन सध्या […]

The post 50-50MP च्या चार कॅमेऱ्यांसह Xiaomi 13 Ultra लाँच; जागतिक बाजारात झाली एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Xiaomi 13 Ultra मध्ये 50MP चे चार रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आले आहेत.
  • हा फोन सर्वप्रथम चीनमध्ये उपलब्ध होईल.
  • हा शाओमी फोन ग्लोबल मार्केटमध्ये लाँच करण्यात आला आहे.

शाओमीनं आज आपला सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन Xiaomi 13 Ultra सादर केला आहे. हा एक कॅमेरा सेंट्रिक स्मार्टफोन आहे, ज्यात 50MP चा 1 इंच आकार असलेला मुख्य सेन्सर आहे. जोडीला 50MP चे तीन कॅमेरा सेन्सर मिळतात. तसेच यात Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर, 16GB RAM, 1TB स्टोरेज आणि Android 13 देण्यात आलं आहे. हा फोन सध्या ब्रँडच्या होम मार्केट चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे जो येत्या दिवसांत भारतासह अन्य बाजारांमध्ये एंट्री करेल. चला जाणून घेऊया शाओमी 13 अल्ट्राच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स व प्राइसची माहिती.

शाओमी 13 अल्ट्रा चे स्पेसिफिकेशन्स

कॅमेरा

  • 1-inch 50MP Sony IMX989 main camera
  • Quad Rear Camera Setup
  • 32MP Selfie camera

Xiaomi 13 Ultra क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ता फोनच्या बॅक पॅनलवर 4 कॅमेरा सेन्सर देण्यात आले आहेत तसेच चारही 50 मेगापिक्सलच्या लेन्स आहेत. प्रायमरी सेन्सर 50MP 1″ Sony IMX989 आहे जोडीला तीन अन्य 50MP IMX858 लेन्स देण्यात आल्या आहेत. शाओमी 13 अल्ट्राचा कॅमेरा 12एमएम पासून 120एमएम पर्यंत शूट करू शकतो. तसेच कॅमेरा सेटअपमध्ये एफ/1.8 अपर्चर पासून एफ/3.0 अपर्चर पर्यंतची क्षमता मिळते. फोनमध्ये 32 MP चा सेल्फी शुटर देण्यात आला आहे.

डिस्प्ले

  • 6.73 inch OLED Display
  • 2K Resolution
  • 2600 nits brightness

Xiaomi 13 Ultra स्मार्टफोन पंच-होल स्टाईल 6.73 इंचाच्या लार्ज 2के डिस्प्लेसह लाँच झाला आहे. ही स्क्रीन ओएलईडी पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. हा फोन डिस्प्ले 2600निट्स ब्राइटनेस, 1920हर्ट्ज पीडब्ल्यूएम डिमिंग, 522पीपीआय आणि एचडीआर 10+ ला सपोर्ट करतो. डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी याला कोर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टसची सुरक्षा देण्यात आली आहे.

प्रोसेसर

  • Android 13
  • Snapdragon 8 Gen 2
  • LPDDR5X RAM, UFS 4.0

Xiaomi 13 Ultra अँड्रॉइड 13 ओएसवर लाँच झाला आहे जो मीयुआयसह मिलकर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा मोबाइल फोन LPDDR5X RAM आणि UFS 4.0 टेक्नॉलॉजीवर चालतो. तसेच हेवी गेमिंगसाठी शाओमी 13 अल्ट्रा मध्ये कूलिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.

बॅटरी

  • 5,000mAh battery
  • 90W wired, 50W wireless charging

या फोन मध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 90W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीच्या मदतीनं चार्ज करता येते. तसेच हा फोन 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो. कंपनीनं दावा केला आहे की हा फोन 1 टक्के बॅटरीवर एक तास वापरता येतो. यावेळी कंपनीनं चार्जिंगसाठी USB 3.2 पोर्टचा वापर केला आहे.

शाओमी 13 अल्ट्राची किंमत

Xiaomi 13 Ultra स्मार्टफोन तीन व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे. फोनचा बेस व्हेरिएंट 12GB रॅमसह 256GB स्टोरेज देतो, ज्याची किंमत 5,999 युआन म्हणजे सुमारे 71,570 आहे. तर 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज मॉडेलची किंमत 6,499 युआन (सुमारे 77,535 रुपये) आणि 16GB रॅम व 1TB स्टोरेज मॉडेल 7,299 युआन )सुमारे 87079 रुपये) मध्ये उपलब्ध होईल.

The post 50-50MP च्या चार कॅमेऱ्यांसह Xiaomi 13 Ultra लाँच; जागतिक बाजारात झाली एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-13-ultra-launched-know-price-features-and-specifications/feed/ 0
18 एप्रिलला लाँच होईल Xiaomi 13 Ultra; ग्लोबल लाँचची खुद्द कंपनीनं दिली माहिती https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-13-ultra-globally-launch-on-april-18th/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-13-ultra-globally-launch-on-april-18th/#respond Wed, 12 Apr 2023 11:37:10 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20231 Xiaomi 18 एप्रिलला एक ग्लोबल लाँच इव्हेंटचे आयोजन करणार आहे. या इव्हेंट दरम्यान कंपनी आपला नवीन स्मार्टफोन Xiaomi 13 Ultra सादर करेल, अशी घोषणा कंपनीनं अधिकृतपणे केली आहे. याच दिवशी ग्लोबल मार्केटसह हँडसेट चीनमध्ये देखील पदार्पण करेल. आपल्या फ्लॅगशिप हँडसेटसह कंपनी Xiaomi Pad 6 देखील सादर करू शकते. परंतु इंडिया लाँचबद्दल अजूनतरी कोणतीही बातमी समोर […]

The post 18 एप्रिलला लाँच होईल Xiaomi 13 Ultra; ग्लोबल लाँचची खुद्द कंपनीनं दिली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Xiaomi 13 Ultra ग्लोबली आणि चीनमध्ये 18 एप्रिलला सादर केला जाईल.
  • स्मार्टफोनमध्ये मागे Leica ब्रँडेड लेन्ससह वर्तुळाकार कॅमेरा मॉड्यूल असेल.
  • आशा आहे की यात 12जीबी रॅम दिली जाऊ शकते.

Xiaomi 18 एप्रिलला एक ग्लोबल लाँच इव्हेंटचे आयोजन करणार आहे. या इव्हेंट दरम्यान कंपनी आपला नवीन स्मार्टफोन Xiaomi 13 Ultra सादर करेल, अशी घोषणा कंपनीनं अधिकृतपणे केली आहे. याच दिवशी ग्लोबल मार्केटसह हँडसेट चीनमध्ये देखील पदार्पण करेल. आपल्या फ्लॅगशिप हँडसेटसह कंपनी Xiaomi Pad 6 देखील सादर करू शकते. परंतु इंडिया लाँचबद्दल अजूनतरी कोणतीही बातमी समोर आली नाही.

Xiaomi 13 Ultra चे स्पेसिफिकेशन, डिजाइन आणि किंमत देखील अनेक प्लॅटफॉर्मवर लीक झाली आहे. तसेच काही लीक्सनुसार हा स्मार्टफोन Xiaomi चा आता पर्यंतचा सर्वात प्रीमियम डिवाइस असू शकतो. चला जाणून घेऊया या फोनबद्दल कोणती माहिती समोर आली आहे.

Xiaomi 13 अल्ट्राची डिजाइन

फोनची डिजाइन पाहता इव्हेंटच्या टीजर पोस्टरमधून कॅमेरा मॉड्यूलची झलक दिसली आहे. यावरून स्पष्ट झालं आहे फोनच्या मागे मोठा वर्तुळाकार कॅमेरा मॉड्यूल असेल ज्यात चार कॅमेरा सेन्सर असू शकतात. तसेच डिवाइसच्या लीक रेंडरनुसार हा पंच-होल सेल्फी कॅमेरा आणि कर्व्ड एजसह येऊ शकतो. स्मार्टफोन व्हाइट सिरॅमिक आणि ब्लॅक लेदर फिनिशसह लाँच होऊ शकतो.

Xiaomi 13 Ultra चे स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • 6.7-इंच 2K AMOLED डिस्प्ले
  • स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट
  • 512GB ऑनबोर्ड स्टोरेज
  • 50MP Sony IMX989 सेन्सर
  • 4,900mAh ची बॅटरी

लिक्सनुसार Xiaomi 13 Ultra मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा 2K AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटसह बाजरात येऊ शकतो. इतकेच नव्हे तर फोनमध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 512GB ऑनबोर्ड स्टोरेज मिळू शकते. लीक्सनुसार Xiaomi 13 Ultra मध्ये MIUI 14 सह Android 13 OS मिळू शकतो.

लाँचच्या टीजरमधून समजलं आहे की Xiaomi 13 Ultra मध्ये Leica ब्रँडेड कॅमेरा लेन्स मिळतील. तसेच फोनमध्ये 50MP Sony IMX989 सेन्सर आणि तीन आणि 50MP सेन्सरसह एक क्वॉड-कॅमेरा सेटअप मिळू शकतो. सेल्फीसाठी स्मार्टफोनमध्ये 32MP चा कॅमेरा असू शकतो. Xiaomi 13 Ultra मध्ये 90W वायर्ड आणि 50W वायरलेस फास्ट चार्जिंगसह 4,900mAh ची बॅटरी मिळू शकते, ही माहिती बऱ्याचदा लीक झाली आहे.

Xiaomi 13 Ultra ची किंमत (संभाव्य)

अनेकदा लीक आणि अफवांच्या मते Xiaomi 13 Ultra तीन व्हेरिएंटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. हा डिवाइस CNY 2,699 (सुमारे 75,100 रुपये) पासून CNY 7,499 (सुमारे 89,500 रुपये) पर्यंत जाऊ शकतो. ही किंमत वेगवेगळ्या बाजारात वेगवेगळी असू शकते.

The post 18 एप्रिलला लाँच होईल Xiaomi 13 Ultra; ग्लोबल लाँचची खुद्द कंपनीनं दिली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-13-ultra-globally-launch-on-april-18th/feed/ 0
Xiaomi 13 Ultra 18 एप्रिलला होऊ शकतो लाँच; स्पेसिफिकेशन्स मिळू शकतात दमदार https://www.91mobiles.com/marathi/18-april-could-be-xiaomi-13-ultra-launch-date-in-china/ https://www.91mobiles.com/marathi/18-april-could-be-xiaomi-13-ultra-launch-date-in-china/#respond Mon, 10 Apr 2023 06:36:01 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20143 Xiaomi नं काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की कंपनी लवकरच आपल्या नंबर सीरीजचा फ्लॅगशिप स्मार्टफोन Xiaomi 13 Ultra मार्केटमध्ये घेऊन येणार आहे. आता एक लीकच्या माध्यमातून या मोबाइल फोनची लाँच डेट देखील समोर आली आहे. समोर आलेल्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की हा शाओमी फोन 18 एप्रिलला चीनमध्ये लाँच होऊ शकतो. ही माहिती एका चिनी रिटेलर […]

The post Xiaomi 13 Ultra 18 एप्रिलला होऊ शकतो लाँच; स्पेसिफिकेशन्स मिळू शकतात दमदार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Xiaomi 13 Ultra 18 एप्रिलला लाँच होऊ शकतो.
  • या फोनची एंट्री सर्वप्रथम चीनमध्ये होईल.
  • शाओमी 13 अल्ट्रासह Xiaomi Pad 6 देखील येऊ शकतो.

Xiaomi नं काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की कंपनी लवकरच आपल्या नंबर सीरीजचा फ्लॅगशिप स्मार्टफोन Xiaomi 13 Ultra मार्केटमध्ये घेऊन येणार आहे. आता एक लीकच्या माध्यमातून या मोबाइल फोनची लाँच डेट देखील समोर आली आहे. समोर आलेल्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की हा शाओमी फोन 18 एप्रिलला चीनमध्ये लाँच होऊ शकतो. ही माहिती एका चिनी रिटेलर वेबसाइटच्या माध्यमातून समोर आली आहे जिथे फोनचे नाव व लाँच डिटेल्स शेयर करण्यात आले आहेत.

शाओमी 13 अल्ट्रा लाँच डेट

Xiaomi 13 Ultra भारतात येण्यासाठी अजून खूप वेळ आहे. हा मोबाइल सर्वप्रथम कंपनीच्या होम मार्केट चीनमध्ये एंट्री करेल. शाओमी 13 अल्ट्रा येत्या 18 एप्रिलला सादर केला जाऊ शकतो. चिनी रिटेलर वेबसाइटवर या फोनचा लाँच टीज करण्यात आला आहे जिथे लाँच टाइम स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता असेल, असं सांगण्यात आलं आहे. याबाबत कंपनीच्या ऑफिशियल घोषणेची आता वाट पहिली जात आहे. या दिवशी फोनसह Xiaomi Pad 6 देखील मार्केटमध्ये सादर केला जाऊ शकतो.

शाओमी 13 अल्ट्राचे लीक स्पेसिफिकेशन्स

  • 6.7″ 2K AMOLED display, 120Hz refresh rate
  • 16GB RAM, 512GB memory
  • Snapdragon 8 Gen 2
  • 50MP Sony IMX989, 32MP selfie snapper
  • 4,900mAh battery, 90W fast charging

Xiaomi 13 Ultra च्या फीचर्स किंवा स्पेसिफिकेशन्सची माहिती अद्याप कंपनीनं दिली नाही. परंतु लीक्स पाहता हा मोबाइल फोन 6.7 इंचाच्या लार्ज 2के अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो ज्यात 120हर्ट्ज रिफ्रेश रेट मिळू शकते.

लीकनुसार शाओमी 13 अल्ट्रा स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या पावरफुल स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच केला जाऊ शकतो. या फोनमध्ये 16जीबी पर्यंत रॅम आणि 512जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळू शकते.

फोटोग्राफीसाठी Xiaomi 13 Ultra मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. लीकमध्ये हे सर्व कॅमेरा सेन्सर 50 मेगापिक्सलचे असतील असं सांगण्यात आलं आहे ज्यात प्रायमरी लेन्स 50MP Sony IMX989 असू शकते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 4,900एमएएचची बॅटरी मिळू शकते. तर लीकनुसार हा शाओमी फोन 90वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल जोडीला 50वॉट वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजी देखील मिळू शकते.

The post Xiaomi 13 Ultra 18 एप्रिलला होऊ शकतो लाँच; स्पेसिफिकेशन्स मिळू शकतात दमदार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/18-april-could-be-xiaomi-13-ultra-launch-date-in-china/feed/ 0
शाओमीचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन लाँचच्या उंबरठ्यावर; Xiaomi 13 Ultra ला मिळालं IMDA सर्टिफिकेट https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-13-ultra-clears-imda-global-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-13-ultra-clears-imda-global-launch-soon/#respond Wed, 05 Apr 2023 08:06:58 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20050 शाओमी 13 सीरिज अधिकृतपणे लाँच केल्यानंतर आता कंपनीनं आगामी महिन्यांमध्ये Xiaomi 13 Ultra सादर करण्याची योजना बनवत आहे. कंपनीनं अद्याप अचूक अशी लाँच डेट सांगितली नाही. परंतु आता शाओमी 13 अल्ट्रा स्मार्टफोन सिंगापूरच्या IMDA सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसल्यामुळे लवकरच हा फोन बाजारात येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. याआधी आलेल्या रिपोर्ट्सनुसार हा फोन यंदा मे किंवा जूनमध्ये […]

The post शाओमीचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन लाँचच्या उंबरठ्यावर; Xiaomi 13 Ultra ला मिळालं IMDA सर्टिफिकेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Xiaomi 13 Ultra स्मार्टफोन सिंगापूरच्या IMDA सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसला आहे.
  • Xiaomi 13 Ultra फोन पुढील काही महिन्यांमध्ये लाँच होणे अपेक्षित आहे.
  • फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट दिला जाऊ शकतो.

शाओमी 13 सीरिज अधिकृतपणे लाँच केल्यानंतर आता कंपनीनं आगामी महिन्यांमध्ये Xiaomi 13 Ultra सादर करण्याची योजना बनवत आहे. कंपनीनं अद्याप अचूक अशी लाँच डेट सांगितली नाही. परंतु आता शाओमी 13 अल्ट्रा स्मार्टफोन सिंगापूरच्या IMDA सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसल्यामुळे लवकरच हा फोन बाजारात येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. याआधी आलेल्या रिपोर्ट्सनुसार हा फोन यंदा मे किंवा जूनमध्ये ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतो. हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 प्रोसेसरसह येणारा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन असू शकतो.

शाओमी 13 अल्ट्रा दिसला सिंगापूरच्या वेबसाइटवर

आगामी Xiaomi 13 Ultra स्मार्टफोन सिंगापूरच्या सर्टिफिकेशन साइट IMDA वर दिसला आहे. इथे हा फोन 2304FPN6DG या मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. त्यामुळे या फोनमध्ये 5जी, ब्लूटूथ, वाय-फाय आणि एनएफसी सपोर्ट असेल हे स्पष्ट झालं आहे. हे देखील वाचा: 60MP Selfie कॅमेऱ्यासह Motorola Edge 40 Pro ग्लोबली लाँच; क्वॉलकॉमच्या सर्वात शक्तिशाली प्रोसेसरची ताकदही यात

शाओमी 13 अल्ट्राचे स्पेसिफिकेशन्स (अपेक्षित)

अपकमिंग Xiaomi 13 Ultra स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा क्यूएचडी+ अ‍ॅमोलेड एलटीपीओ डिस्प्ले असण्याची शक्यता आहे, जो 120हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकतो. या फोनमध्ये लाइका ब्रँडिंगसह क्वॉड कॅमेरा सेटअप मिळण्याची शक्यता आहे. या कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 50 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि दोन 50 मेगापिक्सलचे टेलीफोटो कॅमेरा मिळू शकतात. तर फ्रंटला कंपनी 32 मेगापिक्सलच्या सेल्फी शुटरचा वापर करू शकते.

Xiaomi 13 Ultra मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटची पावर मिळू शकते. जोडीला कंपनी 16जीबी रॅम आणि 512जीबी स्टोरेज देऊ शकते. हा फोन 1टीबी स्टोरेज ऑप्शनसह देखील सादर केला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे परंतु ठोस माहिती मिळाली नाही. फोनमध्ये 4,900एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते, जी 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकते. हा फोन अँड्रॉइड 13 आधारित मीयुआय 14 वर चालू शकतो. हे देखील वाचा: iQOO Neo 6 च्या किंमतीत 5,000 रुपयांची मोठी कपात; जाणून घ्या नवी प्राइस

याआधी फेब्रुवारीमध्ये कंपनीनं आपला Xiaomi 13 Pro स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटसह सादर केला होता. यात देखील लाइकाचे कॅमेरे होते आणि याची किंमत भारतात 79,999 रुपयांपासून सुरु होते. हा फोन सिरॅमिक ब्लॅक आणि सिरॅमिक व्हाइट कलरमध्ये सादर करण्यात आला आहे.

The post शाओमीचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन लाँचच्या उंबरठ्यावर; Xiaomi 13 Ultra ला मिळालं IMDA सर्टिफिकेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-13-ultra-clears-imda-global-launch-soon/feed/ 0