Xiaomi 13 Ultra 18 एप्रिलला होऊ शकतो लाँच; स्पेसिफिकेशन्स मिळू शकतात दमदार

Highlights

  • Xiaomi 13 Ultra 18 एप्रिलला लाँच होऊ शकतो.
  • या फोनची एंट्री सर्वप्रथम चीनमध्ये होईल.
  • शाओमी 13 अल्ट्रासह Xiaomi Pad 6 देखील येऊ शकतो.

Xiaomi नं काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की कंपनी लवकरच आपल्या नंबर सीरीजचा फ्लॅगशिप स्मार्टफोन Xiaomi 13 Ultra मार्केटमध्ये घेऊन येणार आहे. आता एक लीकच्या माध्यमातून या मोबाइल फोनची लाँच डेट देखील समोर आली आहे. समोर आलेल्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की हा शाओमी फोन 18 एप्रिलला चीनमध्ये लाँच होऊ शकतो. ही माहिती एका चिनी रिटेलर वेबसाइटच्या माध्यमातून समोर आली आहे जिथे फोनचे नाव व लाँच डिटेल्स शेयर करण्यात आले आहेत.

शाओमी 13 अल्ट्रा लाँच डेट

Xiaomi 13 Ultra भारतात येण्यासाठी अजून खूप वेळ आहे. हा मोबाइल सर्वप्रथम कंपनीच्या होम मार्केट चीनमध्ये एंट्री करेल. शाओमी 13 अल्ट्रा येत्या 18 एप्रिलला सादर केला जाऊ शकतो. चिनी रिटेलर वेबसाइटवर या फोनचा लाँच टीज करण्यात आला आहे जिथे लाँच टाइम स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता असेल, असं सांगण्यात आलं आहे. याबाबत कंपनीच्या ऑफिशियल घोषणेची आता वाट पहिली जात आहे. या दिवशी फोनसह Xiaomi Pad 6 देखील मार्केटमध्ये सादर केला जाऊ शकतो.

शाओमी 13 अल्ट्राचे लीक स्पेसिफिकेशन्स

  • 6.7″ 2K AMOLED display, 120Hz refresh rate
  • 16GB RAM, 512GB memory
  • Snapdragon 8 Gen 2
  • 50MP Sony IMX989, 32MP selfie snapper
  • 4,900mAh battery, 90W fast charging

Xiaomi 13 Ultra च्या फीचर्स किंवा स्पेसिफिकेशन्सची माहिती अद्याप कंपनीनं दिली नाही. परंतु लीक्स पाहता हा मोबाइल फोन 6.7 इंचाच्या लार्ज 2के अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो ज्यात 120हर्ट्ज रिफ्रेश रेट मिळू शकते.

लीकनुसार शाओमी 13 अल्ट्रा स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या पावरफुल स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच केला जाऊ शकतो. या फोनमध्ये 16जीबी पर्यंत रॅम आणि 512जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळू शकते.

फोटोग्राफीसाठी Xiaomi 13 Ultra मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. लीकमध्ये हे सर्व कॅमेरा सेन्सर 50 मेगापिक्सलचे असतील असं सांगण्यात आलं आहे ज्यात प्रायमरी लेन्स 50MP Sony IMX989 असू शकते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 4,900एमएएचची बॅटरी मिळू शकते. तर लीकनुसार हा शाओमी फोन 90वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल जोडीला 50वॉट वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजी देखील मिळू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here