50-50MP च्या चार कॅमेऱ्यांसह Xiaomi 13 Ultra लाँच; जागतिक बाजारात झाली एंट्री

Highlights

  • Xiaomi 13 Ultra मध्ये 50MP चे चार रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आले आहेत.
  • हा फोन सर्वप्रथम चीनमध्ये उपलब्ध होईल.
  • हा शाओमी फोन ग्लोबल मार्केटमध्ये लाँच करण्यात आला आहे.

शाओमीनं आज आपला सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन Xiaomi 13 Ultra सादर केला आहे. हा एक कॅमेरा सेंट्रिक स्मार्टफोन आहे, ज्यात 50MP चा 1 इंच आकार असलेला मुख्य सेन्सर आहे. जोडीला 50MP चे तीन कॅमेरा सेन्सर मिळतात. तसेच यात Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर, 16GB RAM, 1TB स्टोरेज आणि Android 13 देण्यात आलं आहे. हा फोन सध्या ब्रँडच्या होम मार्केट चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे जो येत्या दिवसांत भारतासह अन्य बाजारांमध्ये एंट्री करेल. चला जाणून घेऊया शाओमी 13 अल्ट्राच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स व प्राइसची माहिती.

शाओमी 13 अल्ट्रा चे स्पेसिफिकेशन्स

कॅमेरा

  • 1-inch 50MP Sony IMX989 main camera
  • Quad Rear Camera Setup
  • 32MP Selfie camera

Xiaomi 13 Ultra क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ता फोनच्या बॅक पॅनलवर 4 कॅमेरा सेन्सर देण्यात आले आहेत तसेच चारही 50 मेगापिक्सलच्या लेन्स आहेत. प्रायमरी सेन्सर 50MP 1″ Sony IMX989 आहे जोडीला तीन अन्य 50MP IMX858 लेन्स देण्यात आल्या आहेत. शाओमी 13 अल्ट्राचा कॅमेरा 12एमएम पासून 120एमएम पर्यंत शूट करू शकतो. तसेच कॅमेरा सेटअपमध्ये एफ/1.8 अपर्चर पासून एफ/3.0 अपर्चर पर्यंतची क्षमता मिळते. फोनमध्ये 32 MP चा सेल्फी शुटर देण्यात आला आहे.

डिस्प्ले

  • 6.73 inch OLED Display
  • 2K Resolution
  • 2600 nits brightness

Xiaomi 13 Ultra स्मार्टफोन पंच-होल स्टाईल 6.73 इंचाच्या लार्ज 2के डिस्प्लेसह लाँच झाला आहे. ही स्क्रीन ओएलईडी पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. हा फोन डिस्प्ले 2600निट्स ब्राइटनेस, 1920हर्ट्ज पीडब्ल्यूएम डिमिंग, 522पीपीआय आणि एचडीआर 10+ ला सपोर्ट करतो. डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी याला कोर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टसची सुरक्षा देण्यात आली आहे.

प्रोसेसर

  • Android 13
  • Snapdragon 8 Gen 2
  • LPDDR5X RAM, UFS 4.0

Xiaomi 13 Ultra अँड्रॉइड 13 ओएसवर लाँच झाला आहे जो मीयुआयसह मिलकर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा मोबाइल फोन LPDDR5X RAM आणि UFS 4.0 टेक्नॉलॉजीवर चालतो. तसेच हेवी गेमिंगसाठी शाओमी 13 अल्ट्रा मध्ये कूलिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.

बॅटरी

  • 5,000mAh battery
  • 90W wired, 50W wireless charging

या फोन मध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 90W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीच्या मदतीनं चार्ज करता येते. तसेच हा फोन 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो. कंपनीनं दावा केला आहे की हा फोन 1 टक्के बॅटरीवर एक तास वापरता येतो. यावेळी कंपनीनं चार्जिंगसाठी USB 3.2 पोर्टचा वापर केला आहे.

शाओमी 13 अल्ट्राची किंमत

Xiaomi 13 Ultra स्मार्टफोन तीन व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे. फोनचा बेस व्हेरिएंट 12GB रॅमसह 256GB स्टोरेज देतो, ज्याची किंमत 5,999 युआन म्हणजे सुमारे 71,570 आहे. तर 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज मॉडेलची किंमत 6,499 युआन (सुमारे 77,535 रुपये) आणि 16GB रॅम व 1TB स्टोरेज मॉडेल 7,299 युआन )सुमारे 87079 रुपये) मध्ये उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here