ZTE - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 27 Apr 2021 13:01:14 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Realme नंतर या चायनीज कंपनीने लॉन्च केला स्वस्त 5G स्मार्टफोन, Xiaomi ला घरात मिळत आहे चांगलीच टक्कर https://www.91mobiles.com/marathi/zte-yuanhang-10-launched-check-specification-price/ https://www.91mobiles.com/marathi/zte-yuanhang-10-launched-check-specification-price/#respond Tue, 27 Apr 2021 13:01:14 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10725 ZTE Yuanhang 10 स्मार्टफोन कंपनीने मीडियाटेकच्या Dimensity 700 चिपसेटसह सादर केला आहे.

The post Realme नंतर या चायनीज कंपनीने लॉन्च केला स्वस्त 5G स्मार्टफोन, Xiaomi ला घरात मिळत आहे चांगलीच टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ZTE ने चीनमध्ये ZTE Yuanhang 10 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. ZTE चा हा स्मार्टफोनमध्ये अफोर्डेबल किंमतीत 5G कनेक्टिविटीसह सादर केला गेला आहे. ZTE Yuanhang 10 स्मार्टफोन हाई रिफ्रेश रेट स्क्रीन, जास्त स्टोरोज, 16 मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह सादर केला गेला आहे. ZTE चा हा 5G स्मार्टफोन मीडियाटेक लेटेस्ट Dimensity 700 चिपसेटसह सादर केला गेला आहे. याआधी या चिपसेटसह Realme 8 5G स्मार्टफोन लॉन्च केला गेला होता. ZTE Yuanhang 10 स्मार्टफोनच्या इंग्लिश नावाबद्दल सध्या कोणतीही माहिती मिळाली नाही. म्हणजे या स्मार्टफोनच्या ग्लोबल लॉन्चबद्दल कंपनीने कोणतीही माहिती शेयर केली नाही. (ZTE Yuanhang 10 launched check specification price)

ZTE Yuanhang 10 स्पेसिफिकेशन्स

ZTE Yuanhang 10 स्मार्टफोनमध्ये 6.52 इंचाचा HD+ रिजोल्यूशन असलेला IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचा डिस्प्ले आस्पेक्ट रेश्यो 20:9 आणि रिफ्रेश रेट 90Hz सह टच सॅम्पलिंग रेट 180Hz आहे. ZTE Yuanhang 10 स्मार्टफोनची जाडी 8.2mm आहे.

हे देखील वाचा : भारतीयांना आवडतात चायनीज फोन हे पुन्हा सिद्ध झाले, या कंपनीने मिळवला प्रथम क्रमांक

ZTE Yuanhang 10 स्मार्टफोन कंपनीने मीडियाटेकच्या Dimensity 700 चिपसेटसह सादर केला आहे. हा स्मार्टफोन 4 GB रॅम वेरिएंटमध्ये सादर केला गेला आहे. फोनच्या स्टोरेजमधील 2GB चा वर्चुअल रॅम म्हणून वापर केला गेला आहे. म्हणजे या फोनमध्ये एकूण 6 GB रॅम देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनचा सेल्फी कॅमेरा HDR, पोर्टेड मोड आणि व्हिडीओ ब्लॉगिंग सारखे फीचर ऑफर करतो. तसेच ZTE Yuanhang 10 स्मार्टफोनच्या मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा प्राइमेरी कॅमेरा 16 मेगापिक्सलचा आहे त्याचबरोबर 5 मेगापिक्सलचा मॅक्रो आणि एक डेप्थ ऑफ फील्ड लेंस देण्यात आली आहे. या फोनमध्ये अँटी शेक व्हिडीओ, स्मार्ट ब्लॉगिंग, AI वॉइस सबटाइटल्स सारखे फोटोग्राफी फीचर्स देण्यात आले आहेत.

हे देखील वाचा : 5000mAh बॅटरी आणि या पावरफुल प्रोसेसरसह लॉन्च झाला हा लो बजेट फोन, जाणून घ्या याबाबत सर्वकाही

ZTE Yuanhang 10 स्मार्टफोन Android OS वर आधारित MyOS 11 वर चालतो. ZTE च्या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ZTE Yuanhang 10 स्मार्टफोनच्या डावीकडे पावर बटण देण्यात आला आहे, ज्यात कंपनीने फिंगरप्रिंट सेंसर पण आहे.

ZTE Yuanhang 10 किंमत आणि उपलब्धता

ZTE Yuanhang 10 स्मार्टफोन सध्या चीनमध्ये 6GB रॅम 128GB स्टोरेजसह 1,298 युआन (जवळपास 14,000 रुपये) च्या किंमतीत सादर केला गेला आहे. ZTE Yuanhang 10 स्मार्टफोन रॉक रिग्ड ग्रे, ब्लू वेव आणि आइरिश ग्रीन कलरमध्ये सादर केला गेला आहे.

The post Realme नंतर या चायनीज कंपनीने लॉन्च केला स्वस्त 5G स्मार्टफोन, Xiaomi ला घरात मिळत आहे चांगलीच टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/zte-yuanhang-10-launched-check-specification-price/feed/ 0
Samsung आणि Xiaomi राहिले मागे, या कंपनीने लॉन्च केला जगातील पहिला अंडर-डिस्प्ले कॅमेरा असलेला फोन https://www.91mobiles.com/marathi/zte-axon-20-5g-world-first-under-display-camera-phone-launched-in-china-know-price-and-specification/ https://www.91mobiles.com/marathi/zte-axon-20-5g-world-first-under-display-camera-phone-launched-in-china-know-price-and-specification/#respond Wed, 02 Sep 2020 11:08:44 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7948 ZTE AXON 20 5G कंपनीने ब्लॅक, ऑरेंज, ब्लू आणि पर्पल कलर ऑप्शन मध्ये सादर केला गेला आहे.

The post Samsung आणि Xiaomi राहिले मागे, या कंपनीने लॉन्च केला जगातील पहिला अंडर-डिस्प्ले कॅमेरा असलेला फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन यूजर्सना फ्यूचर टेक्नॉलजी देण्यासाठी सध्या जवळपास सर्व मोबाईल फोन निर्माता कंपन्या काम करत आहेत. गेल्यावर्षी ओपोने अशीच एक नवीन टेक्नोलॉजी (अंडर स्क्रीन कॅमेरा) असलेला स्मार्टफोन मोबाईल वर्ल्ड कांग्रेस (MWC) मध्ये दाखवला होता. तर काही दिवसांपूर्वी शाओमीने पण आपल्या नवीन जनरेशनच्या अंडर डिस्प्ले कॅमेरा असलेल्या फोनची झलक दाखवली होती. पण आतापर्यंत कोणत्याही कंपनीने अश्या टेक्नोलॉजी सह फोन लॉन्च केला नव्हता. आता सॅमसंग, ऍप्पल आणि शाओमी सारख्या ब्रँड्सना मागे टाकत चायनीज मॅन्युफॅक्चरर ZTE ने 5G क्षमतेसह अंडर-स्क्रीन कॅमेरा असलेला जगातील पहिला स्मार्टफोन अधिकृतपणे लॉन्च केला आहे.

शानदार डिजाइन

ZTE AXON 20 5G ग्रेडिटएंट 3D ग्लास बॅक आणि टेन-लेयर स्ट्रक्चर स्टेक डिजाइन वर सादर केला गेला आहे. कंपनीने या फोन मध्ये व्हॅक्युम ऑप्टिकल कोटिंग प्रोसेस पण दिली आहे. एलिगेंट कर्व्स सह सादर करण्यात आलेला हा फोन खूप खास आहे. फोनचा फ्रंट लुक पाहता यात तुम्हाला कोणतीही नॉच आणि होल-पंच दिसणार नाही, ज्यामुळे फोनच्या चारही कडा बेजल लेस आहेत. सोबतच उजवीकडे वॉल्यू रॉकर आणि पावर ऑन-ऑफ बटन आहेत. बॅक पॅनल वर वर्टिकल शेप चार कॅमेरे आहेत, ज्या सोबत एक एलईडी देण्यात आली आहे. या कॅमेरा मॉड्यूलच्या खाली कंपनीचे नाव आणि त्याखाली फोनचे नाव लिहिण्यात आले आहे.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

फोनच्या डिस्प्ले मध्ये अल्ट्रा-हाई-ट्रांसमिटेंस माइक्रोन-लेवलच्या नवीन मटेरियलचा वापर केला गेला आहे, ज्यात ट्रांसपरंट कॅथोड, स्पेशल OLED आणि एक ट्रांसपरंट अरेचा समावेश आहे. कंपनीने विशेष पिक्सलची व्यवस्था करून डिस्प्ले अजून नैसर्गिक बनवण्याचा प्रयत्न केला आहे. ZTE AXON 20 मध्ये 6.92-इंच (2460 × 1080 पिक्सल) फुल एचडी+ OLED 20.5:9 डिस्प्ले देण्यात आला आहे जो 90Hz रिफ्रेश रेट सह येतो. तसेच जेडटीई एक्सॉन 20 मध्ये ट्रिपल प्रोएक्टिव एल्गोरिथ्म सह 32-मेगापिक्सेलचा कॅमेरा फ्रंटला आहे. स्क्रीनच्या खाली कॅमेरा, लाइट सेंसर, स्क्रीन साउंड यूनिट आणि एक अंडर-स्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनर पण देण्यात आला आहे.

पावर बॅकअपसाठी जेडटीई एक्सॉन 5जी मध्ये 4220mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हि बॅटरी क्वालकॉम क्विक चार्ज 4+ आणि 30W फास्ट चार्जिंग सह येते. या चार्जिंग टेक्नॉलॉजीने यूजर्स हा फोन फक्त 30मिनिटांत 60 टक्के चार्ज करू शकतात. क्विक चार्ज 4+ के मध्ये 45 वॉट पर्यंतची मर्यादा आहे. फोन मध्ये कनेक्टिविटी ऑप्शनसाठी 5G SA / NSA, डुअल 4G VoLTE, वाई-फाई 802.11 ac (2.4GHz + 5GHz), ब्लूटूथ 5, GPS / GLONASS / Beidou, USB टाइप- C आणि NFC आहे.

फोन मध्ये शानदार फोटोग्राफीसाठी एकूण 5 कॅमेरे देण्यात आले आहेत. डिवाइसच्या मागे चार आणि फ्रंटला स्क्रीनच्या खाली एक कॅमेरा आहे. रियर कॅमेरा पाहता यात अपर्चर f/1.8 सह 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, अपर्चर f/2.2 सह 8 मेगापिक्सल 119° अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि अपर्चर f/2.4 सह 2 मेगापिक्सलचा मॅक्रो व 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे. फोन मध्ये वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी फ्रंटला डिस्प्लेच्या खाली अपर्चर f/2.0 सह 32 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

या अंडर डिस्प्ले कॅमेरा असलेल्या फोन मध्ये ऑक्टा-कोर (1 x 2.4GHz + 1 x 2.2GHz + 6 x 1.8GHz Kryo 475 CPUs) स्नॅपड्रॅगॉन 765G चिपसेट देण्यात आला आहे. यात ग्राफिक्ससाठी एड्रिनो 620 GPU आहे. फोन मध्ये 6GB / 8GB रॅम सह 128GB स्टोरेज आणि 8GB रॅम सह 256GB ची स्टोरेज देण्यात आली आहे. यूजर्स फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 2टीबी पर्यंत वाढवू शकतात.

किंमत

ZTE AXON 20 5G कंपनीने ब्लॅक, ऑरेंज, ब्लू आणि पर्पल कलर ऑप्शन मध्ये सादर केला गेला आहे. तसेच फोनच्या 6GB रॅम आणि 128GB वेरिएंटची किंमत 2198 युआन (जवळपास 23,505 रुपये), 8GB रॅम आणि 128GB वर्जनची किंमत 2498 युआन (जवळपास 26,715 रुपये) आणि 8GB रॅम व 256GB स्टोरेज वर्जनची किंमत 2798 युआन (जवळपास 29,925 रुपये ) आहे. हा फोन प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध झाला आहे आणि चीन मध्ये 10 सप्टेंबर पासून विक्रीसाठी येईल.

The post Samsung आणि Xiaomi राहिले मागे, या कंपनीने लॉन्च केला जगातील पहिला अंडर-डिस्प्ले कॅमेरा असलेला फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/zte-axon-20-5g-world-first-under-display-camera-phone-launched-in-china-know-price-and-specification/feed/ 0
डुअल डिस्प्ले असलेला Nubia Z20 लॉन्च, याचा ट्रिपल रियर कॅमेरा सेल्फी आणि रियर दोन्हींचे करतो काम https://www.91mobiles.com/marathi/zte-nubia-z20-launch-with-dual-display-triple-camera-8gb-ram-specs-price/ https://www.91mobiles.com/marathi/zte-nubia-z20-launch-with-dual-display-triple-camera-8gb-ram-specs-price/#respond Thu, 08 Aug 2019 14:41:36 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5006 Nubia Z20 ची मोठी खासियत फोन मध्ये देण्यात आलेला डुअल डिस्प्ले आहे.

The post डुअल डिस्प्ले असलेला Nubia Z20 लॉन्च, याचा ट्रिपल रियर कॅमेरा सेल्फी आणि रियर दोन्हींचे करतो काम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ZTE चा सब-ब्रँड Nubia ने गेल्याच आठवड्यात अधिकृत माहिती दिली होती कि कंपनी येत्या 8 ऑगस्टला आपल्या झेड सीरीजचा विस्तार करत Nubia Z20 सादर करणार आहे. आज कंपनीने फ्लॅगशिप डिवाईस सादर केला आहे. खूप पावरफुल स्पेसिफिकेशन्स असलेला हा स्मार्टफोन सध्या चीनी बाजारात आला आहे. Nubia Z20 ची मोठी खासियत फोन मध्ये देण्यात आलेला डुअल डिस्प्ले आहे. चला जाणून घेऊया Nubia Z20 चे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत.

डुअल डिस्प्ले

Nubia Z20 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.42-इंचाचा फुलएचडी+ कर्व्ड ग्लास डिस्प्ले देण्यात आला आहे तसेच फोनच्या बॅक पॅनल वर 5.1-इंचाचा एचडी+ एमोलेड डिस्प्ले आहे. Nubia Z20 ऑलवेज ऑन डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 2.0 टेक्नॉलॉजी सह येतो. या डिस्प्ले वर फोन अनलॉक न करता टेक्स्ट, ग्राफिक्स व वीडियो इत्यादी बघता येतात.

स्पेसिफिकेशन्स

Nubia Z20 चा हा स्मार्टफोन एंडरॉयड 9 पाई आधारित नुबिया यूआई 7.0 वर सादर केला गेला आहे जो 2.96गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या ऑक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या सर्वात नवीन व पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855+ वर चालतो. कंपनीने हा फोन दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे ज्यात 6जीबी रॅम व 8जीबी रॅम देण्यात आला आहे. हे वेरिएंट 64जीबी मेमरी, 128जीबी स्टोरेज आणि 256जीबी च्या इंटरनल मेमरीला सपोर्ट करतात.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Nubia Z20 ट्रिपल कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हा कॅमेरा सेटअप रियर व फ्रंट दोन्हींचे काम करतो. कंपनीने फोन मध्ये डुअल एलईडी फ्लॅश सह 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सोनी आईएमएक्स586 सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोन मध्ये 16-मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेंस आणि 8-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आला आहे जो 30एक्स डिजीटल झूमला सपोर्ट करतो.

Nubia Z20 डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स व फिंगरप्रिंट सेंसर सोबत पावर बॅकअप साठी 27वॉट फास्ट चार्जिंग व क्विक चार्ज 4.0 सपोर्ट वाली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत

Nubia Z20 रेड, ब्लू आणि ब्लॅक कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे. किंमत पाहता फोनचा 6जीबी रॅम + 128जीबी मेमरी वेरिएंट 3499 युआन (जवळपास 35,000 रुपये) मध्ये लॉन्च केला गेला आहे. त्याचप्रमाणे फोनचा 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज वेरिएंट 3699 युआन (जवळपास 37,000 रुपये) आणि 8जीबी रॅम + 512जीबी मेमरी वेरिएंट 4199 युआन (जवळपास 42,000 रुपये) मध्ये आला आहे. चीन मध्ये हा फोन 16 ऑगस्ट पासून सेल साठी उपलब्ध होईल.

The post डुअल डिस्प्ले असलेला Nubia Z20 लॉन्च, याचा ट्रिपल रियर कॅमेरा सेल्फी आणि रियर दोन्हींचे करतो काम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/zte-nubia-z20-launch-with-dual-display-triple-camera-8gb-ram-specs-price/feed/ 0
झेडटीई ने लॉन्च केला आपला पहिला 5जी स्मार्टफोन, काही सेकंदात संपूर्ण फिल्म होईल डाउनलोड https://www.91mobiles.com/marathi/zte-announces-the-first-5g-flagship-smartphone-and-blade-v10-phone-at-mwc-2019-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/zte-announces-the-first-5g-flagship-smartphone-and-blade-v10-phone-at-mwc-2019-in-marathi/#respond Mon, 25 Feb 2019 15:06:29 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3712 या फोन मध्ये 4जी सर्विस पेक्षा 10 पट जास्त चांगला स्‍पीड मिळेल

The post झेडटीई ने लॉन्च केला आपला पहिला 5जी स्मार्टफोन, काही सेकंदात संपूर्ण फिल्म होईल डाउनलोड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनच्या टेलीकॉम कंपनी झेडटीई ने एमडब्लूसी 2017 इवेंट मध्ये पहिला 5जी स्मार्टफोन सादर केला होता. हा स्मार्टफोन बर्सिलोना मध्ये चालू असलेल्या मोबाईल वर्ल्ड कांग्रेस 2019 मध्ये सादर केला आहे. पण हा काही पहिला 5जी फोन नाही जो या इवेंट मध्ये सादर केला गेला आहे. याआधी सॅमसंग, हुआवई आणि एलजी ने आपापले 5जी फोन सादर केले आहेत.

याव्यतिरिक्त वनप्लस ने पण आपला 5जी प्रोटोटाइप डिवाइस दाखवला आहे. झेडटीई च्या 5जी फोन बद्दल बोलायचे तर कंपनी ने हा डिवाइस झेडटीई एक्सॉन 10 प्रो 5जी नावाने सादर केला आहे. हा डिवाइस यावर्षी यूरोप आणि चीन मध्ये उपलब्ध होईल.

कंपनी द्वारा लॉन्‍च केला गेलेला हा 5जी स्मार्टफोन आहे. या फोन मध्ये 4जी सर्विस पेक्षा 10 पट जास्त चांगला स्‍पीड मिळेल आणि जवळपास एका सेकंदात संपूर्ण मूवी डाउनलोड होईल. या फोन मध्ये क्वॉलकॉमचा लेटेस्ट स्नॅपड्रॅगॉन 855 प्रोसेसर आहे. एक्‍स 6 एलटीई मॉडेम इंटीग्रेशन सह लॉन्‍च केला गेला आहे. कंपनी ने सांगितले कि टेक कंपन्या 5जी आईटी बेसबँड यूनिट वर आधारित आहे. या फोनने 360 डिग्री पॅनोरमिक वर्चुअल रियलिटी वीडियो आणि अल्ट्रा हाई-फाई म्यूजिक आणि वीडियो साठी फास्ट डाउनलोड सपोर्ट मिळतो. झेडटीई ने 5जी फोन सोबत ब्लेड वी10 नावाचा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा डिवाइस पण यावर्षी यूरोप, चीन आणि लॅटिन अमेरिकेत उपलब्ध केला जाईल. पण 5जी आणि ब्लेड वी10 च्या भारतीय उपलब्धतेबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

ब्लेड वी10 चे स्पेसिफिकेशन्स
ब्लेड वी10 बद्दल बोलायचे तर यात 6.3-इंचाचा एफएचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये ऑक्टा-कोर 2.1 गीगाहर्ट्ज आहे. सोबत डिवाइस 3जीबी रॅम+32जीबी इंटरनल स्टोरेज व 4जीबी रॅम+64जीबी इंटरनल स्टोरेज ऑप्शन देण्यात आले आहेत.

ब्लेड वी10 कंपनी ने ब्लॅक, ब्लू आणि ग्रीन कलर ऑप्शन मध्ये सादर केला आहे. फोटोग्राफी साठी फोनच्या मागील बाजूस डुअल कॅमेरा आहे, ज्यात 16-मेगापिक्सल +5-मेगापिक्सलचे कॉम्बिनेशन आहे. तसेच वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी फोन मध्ये 32-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.

पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,200एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच हा डिवाइस एंडरॉयड पाई ऑपरेटिंग सिस्टम वर आधारित आहे. कनेक्टिविटी साठी फोन मध्ये यूएसबी टाइप-सी, 3.5एमएम ऑडियो जॅक आणि माइक्रोएसडी कार्ड स्लॉटचा ऑप्शन आहे.

The post झेडटीई ने लॉन्च केला आपला पहिला 5जी स्मार्टफोन, काही सेकंदात संपूर्ण फिल्म होईल डाउनलोड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/zte-announces-the-first-5g-flagship-smartphone-and-blade-v10-phone-at-mwc-2019-in-marathi/feed/ 0
आला असा अनोखा फोन जो घड्याळाप्रमाणे बांधता येईल मनगटाला https://www.91mobiles.com/marathi/nubia-a-nubia-alpha-wearable-smartphone-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nubia-a-nubia-alpha-wearable-smartphone-in-marathi/#respond Tue, 04 Sep 2018 06:58:52 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1932 सोबतच नुबिया ने नुबिया रेड मॅजिक स्मार्टफोन पण लॉन्च केला आहे जो जवळपास 37,200 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे.

The post आला असा अनोखा फोन जो घड्याळाप्रमाणे बांधता येईल मनगटाला first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
बर्‍याच काळापासून आपण नुसतेच ऐकत होतो की असा फोन येईल जो घड्याळाप्रमाणे हातात घालता येईल. हा फोन कॉल साठी उपयोगी ठरेल आणि घड्याळ व कॅल्क्युलेटर म्हणून वापरता येईल. आता असा हा डिवाईस सत्यात आला आहे. जगातील सर्वात मोठा टेक शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आईएफए च्या 2018 संस्करण मध्ये ही अनोखी टेक्नोलॉजी सादर करण्यात आली आहे. हा अजब स्मार्टफोन सादर केला आहे झेटीई च्या सब-ब्रांड नुबिया ने, आणि याचे नाव आहे नुबिया-ए म्हणजे नुबिया अल्फा.

नु​बिया-ए टेक्नोलॉजीचा एक खूपच अनोखा आणि अद्वितीय नमूना आहे. स्मार्टफोन जगासाठी ही एक मोठी उपलब्धी आहे. ​बर्लिन मध्ये आयोजित आईएफए 2018 च्या मंचावरून नुबिया ने आपला हा अनोखा डिवाईस सादर केला आहे. या डिवाईसला नुबिया-ए अथवा नुबिया अल्फा असे नाव देण्यात आले आहे. या डिवाईस मध्ये कर्व्ड ओएलईडी टच स्क्रीन देण्यात आली आहे जी मनगटावर बांधता येईल. हा स्मार्टफोन सोबतच फिटनेस बँड चे काम करू शकेल.

नुबिया-ए मध्ये फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे, ज्यामुळे चालता चालता पण वीडियो चॅट करता येईल. तसेच या फोन मध्ये माइक्रोफोन पण आहे. नुबिया अल्फा च्या बॅकला चार्जिंग पिन देण्यात आली आहे. कोणत्याही फिटनेस बँड प्रमाणे हा डिवाईस च्या बॅकला हार्ट रेट सेंसर पण देण्यात आला आहे. नुबिया-ए मेटल स्ट्रॅप वर बनवण्यात आला आहे जी ब्लॅक, ब्लू आणि गोल्डन कलर मध्ये आहे. पण कंपनी ने अजूनतरी या डिवाईसच्या स्पेसिफिकेशन्य आणि फीचर्स ची माहिती दिली नाही. येत्या काही महिन्यांत नुबिया-ए आॅफिशियली लॉन्च केला जाऊ शकतो.

सोबतच नुबिया ने नुबिया रेड मॅजिक स्मार्टफोन पण लॉन्च केला आहे जो जवळपास 37,200 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे. या फोन मध्ये 6-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. एंडरॉयड ओरियो सह हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर वर चालतो. फोन 6 जीबी आणि 8 जीबी रॅम वर सादर करण्यात आला आहे जो 64 जीबी आणि 128 जीबी स्टोरेज ला सपोर्ट करतो.

नुबिया रेड मॅजिक मध्ये 24-मेगापिक्सलचा रियर आणि 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. डुअल सिम व 4जी सारख्या फीचर्स सह यात फास्ट चार्जिंग सपोर्ट वाली 3800एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post आला असा अनोखा फोन जो घड्याळाप्रमाणे बांधता येईल मनगटाला first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nubia-a-nubia-alpha-wearable-smartphone-in-marathi/feed/ 0
4,000एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम सह लॉन्च झाला झेडटीई एक्सॉन 9 प्रो https://www.91mobiles.com/marathi/zte-axon-9-pro-launched-snapdragon-845-feature-specification-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/zte-axon-9-pro-launched-snapdragon-845-feature-specification-price-in-marathi/#respond Fri, 31 Aug 2018 12:15:41 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1897 झेडटीई चा हा फोन जर्मनी मध्ये सर्वात आधी विक्री साठी उपलब्ध होईल तसेच फोन च्या भारत लॉन्च बद्दल अजूनतरी माहिती मिळाली नाही.

The post 4,000एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम सह लॉन्च झाला झेडटीई एक्सॉन 9 प्रो first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आईएफए 2018 चा मंच टेक कंपन्यांना नवनवीन टेक्नोलॉजी प्रदर्शित करण्याची संधी देत आहे तसेच अनेक ब्रँडस या मंचावरून स्मार्टफोन बाजारात वापसी पण करत आहेत. बर्लिन मध्ये आयोजित या इवेंट मधून चीनी टेक कंपनी झेडटीई ने पण आपली एक्सॉन सीरीज परत आणली आहे. झेडटीई ने एक्सॉन 9 प्रो स्मार्टफोन लॉन्च केला आहे. ज्याची अंर्तराष्ट्रीय किंमत 650 यूरो म्हणजे जवळपास ​53,900 रुपये ठेवण्यात आली आहे.

झेडटीई एक्सॉन 9 प्रो कंपनी ने दोन वर्षापूर्वी लॉन्च केलेल्या स्मार्टफोन एक्सॉन 7 चा पुढील वर्जन आहे. फोन चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन बेजल लेस नॉच डिस्प्ले सह रियर ग्लास बॉडी वर सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 18.7:9 आस्पेक्ट रेशियो वाला 6.21-इंचाचा एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालतो.

कंपनी ने या फोन मध्ये 6जीबी रॅम तसेच 128जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता एक्सॉन 9 प्रो डुअल रियर कॅमेराला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर 12-मेगापिक्सल आणि 20-मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. तसेच सेल्फी साठी फोनच्या फ्रंट पॅनल वर 20-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

झेडटीई एक्सॉन 9 प्रो 4जी फोन आहे जो बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर पावर बॅकअप साठी हा फोन 4,000एमएएचच्या बॅटरी ला सपोर्ट करतो ज्यात क्विक चार्ज 4.0 आहे. झेडटीई चा हा फोन जर्मनी मध्ये सर्वात आधी विक्री साठी उपलब्ध होईल तसेच फोन च्या भारत लॉन्च बद्दल अजूनतरी माहिती मिळाली नाही.

The post 4,000एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम सह लॉन्च झाला झेडटीई एक्सॉन 9 प्रो first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/zte-axon-9-pro-launched-snapdragon-845-feature-specification-price-in-marathi/feed/ 0