भारतीयांना आवडतात चायनीज फोन हे पुन्हा सिद्ध झाले, या कंपनीने मिळवला प्रथम क्रमांक

Mobile Shop

सर्वांना माहित आहे कि भारत जगातील सर्वात मोठ्या मोबाईल मार्केटपैकी एक आहे. चीनच नाही तर दुसऱ्या देशातील स्मार्टफोन कंपन्या भारतात आपले फोन्स जास्तीत जास्त युजर्सपर्यंत पोहचवू पाहत आहेत. याच कंपन्यांपैकी एक शाओमीने भारतीय बाजारामुळे एक ‘मोठे स्थान’ मिळवले आहे. आपल्या शानदार फोन्सच्या जीवावर शाओमीने भारतात मोबाईल शिपमेंटच्याबाबतीत पहिले स्थान मिळवले आहे. रिसर्च फर्म काउंटरप्वाइंट (Counterpoint) ने 2021 च्या पहिल्या तिमाहीचे मोबाईल शिपमेंटचे आकडे प्रसिद्ध केले आहेत, ज्यात शाओमीला पहिले स्थान मिळाले आहे. (India smartphone shipments see record Q1 in 2021 Xiaomi Samsung Oppo)

Xiaomi बनली नंबर 1

रिपोर्टनुसार Xiaomi ने पुन्हा एकदा Q1 2021 मध्ये 26 टक्के बाजारातील हिस्सेदारीसह भारतीय स्मार्टफोन बाजारात नंबर 1 ची खुर्ची मिळवली कारण जानेवारी-मार्चच्या कालावधीत एकूण शिपमेंट 38 टक्के वाढून 38 मिलियन युनिट्सवर पोहोचली आहे. पण, रिपोर्टमध्ये अशी माहिती दिली आहे कि भारतात आलेल्या कोविड 19 च्या दुसऱ्या लाटेमुळे स्मार्टफोन बाजाराचे खूप नुकसान होऊ शकते.

दुसऱ्या नंबरवर सॅमसंग

काउंटरपॉइंटच्या मॉनिटर सर्विसच्या नव्या रिपोर्टनुसार, 20 टक्के हिस्सेदारीसह सॅमसंग दुसऱ्या स्थानावर होती, जी 52 टक्के (YoY) मध्ये सर्वात पुढे होती, तर वीवो 16 टक्के हिस्सेदारीसह तिसऱ्या स्थानावर होती. तर, रियलमी 11 टक्के मार्केट शेयरसह चौथ्या स्थानावर राहिली.

Counterpoint Q1 Report

कोविड वॅक्सीनमुळे झाला फायदा

सीनियर अनॅलिस्ट Prachir Singh यांनी म्हटले, “भारताच्या स्मार्टफोन बाजारात सतत रेकॉर्ड शिपमेंटचा इतिहास लिहिण्यात आला आहे. तर, भारतात सुरु झालेल्या कोविड 19 लसीकरणानंतर ग्राहकांचा विश्वास पुन्हा आला आहे.” पण, COVID-19 च्या दुसऱ्या लाटेनंतर भारतात यावर्षी Q2 मध्ये फोनची शिपमेंट कमी होऊ शकते.

हे देखील वाचा : फक्त 14,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला भारतातील सर्वात स्वस्त 5G फोन OPPO A53s, Xiaomi आणि Realme ला आव्हान मिळणे निश्चित

लॉकडाउनमुळे घटेल मोबाईलची मागणी

गेल्यावर्षी 3.8 कोटी स्मार्टफोन विकले गेले, जे यापूर्वीच्या वर्षाच्या तुलनेत 23 टक्के जास्त होती. काउंटरप्वाइंटचे विश्लेषक प्रचीर सिंह यांच्या मते, “या आकड्यांकडे सावधानतेने बघितले पाहिजे. देशात सुरु असलेल्या कोरोनाची दुसरी लाट आणि लॉकडाउनमुळे मोबाईलची मागणी कमी होईल.” हे संशोधन अश्यावेळी आले जेव्हा भारतात कोरोनाच्या केसेस वेगाने वाढत आहेत आणि नवीन केसेसमुळे जबरदस्ती राज्यांना लॉकडाउन लावावा लागत आहे.

रिसर्च अनॅलिस्ट शिल्पी जैन म्हणतात, “सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी एम-सीरीज, गॅलेक्सी एफ-सीरीज सोबतच गॅलेक्सी एस 21 सीरीजच्या अनेक नवीन प्रोडक्टने यावेळी मार्केटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तसेच, रियलमीने आपल्या 8 सीरीज लॉच, 9 सीरीज आणि शाओमीने आपल्या रेडमी नोट 10 सीरीज अलीकडेच सादर केली आहे.’’

फीचर फोन मार्केटमध्ये झाली वाढ

फीचर फोन बाजारात 14 टक्के वाढ झाली आहे. जियो फोन आणि इतर फोन भारतात अनेकांना आवडले आहेत. स्मार्टफोन मार्केटच्या या रिपोर्टने पुन्हा एकदा मने जिंकली आहेत कि भारतीय मोबाईल बाजारात चीनी कंपन्यांची हवा आहे आणि चायनीज ब्रँड्सचा मार्केट शेयर साल वर्षानुवर्षे वाढत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here