5000mAh बॅटरी आणि या पावरफुल प्रोसेसरसह लॉन्च झाला हा लो बजेट फोन, जाणून घ्या याबाबत सर्वकाही

Tecno Spark 7 Pro

टेक ब्रँड Tecno ने काही दिवसांपूर्वीच ग्लोबल मार्केटमध्ये आपल्या ‘स्पार्क सीरीज’ चा नवीन मोबाईल TECNO Spark 7P ऑफिशियल केला होता. आता Tecno ने स्पार्क 7 सीरीजमध्ये एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा फोन कंपनीने Tecno Spark 7 Pro नावाने मार्केटमध्ये आणला आहे, ज्यात काही बजेट स्पेसिफिकेशन आहेत. नावानुसार फोन कंपनीचा खूप पावरफुल फोन आहे. तसेच या फोनची खासियत पाहता, याची मोठी बॅटरी, मोठा डिस्प्ले आणि हाई रिफ्रेश रेटसह प्रोसेसर आहे. (Tecno Spark 7 Pro launched with 5000mah battery 48MP camera)

Tecno Spark 7 Pro ची किंमत

Tecno ने अजूनही स्पार्क 7 प्रो ची किंमत आणि विक्रीची माहिती दिली नाही. उपलब्धतेची माहिती दिली नाही. पण, फोन 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज, 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज, आणि 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज सारख्या वेरिएंटमध्ये सादर केला गेला आहे. तसेच, कंपनीने फोन आल्प्स ब्लू, स्प्रशिया ग्रीन, नियॉन ड्रीम आणि मॅग्नेटिक ब्लॅक कलरमध्ये लॉन्च केला आहे.

हे देखील वाचा : फक्त 14,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला भारतातील सर्वात स्वस्त 5G फोन OPPO A53s, Xiaomi आणि Realme ला आव्हान मिळणे निश्चित

Tecno Spark 7 Pro चे स्पेसिफिकेशन्स

Tecno Spark 7 Pro मध्ये 6.6-इंचाची LCD स्क्रीन होल-पंचसह देण्यात आली आहे. पंच होल फ्रंटला टॉप लेफ्ट कॉनर्रवर आहेत. तसेच फोनची स्क्रीन फुल एचडी+ ला सपोर्ट करते. तसेच, यात 90 हर्ट्ज एचडी+ रिजोल्यूशनला सपोर्ट आहे. तसेच फोन कंपनीने MediaTek Helio G80 चिपसेटसह सादर केला आहे. डिवाइसमध्ये 4 GB आणि 6 GB रॅमसह 64 GB आणि 128 GB ची स्टोरेज देण्यात आली आहे. स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी स्पार्क 7 प्रो मध्ये फ्रंटला 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच मागे फोनमध्ये 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, डेप्थ सेंसर आणि एक AI लेंस आहे. तसेच, मागे सिक्योरिटीसाठी एक फिंगरप्रिंट सेंसर आहे.

हे देखील वाचा : भारतीयांना आवडतात चायनीज फोन हे पुन्हा सिद्ध झाले, या कंपनीने मिळवला प्रथम क्रमांक

पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी 10W चार्जिंग सपोर्टसह मिळते. तसेच फोन Android 11 बेस्ड HiOS 7.5 वर चालतो. कनेक्टिविटी ऑप्शनसाठी फोनमध्ये 4 जी एलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ, एफएम, माइक्रो यूएसबी पोर्ट, 3.5 मिमी हेडफोन जॅक इत्यादींचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here