Tecno Camon 30s Pro स्मार्टफोन झाला ग्लोबली लाँच, जाणून घ्या संपूर्ण माहिती

टेक्नोने आपल्या Camon 30 सीरीजचा विस्तार करत एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा ग्लोबल मार्केटमध्ये Tecno Camon 30s Pro नावाने सादर झाला आहे. यात युजर्सना कर्व अ‍ॅमोलेड डिस्प्ले, एक्सटेंडेड टेक्नॉलॉजीच्या मदतीने 16GB पर्यंत रॅम, 50 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा, 5000mAh बॅटरी सारखे स्पेसिफिकेशन देण्यात आले आहेत. चला, पुढे तुम्हाला मोबाईलची संपूर्ण माहिती देत आहोत.

Tecno Camon 30s Pro चे स्पेसिफिकेशन

  • डिस्प्ले: Tecno Camon 30s Pro मध्ये 6.78 इंचाचा FHD+ Dual-Curved Infinite View अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यावर 120Hz रिफ्रेश रेट,1080×2436 पिक्सल रिजॉल्यूशन, 1300 निट्स पीक ब्राईटनेस, 1.07 बिलियन कलर आणि 2160Hz PWM डिमिंगला सपोर्ट मिळतो.
  • प्रोसेसिंग: फोन Helio G100 SOC सह आला आहे. हा चिपसेट आतापर्यंत लाँच होण्यासाठी वेळ आहे म्हणजे हा आल्यानंतर डिव्हाईस सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो. तसेच, ओएसच्या बाबतीत हा Android 14 वर काम करेल.
  • स्टोरेज आणि रॅम: Tecno Camon 30s Pro मध्ये ब्रँडने 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज प्रदान केले आहे. त्याचबरोबर 8GB रॅम + 8GB एक्सटेंटेड रॅम काला सपोर्ट आहे. ज्याच्या मदतीने फोनमध्ये 16 जीबी पर्यंतची पावर मिळते.
  • कॅमेरा: फोनमध्ये बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप आहे ज्यात 50MP चा सोनी IMX896 मेन सेन्सर OIS सह मिळतो. या प्रायमरी लेन्ससह 2MP डेप्थ सेन्सर आणि ड्युअल फ्लॅश देण्यात आला आहे. तसेच, फ्रंटला पण ड्युअल फ्लॅश असलेला ऑटो फोकस 50MP सेन्सर आहे.
  • बॅटरी: Tecno Camon 30s Pro मध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी आहे याला चार्ज करण्यासाठी 45W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की फोन 45 मिनिटामध्ये फुल चार्ज होऊ शकतो. हेच नाही यात 20W वायरलेस फास्ट चार्जिंगचा सपोर्ट पण आहे. जो मॅग्नेटिक चार्जिंग फोन केस आणि वायरलेस चार्जर सह येतो. चार्जिंगसाठी हायपर, स्मार्ट आणि लो टेम्प चार्ज सारखे मोड देण्यात आले आहेत.
  • इतर: Tecno Camon 30s Pro मध्ये Dolby Atmos टेक्नॉलॉजीसह ड्युअल स्पिकर देण्यात आले आहेत. पानी आणि धूलीपापसून वाचविण्यासाठी IP53 रेटिंग आहे. सुरक्षेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर, कनेक्टिव्हिटीसाटठी WiFi, Bluetooth, 4G टेक्नॉलॉजी आहे.

Tecno Camon 30s Pro ची किंमत

टेक्नोच्या अधिकृत वेबसाईटवर Camon 30s Pro ची लिस्टिंग झाली आहे. परंतु अजून किंमत येण्यासाठी वेळ आहे. तसेच, कलर ऑप्शन पाहता हा इंटरस्टेलर ग्रे, पर्ल गोल्ड आणि शिम सिल्व्हर ग्रीन सारख्या तीन पर्यायांमध्ये येतो.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here