येत आहे भारतातील सर्वात स्वस्त इन-डिस्प्ले फिंगर प्रिंट सेंसर असलेला फोन, 10 जुलैला होईल लॉन्च

Tecno कंपनी ने काही दिवसांपूर्वीच भारतीय बाजारात आपला ट्रिपल रियर कॅमेरा असलेला स्मार्टफोन Camon i4 लॉन्च केला होता. या फोनची किंमत 9,599 रुपयांपासून सुरु होत आहे ज्यामुळे हा देशातील सर्वात स्वस्त ट्रिपल रियर कॅमेरा वाले टॉप 3 स्मार्टफोन्स मध्ये समाविष्ट होतो. आता पुन्हा एकदा Tecno भारतात काहीतरी नवीन करणार आहे. बातमी समोर आली आहे कि टेक्नो कंपनी भारतात ब्रँडचा नवीन फोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे आणि हा डिवाईस भारतातील सर्वात स्वस्त इन-डिस्प्ले फिंगर प्रिंट सेंसर असलेला फोन असू शकतो.

Tecno Mobile India ने मीडिया इन्वाईट शेयर केला आहे ज्यात नवीन फोनच्या लॉन्चच्या तारखेचा खुलासा करण्यात आला आहे. कंपनीने सांगितले आहे कि येत्या 10 जुलैला Tecno भारतात एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंटच्या मंचावरून कंपनीचा नवीन स्मार्टफोन इंडियन मार्केट मध्ये येईल. कंपनीने 10 जुलैला लॉन्च होणाऱ्या फोनचे नाव सांगितले नाही पण Tecno ने या फोन सोबत Tecno Phantom is coming हॅशटॅगचा वापर केला आहे.

Tecno च्या या आगामी स्मार्टफोन बद्दल बोलायचे तर शेयर केल्या गेलेल्या मीडिया इन्वाईट मध्ये ‘फिंगरप्रिंट सेंसर’ दाखवण्यात आला आहे. या टीजर ईमेज बघून अंदाज लावला जात आहे कि कंपनीचा आगामी डिवाईस इन-डिस्प्ले फिंगर प्रिंट सेंसर सह येईल. विशेष म्हणजे Tecno ने आपले सर्व स्मार्टफोन्स प्राइस रेंज मर्यादित ठेवली आहे. त्यामुळे Tecno द्वारा लॉन्च केला जाणारा हा फोन भारतातील सर्वात स्वस्त इन-डिस्प्ले फिंगर प्रिंट सेंसर असलेला फोन ठरू शकतो. विशेष म्हणजे फोनची इतर माहिती मिळताच वाचकांपर्यंत पोचवली जाईल.

Tecno Camon i4

Camon i4 कंपनीने 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या डॉट नॉच डिस्प्ले वर सादर केला आहे. हा फोन 1520 X 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.21-इंचाच्या एचडी+ स्क्रीनला सपोर्ट करतो. टेक्नो ने आपला नवीन फोन हाईओएस आधारित एंडरॉयड 9 पाई वर सादर केला आहे जो 3 रॅम वेरिएंट्स मध्ये बाजारात आला आहे. टेक्नो Camon i4 चे हे वेरिएंट्स वेगवेगळ्या अलग चिपसेट वर चालतात.

Tecno Camon i4 चा सर्वात छोटा वेरिएंट 2जीबी रॅमला सपोर्ट करतो. तसेच फोनच्या दुसऱ्या वेरिएंट मध्ये 3जीबी रॅम देण्यात आला आहे. हे दोन्ही वेरिएंट 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात तसेच 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या क्वॉड-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीयो ए22 चिपसेट वर चालतात. त्याचप्रमाणे Camon i4 चा सर्वात वेरिएंट कंपनी द्वारा 4जीबी रॅम व 64जीबी इंटरनल स्टोरेज वर लॉन्च केला गेला आहे जो आक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेकच्या हेलीयो पी22 चिपसेट वर चालतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Camon i4 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी, 2-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसिंग सेंसर आणि 8-मेगापिक्सलची वाइड एंगल लेंस देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सेल्फी साठी Camon i4 एफ/2.0 अपर्चर वाल्या 16-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Camon i4 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगर प्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी Camon i4 मध्ये रॉकेट चार्जिंग फीचर असलेली 3,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. Camon i4 मीडनाईट ब्लॅक, एक्वा ब्लू, शेपेंन गोल्ड आणि नेबुला ब्लॅक कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.

Tecno Camon i4 च्या या वेरिएंट्सची किंमत क्रमश: 8,499 रुपये, 10,599 रुपये आणि 11,999 रुपये आहे. हा फोन रियर फिंगरप्रिंट सेंसर व फेस अनलॉक फीचर सह रॉकेट चार्जिंग फीचर असलेल्या 3,500एमएएच की बॅटरीला सपोर्ट करतो.

वीडियो

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here