Tecno Phantom V Fold 2 आणि Phantom V Flip 2 च्या जागतिक लाँचची झाली पुष्टी, जाणून घ्या तपशील

टेक्नोने जागतिक बाजारपेठेत आपले दोन फोल्ड स्मार्टफोन जाहीर केले आहेत. हे पहिले घानामध्ये Tecno Phantom V Fold 2 आणि Tecno Phantom V Flip 2 या नावांनी लाँच केले जातील. ब्रँडच्या सोशल मीडियावर जाहीर केलेल्या माहितीत या स्मार्टफोनची प्री-ऑर्डर आणि लूकला दर्शवते. तुम्हाला सांगतो की, गेल्या अनेक दिवसांपासून सर्टिफिकेशन वेबसाईटवर हे दोन्ही मोबाईल्स स्पॉट होत होते. आता ते अधिकृत होण्यास तयार आहेत. चला, त्यांचे तपशील जाणून घेऊया.

Tecno Phantom V Fold 2 आणि Phantom V Flip 2 जागतिक लाँचची पुष्टी

  • टेक्नो ने घानामध्ये त्यांचे Phantom V Fold 2 आणि V Flip 2 लाँच करण्याची घोषणा केली आहे. दोन्ही फोनसाठी प्री-ऑर्डर 19 ऑगस्ट ते 24 ऑगस्टपर्यंत आहेत.
  • वर नमूद केलेल्या तारखांना जे युजर्स Phantom V Fold 2 किंवा Phantom V Flip 2 ची प्री-ऑर्डर करतील त्यांना GHS 3000 किमतीच्या मोफत भेटवस्तू मिळतील. ज्यामध्ये ब्लूटूथ स्पीकर आणि फ्लॅस्क असलेला गिफ्ट बॉक्स, ट्रॅव्हल बॅग आणि 3 घड्याळ यांचा समावेश आहे.
  • याशिवाय, ग्राहकांना 6 महिन्यांसाठी 15GB MTN डेटा, 180 दिवसांचा स्क्रीन विमा आणि 12+1 महिन्यांची अतिरिक्त वाँरटी दिली जाईल.
  • ब्रँडने अद्याप Tecno Phantom V Fold 2 आणि Phantom V Flip 2 चे स्पेसिफिकेशन शेअर केलेले नाहीत, परंतु लवकरच याची घोषणा केली जाऊ शकते.

Tecno Phantom V Fold 2 आणि Phantom V Flip 2 चे डिझाईन

  • तुम्ही वरील सोशल मीडिया पोस्टमध्ये पाहू शकता की Tecno Phantom V Fold 2 च्या मागील बाजूस एक आयताकृती मॉड्यूल दिले गेले आहे. ज्यामध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. प्रतिमेत एक स्टाईलस देखील पहायला मिळत आहे. ज्यावरून असे दिसते की हे स्टाईलस सपोर्टसह उपलब्ध होईल.
  • Tecno Phantom V Flip 2 स्मार्टफोन विषयी जर बोलायचे झाल्यास त्याच्या चित्रात मोठा कव्हर डिस्प्ले आहे. यासोबतच त्याच्या व्हर्टिकल पॅटर्नमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप दर्शविला आहे.

TECNO Phantom V Fold 2 आणि V Flip 2 चे तपशील (अपेक्षित)

  • गुगल प्ले कंसोल आणि गिकबेंच साईटवरून मिळालेल्या माहितीनुसार Tecno Phantom V Fold 2 मध्ये MediaTek Dimensity 9000+ चिपसेट लावला जाऊ शकतो.
  • TECNO Phantom V Fold 2 स्मार्टफोनमध्ये जवळपास 12GB रॅम मिळण्याची अपेक्षा आहे.
  • TUV सूचीनुसार फोल्ड मॉडेलमध्ये 5610mAh (2973 mAh + 2637 mAh) ची ड्युअल बॅटरी मिळू शकते.
  • Tecno Phantom V Flip 2 बद्दल बोलायचे झाले तर ते जवळपास 8GB रॅम + 256GB इंटरनल स्टोरेजसह येऊ शकते.
  • Phantom V Flip 2 च्या FCC सर्टिफिकेशनमध्ये असे म्हटले आहे की यामध्ये ड्युअल बॅटरी दिली जाऊ शकतात. ते जवळपास 4590mAh असण्याची शक्यता आहे.
  • Tecno Phantom V Flip 2 मध्ये चार्जिंगसाठी 70 वॉट चा सपोर्ट असू शकतो.
  • TECNO Phantom V Fold 2 आणि V Flip 2 डिव्हाईस अँड्रॉईड 14 ओएस सह आणले जाऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here