Tecno मोबाईल ने भारतीय मार्केट मध्ये आपले दोन नवीन स्मार्टफोन्स- Tecno Spark Go आणि Tecno Spark 4 Air सादर केले आहेत. दोन्ही फोनचे स्पेसिफिकेशन्स जवळपास एक समान आहेत. फक्त रॅम, स्टोरेज ऑप्शन आणि कॅमेरा सेटअपच्या बाबतीत वेगळेपण दिसून येते. खरेदीसाठी फोन्स आज पासूनच मार्केट मध्ये उपलब्ध झाले आहेत.
Tecno Spark Go आणि Tecno Spark 4 Air ची किंमत
Tecno Spark Go च्या 2GB रॅम + 16GB स्टोरेज ऑप्शनची किंमत 5,499 रुपये आहे. तर Tecno Spark 4 Air च्या 3GB रॅम + 32GB स्टोरेज ऑप्शनची किंमत 6,999 रुपये आहे. स्मार्टफोन्स कंपनीने Nebula Black आणि Royal Purple कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध केले आहेत. तसेच Tecno Spark Go च्या ग्राहकांना 799 रुपयांचे ब्लूटूथ ईयपपीस मोफत मिळतील.
Tecno Spark Go चे स्पेसिफिकेशन्स
स्पेसिफिकेशन्स पाहता Tecno Spark Go मध्ये 6.1-इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 19.5:9 एस्पेक्ट रेश्यो सह येतो. तसेच, 2.0GHz हीलियो ए22 क्वाड-कोर एसओसी सह 2GB रॅम आहे. फोन मध्ये 16GB स्टोरेज देण्यात आली आहे. डिवाइसची स्टोरेज 256GB पर्यंत वाढवता येते.
फोटोग्राफी साठी फोन मध्ये फोन मध्ये 8-मेगापिक्सलचा एआई रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी फोन मध्ये 5-मेगापिक्सलचा एआई फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे, जो फ्लॅश सह येतो. यात तुम्हाला एआई कॅमेरा, पोर्टरेट मोड, एआई ब्यूटी, एचडीआर मोड, एआर शूट, वाइड मोड फीचर मिळतात.
फोन मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी आहे जी याला पावर बॅकअप देते. तसेच फोन एंडरॉयड 9 पाई वर चालतो. फोन मध्ये कोणताही फिंगरप्रिंट सेंसर नाही.
Tecno Spark 4 Air चे स्पेसिफिकेशन्स
Spark 4 Air पाहता यात 6.1-इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे, सोबत 19.5:9 आएस्पेक्ट रेश्यो आहे. तसेहच Tecno Spark 4 Air 2.0GHz हीलियो ए22 क्वाड-कोर एसओसी वर आधारित आहे. फोन मध्ये 3जीबी रॅम व 32जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 256जीबी पर्यंत वाढवता येते.
TECNO Spark4 Air डुअल रियर कॅमेऱ्यासह सादर केला गेला आहे. फोन मध्ये 13-मेगापिक्सल AI कॅमेरा f/1.8 अपर्चर व दुसरा VGA कॅमेरा आहे. रियर कॅमेरा मध्ये पोर्टेट मोड, नाइट आणि प्रोफेशनल कॅमेरा सेटिंग देण्यात आली आहे. त्याचबरोबर फोन मध्ये 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,000mAh ची बॅटरी आहे.
















