स्मार्टफोन बनवणारा TECNO ब्रँड अनेक दिवसांपासून भारतात लो बजेट मध्ये खूप चांगले स्पेसिफिकेशन्स असलेले हँडसेट लॉन्च करत आहे. फोन मध्ये शानदार फीचर्समुळे कंपनीचे फोन Realme–Xiaomi च्या डिवाइसेसना आव्हान देत आहेत. अलीकडेच कंपनीने नवीन स्मार्टफोन सीरीज ‘POVA’ मध्ये पहिला स्मार्टफोन TECNO POVA सादर केला होता. आता कंपनीने मोठ्या बॅटरी सह एक नवीन फोन Tecno Spark 6 Go भारतीय मार्केट मध्ये सादर केला आहे. Tecno च्या या नवीन स्मार्टफोनची भारतात Realme C3 आणि Samsung Galaxy M01s सारख्या स्वस्त फोन्स सोबत टक्कर होईल.
दमदार बॅटरी
पावरबॅकअपसाठी फोन मध्ये 5,000mAh ची बॅटरी मिळेल. बॅटरी बद्दल कंपनीचा दावा आहे कि फोन मध्ये स्टॅण्डबाय पोजिशन मध्ये 40 दिवसांची बॅटरी लाइफ मिळेल, तसेच सिंगल चार्ज मध्ये फोनची बॅटरी 54 तास टॉक-टाइम देईल. याचे डायमेंशन 165.6×76.3×9.1mm आणि वजन 193 ग्राम असेल.

हे देखील वाचा : Vodafone Idea चा धमाका, नवीन ग्राहकांसाठी लॉन्च केले हे स्वस्त आणि स्पेशल प्लान
स्पेसिफिकेशन्स
Tecno Spark 6 Go स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता फोन मध्ये वॉटरड्रॉप स्टाइल 6.52 इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 720×1,600 पिक्सल आहे. तसेच, फोनचा ऑस्पेक्ट रेश्यो 20:9 आणि पीक ब्राइटनेस 480 nits आहे. तसेच हँडसेट मध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो A25 SoC सपोर्ट मिळेल. Spark 6 Go मध्ये 4GB रॅम सह 64GB स्टोरेज मिळेल, जी माइक्रो एसडी कार्डच्या मदतीने 512GB पर्यंत वाढवता येईल.
फोटोग्राफीसाठी या बजेट फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याचा प्राइमरी कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आहे. तसेच अजून एका लेंसला सपोर्ट मिळेल. रियर कॅमेरा मध्ये AI HDR, AI Beauty, Bokeh Mode सारखे फीचर्स मिळतील. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाईल जो एलईडी फ्लॅश लाइट सह येईल. फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स देण्यात आले आहेत सोबतच हा डिवाइस फोन अँड्रॉइड 10 सह HiOS 6.2 वर काम करेल.
हे देखील वाचा : Samsung घेऊन येत आहे आपला सर्वात स्वस्त 5G फोन Galaxy A22, करेल का OnePlus Nord ची सुट्टी?
किंमत व ऑफर्स
Tecno Spark 6 Go स्मार्टफोन फक्त एकाच रॅम व स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे, ज्याची किंमत 8,699 रुपये आहे. पण, फोनची इंट्रोडक्टरी प्राइस 8,499 रुपये आहे. फोन Aqua Blue, Ice Jadeite, Mystery White कलर ऑप्शन मध्ये येईल. Spark 6 Go 25 डिसेंबरच्या दुपारी 12 वाजल्यापासून विक्रीसाठी ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट वर उपलब्ध होईल. तसेच ऑफलाइन स्टोर वर फोनची विक्री 7 जानेवारी पासून सुरु होईल. Tecno कडून फोन खरेदीनंतर 100 दिवसांपर्यंत वन टाइम स्क्रीन रिप्लेसमेंटची ऑफर दिली जात आहे.















