शाओमीच्या टीवी पेक्षा पण स्वस्त आहे या कंपनीचा 32 इंची स्मार्ट टीवी, फक्त 4,999 रुपये आहे किंमत

इंडियन बाजारात गेल्यावर्षी शाओमीने कमी किंमतीत स्मार्ट टीवी लॉन्च करून एका नव्या क्रांतीची सुरवात केली होती. हि क्रांती पुढे नेत आता सॅमी इंफोर्मेटिक नावाच्या कंपनी ने भारतीय बाजारात आपला स्वस्त स्मार्ट एंडरॉयड टीवी लॉन्च केला आहे.

या स्मार्ट टीवी ची किंमत फक्त 4,999 रुपये आहे. मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडिया अंतर्गत लॉन्च करण्यात आलेल्या या टीवी ची साइज 32-इंच आहे. पण जर तुम्ही हा टीवी विकत घेऊ इच्छित असाल तर त्याआधी तुम्ही याची संपूर्ण माहिती घेतली पाहिजे. चला हा स्मार्ट टीवी विकत घेण्याची पद्धत आणि याच्या स्पेसिफिकेशन्स बद्दल जाणून घेऊया.

32-इंचाचा हा एंडरॉयड टीवी विकत घेण्यासाठी तुमच्याकडे एंडरॉयड फोन असणे आवश्यक आहे. कारण कंपनीचा टीवी विकत घेण्यासाठी गूगल प्ले स्टोर वरून तुम्हाला सर्वात आधी सॅमी ऍप डाउनलोड करावा लागेल. या ऍपच्या माध्यमातून हा विकत घेता येईल. ऍप डाउनलोड केल्यानंतर हा बुक करावा लागेल. पण हा टीवी जीएसटी नंतर 5,899 रुपयांना पडेल. तसेच 1,500 रुपयांच्या शिपिंग कोस्ट नंतर हा टीवी तुम्हाला 7,400 रुपयांना पडेल.

इतकेच नव्हे तर हा टीवी विकत घेण्यासाठी ऍप मध्ये आधार नंबर गरजेचा आहे. तसेच टीवी मध्ये आधीपासूनच फेसबुक, यूट्यूब सारखे ऍप इंस्टॉल आहेत. नंतर तुम्ही तुमच्या आवडीचे ऍप पण इंस्टॉल करू शकता हा फक्त ऑनलाइन उपलब्ध होईल, ज्यासाठी कॅश ऑन डिलिवरी करता येईल.

याच्या स्क्रीनचे रेजॉलूशन 768 पिक्सल आहे. या टीवी वर यूजर्स मूवी, टीवी शोज बघू शकतात तसेच वेबपेज ब्राउजिंग आणि एंडरॉयड गेम खेळू शकतात. यात 4जीबी रॅम आणि 512 एमबी स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच टीवी मध्ये 2 यूएसबी पोर्ट, दो एचडीएमआई पोर्ट आणि वीजीए पोर्ट पण देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here