5G वापरण्याआधी जाणून घ्या महत्वाची बाब; कोणता फ्रीक्वेंसी बँड असेल तुमच्यासाठी बेस्ट

5G Spectrum Auction चा पहिला टप्पा पूर्ण झालं आहे आणि भारतीय टेलीकॉम ऑपरेटर्सना त्यांच्या वाट्याचे 5जी स्पेक्ट्रम मिळाले आहेत. लिलावात एकूण 10 बँड्सचा समावेश करण्यात आला होता ज्यात 700 MHz 5G Band चा देखील समावेशो होता. रिलायन्स जियोनं 88,078 कोटी रुपयांची बोली लावून सर्वाधिक 24,740 MHz स्पेक्ट्रमचं संपादन केलं आहे. लिलाव पूर्ण झाला आहे आणि आता फक्त 5G Service भारतात सुरु होण्याची प्रतीक्षा आहे. परंतु याआधी हे जे 5जी स्पेक्ट्रम लिलावात ठेवण्यात आले होते, त्यांचा अर्थ काय आणि त्यांचं काम काय हे जाणून घेणं आवश्यक आहे.

5G frequency band in India

या स्पेक्ट्रममुळे ही मोबाईल युजर्सना मिळणाऱ्या 5G Service ची गुणवत्ता आणि 5G Network तसेच 5G Internet ची क्वॉलिटी अवलंबुन असेल. 5G Spectrum Auction मध्ये भारत सरकारनं एकूण 10 5G frequency bands सामील केले होते. वरवर यांची विभागणी लो फ्रीक्वेंसी बँड, मिड फ्रीक्वेंसी बँड आणि हाय फ्रीक्वेंसी बँड अशी करता येते. यातील 600 MHz, 700 MHz, 800 MHz, 900 MHz, 1800 MHz, 2100 MHz, 2300 MHz आणि 2500 MHz लो फ्रीक्वेंसी बँडमध्ये येतात. तर 3300 MHz मीडियम फ्रीक्वेंसी बँड आहे तसेच 26GHz हाय फ्रीक्वेंसी रेडियो वेव्स बँड आहे.

High Frequency 5G Bands

हाय बँडचा वापर प्रामुख्याने जास्त लोकसंख्या घनता असलेल्या ठिकाणी केला जातो. High Frequency 5G Bands वर 3 Gbps पर्यंतचा स्पीड मिळवता येऊ शकतो. यात कव्हरेज एरिया मात्र कमी असतो परंतु जिथे हा बँड उपलब्ध होतो तिथे हाय फ्रीक्वेंसी सिग्नल मिळतो. हाय फ्रीक्वेंसी बँडला mm waves स्पेक्ट्रमच्या नावानं देखील ओळखलं जातं, जे 25Ghz ते 39Ghz दरम्यान येतात. हाय बँड टॉवरची उंची देखील कमी असते कारण बिल्डिंग इत्यादी गोष्टींमुळे नेटवर्कमध्ये अडथळा येतो. चांगल्या कव्हरेजसाठी छोट्या भागात जास्त मॉडेम टॉवरची आवश्यकता असते त्यामुळे याला येणार खर्च वाढतो.

Mid Frequency 5G Bands

कमी लोकसंख्या असलेल्या वस्त्यांमध्ये आणि छोट्या शहरांमध्ये मिड बँड जास्त उपयुक्त ठरू शकतो. हा हाय फ्रीक्वेंसी बँडपेक्षा जास्त भागात नेटवर्क देतो तसेच एकाच टॉवर किंवा मॉडेमच्या माध्यमातून दूरपर्यंत कव्हरेज पोहोचवता येते. यात इंटरनेट स्पीड हायबँडच्या तुलनेत थोडा कमी मिळतो. मिड बँड 5जीसाठी चार्ज देखील हाय बँडच्या तुलनेत कमी असेल.

Low Frequency 5G Bands

लो फ्रीक्वेंसी बँड ग्रामीण भागासाठी योग्य आहे. लो बँडवर सर्वात जास्त कव्हरेज एरिया मिळतो. यात हाय व मिड बँडच्या तुलनेत इंटरनेट स्पीड थोडा कमी होतो परंतु सिग्नलच्या बाबतीत हा सर्वात बेस्ट मानला जातो. Low Frequency Bands असलेले मोबाईल टॉवर जास्त उंचीवर उभारले जातात जे 6 ते 10 किलोमीटरच्या अंतरावर आपली रेंज पोहचवू शकतात. लो बँड 5जी 600MHz ते 850 MHz फ्रिक्वेंसी दरम्यान ऑपरेट करतात तसेच 50 ते 250 Mbps पर्यंतचा इंटरनेट स्पीड देण्यास सक्षम असतात. म्हणजे यावर सध्याच्या 4G Internet पेक्षा जास्त स्पीडच मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here