मागील काही दिवसांपासून पॉप्युलर विडियो मेकिंग ऍप TikTok चर्चेत आहे. अलीकडेच हा ऍप बॅन करण्यात आला होता. पण काही आठवड्यांत हा पुन्हा एंडरॉयड आणि आईओएस वर डाउनलोड साठी उपलब्ध करण्यात आला. या ऍपच्या प्रसिद्धीचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो कि अलीकडेच Tik Tok एंडरॉयड आणि आईओएस वर नंबर वन फ्री ऍप बनला होता. तसेच आता समोर आलेल्या माहिती नुसार हा ऍप सोशल मीडियाचा किंग असलेल्या फेसबुकला मागे टाकत आहे.
ऍप इंटेलिजेंस फर्म सेंसर टॉवर नुसार टिकटॉक ने वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 18 कोटी 80 लाख यूजर्स जोडले आहेत. इतकेच नव्हे तर मार्च 2018 पासून आता पर्यंत हा ऍप इंस्टॉल करण्याच्या बाबतीत 70 टक्के वाढ झाली आहे. तुम्हाला सांगू इच्छितो कि मागील काही दिवसांत TikTok साठी भारत सर्वात मोठी बाजारपेठ बनली आहे. हैराणीची बाब म्हणजे देशात TikTok बॅन झाल्यामुळे या चीनी कंपनीला रोज $500,000 यूएस डॉलर म्हणजे जवळपास 3.5 कोटी रुपयांचे नुकसान होत होते.
सोबत हा ऍप बनवणारी कंपनी शंघाई बाइटडांस टेक्नोलॉजी ने असे सांगितले होते कि भारतात TikTok बॅन झाल्यास 250 पेक्षा जास्त नोकऱ्या संपतील. कंपनी नुसार भारतात TikTok चे 300 मिलियन पेक्षा जास्त यूजर आहेत.
मागे TikTok वर बॅन केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने मद्रास हायकोर्टाला आदेश देऊन या ऍप वर अंतिम निर्णय देण्यास सांगितले होते. या ऑर्डर मध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटले होते कि मद्रास हायकोर्ट जर TikTok वरील बॅन संविधानिकरित्या का योग्य आहे हे सांगू शकत नसल्यास या ऍप वरील बॅन हटवण्यात येईल.
विशेष म्हणजे यावर्षीच्या पहिल्या तिमाहीत TikTok जगभरात तिसरा सर्वात जास्त इंस्टॉल केला जाणारा ऍप बनला होता. TikTok ने मार्चच्या तिमाहीत जगभरात 18.8 कोटी नवीन यूजर जोडले होते, ज्यात भारताचा वाटा 8.86 कोटी यूजर्सचा होता.














